नमस्कार मित्रांनो हल्लीच्या काळात सर्वजन हे कामाच्या धावपळीत असताना बघायला मिळतात. या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकजण हे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असतात. परंतु मित्रांनो काम करण्यासाठी आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले असावे लागते. जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत आपण कुठले कामे व्यवस्थित प्रकारे करू शकतो. म्हणजेच बघाना कुठलीही वस्तू असो त्या वस्तूला तिचा स्रोत मिळाल्याशिवाय ती वस्तू व्यवस्थित चालणारच नाही. उदाहरण द्यायचे म्हटले तर आपली मोटरसायकल बघा. तर आपली मोटर सायकल चालण्यासाठी तिला ऊर्जेची गरज असते तिला स्रोतेची गरज असते म्हणजे तिला इंधन दिल्याशिवाय ती चालणारच नाही. आणि जर तिला व्यवस्थित इंधन मिळाले तर ती व्यवस्थित चालू राहते. तर मित्रांनो आपल्या शरीराचे देखील असेच असते. जर आपल्याला आपल्या शरीराचे स्वास्थ्य जपायचे असेल तर आपण आपल्या शरीराची व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी.
आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सर्वच चांगल्या घटकांचा समावेश करायला हवा. आहारामध्ये नियमित पालेभाज्यांचा समावेश देखील करायला हवा तसेच आहारातून आपल्याला सर्व प्रकारचे विटामिन्स देखील मिळायला हवेत, असा आपला आहार असावा. आणि मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजेच आपण आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, आपले शरीराची गाडी व्यवस्थित धकवण्यासाठी आपण आपल्या शरीराकडून व्यायाम करून घेतला पाहिजे. हो मित्रांनो आपल्या शरीरासाठी व्यायाम हा फारच उपयुक्त ठरत असतो.
जर तुम्ही नेहमी तुमच्या दिनचर्येत व्यायामात समावेश करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराचे स्वास्थ्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतात. व्यायाम केल्यामुळे आपण अनेक रोगांपासून आजारांपासून दूर राहू शकतो. तसेच व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू लागते. आपण व्यायाम करणे म्हणजे एक प्रकारे शरीराला ऊर्जा मिळत असते. ज्यामुळे आपण कुठलेही कार्य सहज रित्या करू शकतो. ज्या प्रमाणे कुठल्याही इतर वस्तूंना त्यांना चार्जिंग मिळाल्याशिवाय ते व्यवस्थित चालत नाही तसेच आपल्या शरीराचे देखील असते. जर आपण आपल्या शरीराला व्यवस्थित चार्जिंग केली म्हणजेच व्यायाम केला तर आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. मित्रांनो व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होत असते. त्यामुळे शरीराची हालचाल झाल्यामुळे आपले अवयव हे लवचिक बनू लागतात.
तसेच शरीरातील प्रत्येक अवयव हा मजबूत बनू लागतो. शिवाय आपल्या शरीरातील हाडांची व्यवस्थित हालचाल त्यामुळे ते मजबूत देखील बनू लागतात. म्हणजेच व्यायाम केल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढत असते. आणि जर आपण नियमित व्यायाम करत असाल तर आपल्याला व्यायामाची सवय असल्यामुळे कुठलेही काम आपण सहज रित्या करू लागतो आणि त्यामुळे थकवा देखील येत नाही म्हणजे एक प्रकारे शरीराचा स्टॅमीना वाढू लागतो. तर मित्रांनो आज आपण नियमित व्यायामाचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, नियमित व्यायाम केल्याने कोणते कोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात? तसेच नियमित व्यायाम का करायला हवा? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
नियमित व्यायाम का करायला हवा?
मित्रांनो आपण आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करायला हवा. आपण नियमित व्यायाम केल्यामुळे एक प्रकारे आपल्या शरीराला योग्य ऊर्जा मिळत असते. तर मित्रांनो नियमित व्यायाम का करायला हवा याविषयी देखील आपला माहित असायला हवे. नियमित व्यायाम केल्यामुळे आपण एक ना अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी दिवसभरातील जो उत्साह असतो तो उत्साह दिवसभर टिकून राहतो. तसेच दिवसभर आपल्याला फ्रेश देखील वाटू लागते. नियमित व्यायामाची सवय असल्यामुळे आपले शरीर हे लवचिक बनू लागते शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यामुळे आपले शरीर स्थिर बनून लागते.
आजच्या या धावपळीच्या जगात सर्वच जण कामाच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांची व्यायाम करण्याची सवय निघून जात असते. परंतु अशामुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी जडू लागतात. शरीराचा लठ्ठपणा वाढू लागतो. त्याचप्रमाणे शरीराचे व्यवस्थित हालचाल न झाल्यामुळे अनेकांना संधिवाताची समस्या देखील येत असते. तसेच सारखे सारखे बसून काम केल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. आणि जर शारीरिक हालचाली केल्या नाहीत तर त्यामुळे डायबीटीस होण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, रोजच्या नियमित दिनचर्या तुम्ही व्यायामाचा समावेश करायला हवा. जेणेकरून तुम्ही अनेक व्याधींपासून दूर राहू शकाल.
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची ताकद देखील वाढू लागते. आणि कुठले काम करताना लवकर थकवा देखील येत नाही. जर घरातील व्यक्ती नियमित व्यायाम करत असतील तर त्या व्यक्तींचे पाल्य देखील नियमित व्यायामाचा सराव करू लागतात. कारण मोठ्यांचे अनुकरण घरातील लहान मुले करत असतात. आणि घरातील मोठे व्यक्ती सर घरात बसून बसून काम करत असतील तर लहान मुले देखील घरातल्या घरातच खेळ खेळतात बाहेर जाऊन खेळ खेळणे राहतात अशामुळे मुलांना लवकर लठ्ठपणा येऊ लागतो. म्हणून तुम्ही देखील व्यायाम करावा मुलांना देखील नियमित व्यायामाची सवय करायला हवी. मित्रांनो जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत व्यायामाची सवय ठेवली तर तुम्हाला त्याचे एक ना अनेक फायदे होऊ शकतील.
नियमित व्यायाम करण्याचे कुठल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात?
नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. शिवाय आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा देखील मिळू लागते. आपले शरीर हे मजबूत बनू लागते. अर्थातच व्यायाम केल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. तर मित्रांनो, व्यायाम करण्याचे नेमके अजून कोण कोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.
शरीराची पचनसंस्था वाढू लागते.
मित्रांनो, जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक अडचणी दूर होऊ लागतात. अनेक लोकांना अपचनाचा त्रास होत असतो. जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत नियमित व्यायामाची सवय ठेवली असेल तर तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकतात. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील सर्व हालचाली या योग्यरीतीने होऊ लागतात तसेच शरीराच्या हालचाली व्यवस्थित झाल्यामुळे आपण कुठले अन्न जे खात असू त्याचे पचन देखील व्यवस्थित प्रकारे होऊ लागते. अर्थातच नियमित व्यायामाची सवय ठेवल्यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली या योग्यरीतीने होत असतात त्यामुळे आपल्या शरीराचे पचनसंस्थेवर त्याचा चांगला परिणाम होत असतो. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन सुलभ होण्यास मदत होते. आपली शरीराची पचन संस्था देखील मजबूत होऊ लागते.तर हे नियमित व्यायाम करण्याचे काही फायदे आहेत.
केसांची वाढ चांगल्या रीतीने होण्यास मदत होते.
मित्रांनो नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला आणि प्रकारचे फायदे होत असतात. तसेच अनेक जणांना केसां बद्दल समस्या येत असतात. म्हणजेच केस गळती होणे केसांची वाढ व्यवस्थित न होणे या अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. तर व्यायाम केल्यामुळे या समस्या देखील दूर होऊ शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्या संपूर्ण शरीराचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होऊ लागते.
शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे शरीरातील अनेक आजारांपासून आपण दूर जाण्यास मदत होत असते शिवाय केसांच्या ज्या तक्रारी असतील त्या देखील नाहीशा होऊ लागतात. ज्या लोकांचे अकाली केस पांढरे होत असतील तर त्यांना व्यायामामुळे फायदे होऊ शकतात. व्यायाम केल्यामुळे केस गळती देखील थांबू लागते. तर शरीराचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित झाल्यामुळे केस लांब देखील वाढू लागतात.तर हे नियमित व्यायाम करण्याचे काही फायदे आहेत.
व्यायाम केल्यामुळे शरीराची हाडे मजबूत व शरीर लवचिक बनते.
मित्रांनो, नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होत असते. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराचे अवयव यांची व्यवस्थित प्रकारे हालचाल झाल्यामुळे आपले शरीर हे लवचिक बनू लागते. तसेच शरीरातील हाडांचा देखील एक प्रकारे व्यायाम होत असतो. त्यामुळे आपल्या शरीराची हाडे देखील बळकट व मजबूत करू लागतात.
आपल्या शरीराची हाडे ही बळकट आणि मजबूत असली तर आपण संधिवात यासारख्या आजारापासून देखील दूर राहू शकतो. शिवाय आपल्या शरीराची हाडे मजबूत व आपले शरीर लवचिक बनल्यामुळे आपण कुठलेही काम हे न थकता काम करू शकतो. म्हणजेच एक प्रकारे आपल्या शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढत असते. आणि आपल्या शरीराची ताकद देखील वाढू लागते. एक प्रकारे आपल्या शरीरात उत्साह निर्माण होण्यास मदत होत असते.तर हे नियमित व्यायामाचे काही फायदे आहेत.
नियमित व्यायाम केल्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
नियमित व्यायाम करण्याची सवय असल्यामुळे आपण एकदा अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराच्या सतत हालचाली होत राहतात. आणि त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण हे वाढत नाही. ज्यामुळे आपण डायबिटीज या सारख्या आजारापासून दूर राहू शकतो. तसेच नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या खेळण्याची अतिरिक्त चरबी देखील कमी होऊ लागते.
यामुळे आपण लठ्ठपणा या आजारांपासून देखील दूर राहू शकतो. आणि लोकांना पोट साफ न होण्याच्या समस्या देखील येत असतात. नियमित व्यायाम करण्याची सवय असल्यामुळे शरीराची पचनसंस्था चांगली होऊन पोट साफ होण्यास मदत होत असते. अनेकांना सतत एकाच ठिकाणी बसून काम करावे लागत असते. आणि जर ते काम करण्यापूर्वी सकाळी रोज उठल्यावर व्यायाम करण्याची सवय असेल तर त्यामुळे त्यांना थकवा देखील येत नाही शिवाय त्यांची शरीराची ताकद देखील वाढत असते. त्यामुळे त्यांचा दिवसभरातील उत्साह टिकून राहतो. आणि एक ना अनेक आजारांपासून ते देखील दूर होऊ लागतात.तर हे नियमित व्यायामाचे काही फायदे आहेत.
नियमित व्यायाम केल्यामुळे श्वसना संदर्भात येणाऱ्या समस्या पासून आपण दूर राहू शकतो.
मित्रांनो व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी प्रत्येक हालचालीसाठी वेग वेगळ्या प्रकारचा व्यायाम असतो. त्याच प्रमाणे आपण जर अनुलोम-विलोम व्यायाम नियमितपणे करत असाल तर शरीराची श्वसन संस्था चांगली राहण्यास मदत होत असते. बऱ्याच जणांना श्वसनाच्या समस्या येत असतात. आपल्या सुचना संदर्भ त्रास होऊ नये यासाठी आपण नियमितपणे व्यायामाचा सराव करणे गरजेचे ठरते. नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील क्रिया या व्यवस्थित घडण्यास मदत होत असते. तर हे नियमित व्यायामाचे काही फायदे आहेत.
व्यायाम करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी?
मित्रांनो आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी नियमितपणे आपण व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते शिवाय आपल्या शरीराची ताकद देखील वाढू लागते. व्यायामामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति देखील चांगल्या पटीने वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते व आपल्या शरीर निरोगी राहण्यास मदत होत असते.
नियमित व्यायाम केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहू शकतो. त्याचप्रमाणे, आपण कोणतेही काम करत असताना आपल्याला लवकर थकवा येत नाही. परंतु मित्रांनो जर तुम्हाला काही शारीरिक समस्या असतील म्हणजेच गुडघे दुखत असतील किंवा इतर काही तक्रारी असतील तर तुम्ही अशा वेळेस व्यायाम करणे टाळायला. जर नुकतेच ऑपरेशन झाले असतील तर अशा वेळेस देखील तुम्ही व्यायाम करणे शक्यतो टाळायला हवे. आणि करायचा असल्यास डॉक्टरांना विचारूनच करावा. व्यायाम करणे हे चांगली गोष्ट आहे कारण की यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे शरीराला होत असतात परंतु शरीराला काही इजा झाली असल्यास अशा वेळी व्यायाम करणे शक्य टाळायला हवे.
तर मित्रांनो, व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तसेच नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरात उत्साह टिकून राहतो. तसेच आपले मन प्रसन्न व देखील राहते. अनेक आजारांपासून देखील आपण दूर राहू शकतो. आपल्या शरीराला चार्ज करण्यासाठी आपण नियमित व्यायाम करायला हवा.तर हे नियमित व्यायामाचे काही फायदे आहेत.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.