तर आपण सर्वांनीच एक गोष्ट तर बघितले असेल की आपल्या बेंबीमध्ये बऱ्याच वेळेस एक कापसासारखा पदार्थ तयार होतो. पण नक्की प्रश्न असा पडतो की हा बेंबीत तयार होणारा कापसासारखा पदार्थ आला तरी कुठून ? आणि हा आपल्या बेंबीमध्ये तरी कस काय आला ? तर मित्रांनो आज आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. हा आपल्या आज महत्त्वाचा मुद्दा आहे पण याच बरोबर आपण हे देखील जाणून घेणार आहोत की आपण आपली बेंबी कसे स्वच्छ ठेवू शकतो. त्यातील कचरा आपण कोणत्या पद्धतीने साफ करू शकतो.
जेणेकरून आपली बऱ्याच आजारांपासून सुटका होईल तर आजारांपासून सुटका होईल. आता तुम्ही म्हणाल की बेंबी साफ ठेवल्याने कोणत्या आजारांपासून सुटका मिळेल तर आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये असे लिहिलेले आहे की आपली बहुतांश रोगप्रतिकारक शक्ती ही बेंबी मध्ये असते. तसेच जर तुम्ही बेंबी साफ केली तर तुमचे शरीर देखील साफ राहील असे मानले जाते. यासाठी बरेच उपाय आहेत हेदेखील आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया.
Table of Contents
बेंबीत तयार कचरा कसा साफ करावा ?
चला जाणून घेऊ या की आपण आपली बेंबी कोणत्या प्रकारे साफ ठेवू शकतो तसेच सोपा सरळ घरगुती उपाय देखील आपण बघूया चला तर मग.
ओला कापूस :
अंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमची बेंबी स्वच्छ व कोरडी ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण पूर्ण शरीर पुस्तक कोरडे करतो पण बेंबी पुसतच नाही. यामुळे बेंबळी ओली राहते आणि त्याच्या मध्ये कचरा साचत जातो आणि हे देखील एक कारण असू शकते आजारी पडण्याचे. वैज्ञानिका नुसार आपल्या बेंबीमध्ये 800 वेगवेगळ्या प्रकाराचे छोटे-छोटे बॅक्टेरिया असतात. म्हणून तुम्ही तुमच्या बेंबीची काळजी घेणे फार गरजेचे आहे.
तर तुम्ही आंघोळ झाल्यानंतर एक ओला कापून घ्यावा आणि तो बेंबीवर एक पाच मिनिटात कसा ठेवावा. तसेच तो हळूहळू व अलगद बोटाने थोडीसी मसाज करावी आणि पाच मिनिटानंतर तो कापूस काढावा. तो कापूस थोडासा पिवळसर झालेला असेल. असे तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा एकदा केले तरी तुमची बेंबली साफ राहण्यास मदत होईल.
कोमट तेल वापरावे :
तुम्ही नेहमी बेंबी करण्यासाठी कोमट कोमट तेल देखील वापरू शकता. ते कसे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे साधारण तेल वापरू शकतात. तसेच तुम्ही खोबऱ्याचे तेल किंवा तिळाचे तेल वापरले तर अतिउत्तम झोपण्याआधी तुम्ही थोडेसे कोमट तेल गरम करून घ्यावे. त्यानंतर त्या तेलाचे दोन ते तीन थेंब बेंबीमध्ये टाकावे आणि टाकल्या नंतर बेंबीची घड्याळाच्या दिशेने मसाज करावी. साधारणता दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर बेंबीवर कापूस ठेवावे जेणेकरून उरलेले तेल व कचरा कापसामध्ये जिरून जाईल आणि त्यानंतर कापूस फेकून द्यावा अशा प्रकारे देखील तुम्ही तुमची बेंबी साफ करू शकता.
बेंबीत तयार होणारा कापसासारखा पदार्थ हा नेमका काय असतो ?
तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया की नक्की बेंबीत तयार होणारा हा कापसा पदार्थ काय असतो चला तर मग जाणून घेऊया नक्की हा पदार्थ काय असतो.
आपण वेगवेगळ्या ऋतूनुसार वेळ कपडे वापरतो तसेच माणसं वेगळे कपडे वापरतात व स्त्री वेगळे कपडे वापरतात. त्याच प्रकारे कधी कधी कोणी 24 तास कपडे घालून असतो तर कधी कधी कोणी थोड्यावेळासाठी कपडे बाजूला ठेवतात. आता तुम्ही म्हणाल की याचा बेंबीशी काय संबंध तर संबंध आहे. आपण जे कपडे घालतो त्यामध्ये बारीक रेशीम असतात आणि आपण सतत कपडे घातल्याने ते बारीक रेशीम चे धागे आपल्या पोटाजवळ येतात. आणि कपड्याचे म्हणजेच बनेल, टी शर्ट, शर्ट, टॉप अशा कपड्यांचे रेशीमचे बारीक धागे आपल्या बेंबीमध्ये आढळतात.
तरी हे रेशीम मुख्यता अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तुम्ही जर आंघोळ करून आले असाल आणि ओले असतानाच कपडे घातले असेल तर हा कापसासारखा पदार्थ तुमच्या बेंबीमध्ये तयार होऊ शकतो. दुसरे म्हणजे तुम्ही बरेचदा विरळ झालेले किंवा जाडसर कपडे घातले तरी देखील हा बेंबीमध्ये पदार्थ आढळून येतो. असे सर्वांसोबत होते याची शाश्वती नाही पण बरेच लोकांना हा पदार्थ आपल्या बेंबीमध्ये आढळून येतो आणि ही एक सामान्य बाब आहे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही.
बेंबीतील कचरा साफ करण्याचे सोपे व घरगुती उपाय !
जाणून घेऊया सहज व सोपे घरगुती उपाय बेंबीतील कचरा साफ करण्यासाठी चला तर मग बघुया.
कापसाच्या बर्ड्सचा वापर करावा :
कापसाचे बर्ड्स सगळ्यांनाच माहिती असेल आपण कान साफ करण्यासाठी त्याचा वापर करतो तेच तुम्ही बेंबी साफ करण्यासाठी देखील वापरू शकता. तर तुम्ही गरम पाण्यामध्ये तो बर्ड्स ओला करून बेंबी साफ करू शकता किंवा खोबऱ्याचे तेल लावून देखील तुम्ही बेंबी सहज व सोप्या रितीने साफ करू शकता.
केळाच्या साला चा वापर करू शकता :
तुमच्या बेंबीच्या आजूबाजूस काळेपणा चा थर झाला असेल तर तुम्ही केळ्याचे साल थोडे बारीक पेस्ट करून त्या ठिकाणी लावू शकतात व हलक्या बोटांनी तिकडे मसाज करावी. बेंबीच्या जवळ भागास मसाज करून झाल्यावर दोन-तीन ठेव गुलाबजल चे थेंब टाकून पुन्हा एकदा एक ते दोन मिनिटं हलक्या हाताने मसाज करावी. तुमच्या बेंबीचा काळेपणा दूर होईल बी साफ होण्यास मदत होईल.
कोणती काळजी घ्यावी ?
रोज बेंबी साफ करू नये असे केल्याने बेंबी लाल होईल आणि थोडी सुजल्यासारखे वाटेल याची दक्षता घ्यावी. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा बेंबी साफ करावी. तसेच जर एखादी स्त्री गरोदर असेल असेल तर तिने तिच्या बेंबी कडे फार लक्ष द्यावे. कारण बाहेरील बॅक्टेरिया बेंबीचे माध्यमातून सहज तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. याचप्रकारे बेंबीमध्ये कोणते प्रकारचे इन्फेक्शन आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य तील ट्रीटमेंट चालू करावी.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की नक्की बेंबीत तयार होणारा कापसासारखा पदार्थ काय असतो. याच प्रकारे आपण बी साफ करण्यासाठी काही घरगुती व सोपे उपाय देखील बघितले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !