डोकं दुखत असेल तर घरगुती उपाय

0
1276
डोकं दुखत असेल तर घरगुती उपाय
डोकं दुखत असेल तर घरगुती उपाय

 तर आजकाल डोकेदुखी ही एक सामान्य अडचण झालेली आहे. कारण आजकालच्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाला कामाचा टेन्शन असतो कामाचा ताण असतो. यामुळे बहुतांश लोकांचे डोकेदुखी ही कामाच्या त्रासामुळे असते. तसेच हे खूप लोकांची डोकेदुखी खूप वेळ काम केल्याने किंवा पूर्ण वेळ झोप न घेतल्याने विश्रांती न घेतल्यामुळे देखील डोकं दुखू शकते. बरेच वेळेस आपल्या डोळ्यांमधून खूप उष्णता बाहेर पडत असतील आणि जर आपल्या शरीराला योग्य ती विश्रांती भेटली नाही तर आपले डोके दुखू लागते. जर काही इतर कारणामुळे डोकं दुखत असेल तर आपण त्यावर आज काही माहिती बघणार आहोत आणि त्यावर काही उपाय देखील करून बघणार आहोत तर तुम्ही चे उपाय तुमच्या घरी सहज करू शकतात.

डोके दुखण्याची कारणे

                   तर आपण डोकेदुखी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली आता आपण या डोकेदुखीची कारणे जाणून घेऊया चला तर मग बघुया.

कामाचा तणाव :

              तर बऱ्याच वेळेस जसे की आपण बघितलं कामाचा तणाव खूपच असतो. हाच कामाचा तणाव एका वयानंतर असह्य होतो आणि मग डोकं दुखू लागतो म्हणून कामाचा तणाव घेऊ नये तसेच शरीराला झेपेल इतकेच काम घ्यावे

अवेळी झोप व अवेळी काम :

               अवेळी झोप घेणे किंवा आजकाल मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे तर रात्र रात्रभर जागून मोबाईल बघणे. यामुळे झोपेची वेळ बदलणे तसेच अवेळी काम करणे यामुळेदेखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

पुरेशी विश्रांती न भेटणे :

             आपण आपल्या शरीराकडून किती व कसे काम करून घ्यावे हे आपल्या हातात असते. पण यात शरीराला पुरेशी विश्रांती मिळते की नाही हे बघणे देखील आपले काम आहे. सर्वात आधी शरीराला पुरेशी विश्रांती दिली पाहिजे पुरेशी विश्रांती दिल्यामुळे बरेचसे आजार दूर होण्याची शक्यता असते.

वाचा  वेलदोडा खाण्याचे फायदे काय आहे जाणून घेऊयात

अति सर्दी मुळे :

                  खूप लोकांना दोन-दोन तीन-तीन दिवस सर्दी असते आणि सर्दी खूप दिवस असल्यामुळे डोक्याच्या नसा ताणल्या जातात. यामुळे डोकेदुखी होते तर वरील प्रमाणे तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी तसेच स्वतःमध्ये थोड्या प्रमाणेमध्ये का होईना बदल करावा.

डोकेदुखी वर उपाय :

                  तर आपण डोकेदुखी बद्दल अधिक माहिती जाणून घेतली तसेच यावर आपण कारणे देखील बघितली आता आपण जाणून घेणार आहोत यावर कोणकोणते घरगुती उपाय आहे ते आपल्याला सहज पद्धतीने करता येतील चला तर मग बघुया.

पुरेशी झोप घेणे :

                 बऱ्याच वेळेस 50% आजार हे पुरेशी झोप न घेतल्यामुळे होतात. म्हणून जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमच्या शरीराला देखील दुसऱ्या दिवशी काम करण्यास उत्साह येईल व तुमचे काम देखील चांगल्या रीतीने पार पडेल. तसेच जर तुमचे डोकं दुखत असेल तर किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही जर पुरेशा प्रमाणामध्ये झोप घेतली तर तुम्हाला चांगले वाटेल. तसेच तुमची जी अडचण होती ती देखील दूर होण्यास मदत होईल आपला मेंदू चोवीस तास काम करत असतो मग त्याला विश्रांतीची देखील गरज असते. आणि मेंदूला जर हवी ती विश्रांती मिळाली नाही तर डोळे लाल होतात डोक्याच्या दोन्ही बाजूस दुखू लागते सर्व कोणतेही काम करण्यास आपल्याला रुची राहत नाही म्हणून तुम्ही सर्वात आधी शरीराला पुरेशी विश्रांती व पुरेशी झोप दिली पाहिजे.

चुकीच्या सवयी बदला :

                    आज-काल आपल्याला वाईट सवय फार लवकर लागतात आणि यामुळे आपला पूर्ण दिनक्रम विस्कळीत होतो. चुकीच्या सवयी मध्ये मुख्य अवेळी व उशिरा रात्रीपर्यंत काम करणे तसेच मोबाईल वापरणे. अशाने काय होतं की तुम्ही जेव्हा रात्री रात्र उशीरापर्यंत मोबाईल वापरतात किंवा लॅपटॉपवर काम करतात त्यामुळे सतत तुमच्या डोळ्यांमध्ये प्रकाश जाऊन जाऊन डोळे लाल होतात. तसेच डोळ्यांच्या नसा व डोक्याच्या नसा तानवतात यामुळे देखील डोळ्यांच्या आणि डोक्याच्या बाजुस दुखू लागतो यावर एक उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी काकडीचे तुकडे ठेवावे जेणेकरून काकडीचे तुकडे डोळ्यातील सर्व उष्णता शोषून घेतील आणि तसेच आपल्या रोजच्या जीवनामधील पहिल्या तर या चुकीच्या सवयी बदला यामुळे तुमची जीवन विस्कळीत होणार नाही तसेच.

वाचा  स्वप्नात फुलपाखरू दिसणे शुभ की अशुभ

गरम पाण्याचा वाफा द्या :

                  बऱ्याच वेळेस सर्दी झाल्याने देखील डोकं दुखू लागतो म्हणून वारंवार सर्दी असेल तर गरम पाण्यामध्ये निलगिरी टाकून त्याच्या वाफवून घ्यावा जेणेकरून वारंवार सर्दी होणार नाही व डोकेदुखी देखील बंद होईल.

कोमट तेलाने मालिश करावी :

                  खोबर्याच्या तेलाने किंवा कोणत्याही इतर तेलाने डोक्याची मसाज करावी. तसेच गरम करून घ्यावे जेणेकरून चांगल्या रीतीने डोक्याची मसाज होईल व डोकेदुखी देखील काही प्रमाणामध्ये आटोक्यात येईल.

 आल्याचा रस करेल कमाल :

                  आल्याचा रस हा डोकेदुखी साठी एक रामबाण उपाय आहे. रसामुळे ताणलेल्या नसा मोकळ्या होतात व डोकेदुखी तात्काळ थांबते यासाठी तुम्ही एक चमचा आल्याचा रस त्याचे सेवन करू शकतात. किंवा एक चमचा आल्याचा रस मध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून देखील सेवन केल्यास तत्काळ डोकेदुखी दुखी थांबू शकते.

                 तर आपण आज डोकेदुखी बद्दल बरीचशी माहिती बघितली आणि डोकेदुखीची कारणे बघितली त्यावर उपाय देखील जाणून घेतली. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

    

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here