नमस्कार, मित्रांनो हल्लीच्या धावपळीच्या जीवनात, धावपळ करून थकवा येणे, तसेच धुळीची ॲलर्जी, वेळी-अवेळी खाणे, जागरण यासारख्या समस्यांमुळे, डोळ्याला लाली येते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. तसेच कॉम्पुटर वर, सतत काम करून, तसेच विद्यार्थी म्हणजे लहान मुले सतत पुस्तकात डोकावून, तसेच मोबाईल सतत डोकावून, त्यांच्या डोळ्यांची आग होते. तसेच तुमच्या डोळ्यांची आग कशामुळे होते? तसेच तुम्हाला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये डोळ्यांची जळजळ होते का? तसेच होते डोळे आल्यासारखे वाटतात, झोप लागत नाही, अक्षरशः डोळे अतिशय लाल दिसते, त्यालाच डोळ्यांची जळजळ होणे, असे म्हणतात.
आज आपण जाणून घेणार आहोत, की डोळ्यांची जळजळ होणे म्हणजे नेमके काय? ज्यावेळी डोळ्यांची जळजळ होते, त्यावेळी त्याची नेमकी कारणे व त्याची काही लक्षणे व त्यावर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की डोळ्यांची जळजळ होण्याची नेमकी कारणे कोणती?
Table of Contents
डोळ्यांची जळजळ होण्याची कारणे?
डोळ्यांची जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत. ती आपण जाणून घेऊयात!
- उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे डोळ्यांना हा त्रास होऊ शकतो.
- सतत मोबाईल वर टीव्हीवर कॉम्प्युटर वर नजर असल्यामुळे, डोळ्यांची आग होते व जळजळ होते.
- सतत शिवन काम करणाऱ्या महिलांचे ही डोळ्यांची आग होते जळजळ होते.
- ज्यांच्या शरीरात उष्णता आहे, अशा लोकांनाही डोळ्यांची आग होते.
- बाहेरील धुळीचे कण डोळ्यात गेल्याने, हे डोळ्यांची आग होते.
- पुरेशी झोप न होने, जागरण करणे, यामुळेही डोळ्यांची जळजळ व आग होते.
- शारीरिक थकवा आल्याने, ही डोळ्यांची आग होते जळजळ होते.
- तसेच बाहेर कंटिन्यू नऊ ते दहा तास बाईक वर प्रवास केल्याने, डोळ्यांची जळजळ होऊ शकते.
डोळ्यांची जळजळ होत असेल त्या पूर्वीची काही लक्षणे
वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की डोळ्यांची जळजळ नेमक्या कोणत्या कारणांमुळे होते, आता आपण त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात!
- ज्यावेळी डोळ्यांची जळजळ होते, तेव्हा डोळे लाल दिसायला सुरुवात होते.
- डोळ्यांची आग होते.
- गोळी सारखे उघडझाप करताना, त्रास होतो, पाणी येते.
- कधीकधी भुरकट दिसते.
- नाकातून पाणी येते.
- थोडे डोके दुखायला सुरुवात होते.
डोळ्यांची जळजळ होत असेल, त्याच्यावर काही घरगुती उपाययोजना!
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की डोळ्याची जळजळ होण्याची कारणे व लक्षणे आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. आता आपण डोळ्यांना हा त्रास होत असेल, तर त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊयात. चला तर मग बघुयात!
कोरफड वापरून बघा
हो, जर तुमच्या डोळ्यांची जळजळ व आग होत असेल, अशावेळी तुम्ही कोरफड वापरू शकतात.
ती कशी? तर तुम्हाला कोरफड घ्यायची आहे, तिला मधोमध कापून, तिच्या स्लाईसेस करायचे आहे, आणि मग ते डोळे बंद करून डोळ्यांच्या वर दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचे आहे. याने डोळ्यातील उष्णता बाहेर निघेल. शिवाय जळजळ व आग होण्याचे समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. तसेच तुम्ही कोरफडचा जेलचा बर्फही करू शकतात. त्यासाठी तुम्ही आईस ट्रेमध्ये कोरफडचा गर टाकून, तो फ्रीजमध्ये ठेवावा, आणि नंतर तो काढून, एका कापडात गुंडाळून डोळ्यांवर व डोळ्यांचे आजूबाजूला त्याने शेक दिल्यास, तुमच्या डोळ्यांची जळजळ कमी होऊन, लाली कमी होते.
काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा
डोळ्यांची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे, तसे डोळ्यांवर लाली येणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला काकडीचे काप फार फायदेशीर ठरतात. काकडी ही पूर्वीच्या काळापासून डोळ्यांची आग होण्यावर वापरली जात आहे. यासाठी तुम्ही जर काकडीचे काप करून डोळ्यांच्या पापण्यांवर दहा ते पंधरा मिनिटे ठेवले, तर तुमच्या डोळ्यांची आग कमी होईल, असे तुम्हाला दिवसातून तीन ते चार वेळेस करावयाचे आहे.
थंड पाण्याच्या घड्या ठेवा
हो, डोळ्यांची आग होणे, जळजळ होणे, तसेच डोळे उघड झाप करताना त्रास होणे, अशा समस्या वर जर तुम्ही अतिशय थंड पाणी घेऊन, त्यात एक छोटा नॅपकिन बुडवून, थोडासा पिळून तो डोळ्यांच्या पापण्यांवर 15 ते 20 मिनिटे ठेवावेत. कोरडा झाल्यास परत ओला करून, डोळ्यांच्या पापण्या वर ठेवावे. म्हणजे तुमची डोळ्यांची आग होणे, सारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. असे तुम्हाला दिवसातून तीन ते चार वेळेस करावयाचे आहे.
कच्चा बटाटा वापरून बघा
कच्चा बटाटा हा तुमच्या डोळ्याची आग व लाली थांबवण्यासाठी प्रभावशाली आहे. त्यासाठी तुम्हाला एक बटाटा घेऊन, त्याचे काप, स्लाईसेस करून, पंधरा ते वीस मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवावे. त्यानंतर ते काप म्हणजेच स्लाईसेस, तुम्ही दुपारच्या वेळी डोळ्यांच्या पापण्यांवर 15 ते 20 मिनिटे ठेवावेत. शिवाय बदलत राहावे, त्याने तुमच्या डोळ्यांची आग होण्यासारख्या, समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
गुलाब जल चा वापर करून बघा
गुलाब जल हे थंड असते, जर तुमच्या डोळ्यांची आग होत असेल, अशावेळी जर तुम्ही कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल घेऊन, डोळ्यांचे आजूबाजूला सर्कुलेशन पद्धतीने मसाज केला, तर तुमच्या डोळ्यांची जळजळ ची समस्या हळू कमी होईल. शिवाय कमी होईल, तसेच तुम्ही गुलाबजल चे एक थेंब तुम्ही डोळ्यात टाकले, तर डोळ्यांना थंडावा मिळून जळजळ कमी होईल.
डोळ्यांची आग थांबवण्यासाठी कोणते ड्रॉप घ्यावे?
डोळ्यांची जळजळ होत असेल, आग होत असेल, अशावेळी तुम्ही डॉक्टरांना विचारून त्यांच्या सल्ल्यानुसार डोळ्यात टाकण्याचे ड्रॉप घेऊ शकतात.
डोळ्यांची आग होत असेल त्या वेळी कोणती काळजी घ्यावी?
ज्यावेळी तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल, तर तुम्ही काही काळजी घ्यायला हवी? ती आपण जाणून घेऊयात.
- डोळे नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावेत व कपड्याने पुसावे,
- बाहेर जायच्या वेळेस डोळ्याला चष्मा किंवा गॉगल लावावेत.
- उन्हात जाणे शक्यतो टाळावे.
- पुरेशी झोप घ्यायला हवी, पुरेशी झोप झाल्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास कमी होतो.
- धुळीच्या वातावरणात जाऊ नका, त्याचे कण डोळ्यात जाऊन, अजून डोळ्यांची आग वाढण्याची शक्यता असते.
- थंड पदार्थांचे सेवन करा.
- जर तुम्ही डोळ्यात लेन्स लावत असेल, तर डोळ्यांची जळजळ ज्यावेळी होते, त्यावेळी तुम्ही डोळ्यात लेन्स लावणे शक्यतो टाळावेत.
- सतत टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वर काम करू नका.
- डोळे सारखे – सारखे चोळू नका. त्याने इन्फेक्शन अजून वाढण्याची शक्यता असते.
- शिवाय बाहेरून आल्यावर डोळ्यांना थंड पाण्याने धुवावे.
चला, तर मग आज आम्ही तुमच्या डोळ्यांची जळजळ होणे, यावर काही कारणे लक्षणे व उपाय सांगितलेले आहेत. तसेच तुमच्या डोळ्यांची आग होत असेल, तर तुम्ही नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, ते आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, जर डोळ्यांचा त्रास थांबत नसेल, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना दाखवावे, आणि त्यांच्याकडून ड्रॉप्स द्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद