गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती

0
599
गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती
गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती

नमस्कार मित्रांनो. आई होणे हा स्त्रीच्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण असतो. घरात कोणीतरी नवीन पाहुणा येणार यासाठी घरातील वातावरण देखील आनंदी आणि उत्साहाचे निर्माण झालेले असते. म्हणून गर्भवती महिलेची घरातील सगळेच लोक काळजी घेत असतात. गर्भवती महिला व तिचा होणार बाहेर कसे सुखरूप राहील यासाठी बरीच काळजी घेतली जात असते त्याचप्रमाणे गर्भवती महिलेने काय करावे ? काय करू नये ? कुठली कामे केली पाहिजे ? गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती कशी असावी ? तसेच कुठल्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजे ? याबद्दल देखील काळजी घेतली जात असते. आणि अशात जर घरामध्ये प्रौढ स्त्रिया म्हणजे वयस्कर स्त्रिया असतील तर ते अजूनच जास्त तिची काळजी घेत असतात.

गर्भवती महिला चा आहार कसा असावा त्याचप्रमाणे तिला आहारामध्ये कुठले घटक पोषक तत्व मिळायला हवे अगदी याबद्दल देखील काळजी घेतली जात असते. म्हणजेच जेवढे गर्भवती महिलेची काळजी घेतली जाते तेवढी तिच्यासाठी ते आवश्यक देखील ठरत असते. बर्‍याच गर्भवती महिलांना झोप व्यवस्थित न लागण्याची समस्या देखील उद्भवत असते. झोपे संदर्भात बर्‍याच गर्भवती महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की झोपताना नेमके कसे झोपावे ? गर्भावस्थेत दरम्यान आपण कशाप्रकारे झोपले पाहिजे जेणेकरून पोटातील बाळाला त्रास होणार नाही? गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती नेमकी कशी असायला हवी? याबद्दल देखील माहिती जाणून घेणे आवश्यक ठरत असते.

तर मित्रांनो, आज आपण गरोदरपणात झोपण्याची स्थिती ही कशाप्रकारे असायला हवी? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती कशाप्रकारे असायला हवी याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

गरोदरपणामध्ये कोणत्या स्थितीमध्ये झोपणे टाळावे ?

गर्भधारणेदरम्यान झोपण्याची स्थिती नेमकी कशी असावी ? रे उलटी झोपले तर याने काही नुकसान तर होणार नाही तसेच अरे आपण पोटात झोपलो होतो, आता काय होईल ?  तर मित्रांनो याबद्दल तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. कारण झोपताना अनावधानाने झोपण्याच्या स्थिती या आपोआप बदलत असतात. त्यामुळे तुम्ही उठल्यावर चिंता करत बसणार की अरे देवा मी तर उलटी झोपली होती, मी तर सरळ झोपली होती त्यामुळे चिंता अजून वाढतात. आणि झोप देखील व्यवस्थित लागणार नाही. 

वाचा  हाड फ्रॅक्चर झालंय? हाड फ्रॅक्चर आहे हे कसे ओळखतात?

फक्त झोपताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे झोपताना सरळ झोपणे टाळले पाहिजे कारण, गरोदरपणामध्ये सरळ झोपल्यामुळे बीपीचा त्रास वाढू शकतो. त्याचप्रमाणे, सरळ झोपल्यामुळे पूर्ण वजन हे पाठीवर पडल्यामुळे पाठीचा कणा दुखू शकतो. आणि कंबर देखील दुखू शकते. त्याच प्रमाणे सरळ झोपल्यामुळे रक्त पुरवठा हा व्यवस्थित प्रकारे होत नाही. म्हणजेच बाळाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असतो. परिणामी बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्व झोपल्यामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे सरळ झोपल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास देखील होत असतो म्हणजे छाती मध्ये जळजळ होऊ शकते. 

गरोदरपणामध्ये कशाप्रकारे झोपायला हवे ?

   गरोदरपणामध्ये गरोदर बाईला पुरेपूर विश्रांती घेण्याची खूप आवश्यकता असते. त्यामुळे तिची झोप व्यवस्थित प्रकारे झाली पाहिजे. बऱ्याच गरोदर महिलांना गरोदरपणामध्ये नेमके झोपावे तरी कसे? हा प्रश्न पडलेला असतो. गरोदर पणात गरोदरपणामध्ये नेमकी झोपण्याची स्थिती कशी असावी? आपण कशा प्रकारे झोपावे? अशा एक ना अनेक प्रश्नाने गरोदर महिला ग्रस्त झालेल्या असतात. गरोदरपणामध्ये झोपताना व्यवस्थित काळजी घ्यावी लागत असते. म्हणजेच गरोदरपणामध्ये झोपतांना पोझिशन ही योग्य प्रकारे असायला हवे जेणेकरून बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गरोदरपणामध्ये कशाप्रकारे झोपायला हवे ? झोपण्याची पोझिशन ही कोणत्या प्रकारे असावी ? हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

डाव्या कुशीवर झोपणे :

गरोदरपणामध्ये गरोदर बाईने झोपताना डाव्या कुशीवर झोपायला हवे. कारण डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गरोदर बाईला झोप पण व्यवस्थित लागत असते. तसेच डाव्या कुशीवर झोपल्यामुळे अन्नपचनाची क्रिया देखील सुरळीत चालू राहते त्याचप्रमाणे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक शरीरातील रक्त पुरवठा हा योग्य रीतीने चालू असतो. आणि शरीरातील रक्तपुरवठा व्यवस्थित चालल्यामुळे बाळाला रक्त रक्तपुरवठा व्यवस्थित प्रकारे होत असतो. परिणामी बाळाची वाढ देखील चांगली होण्यास मदत होत असते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे श्वास व्यवस्थित प्रकारे घेता येतो. म्हणजे श्वास घेण्यास कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आणि बाळापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा देखील होत असतो.

उजव्या कुशीवर झोपणे :

गरोदरपणामध्ये गरोदर बाईला झोप व्यवस्थित लागत नसते. कारण पोटामध्ये बाळाची वाढ होत असते. त्यामुळे एखाद्या हालचालीमुळे अचानक जाग येते आणि नंतर जाग आल्यावर लवकर झोप लागत नाही. तसेच बाळाची वाढ होत असताना त्वचा ताणली जाते त्यामुळे अचानक पोट दुखून येते त्यामुळे देखील जाग येत असते. त्यामुळे झोपताना सतत या पोझिशन मधून त्या पोझिशन मध्ये अश्या प्रकारे करावे लागत असते. वरील प्रमाणे आपण बघितले की झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. परंतु सतत एकाच कुशीवर देखील व्यवस्थित झोप लागत नाही. त्यामुळे तुम्ही उजव्या कुशीवर देखील झोपू शकतात. कारण एकाच कुशीवर सतत  झोपल्यामुळे अवघडल्यासारखे देखील वाटत असते. त्यामुळे तुम्ही अधून-मधून पोझिशन चेंज करू शकतात.

वाचा  जेवणानंतर पाणी केव्हा प्यावे ?

आरामदायक स्थितीमध्ये झोपणे :

गरोदरपणामध्ये बऱ्याच महिलांना झोप व्यवस्थित लागत नसते. त्यामुळे ती झोपताना सतत इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पोझिशन मध्ये वळत असतात. नाहीतर मध्येच एखाद्या वेळेस बाळाच्या हालचाली मुळे जाग येत असते. आणि एकदा जर जाग आली तर लवकर झोप देखील लागत नसते.शरीरामध्ये गरोदरपणामध्ये बऱ्याच प्रमाणात हार्मोन्स बदल होत असतात. आणि याचा प्रभाव देखील झोपेवर पडत असतो. जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल तर तुम्ही आरामदायक स्थितीमध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही आरामदायक खुर्चीचा वापर देखील करू शकतात. तसेच बसल्या बसल्या तुम्ही पाठीच्या मागे उशी ठेवाव्यात. दोन हातांत खालीदेखील उशी घ्यावी आणि पाय हे खाली मोकळे सोडू नये तर पायाखाली देखील उशी ठेवावी यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही आरामदायक स्थितीमध्ये झोपू शकतात.

गरोदरपणात किती झोप घेणे आवश्यक आहे? व  का?

मित्रांनो, खरंतर झोप फक्त गरोदरपणात आवश्यक आहे असे नाही तर वेळ देखील तुम्ही पुरेपूर झोप घेणे आवश्यक ठरते. गरोदरपणामध्ये तुम्ही सात ते आठ तास झोप घेणे खूप आवश्यक आहे. आणि दिवसादेखील तुम्ही दोन ते तीन तास विश्रांती घेऊ शकतात. बऱ्याच गर्भवती महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की दिवसा झोपल्यामुळे बाळाचे डोक्याचा आकार बदलू शकतो. नाहीतर दिवसा जास्त झोप घेतल्यामुळे बाळा आळशी बनू शकते, असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. खरं तर असं काहीच नसते. या उलट गरोदरपणात तुम्ही पुरेपुर विश्रांती घेणे आवश्यक ठरत असते.

बाळ आहे आईच्या पोटात सुखरूप असते त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा आकार चेंज होत नसतो. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची म्हणजेच डोक्याच्या आकाराची काळजी घेण्यावर असते. त्यामुळे गरोदरपणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त झोप घेणे आवश्यक असते त्यामुळे बाळाची वाढ देखील योग्य रित्या होत असते. दिवसा तुम्ही 2 तास झोप घेऊ शकतात आणि रात्री तुम्ही 7-8 तास झोप घेणे आवश्यक असते. विश्रांती ही पूर्णवेळ घेतल्यामुळे तुम्ही तणाव रहित राहू शकतात.

वाचा  पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय काय आहेत जाणून घेऊया

झोप व्यवस्थित लागावी म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे ?

गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांना शांत झोप न लागण्याची समस्या बद्दल होत असते. पोटामधील बाळाची वाढ होताना पोटावरील त्वचा घेतली जाण्याची जात असते. आणि यामुळे अचानक पोटात दुखत असते त्यामुळे देखील झोपमोड होत असते. झोप शांत लागावी यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  •  गरोदरपणामध्ये झोप व्यवस्थित लागावी म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मसालेदार पदार्थ तसेच तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
  • गरोदरपणा मध्ये शांत झोप लागत नसते, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे काम करा ज्यामुळे तुम्हाला थकवा येईल आणि थकवा आल्यामुळे झोपही शांत लागत असते.
  • गरोदरपणा मध्ये जास्त पाणी पिणे आवश्यक असते. परंतु रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाणी कमी प्रमाणात प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी पाणी जास्त पिल्यामुळे सारखे सारखे बाथरूम ला जाण्यासाठी उठावे लागत असते, त्यामुळे झोप मोड होत असते.
  • झोप व्यवस्थित लागत नसेल तर तुम्ही उशींचा सहारा घेतला पाहिजे. म्हणजेच झोपताना तुम्ही आरामदायक स्थितीमध्ये झोपायला हवे पाठीच्या मागे उशा, हातानखाली उशी आणि पायाखाली उशी अशाप्रकारे घेतल्यामुळे झोप व्यवस्थित लागण्यास मदत होत असते.
  • गरोदरपणामध्ये रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मधुर म्युझिक ऐकू शकतात. मधुर आणि शांत म्युझिक ऐकल्यामुळे झोप शांत लागण्यासाठी मदत होत असते.
  • झोप शांत लागावी यासाठी तुम्ही गरोदर पणात नियमित योगासनांचा सराव देखील करू शकतात. तसेच तुम्ही मेडिटेशन देखील करू शकतात.

गरोदरपणामध्ये झोप ही व्यवस्थित व शांत लागावी यासाठी तुम्ही वरील प्रमाणे काय करू शकतात. झोप शांत लागण्यासाठी तुम्ही झोपेच्या गोळ्या अजिबात घेऊ नका. झोप व्यवस्थित न लागण्या बद्दल तुम्हाला अजून समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

मित्रांनो वरील प्रमाणे आपण गरोदरपणामध्ये कोणत्या स्थिती मध्ये झोपायला हवे ? त्याचप्रमाणे, झोप घेताना कुठल्या प्रकारचे काळजी घ्यायला हवी ? कोणत्या स्थितीमध्ये झोपू नये ? याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here