गर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी उपाय

0
420
गर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी उपाय
गर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी उपाय

गर्भपाताची कारणे

नमस्कार, मैत्रिणींनो गर्भधारणा होणे, हा स्त्रीच्या आयुष्यातील सुंदर असा क्षण असतो. ज्यामध्ये तिच्या सगळ्या दुःख, यातना, राग, चिंता, यासारख्या गोष्टी विसरून जाते. तिच्या पोटातील बाळामध्ये ती मग्न होऊन जाते. ती त्याचे एक-एक क्षणाचे अनुसरण करत राहते, जणू काही तो तिच्याशी बोलत आहे. मग त्यावेळी ती त्याची जी नाही, ती देखभाल करते. त्याच्यासाठी खाते, पिते, त्याच्यासाठी जगते, हा अविस्मरणीय घटक हा तिच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि समजा काही घटनास्थळी, काही कारणास्तव, तिचा हा घटक तिच्यापासून जर दूर झाला, त्यावेळी ती अत्यंत कोसळून जाते. तिच्या मनाला ठेच पोहोचते. दुखी होते. त्यासाठी ती जी नाही, ती काळजी करायला तयार असते. ज्यावेळी तिचा गर्भपात होतो. त्यावेळी ती फार दुःखी होऊन जाते, एक प्रकारे ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. आज आपण जाणून  घेणार आहोत,गर्भपाताची कारणे? व गर्भपात होऊ नये? यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग जाणून घेऊयात! 

गर्भपाताची कारणे काय आहेत? 

ज्यावेळी एखादी स्त्री तिच्या बाळामध्ये मग्न असते, आणि ती जणू त्याच्याशी पुटपुटत बोलत असते. आणि त्यावेळी तिला तिच्या बाळाची योग्य काळजी घ्यावी लागते. गर्भपात हा पहिल्या तीन महिन्यांमध्ये जास्ती प्रमाणात होऊ शकतो. याची काळजी घ्यावी. कारण पहिले तीन महिने जपणे फार महत्त्वाचे असतात. तसेच जर समजा, त्यामध्ये काही इन्फेक्शन झाले, किंवा काही खाण्यामध्ये वेगळे आले, किंवा काही कारणास्तव तिला रक्तस्राव चालू होऊन, तिचा गर्भपात झाला. त्यावेळी अत्यंत कोसळून जाते, व तिच्या परिवाराला ही दु:ख होते. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की गर्भपात होण्याची नेमकी कारणे, कोणती असू शकतात. 

 • जर गर्भवती महिलेने, अति अवजड वस्तू पकडल्या, दिवस जवळ सामान पकडला, तर त्या वेळी तिच्या पोटावर प्रेशर जाऊन गर्भपात होण्याची शक्यता असते. 
 • तसेच गर्भवती महिलेने, जास्त पावरफूल औषधे घेतल्यास, तिचा गर्भपात होऊ शकतो. 
 • तसेच गर्भवती महिलेचे खाण्यामध्ये, काही बिघडले, जसे की गरम पदार्थ, अति गरम पदार्थ, तिने जर सेवन केले, तर गर्भपात होण्याची शक्यता असते. 
 • तसेच आईच्या शरीरातून बाळाला जर पुरेसा रक्तप्रवाह होत नसेल, असे वेळीही गर्भपात होऊ शकतो. 
 • जर एखाद्या स्त्रीला थायरॉइडचा त्रास आहे, अशा वेळी तिचे हार्मोन्स असंतुलन होउन,  त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. 
 • जर गर्भ पिशवीमध्ये, फायब्रॉइड च्या गाठी असतील, त्यावेळी त्या गाठींचा प्रेशर होणाऱ्या गर्भावर, म्हणजेच बाळावर वर पडून गर्भपात होऊ शकतो. 
 • तसेच प्रवास करताना, खड्डे मोठे मोठे खड्डे जर आलेत, तर आईच्या पोटावर प्रेशराइस होऊन, एक प्रकारे ओटी पोटात दुखून, गर्भपात होऊ शकतो,  व यासारख्या घटना ही होऊ शकतात. 
 • पीसीओएस, मधुमेह, तसेच हार्मोनलइन बॅलेन्स, बिपी, यासारख्या महिलांनाही गर्भपाताच्या समस्या होऊ शकतात. 
वाचा  कानदुखी चे कारणे व उपाय

गर्भपाताची कारणे व त्यावेळी ची लक्षणे? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही गर्भपाताची कारणे सांगितलेले आहेत. आता आपण त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात. 

 • तुम्हाला बेचैन असल्यासारखे जाणवते. 
 • गर्भपाताची लक्षणे, म्हणजे त्यावेळी तुमची तीव्र डोकेदुखी होते. 
 • तुमच्या ओटी पोटात सारखे दुखते. 
 • कालांतराने तुम्हाला रक्तस्राव चालू होऊन जाते. 
 • फक्त तो रक्तस्राव इतका असतो, की तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते, हे मुख्य कारण आहेत. गर्भपात होण्याची. 
 • अशावेळी तुम्ही त्वरित वेळ न घालवता, दवाखान्यात जावे, व डॉक्टरांना दाखवावे. 

गर्भपात होऊ नये यासाठी, काय काळजी घ्यावी? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला गर्भपात होण्याची नेमके, कोणत्या कारणांनी होऊ शकतो, व त्याची लक्षणे सांगितलेले आहेत. आता आपण त्यावर कोणती काळजी घेऊ शकतो, हे जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

 • तुम्ही नियमित सकस आहार घ्यावा. 
 • अवजड वस्तू पकडणे टाळावेत. 
 • जास्तीत जास्त कठीण योगा करू नयेत. 
 • खाण्यामध्ये गरम वस्तूंचा वापर करू नये. जसे की अननस, पपई, कारली, गुळ, मेथीचे दाणे, तीळ, अंडी हे उष्ण पदार्थ त्याने गर्भपात होऊ शकतो. 
 • तिखट मसालेदार पदार्थ शक्यतो खाणे, कमी करावे. 
 • डॉक्टरांना दाखवून औषधी गोळ्या घ्याव्यात. 
 • सतत पोटात दुखत असेल, तर डॉक्टरांना दाखवावे.
 • गर्भपणात कुठलीही समस्या आली, तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही, पावर फुल औषधे घेऊ नका. 
 • तसेच गर्भवती महिलेने, तिच्या आरोग्यात विटामिन युक्त फळे खावीत. तसेच त्यांनी  नारळाचे पाणी, चिकू, सफरचंद यासारखे फळांचे सेवन करावेत. 
 • तसेच त्यांनी त्यांच्या आहारात पचण्यास, हलक्‍या अशा वस्तूंचे सेवन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळींचे सूप, प्रोटीन युक्त आहार घ्यावे. 
 • तसेच त्यांनी प्रवास करणे शक्यतो टाळावेत.  समजा कुठे कारणास्तव प्रवास करावा लागला, तर तो डॉक्टरांना विचारून जावे. तसेच आरामदायक वाहनांमध्ये प्रवास करावा. 
 • आहारात थंड पदार्थ खावे दूध, दही यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात.
 • शरीरासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
 • हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ खावेत.
वाचा  नियमित व्यायामाचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला गर्भपात होण्याची कारणे, व त्याची लक्षणे, आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत तसेच गर्भपात होऊ नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यावी, हेही आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत.तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही डॉक्टरांनाही विचारू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.

 

                        धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here