ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग

0
4439

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग लहान बाळ जन्मल्यापासून त्याची आई वेळेवर योग्य त्या पद्धतीने काळजी घेत असते. बाळाला जेव्हा भूक लागत असते तो त्याच्या रडण्यातून ते व्यक्त करत असतो. तेव्हा, आईने योग्य तितक्या प्रमाणात बाळाला स्तनपान देणे आवश्यक ठरत असते. म्हणजे आईने बाळाला कमीत कमी अर्धा तास तरी स्तनपान करावे जेणेकरून बाळाचे पोट भरण्यास मदत होईल. तसेच बाळाला स्तनपान करताना आईने एका साईडने 15 ते 20 मिनिटे स्तनपान द्यावे आणि नंतर साइड चेंज करून दुसऱ्या बाजूने देखील 15 ते 20 मिनिटे स्तनपान करावे. त्यामुळे बाळाला पोटभर दूध मिळण्यास मदत होते. बऱ्याच वेळी असे देखील दिसून येते की बाळाची योग्य प्रकारे काळजी घेऊन देखील बाळ सारखे सारखे रडत असते. तसेच चिडचिड करताना देखील दिसून येत असते. यामुळे बाळ शांत झोपू शकत नाही. लहान बाळ बोलू शकत नाही त्यामुळे रडून रडून यातूनच तो त्याच्या भावना व्यक्त करू शकतो. बऱ्याच वेळा काही पालक घाबरून देखील जात असतात की आपल बाळ रडत का असेल?त्याचे पोट व्यवस्थित साफ झाले नसेल का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडत असतात. आणि काही पालक हेच बाळ थोडे जरी रडले तरी दवाखान्यात घेऊन जात असतात. बऱ्याच वेळा जर आईच्या आहारामध्ये जर एखादा वातडा पदार्थ खाण्यात आला असेल तर पोट दुखण्याची शक्यता असते. या कारणास्तव बाळ चिडचिड देखील करताना दिसून येते किंवा सारखे सारखे रडत असते. तसेच काही वेळा बाळाला जर अपचनाची समस्या उद्भवत असेल तेव्हा देखील बाळ सारखे रडत असते नाहीतर चिडचिड करत असताना दिसून येते. परंतु मित्रांनो अशा वेळी जास्त घाबरून जाऊ नका. यासाठी लहान बाळाला तुम्ही ग्राईप वॉटर देऊ शकता जेणेकरून बाळाला आराम मिळण्यास मदत होईल. तर मित्रांनो ग्राईप वॉटर नक्की काय असते? लहान बाळाला ग्राईप वॉटर ही केव्हा द्यावी? आणि ग्राईप वॉटर देण्याचे फायदे नेमके कोणते असू शकतात? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

ग्राईप वॉटर नेमके काय असते?

अनेक वेळा बाळ जेव्हा सारखे सारखे रडत असेल किंवा बाळाला शांत झोप लागत नसेल किंवा तसेच बाळ सारखे सारखे चिडचिड करत असेल तेव्हा बरेच पालक हे बाळाला ग्राईप वॉटर देत असतात. तर मित्रांनो ग्राईप वॉटर म्हणजे नेमके काय असते लहान बाळ रडत असेल तर त्याला ग्राईप वॉटर का दिले जाते याबद्दल आपल्या माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊ की ग्राईप वॉटर म्हणजे नेमके काय असते.

वाचा  साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घेऊयात काय आहेत?

ग्राईप वॉटर हे पाण्याच्या फॉर्म मध्ये असतं म्हणजेच त्याला लिक्विड स्वरूपाचं देखील म्हणता येईल. ग्राईप वॉटर मध्ये काही जडीबुटी यांचा समावेश असतो जी पचन क्रियेस मदत करत असते. त्याचप्रमाणे ग्राईप वॉटर मध्ये अद्रक बडीशोप दालचिनी आणि अजून बरेच काही घटकांचा समावेश असतो. जर लहान बाळाचे पोटात दुखत असेल किंवा बाळाचे व्यवस्थित रित्या पचन न झाल्यामुळे देखील रडत असेल तर त्यावेळी बरेच पालक हे डॉक्टरांचा सल्ला न घेता ग्राईप वॉटर देणे योग्य समजतात. काही ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण देखील असते त्यामुळे बाळाला शांत झोप लागत असते. तर काही ग्राईप वॉटर मध्ये पोषक उपयुक्त घटक आणि सोडियम बायकार्बोनेट हे घटक असतात. म्हणजेच प्रत्येक ग्राईप वॉटर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. तसेच, ग्राईप वॉटर मध्ये ओवा, साखर युक्त घटक देखील असतात.

ग्राईप वॉटर बाळाला केव्हा देऊ शकतात?

बऱ्याच वेळा पोटभर दूध पिऊन देखील बाळ सारखे रडत असताना दिसून येत असते. आणि काही वेळा चिडचिड करताना देखील दिसून येत असते. तर काही बाळाना शांत झोप येत नाही सारखे सारखे उठत असतात. बऱ्याच वेळा आईच्या आहारामध्ये एखादा वातडा पदार्थ खाण्यात आला असेल तर त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो. ज्यामुळे बाळाचे पोट दुखू शकते. बऱ्याच वेळा बाळ दूध पिल्यावर बाळाचा व्यवस्थित प्रकारे ढेकर काढला नसेल तर त्यामुळे, देखील बाळाला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा बाळाने दुध पिल्यावर जर बाळाचे व्यवस्थित पचन झाले नाही तर त्यामुळे देखील बाळाला त्रास होऊन बाळ रडत असते किंवा चिडचिड करताना दिसून येत असते. अशावेळी बाळाला ग्राइप वाटर देणे योग्य ठरत असते. म्हणजेच बाळ चिडचिड करत असेल शांत झोप येत नसेल किंवा सारखे सारखे रडत असेल अशावेळी तुम्ही बाळाला ग्राईप वॉटर देऊ शकतात. बाळात तुम्ही ग्राईप वॉटर दिल्यामुळे बाळाच्या पोटा संबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होत असते. बरेच जण हे तर डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकल मधून ग्राईप वॉटर घेऊन जे बाळ सतत चिडचिड करत असेल व ज्याला शांत झोप येत नसेल तेव्हा बाळाला देत असतात. ग्राईप वॉटर च्या जाहिरात मध्ये देखील बरेच जण बघत असतात त्यामुळे डॉक्टरचा सल्ला न घेता ते बाळाला ग्राईप वॉटर देत असतात.

वाचा  सूर्यनमस्कार करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

       लहान बाळाला ग्राईप वॉटर दिल्यामुळे बाळाची पोट दुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बाळाच्या पोटात गॅस झाला असेल तर तो देखील नाहीसा होण्यास मदत होत असते. बाळाची पचन करण्याची क्षमताही कमी प्रमाणात असते त्यामुळे बाळाला पोट दुखीची तसेच पोटात गॅस होण्याची व ॲसिडिटीची समस्या ही लवकर होत असते त्यामुळे अशावेळी तुम्ही ग्राईप वॉटर बाळाला देऊ शकतात. अनेक वेळा आपण जेव्हा बाळाला वरचे अन्न देणे सुरू करत असतो तर वरील पदार्थामुळे देखील बाळाच्या पोटात गॅस होण्याची शक्यता असते. बाळाची पचन क्रिया ही खूप कमी प्रमाणात असते त्यामुळे देखील बाळाच्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाळ रडताना दिसणे, सतत चिडचिड करताना देखील दिसून येत असते त्यामुळे तुम्ही तेव्हा बाळाला ग्राइप वाटर देऊ शकतात. तसेच नवजात बाळांना तुम्ही ग्राईप वॉटर एक टॉनिक म्हणून देखील देऊ शकतात. एक महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही बाळाला ग्राइप वाटर देऊ शकतात कारण यात साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे लहान बाळांना जास्त गोड देणे अयोग्य ठरते.

      जर तुमचे लहान बाळसारखे रडत असेल, चिडचिड करत असेल किंवा त्याला पोटासंबंधी समस्या उद्भवत असतात, त्यावेळेस तुम्ही ग्राईप वॉटर देऊ शकतात. नाहीतर लहान बाळ शांत झोपावे फक्त यासाठी तुम्ही ग्राईप वॉटर देणे टाळायला हवे. ग्राईप वॉटर हे किती एम एल द्यावे याचे प्रमाण देखील त्यावर दिलेले असते. त्याप्रमाणे तुम्ही लहान बाळाला ग्राइप वाटर देणे योग्य ठरते. आणि जेवढे एम एल दिले त्यापेक्षा अधिक एम एल देणे चुकीचे ठरते. कारण ठरलेल्या मात्रा पेक्षा जर तुम्ही जास्तीची मात्रा बाळाला दिली तर त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. आणि दिवसातून बाळाला जितक्या वेळा ग्राईप वॉटर देणे लिहिलेले असेल तितक्याच वेळ द्यावे. त्याव्यतिरिक्त जास्त वेळा ग्राईप वॉटर देणे त्रासदायक ठरू शकते.

वाचा  पनीर खाण्याचे फायदे

ग्राईप वॉटर चा उपयोग करताना कोणती काळजी घ्यावी?

      जर तुमचे लहान बाळ असेल ते सतत रडत असेल किंवा त्याला पोटा विषयी तक्रार असेल अशावेळी तुम्ही बाळाला ग्राईप वॉटर देणे योग्य ठरू शकते. बरेच लोक हे ग्राईप वॉटर बाळाला देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेत नसतात. बऱ्याच वेळा टीव्हीवर ग्राईप वॉटर बद्दल जाहिरात बघितल्यामुळे लगेच पालक बाळाला ग्राइप वाटर देण्यास सुरुवात करत असतात. परंतु ग्राईप वॉटर बाळाला देणे योग्य आहे का याबद्दल देखील आपल्याला माहित असणे आवश्यक असते. ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण देखील असते ज्यामुळे बाळ तर शांत झोपते परंतु बाळाला त्याचा त्रास देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला कुठलेही औषध देण्याआधी तसेच ग्राईप वॉटर देण्याआधी तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला योग्य ठरू शकतो. बरेच लहान बाळांना एखाद वेळेस ग्राईप वॉटर ची एलर्जी देखील होताना दिसून येत असते. त्यामुळे तुम्ही ग्राईप वॉटर देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. जेणेकरून तुमच्या बाळाला त्याचा त्रास होणार नाही. मेडिकल स्टोअर मध्ये ग्राईप वॉटर हे सहजरीत्या उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही ग्राईप वॉटर घेताना त्यावर जे इन्ग्रेडियंट लिहिलेले असतात ते वाचून घ्यायला हवेत जेणेकरून तुम्हाला समजेल की ग्राईप वॉटर मध्ये नेमके कोणते कोणते घटक असतात आणि ते आपल्या बाळासाठी योग्य आहे का? म्हणून मित्रांनो, तुम्ही ग्राईप वॉटर देण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते जेणेकरून तुमच्या बाळाला त्रास होणार नाही. ग्राईप वॉटर दिल्यामुळे एक प्रकारे बाळ शांत होण्यास मदत होत असते परंतु पुढे भविष्यात बाळाला त्यामुळे त्रास होण्याची देखील शक्यता असू शकते. म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध किंवा ग्राईप वॉटर बाळाला देऊ नये डॉक्टरांनी जेव्हा सांगितले असेल तेव्हाच ते देणे योग्य ठरते.

          तर मित्रांनो, वरील प्रमाणे आपण ग्राईप वॉटर म्हणजे नेमके काय असते? ग्राईप वॉटर मध्ये नेमके कोणते घटक असतात? ग्राईप वॉटर लहान बाळांना का द्यावे? तसेच ग्राईप वॉटर लहान बाळांना देणे योग्य ठरते का? याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. आणि या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

      मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here