हळदीचे फायदे

0
725
हळदीचे फायदे
हळदीचे फायदे

नमस्कार, मित्रांनो हळद ही कोणाला माहिती नाही, असे कोणीच नाही. कारण प्रत्येकाच्या घरात हळद ही राहते. प्रत्येक सणाला विशिष्ट रंग व चव देण्याचे काम हळद ही करते. तसेच देवघरामध्ये हळद शिवाय कुंकवाचा करंडा हा पूर्ण दिसत नाही. देवघरामध्ये हळद आणि कुंकू हे मुख्य स्थान आहे. तसेच स्त्रीचे सौभाग्याचे स्थान हळदीकुंकू आहे. तसेच हळदीमध्ये अंतीबॅक्टरियल व ऑंटीफंगल इन्फेक्शन वर मात करण्याचे गुणधर्म असतात. हळद ही आयुर्वेदातील महत्त्वाचे स्थान आहे, तसेच हळदीचा वापर हा पुरातन काळापासून केला जात आहे. हळदी लग्नसमारंभात वापरली जाणारी वनस्पती आहेत. कारण हळदीने अनेक रोग नाहीसे होतात. तसेच इन्फेक्शन नाहीशी होतात. चला तर मग जाणून घेऊयात हळदीचे फायदे.

त्यामुळे लग्नसमारंभात पूर्ण अंगाला हळद लावली म्हणजे, शरीरावर कोठे इन्फेक्शन असेल, तर ते नाहीसे होतात. शिवाय हळद चा वापर केल्याने रंगही उजळतो. तसेच घराघरांमध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये लोणची करतात, त्यामध्ये हळदीचा    वापर केला जातोय. हळदीचा वापर केल्यामुळे लोणच्याला अजून निराळी चव येते, हळदीचे उत्पन्न  आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच हळदीचे एवढाच वापर आहे का? तर नाही, हळदीचे आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होतात, मग तो कशाप्रकारे होतोय? ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग ही बहुगुणी हळदी चे आपण आपल्या आहारात, व आपल्या शारीरिक सौंदर्यासाठी, त्याचा वापर आपण कोणत्या प्रकारे करू शकतो, ते जाणून घेऊयात! 

हळदीने मिळतात, निरनिराळे फायदे? 

हो, तुम्हाला जाऊन आश्चर्य वाटेल. पण हळदीने आपल्या शरीरासाठी निरनिराळे फायदे मिळतात, व ते कोणत्या प्रकारे मिळतात, ते आज आपण जाणून घेणार आहोतच. चला तर मग कोणत्या समस्येवर तुम्ही कशा प्रकारे हळदीचा वापर करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात! 

वाचा  बाळाचे दात स्वच्छ कसे करावेत?

दुधात टाकून प्या

हो, दुधात टाकून पिल्याने तुम्हाला खूप फायदे होतात. जर तुम्हाला जुना खोकला असेल, तर तुम्ही दूध हळद टाकून पिले, तर खोकल्यावर आराम मिळतो. शिवाय घशात इन्फेक्शन असेल, तर त्यावरही फायदा मिळतो, तसेच एक म्हण आहे,    “पि हळद आणि हो गोरी” हि म्हण भरपूर जणांना माहिती असेलच, खरंच हळदीचे दूध पिल्याने तुमचा रंग उजळण्यास मदत मिळते. शिवाय तुमचे रक्त शुद्ध होते. 

चेहऱ्याचे सौंदर्य निखारते

हो, जर तुम्हाला चेहऱ्यावर काळे डाग असतील, पुटकुळ्या असतील, त्या फोडून त्यातून पु निघत असेल, रक्त येत असेल, अशा वेळी जर तुम्ही हळद पावडर+ बेसन पीठ + त्यामध्ये चिमूटभर दही यांचे मिश्रण एकजीव करून, ते जर तुम्ही तुम्ही फुटकुळ्या किंवा डाग असतील, अशा ठिकाणी लावले, तर त्या लवकर जाण्यास मदत मिळते. शिवाय  त्याचे निशाण राहत नाही, व तेथील डाग जाण्यास लवकर मदत मिळते. शिवाय चेहर्याचा रंग उजळतो व त्वचा मुलायम होते. 

जखम लवकर भरून काढते

पूर्वीच्या काळापासून हळदीचा जखमेसाठी वापर केला जातो. जर तुम्हाला कुठे चोंद पडली, लागलं तर त्यावरही तिचा फायदा होतो. हळद मध्ये अंतीबॅक्टरियल तसेच अँटी सेफ्टी गुणधर्म असल्यामुळे, ते तुम्हाला कुठेही जखम झाली, तर ती लवकर भरून काढण्यास मदत करतात. हळदीमुळे तुमच्या जखम वर इन्फेक्शन होत नाही, शिवाय हळद तुमची जखम लवकर भरून काढण्यास मदत मिळते. ज्या ठिकाणी तुम्हाला लागलेले आहे, ती जागा तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी, त्यानंतर हळद आणि तेल हे कोमट करून थंड झाल्यावर जखमेवर लावावेत. त्यामुळे तुमची जखम कोणतेही इन्फेक्शन होता भरून निघते. कसे हाताला चाकू लागणे, खेळता-खेळता पडणे, अशा वेळी लगेच हळद भरली जाते, व ती जखम लवकर भरून निघते. 

मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात

खूप स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असते. तसेच आल्यावर पोटात जास्त दुखते. तसेच अंगावरून रक्तस्राव कमी प्रमाणात होतो. अशा वेळी जर त्यांनी रेगुलर हळद कोमट पाण्यात टाकून पिल्याने, त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता, ही पूर्ण होते. शिवाय मासिक पाळी लवकर येण्याची मदत मिळते व रेगुलर होते. 

वाचा  केसांना फाटे आले असतील तर ? काही घरगुती उपाय !

शरीराची मृदु त्वचा निघण्यास मदत होते

बहुतेक वेळा काही जणांना शरीरावर खाज येते, व ते स्वतःच्या खाजून खाजून अक्षरशः ती जागा लाल होते. तसेच काही जणांची त्वचेवर इन्फेक्शन लवकर होते, तर काही जणांची त्वचा ही मृदु असते, अशावेळी जर त्यांनी हळद दुधामध्ये मिक्स करून त्यांच्या संपूर्ण अंगाला लावले, तर निर्जीव त्वचा लवकर निघते. शिवाय त्वचेचा रंगही उजळतो. तसेच फंगल इन्फेक्शन खाज येण्यासारखी समस्या असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. म्हणूनच तर लग्नाच्या वेळी नवरदेव- नवरीला संपूर्ण अंगावर हळदीचा लेप लावला जातो, कारण हळदीचा लेप लावल्याने रंग उजळतो. तसेच हळदीचा लेप मध्ये चंदन पावडर टाकल्याने, मृदु त्वचा असेल, तर तीही लवकर बाहेर निघते, व चेहऱ्यावर नवीन सौंदर्य येते. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हळद तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काहीजण सारखे सारखे आजारी पडतात, त्यांना व्हायरल इन्फेक्शन लवकर होते. अशावेळी जर त्यांनी हळदीचा वापर केला, तर यासारख्या समस्या त्यांच्या पासून खूप दूर होतात. ते सारखे सारखे आजारी पडण्यामागे एकमेव कारण म्हणजे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, जर तुम्हाला तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीही वाढवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा वापर करा. हळदीची वापर केल्यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून, तुमचे रक्त ही शुद्ध होते. व कोणतेही आजार तुमच्या पासून लांब राहतात. 

हळद पिल्याने बाळांतीन ला दूध येते

जर तुम्ही बाळांतीन असाल, तर तुमच्या आहारात हळदीचा वापर करा, कारण त्याने तुमचे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते, शिवाय शुद्ध होते, तसेच तुम्हाला पूरक दूध देते. तसेच हळद पिल्याने तुमची शिवाय बाळाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, शिवाय बाळाला तुमच्या मार्फत योग्य आहार बाळाला मिळतो, व हळदीचे पाणी किंवा दूध पिल्याने बाळाला आवश्यक ते विटामिन्स बाळाला मिळतात, शिवाय तुमच्या अंगावरून जाणारा रक्तस्राव हा योग्य प्रमाणात होतो. तुम्हाला शारीरिक त्रास हा पुरत नाही. 

वाचा  मासिक पाळी येण्यासाठी उपाय

हळदी ने होणारे नुकसान

हळदीने शरीराला सहसा करून नुकसान होत नाही, पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांना थोडाफार त्रास त्याचा होतो, कारण हळद ही उष्ण असते, तसेच ज्यांना प्रेग्नेंसी हवी असेल, त्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा वापर कमी करावा. कारण  त्यामुळे त्यांना त्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसेच ज्यांना कावीळ, डायबेटिस, ऍनिमिया यासारखे आजार असतील, तर त्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा वापर हा कमी करावा. 

जाणून घ्या : मांड्या कमी करण्यासाठी उपाय

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हळदीचा वापर, तुमच्या शरीरावर कशा प्रकारे होतो, व त्याने तुम्हाला काय फायदे मिळतात, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here