कोथिंबीरीचे फायदे

0
472
कोथिंबीरीचे फायदे
कोथिंबीरीचे फायदे

नमस्कार मित्रांनो. हिरव्या ताजे भाजीपाल्यांचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होत असतात. हिरवी पालेभाज्यांमधून आपल्याला सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळण्यास मदत होत असते. शिवाय आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होत असते. मित्रांनो, आपण आपण कुठल्याही प्रकारचे भाजी बनवली तर त्यामध्ये हमखास कोथंबीर टाकत असतो. कोथिंबीर मुळे भाजीला स्वाद येण्यास मदत होते. शिवाय एक सजावट म्हणून देखील कोथंबीर आपण भाजीवर अथवा पदार्थावर टाकत असतो. मित्रांनो, कोथिंबीरीचे किती आरोग्यदायी फायदे आहेत तुम्हाला माहित आहे का?

कोथिंबिरी शिवाय भाजी ही अपूर्ण वाटते. संपूर्ण जेवण बनवून झाल्यावर आपण भाजी वर कोथिंबीर वरून टाकत असतो शिवाय भाजी बनवताना मसाला मध्ये देखील आपण कोथिंबीरीचे वाटण घेत असतो. कोथिंबीर भाजीमध्ये घातल्यामुळे तिला पौष्टिकता देखील प्राप्त होत असते. कोथंबीर चे जर आपण नियमित सेवन केले तर त्यामुळे आरोग्यदायी फायदे आपल्याला होऊ शकतात. काही जणांना कोथिंबीरीचे सेवन करणे एवढे आवडते की ते कोथिंबीरीची चटणी बनवून त्याचे देखील सेवन करत असतात. अर्थातच कोथिंबीर हे आपल्या सर्वांसाठी फार गुणकारी व लाभकारी ठरते. कोथिंबीर यामुळे एक प्रकारे आपल्या शरीराला थंडावा मिळण्यास मदत होत असते.

उन्हाळ्याच्या दिवसात आपण मठ्ठा बनवून देत असतो तर त्यामध्ये कोथिंबीरीचा वापर हा सर्रास होत असतो. कारण उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण हे वाढत असते त्यामुळे जर तुम्ही मोठ्या मध्ये कोथिंबीर घालून याचे सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते शिवाय थंडावा देखील प्राप्त होऊ शकतो. कोथिंबीरीचे फायदे म्हटले तर अनेक प्रकारचे सांगता येतील. तर मित्रांनो आज आपण कोथिंबीरीचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, कोथिंबीरीचे फायदे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

कोथिंबीरीमुळे होणारे फायदे:-

आपण जर कुठल्याही प्रकारचा पदार्थ बनवला जेवण तयार केले तर त्यावर आपण हमखास कोथिंबिरीचा वापर करत असतो. भाजी मध्ये कोथिंबीर घातली तर त्यामुळे भाजीला पौष्टिकता प्राप्त होते शिवाय भाजीवर वरून कोथिंबीर घातल्यामुळे सजावटीसाठी देखील तीचा उपयोग होत असतो. कोथिंबीरीची सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आपला होत असतात तर ते कोणत्या प्रकारचे हे आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • कोथिंबीरीचे तुम्ही नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाणही कमी होण्यास मदत होऊ शकते शिवाय तुमच्या शरीराला एक प्रकारे थंडावा मिळण्यास मदत होते.
  • बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास होत असतो. म्हणजेच खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचन होत नाही. आणि अपचनाचा त्रास झाल्यामुळे पोट दुखी देखील होऊ शकते. जर तुम्ही कोथिंबीरीचे नियमित सेवन करत असाल तर तुम्हाला अपचनाची समस्या उद्भवणार नाही. शिवाय तुमची पचन संस्था देखील व्यवस्थित सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
  • काही व्यक्तींना कोलेस्टेरॉलची समस्या येत असते. तर अशा व्यक्तीने कोथिंबिरीचे सेवन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या ही नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
  • जर तुम्हाला डोळ्यात संबंधीच्या समस्या येत असतील जसे की डोळे आग अथवा जळजळ होणे. तरी यासाठी तुम्हाला कोथिंबिरीचे गुणकारी फायदे होऊ शकतात. शिवाय कोथिंबिरीची सेवन केल्यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  • उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या तळपायांची आग होत असते शिवाय हात आणि तळ पाय हे जळजळ होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात देखील कोथिंबीरीचे नियमित सेवन करणे आवश्यक ठरते यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊन हातापायांची जळजळ होणे थांबते.
  • कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढावी शिवाय उष्णताही कमी प्रमाणात व्हावी यासाठी तुम्ही कोथिंबिरीचे काही पाने स्वच्छ धुऊन एका पातेल्यात टाकून घ्यावे त्यामध्ये पुदिन्याचे पाने देखील स्वच्छ होऊन त्या पातेल्यात टाकून घ्यावे. नंतर काय मध्ये एक ग्लास स्वच्छ पाणी टाका. हे पाणी व्यवस्थित उकळून झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिंबू चा रस टाकावा. आणि त्या पाण्याचे सेवन कमी करावे अशा केल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढते शिवाय शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • काहीजणांना पित्ताचा त्रास उद्भवतो. शरीरामध्ये ऍसिडिटी झाली तर ऍसिडिटीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास कमी व्हावा शिवाय जावी यासाठी देखील तुम्ही कोथिंबीरीचे नियमित सेवन करणे आवश्यक ठरते. पित्ताचा त्रास जावा यासाठी तुम्ही, धने ची पावडर दोन चमचे घेऊन त्यामध्ये थोडीशी खडीसाखर मिसळून घ्यावी आणि त्या चुरणा चे सेवन करावे असे केल्यामुळे, तुमचा पित्ताचा त्रास हा कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • कोथिंबिरीची नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये जास्तीचे वजन देखील वाढत नाही एक प्रकारे आपल्या शरीराचे वजन हे नियंत्रित राहण्यास मदत होत असते.
  • जर तुम्हाला खोकला लागलेला असेल तर त्यासाठी देखील तुम्ही कोथिंबिरीचा उपयोग करू शकता. तुम्हाला जर खोकला लागलेला असेल तर त्यासाठी तुम्ही धने पावडर घेऊन त्यामध्ये सुंठ पावडर मिक्स करून घ्यावी त्याचप्रमाणे त्यामध्ये तुम्ही मध व्यवस्थित एकत्रित करून त्याची सेवन करावे. असे चूर्ण सेवन केल्यामुळे तुमचा खोकला निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  • गरोदर महिलेला उलटीचा त्रास हा होत असतो. काहींना सुरुवातीपासूनच उलटीचा त्रास होतो तर काहींना सुरुवातीपासून शेवटच्या महिन्यापर्यंत उलटीचा त्रास हा होत असतो. या पासून आराम मिळावा म्हणून त्यासाठी तुम्ही जिरे पावडर मध्ये थोडी खडीसाखर मिक्स करून त्याचे सेवन करायला हवे त्यामुळे  तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे अल्सर सारखे समस्या देखील निर्माण होत नाही.
  • जर तुमचे पोट बिघडले असेल, म्हणजेच जर तुम्हाला जुलाबाची समस्या निर्माण झालेली असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला कोथिंबीर पासून बनलेला काढया चा उपयोग होऊ शकतो.
  • धने पावडर व जिरे पावडर यांचे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यावे आणि त्याचे सेवन केल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात.
  • कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहण्यास मदत होत असते. ज्या लोकांना डायबिटीस ची समस्या असेल तर अशा लोकांनी हमखास कोथिंबिरीचे व धने पावडर ची सेवन करणे आवश्यक ठरते त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते म्हणजेच, डायबिटीस हे नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते.
  • कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे आपण रुदय रोगाच्या आजारापासून देखील दूर राहू शकतो शिवाय हृदयाचे कार्य हे देखील सुरळीत चालू राहण्यास मदत होऊ शकते.
  • कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा देखील व्यवस्थित राहण्यास मदत होऊ शकते. कोथंबीर नियमीत खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला एक प्रकारे ओलावा निर्माण होत असतो म्हणजेच, त्वचेला मॉइश्चरायझर चे काम होत असते.
  • जखमा नेहमी सर्वात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर यासाठी देखील कोथंबीर उत्तम ठरते डोकेदुखी होऊ नये यासाठी तुम्ही कोथिंबिरीचा काढा अथवा धने पावडर याचे सेवन केले तर तुम्हाला डोकेदुखी पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • महिलांना मासिक धर्माच्या वेळी त्रास होत असतो. अनेक वेळा तर चे पोट दुखी ची समस्या देखिल येत असत. मासिक धर्म मध्ये त्रास कमी व्हावा यासाठी तुम्ही धने पावडर घेऊन त्यामध्ये खडी साखर मिक्स करुन ते चूर्ण सेवन करावे त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
वाचा  मटन खाल्यानंतर काय खाऊ नये?

तर मित्रांनो, कोथिंबिरीचा आपण भाजीवर सजावटीसाठी तसेच, भाज्या बनवण्यासाठी तर उपयोग करत असतो. शिवाय, कोथिंबिरीचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली प्रकारे वाढण्यास मदत होत असते शिवाय आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी देखील कोथिंबिरीचा उपयोग होत असतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही देखील तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये कोथिंबिरीचा समावेश आवर्जून करा कोथिंबीरीचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे तुमच्या शरीराला होण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here