लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत

0
799
लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत.
लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत.

नमस्कार मित्रांनो. बाळाचा जन्म झाल्यापासून बाळाची आई ही त्याची सर्व प्रकारची काळजी घेत असते. बाळ हे जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याच्या हालचाली या वाढत जातात. असे म्हटले जाते की लहान मुलांची बुद्धी ही एक ते तीन वर्षांपर्यंत खूप अधिक पटीने वाढत जात असते. म्हणून आपण आपल्या मुलांना जेवढे कृतीयुक्त नवीन नवीन शिकवू तेवढे ते लवकर कॅप्चर करत असतात. एक ते तीन वर्षापर्यंत लहान मुलांचा हा बुध्यांक वाढत असतो. म्हणजेच एक ते तीन वर्ष पर्यंत आपण लहान मुलांना जे जे शिकवले ते लवकर त्यांच्या लक्षात राहते. म्हणून आपण योग्य वेळीच आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे. त्याला रोज काही ना काही नवीन नवीन कृती या शिकवायला हव्यात. जेणेकरून तो जसजसा मोठा होईल त्याला पुढे शिकताना त्रास होणार नाही. सुरुवातीला पण त्याला एक-दोन ओळींच्या किंवा तीन चार ओळींच्या अशा कविता शिकवायला हव्यात. आणि बरेच लहान मुले ही खेळताना देखील त्या कविता गुणगुणत असतात. त्याला विविध प्रकारची खेळणी घेऊन द्यायला हवी जेणेकरून तो ती खेळणे जोडून अजून काहीतरी नवीन नवीन बनवत राहील. म्हणजेच आपण आपल्या लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करायला हवा. तसेच आपण लहान मुलांना एबीसीडी शिकवताना देखील काहीतरी नव्या पद्धतीने शिकवायला हवे जेणेकरून त्यांना ती लवकर लक्षात येईल. तर मित्रांनो आज आपण लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत कशी असायला हवी याबद्दल जाणून घेणार आहोत. जेणेकरून लहान मुलांना एबीसीडी शिकताना त्रास होणार नाही आणि ते लवकर शिकतील. चला तर मग, लहान मुलांना एबीसीडी शिकवण्याची पद्धत नेमकी कशी असायला हवी? याबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

लहान मुलांना एबीसीडी आधी आपण त्याला लाईन्स शिकवल्या पाहिजेत 

मित्रांनो, कोणतेही लहान मुलं असो त्याला डायरेक्ट न शिकवता आपण त्याला सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींपासून शिकवायला हवे. लहान मुलांना डायरेक्ट एबीसीडी शिकवले तर त्यांना ते लवकर लक्षात येणार नाही. यामध्ये बराच गोंधळ निर्माण करतील. A कसा काढावा,C कसा काढावा, F कसा काढावा म्हणजेच यामध्ये गोंधळ निर्माण करतील. म्हणून लहान मुलांना एबीसीडी शिकवन्या पूर्वी आपण त्यांना लाईन्स कशा आखाव्यात,  याबद्दल शिकवले पाहिजे. लहान मुलांना सुरुवातीला आपण लाइन्स काढायला शिकवायला हवे. आणि त्या कशा प्रकारे शिकवायला हव्यात आपण हे खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • प्रथम आपण लहान मुलांना स्टॅंडिंग लाईन काढून शिकवायला हवी. म्हणजेच एका ब्लँक बुक वर सुरुवातीला आपण ठळक स्टॅंडिंग लाईन काढून द्यावी. आणि त्यानंतर लहान मुलांना त्यावर गिरवून पुढीलप्रमाणे स्टॅंडिंग लाईन काढायला सांगावी.
  • स्टॅंडिंग लाईन शिकवल्यानंतर आपण लहान मुलांना स्लाटिंग लाईन शिकवायला हवी. तीदेखील सर्वप्रथम आपण काढून द्यावी आणि मुलं ती बघून बघून काढायला शिकतील.
  • यानंतर तुम्ही स्लीपिंग लाइन काढायला शिकवायला हवी. स्लीपिंग लाइन देखील तुम्ही सर्वप्रथम काढून द्यावी नंतर बोलू त्यावर घेऊन स्वतः काढण्याचा प्रयत्न करतील.
  • आणि त्यानंतर कमी curve लाईन काढायला शिकवायला हवी. म्हणजेच गोलाकार लाईन करायला शिकवायला हवी. ते देखील तुम्ही स्वतः प्रथम काढून घ्यावी नंतर मुले ती बघून बघून काढायला शिकतील.
  • आणि खाली आता तर बाजारामध्ये लाईनची ट्रेसिंग बुक देखील उपलब्ध होत असतात. तर ही बुक तुम्ही तुमच्या मुलांना आणून द्यावी जेणेकरून त्यांना त्यावर शिकता येईल. सारखे सारखे गेल्यावर लहान मुलांना व्यवस्थित अक्षर गिरवायला शिकता येईल.
वाचा   चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

मित्रांनो, एबीसीडी शिकवणे आधी तुम्ही मुलांना लाईन्स ची ओळख करून द्यावी. जेणेकरून त्यांना एबीसीडी चा व्यवस्थित आकार काढता येईल. आणि त्यांना एबीसीडी शिकण्यास सुलभ होईल.

लहान मुलांना एबीसीडी शिकवतांना कशा प्रकारे शिकवाल?

मित्रांनो, एबीसीडी शिकवणे आधी तुम्ही लहान मुलांना लाईन्स कशा काढाव्यात याची ओळख करून दिले पाहिजे. तसेच सुरुवातीला तुम्ही एबीसीडी चा राइम्स लहान मुलांना ऐकवल्या पाहिजेत. जेणेकरून एबीसीडी नेमक काय आहे हे त्यांना कळू शकेल. बरेच जण हे लहान मुलांना युट्युब वरील एबीसीडी चे सॉंग्स ऐकवत देखील असतात. आणि गाण्याच्या सहायाने लहान मुले एबीसीडी बोलायला देखील लवकर शिकतात. आणि बरेच लहान मुले तर खेळता-खेळता देखील एबीसीडी चे सॉंग्स गाताना दिसून येत असतात.

  • लहान मुलांना तुम्ही एबीसीडी शिकण्यासाठी एक मोठा तक्ता आणून घ्यायला हवा. आणि त्यातच याद्वारे तुम्ही लहान मुलांना एबीसीडी देखील शिकवू शकतात. एका मोठ्या स्केल च्या साह्याने तुम्ही ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट असे बोलायला शिकवायला हवे. आणि लहान मुलं अगदी ऐकत देखील लवकर त्यामुळे त्यांना लवकर कॅच करता येते.
  • तसेच तुम्ही तुमच्या लहान मुलांना एबीसीडी ची खेळणी आणून देखील एबीसीडी शिकवू शकतात. म्हणजेच खेळता-खेळता खेळण्याच्या माध्यमातून एबीसीडी लहान मुले सहजरित्या शिकतात.
  • आणि एबीसीडी हे लिहायला शिकवा ना तुम्ही वरील प्रमाणे लाईन्स ची ओळख तर करून दिलीच आहे. तर ए टू झेड पैकी स्टॅंडिंग लाईन आणि स्लीपिंग लाइन अशी अक्षरे साईडला काढून घ्यावीत. आणि ती सुरुवातीला शिकवायला हवीत. स्टॅंडिंग लाईन आणि स्लीपिंग लाइन मधील अक्षरे म्हणजे, E,F,H,I,L ही अक्षरे काढायला शिकवावेत.
  • त्यानंतर तुम्ही स्लान्टींग लाइन वाली अक्षर काढायला शिकवायला हवीत. ती म्हणजे,A,K,M,V,Y,M,W,X,Z अशा पद्धतीची म्हणजेच स्लाटिंग लाईन वाले अक्षर काढायला शिकवायला हवेत.
  • आणि त्यानंतर तुम्ही गोलाकार अक्षरे काढायला शिकवायला हवीत. जसे की,Q,O,G,D,C,B,P,R,U अशा प्रकारची Curve लाइन्स वाली अक्षरे. जेणेकरून त्यांना अक्षरे काढण्यास सुलभ होतील.
  • हल्ली बाजारामध्ये एबीसीडी चे ट्रेसिंग बुक देखील मिळतात. तर ते बूक तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन द्यावी आणि त्यावर एबीसीडी चे अक्षर गिरवायला शिकवावे. सर्वप्रथम तुम्ही त्यांना अक्षर कसे गिरवावे हे गिरवून दाखवावे आणि नंतर त्यांना अक्षर यांवर गिरवायला सांगावे.
  • तसेच लहान मुलांना सहज रित्या एबीसीडी बोलता यावी यासाठी तुम्ही त्यांना खेळण्याच्या माध्यमातून देखील एबीसीडी बोलायला शिकवायला हवे जेणेकरून त्यांना शिकतांना जास्त त्रास होणार नाही.
  • आज-काल आता बाजारांमध्ये सध्या एबीसीडी चे गेम्स बुक देखील उपलब्ध आहेत. तशी भूक तुम्ही लहान मुलांना आणून द्यावेत जेणेकरून गेम खेळता खेळता नाही एबीसीडी शिकायला सहज सोपे जाईल. म्हणजेच गेम च्या साह्याने त्यांच्या कृतीयुक्त सहभाग होतो आणि कृतीयुक्त सहभागाने लहान मुलं लवकर शिकत असतात.
  • तसेच तुम्ही एबीसीडी चे लहान मुलांना ऐकू यायला हवेत जेणेकरून ते त्यांच्या लवकर लक्षात राहतात आणि ते गुणगुणत देखील असतात.बरेच लहान मुले तर हे खेळताना देखील एबीसीडी सॉंग बोलत बोलत खेळताना दिसून येतात. म्हणजे एबीसीडी चे सॉंग ऐकल्याने त्यांच्या तोंडात देखील तेच गुणगुणत असतात. यामुळे त्यांना एबीसीडी शिकणे सोपे होते.
  • तसेच लहान मुलं चित्र बघून देखील शिकत असतात. बाजारात एबीसीडी च्या मोठ्या चित्रं वाल्या बुक देखील उपलब्ध असतात. म्हणजेच ए फॉर एप्पल तर एप्पल चे मोठे चित्र असेल आणि त्याला कलर देखील करायला एक वेगळं चित्र दिलेल असतं. म्हणजेच लहान मुलाचे चित्रांच्या माध्यमातून देखील एबीसीडी लवकर शिकतील शिवाय त्यांना कलर करायला देखील आवडत असते. आणि यामुळे देखील ते लवकर एबीसीडी शिकू शकतील.
वाचा  संडास मधून रक्त पडणे याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय

लहान मुलांना एबीसीडी शिकवताना सर्वप्रथम तुम्ही त्यांना लाईन्स कशा खायला हव्या त्या पासून सुरुवात करायला हवी. त्यानंतर तुम्ही त्यांना ट्रेसिंग बुक वर हळूहळू शिकवावे. एबीसीडी चे बरेच सांगायला हवेत वरील सर्व प्रमाणे जर तुम्ही लहान मुलांना एबीसीडी शिकवले तर लवकरच त्यांना एबीसीडी शिकणे देखील सोपे होऊ शकते. अरे जास्तीत जास्त कृतीयुक्त सहभागातून मुले लवकर शिकत असतात. तर मित्रांनो आज आपण एबीसीडी लहान मुलांना शिकवायचे असल्यास ती कशा पद्धतीने शिकवायला हवी हे वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत.

जाणून घ्या : बाळाचे ओठ फुटणे आणि त्यावरील उपाय 

मित्रांनो, आम्ही वरील प्रमाणे सांगितलेकी माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अधिक माहिती साठी येथे जाणून घेऊ शकता.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here