बऱ्याच लहान मुलांना शिस्त लागणे हे फार गरजेचे असते आणि बऱ्याच वेळेस असे होते की आई वडील हे दोन्ही जर कामाला जात असेल तर त्या मुलाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आणि म्हणून हे एक मोठे कारण असू शकते की मुलांना शिस्त लागत नाही. तसेच लहान वया मध्येच मुलांना जर शिस्त लागली तर फार उपयोगाचे ठरते. आजकाल बघायला गेले तर प्रत्येक लोकं वेगवेगळे जाऊन राहतात. म्हणजेच कोणीच आजी-आजोबांसोबत राहत नाही. मग आजी आजोबांच्या गोष्टी त्यांचे मार्गदर्शन त्यांचा अनुभव त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही आणि मुले देखील एकटीच राहील लागतात. त्याला एक मोठे कारण म्हणजे आपला फोन आहे मुले दिवसभर फोन मध्येच असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे भान नसते की आपल्या आजूबाजूस काय चालले आहे. तसेच आपण काय करतो आहे किंवा कोणत्या प्रकारे करतो आहे याचे जरासे भान उरत नाही.
तसेच मित्रपरिवार देखील कमी होत जातो व संवाद साधने देखील कमी होतं तसेच संवाद साधणार नाही तर त्या मुलांमध्ये आत्मविश्वास कुठे तरी कुठून येणार. शिस्त आली पाहिजे म्हणजे ती आपल्या बोलण्यात देखील दिसली दिसली पाहिजे. समोरच्याला न सांगता ते कळले पाहिजे आणि ही शिस्त जर मुलांना लहान वयापासून लावली तर बऱ्याच समस्यांचे समाधान आपोआपच मिळेल. तर आपण आज या गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत की जर मुलांना लहान वयापासूनच शिस्त लावायची असेल तर ते आपण कोणत्या प्रकारे लावू शकतो. तसेच मुलांना शिस्त न लागण्याची कारणे कोणती हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया.
Table of Contents
मुलांना शिस्त लावणे म्हणजे काय ?
तर नक्की मुलांना शिस्त लावणे म्हणजे नेमकं काय मुलांच्या बोलण्यातून वागण्यातून बोलण्यातून एक प्रकारची शिस्त व शिस्त दिसून येते तसेच मोठ्यांचा आदर करणे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या त्या मुलांमध्ये असेल म्हणजेच शिस्त त्याच्या अंगामध्ये असेल तर तो मुलगा सर्वगुणसंपन्न असा वाटतो. कारण आजकाल बरीच मुलं पारगाव झालेली आहेत म्हणजेच ते मोठ्यांमध्ये काहीही बोलतात तसेच त्यांना मोठ्या व छोट्या चे भान उरत नाही आपल्या आजूबाजूस कोण आहे ह्याची देखील त्यांना उरत नाही.
तसेच कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी कोणत्या वेळी कोणती गोष्ट करू नये हे देखील सतत सांगावे लागते. आई वडिलांना नेहमी त्या मुलावर ओरडावे लागते असे न होता मुलांनी जर आई-वडिलांची सर्व कामे समजून घेतली. त्याची जबाबदारी समजून घेतली त्यांची कामे ऐकली तसेच मोठ्यांचा आदर केला आपल्या आजूबाजूस कोण आहे कसे आहे हे जाणून घेतले. याच प्रकारे आपले गुरु जे तुम्हाला शिकवणी देतात किंवा तुमचा मित्र परिवार यांचा आदर केला आणि वृद्ध माणसांना किंवा प्रत्येकाला ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत केली तर आपण ह्याला एक चांगला शिस्तबद्ध मुलगा म्हणू शकतो.
मुलांना शिस्त लागण्यासाठी काय करावे ?
तर शिस्त म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतले. तर आता आपण जाणून घेऊया की जर तुम्हाला तुमच्या मुलांना शिस्त लावायची असेल तर तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारे तुमच्या मुलाला शिस्त लावू शकता चला तर मग बघुया.
वेळेच्या वेळी रागवा व बरोबर गोष्ट सांगा :
बऱ्याच वेळा असे बघण्यात आले आहे की बरेच आई-वडील मुलाला चुकल्यावर त्याच वेळी सांगत नाही. तसेच असे केल्यामुळे मुलगा अजूनच बिघडत जातो. जर तुम्ही त्याची चुकी झालेल्या वेळी त्याच वेळी जर तुम्ही त्याची चूक दाखवून दिली आणि त्याच्याकडून ती चूक सुधारून घेतली. तर त्याला त्याच वेळी समजेल की असे केल्याने काय होतो किंवा कोणती गोष्ट करायला हवी कोणती गोष्ट करायला नको. म्हणून पालकांनी योग्य वेळी योग्य तो सल्ला द्यावा.
एक वेळापत्रक बनवा :
एक वेळापत्रक बनवावे म्हणजे आपला दिवसभरातील वेळ प्रत्येक गोष्टीला वाटून द्यावा. म्हणजेच अभ्यासाचा थोडा वेळ खेळण्यासाठी थोडा वेळ काहीतरी नवीन शिकण्यासाठी थोडा वेळ असे एक वेळापत्रक बनवावे आणि त्यानुसार आपला दिनक्रम चालू करावा. असे केल्याने एक तर मुलाला वेळेचे महत्त्व कळेल व कधी कोणत्या गोष्टी करावी हे देखील समजेल.
मोबाईल पासून दूर ठेवावे :
मुलांना शिस्त लावायची असेल तर पहिल्या त्यांना मोबाईल पासून दूर ठेवा. कारण त्यांना त्या बाहेरचे जग काही माहितीच नाही बाहेरच्या जगामध्ये काय होत आहे काय घडामोडी झाल्या हे देखील माहिती नसते. तर तुम्ही जर त्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली तर त्यांना समजावून सांगा त्या चुकीची जाणीव करून द्या. तसेच कधीकधी मारायला लागले तर मारावे पण प्रत्येक वेळी मुलाला मारल्याने मुलगा सुधारत नसतो. कधी कधी जर तुम्ही त्याला दोन प्रेमाच्या गोष्टी सांगून जरी सुधरवायचा प्रयत्न केला तरी लहान मुलं ऐकतच.
लहान मुलांना शिस्त लागण्यासाठी कोणते प्रयोग करू शकता ?
तर आपण शिस्त म्हणजे काय ती मुलांना कशा प्रकारे व कशी लावावी हे आपण बघितले आता आपण जाणून घेऊया की आपण आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारे प्रयोग करून मुलांना शिस्त लावू शकतो चला तर मग बघुया.
आजी-आजोबांसोबत राहू द्या :
बरीच लोकं वेगवेगळे राहतात म्हणून त्यांना आजी-आजोबांच्या गोष्टी किंवा त्यांचा अनुभव ऐकायला मिळत नाही. तर तुम्ही असं न करता मुलाबरोबर आजी-आजोबांना राहू द्या रोज थोडावेळ का होईना पण आजी आजोबा सोबत त्या मुलाला ठेवल्यामुळे तुम्ही त्याचे निरीक्षण करा की तो वडीलधाऱ्या व्यक्तींशी कसा बोलतो. तसेच आजी-आजोबा ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी किती मन लावून ऐकतो व त्याचे पालन करतो. अशाप्रकारे तुम्ही मुलाचे निरीक्षण करू शकता व त्याला चांगले व वाईट यामधला फरक सांगू शकता.
गोष्टी सांगाव्या :
तुम्ही लहान मुलांना चांगल्या चांगल्या बोध देणाऱ्या गोष्टी सांगू शकता आणि गोष्ट सांगून झाल्यावर त्या मुलाला एवढेच विचारा की आज या गोष्टीतून का तू काय शिकला. तसेच तू या या गोष्टी मधील जो चांगला भाग आहे तो तुझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे आचरणात आणू शकतो. तर पालकांनी किंवा त्यांच्या आजी-आजोबांनी दिवसभर यामधून एक तरी चांगली गोष्ट त्या मुलाला सांगावी.
आश्रमाला भेट द्यावी :
तुम्ही अनाथालय किंवा कोणत्याही वृद्धाश्रमात जाऊन याचे निरीक्षण करावे की तुमचा मुलगा त्या व्यक्तींना कोणत्या प्रकारे मदत करतोय. तो त्याच्या परीने काय काय करू शकतो आणि काय काय करतोय. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्या लोकांची संवाद कसा साधतोय हे आपण जाणून घेऊ शकतो.
तर आज आपण बघितले की शिस्त म्हणजे नेमकं काय ? तसेच ते आपण मुलाला कोणत्या प्रकारे लावू शकतो. याच प्रकारे तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !