लहान बाळाचे केस गळणे

0
1595
लहान बाळाचे केस गळणे
लहान बाळाचे केस गळणे

नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा लहान बाळाचा जन्म झाल्यावर लहान बाळांना केस कमी असल्याचे दिसून येत असते. हे प्रत्येक बाळाच्या बाबतीत असते असे नाही. प्रत्येक लांब आहे वेगळे प्रकारचे असते म्हणजे त्यांची शारीरिक रचना देखील वेगवेगळे प्रकारचे असते. काही लहान बाळांचे केस हे जन्मदरात खूपच घनदाट आणि लांब देखील असल्याचे बघायला मिळतात. तर याउलट काही लहान बाळांची केस हे अगदी पातळ एका साईडला केस आहेत आणि एका साईडला फारच कमी प्रमाणात केस आहेत असे देखील दिसून येत असतात. आणि काही लहान बाळाला तर एकदमच टकलू असे देखील दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक बाळ हे वेगळ्या प्रकारचे असते. त्यामुळे जर बाळाला जास्तीचे केस नसले तर त्यांचे आई-वडील चिंतेत पडतात. अरे देवा आपल्या बाळाला जास्तीची केसच नाहीत? असे बोलत असतात. परंतु याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण सुरुवातीचे लहान बाळाचे केस हे कमी-जास्त प्रमाणात असतातच. लहान बाळाचा जन्म झाल्यावर बऱ्याच वेळा म्हणजेच बराच कालावधीत लहान बाळांची केस गळण्याची समस्या असते. म्हणजेच एक महिने दोन महिने तीन महिने अशा सुरुवातीच्या काळामध्ये लहान बाळांची केस हे सतत गळताना दिसून येत असतात. त्यामुळे लहान बाळाच्या आई यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते की बाळाचे केस गळणे मधील कारण काय असू शकते? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना उद्भवत असतात. परंतु लहान बाळाचे केस गळण्या मागील नेमकी कारणं तरी कोणती असू शकते? याबद्दल आपल्या माहिती जाणून घ्यायला हवी. तर मित्रांनो, आज आपण लहान बाळाचे केस गळणे याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग लहान मुलांचे केस गळणे यामागील नेमकी कारणे कोणती असू शकतात?आणि त्यावर काय उपाय आपण करू शकतो?  याबद्दल खालील प्रमाणे जाणून घेऊयात. चला तर मग जाणून घेऊयात लहान बाळाचे केस गळणे

लहान बाळांची केस गळणे मागील नेमकी कारणे कोणती असू शकतात?

 

लहान बाळ जन्मल्यावर काहींचे केस कमी असते तर काहींचे टक्कल असते तर काहींना खूप असे घनदाट केस असताना दिसून येत असतात. बऱ्याच वेळा लहान बाळांच्या केसान मागील कमी-जास्त येण्याचे प्रमाण हे त्यांच्या घरावर अवलंबून असते. आणि जन्म झाल्यावर काही बाळांचे तर सतत केस हे गळताना देखील दिसून येत असतात. त्यामुळे त्यांचे आई-वडील देखील चिंतेत असतात की आपल्या बाळाचे केस गळण्या मागील नेमके कारण कोणते असू शकते? असे प्रश्न देखील त्यांना पडत असतात. लहान बाळांना केस गळणे मागील नेमकी कोणती कारणे असू शकतात याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • लहान बाळांचे केस हे त्यांच्या आई-वडिलांवर अवलंबून असतात. म्हणजे अनुवंशिकतेचा परिणाम म्हणून देखील लहान बाळाचे केस कमी जास्त यावर दिसून येतो. लहान बाळ हे खुपच नाजूक असतात त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे बाळ केस हे देखील अत्यंत नाजूक असे असतात त्यामुळे ते गळण्याची समस्या असू शकते.
  • बऱ्याच ठिकाणी लहान बाळाचे जावळ काढण्याची पद्धत असते म्हणजेच डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्याची पद्धत असते. कारण असे केल्याने बाळाचे केस हे चांगल्या प्रकारे येत असतात आणि हे देखील एक प्रकारे योग्यच आहे कारण जन्म झाल्यावर बाळाची केस अगदी मऊ मुलायम असतात आणि जेव्हा बाळाचे जावळ काढले जाते तेव्हा बाळाला नवीन केस हे चांगल्या प्रकारे येऊ शकतात.तसेच बाळाच्या पहिल्या केसांमधील आणि जावळ नंतर काढलेल्या केसांमध्ये देखील फरक चांगल्या प्रकारे जाणून येत असतो. आणि केसांचा कलर देखील चेंज होत असतो.
  • लहान बाळाचा जन्म झाल्यावर आईच्या पोटातील वातावरण हे वेगळे असते आणि बाहेरील वातावरण हे वेगळे असते म्हणून वातावरणाचा परिणाम  म्हणून देखील लहान बाळाचे केस गळू शकतात.
  • लहान बाळ मधील हार्मोन्स हे बदल होत असतात त्यामुळे देखील त्याचा परिणाम हा केसांवर दिसून येत असतो परिणामी केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.
  • बरेच लहान बाळा हे झोपताना एकाच कुशीवर झोपत असतात आणि सारखे सारखे त्याच कुशीवर झोपल्यामुळे त्याचा परिणाम हा केसांवर दिसून येत असतो परिणामी, ज्या कुशीवर लहान बाळ सारखे सारखे झोपत असते तेथील केस हे पातळ होत असतात आणि गळत असतात.
  • लहान बाळ जन्मते तेव्हा त्यांची टाळू ही पूर्ण भरलेली नसते. त्यामुळे ती हळूहळू भरत असते. जसजसे बाळ हे मोठ मोठे होत जाते, तसतसे त्यांची टाळू ही भरतांना दिसून येत असते. आणि लहान बाळांचे केस हे टाळूला चिकटून असतात. त्यामुळे ही टाळू ही जसजशी भरत असते तर तसतसे टाळूवरील कवच हे हळुवारपणे निघत असते आणि केस हे टाळूला चिटकलेली असल्यामुळे जेव्हा टाळूचे कवच निघते त्यामुळे केस देखील निघत असतात अशा मुळे देखील लहान बाळाचे केस गळू शकतात.
  • काहीजण हे लहान बाळाला स्तनपान करताना बाळाच्या डोक्यावर हात फिरवत असतात तर यामुळे देखील लहान बाळाचे केस गळू शकतात.
वाचा  नखाला बुरशी लागणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

मित्रांनो, लहान बाळांचे वरील प्रमाणे सर्व कारणांमुळे केस गळतीची समस्या उद्भवते. बरेच पालक आहे बाळाच्या केस गळती मुळे चिंतेत येताना दिसून येत असतात. त लहान बाळांचे केस गळू नयेत यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल देखील आपला माहिती जाणून घ्यायला हवी.

 

लहान बाळांची केस गळत असल्यास काय काळजी घ्यायला हवी?

 

लहान बाळाचा जन्म झाल्यावर तो जसजसा मोठा होत असतोच तसतसे त्याची केस गळण्याची समस्या उद्भवत असते. आणि लहान बाळाचे केस गळतीमुळे त्याचे आई-वडील हे चिंतेत येताना देखील दिसून येत असतात. लहान बाळाचे केस जर गळत असतील तर तुम्ही योग्य त्या प्रकारे बाळाची काळजी घ्यायला हवी.

  • बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा तेथील वातावरण आणि बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा बाहेरील वातावरण या दोघांमध्ये फरक असतो. तर बाहेरील वातावरणाशी मिळतेजुळते करून घ्यायला बाळाला वेळ लागत असतो यामुळे देखील बाळाची केस गळू शकतात परंतु जेव्हा हे वातावरणाच्या बदलाशी बाळ  मिळतेजुळते करत असते तेव्हा या समस्या आपोआप कमी होत जातात.
  • खरं तर लहान बाळांची केस गळणे ही सामान्य बाब असते. लहान बाळ खूपच नाजूक आणि कोमल असते आणि त्याची आलेली केस ही तर एकदमच नाजूक आणि मुलायम स्वरूपाचे असतात. त्यामुळे ती हळूहळू गळत देखील असतात. त्यामुळे याबाबत जास्त काळजी करायला नको कारण ज्याप्रमाणे केस गळती ज्याप्रमाणे केस देखील आपोआप येत असतात.
  • अनुवंशिकतेचा परिणाम म्हणून देखील बाळाची केस गळू शकतात. जर माझे आई-वडील यांना केसान विषयी काही समस्या असेल तर ती बाळाबद्दल देखील दिसून येत असते.
  • आई जेव्हा स्तनपान करत असते तेव्हा बऱ्याच वेळा तिला बाळाच्या डोक्यावर हात फिरण्याची सवय असते कारण की हात फिरल्यामुळे बाळाला शांत वाटते आणि बाळ व्यवस्थितपणे दूध पीत असतो परंतु यामुळेदेखील बाळाचे केस गळू शकतात. यासाठी आईने बाळाच्या डोक्यावर वारंवार हात फिरवणे कमी करावे जेणेकरून बाळाची केस गळतीची समस्या कमी होऊ शकेल.
  • बऱ्याच लहान बाळांना एकाच कुशीवर झोपण्याची सवय असते. आणि एकच कुशीवर सतत झोपल्यामुळे केसांच्या त्वचेवर सारखे सारखे घर्षण होत असते आणि त्यामुळे बाळाचे केस गळू शकतात. त्यासाठी तुम्ही बाळाला एकाच कुशीवर झोपण्याची सवय करू नका बाळ जेव्हा एका कुशीवर झोपले असते तेव्हा त्याला दुसर्‍या कुशीवर करावे आणि हळुहळू करून दोघ बाजूने व्यवस्थित प्रकारे झोप येईल अशी सवय करावी जेणेकरून त्याचे केस गळतीची समस्या कमी होऊ शकेल.
  • बाळाची केसे सततच गळत असतील तर तुम्ही बाळाच्या डोक्यातील त्वचेला साध्या तेलाने मसाज हळूवारपणे करावे जेणेकरून केस पूर्णपणे गळणे तर बंद होणार नाही परंतु केस गळती खूपच कमी प्रमाणात होईल.
  • बाळाचा जन्म झाल्यावर बाळाच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतात यामुळे देखील केस गळू शकतात परंतु जेव्हा हे हार्मोन्स व्यवस्थित प्रकारे येण्यास सुरू होतात तेव्हा केस गळतीची समस्या आपोआप बंद होते.
  • बऱ्याच वेळा बाळ आजारी पडल्यामुळे देखिल केस गळू शकतात यासाठी तुम्ही बाळाची वेळोवेळी काळजी घ्यायला हवी तसेच डॉक्टरांना विचारून योग्य तो सल्ला घ्यायला हवा जेणेकरून बाळ व्यवस्थित प्रकारे राहील.

जाणून घ्या : लहान बाळाचे कां कधी टोचावे 

मित्रांनो, बाळाची केस गळत असल्यास काय नेमके उपाय करायला हवेत, कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी? याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. जर बाळाचे जास्तच केस गळत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतला पाहिजे.

वाचा  अचानक ओठ सुजणे कारण व उपाय

वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, याबद्दल तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अधिक माहिती साठी येथे पाहू शकता.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here