लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास काय करावे

0
1180
लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास काय करावे
लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास काय करावे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास काय करावे भरपूर पालक हे आपल्या मुलांची काळजी घेण्यास फार सतर्क असतात. त्या मुलांच्या हालचालीकडे व त्यांच्या खाण्यापिण्यावर इतके लक्ष ठेवतात, की त्यांची एक-एक गोष्टीचे अनुकरण करत असतात. तरीही मुले इतकी जिद्दी असतात, की ते त्यांना जे करायचे, ते करूनच घेतात. मुलांना आपण जर सांगितले की बाहेरचे पाणी पिऊ नको, तरी खेळायला गेले, तर तिथे उघड्यावरचे पाणी पिऊन येतात. थंड पदार्थ खातात. आईस्क्रीम खातात. आपण जे सांगतो, त्याच्या उलट लहान मुले करत असतात. त्याच्या अभावी मुलांना सर्दी होते, खोकला होतो, आंबटचिंबट पदार्थ जास्त खाऊ नका, तरी ऐकत नाहीत, ते खातातच. मग त्यांना खोकला इतका तीव्र होतो, की त्यांना अक्षरशः खोकताना कफ पडतो, आज आपण बघणार आहोत, की लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास, त्यावर आपण कोणते उपाय करू शकतो? आता आपण सर्दी-खोकला होण्याची मुख्य कारणे कोणती? ते जाणून घेऊया, चला तर मग ते बघूया! 

सर्दी खोकला होण्याची मुख्य कारणे? 

अनेक कारणांमुळे, लहान मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात! 

  • बदलत्या वातावरणामुळे, त्याचा परिणाम लहान मुलांवर  खूप लवकर होतो. त्यामुळे त्यांना सर्दी खोकला सारख्या समस्या बघावयास मिळतात. 
  • तसेच जास्ती वेळ पाण्यामध्ये, खेळल्याने ही सर्दी-खोकला होतो. 
  • जर लहान मुले थंड पाण्याने आंघोळ करतात. त्यावेळी थंड पाणी डोक्यावर पडते. त्यावेळी त्यांना सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. 
  • तसेच थंड पेय, आईस्क्रीम, कोका-कोला, थम्स-अप, यासारखी थंड शीतपेय पिल्यामुळे, लहान मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो. 
  • तसेच आजकालच्या वाढत्या आजारामुळे स्वाईन फ्लू , डेंगू , कोरोना, यासारख्या आजारामध्ये, ही मुलांना सर्दी खोकला होतो. 
  • तसेच आंबट-चिंबट पदार्थ खाल्ल्याने, लहान मुलांना खोकला येण्याची शक्यता असते. 
  • तसेच दुसऱ्या ठिकाणचे पाणी बदल झाल्यामुळे, ही लहान मुलांना सर्दी खोकला होऊन जातो. 
  • तसेच पावसाळ्यामध्ये पाण्यात भिजल्यावर, लहान मुलांना सर्दी खोकला होतो. 
  • हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड वातावरणात राहिल्यामुळे, ही लहान मुलांना सर्दी व खोकला लवकर होतो. 
  •  उन्हाळ्यात उष्णतेचा प्रभाव वाढून, लहान मुलांच्या छातीतील कफ हा वितळतो,  व त्यांना सर्दी होते. 

सर्दी खोकला झाल्यास, त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सर्दी खोकला होण्याची कारणे, नेमकी कोणती ते सांगितलेले आहेत. आता आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

वाचा  मुलांना चांदीच्या भांड्यात जेऊ घालण्याचे फायदे.

अद्रक चा वापर करा

हो, खरंच लहान मुलांना सर्दी खोकला झाला, तर त्यांच्यासाठी अद्रक हे फार फायदेशीर ठरेल. कारण अद्रक मध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. जर लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन झाले, त्यावेळी जर तुम्ही अद्रक चा रसचा मुलांनवर वापर केला, तर त्यांना ताबडतोब फरक पडेल. त्यासाठी तुम्ही अद्रक किसून घ्यावे, त्याचा रस काढून घ्यावा, त्यामध्ये मध टाकून, लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास, त्याचे चाटण करायला लावावेत. असे दिवसातून त्यांनी तीन वेळेस केले, तर त्यांना या सर्दी खोकल्यावर त्वरीत आराम मिळू शकतो. 

दूध हळद चा वापर करा

हळद मध्ये ऑंटीसेप्टीक, आंटिबॅक्टीरियल गुणधर्म असतात. ज्या वेळी मुलांना वायरल इन्फेक्शन होते,  त्यामुळे त्यांना सर्दी खोकला, सारख्या समस्या बघायला मिळतात. अशा वेळी जर तुम्ही मुलांना सकाळी व संध्याकाळी एक कप दुधात, एक चमचा हळद ची पावडर टाकून, ते दूध मुलांना प्यायला दिलेत, तर मुलांच्या सर्दीवर आराम मिळतो. शिवाय खोकलाही त्याने लवकरात लवकर थांबतो. असे तुम्हाला हप्त्यातून रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ करावयाचे आहे. मुले जर प्यायला नखरे करतील, तर त्यामध्ये चिमूटभर दोन दाणे साखरेची टाकू शकतात. 

मुलांना आयुर्वेदिक चहा प्यायला द्या

आता तुम्ही म्हणाल, आयुर्वेदिक चहा कसा करायचा? व तो मुलांना कसा फायदेशीर ठरेल? 

 जर मुलांनी आयुर्वेदिक चहा पिला, तर त्यांचे छातीतील कफ लवकर वितळतो, व बाहेर निघतो, व खोकल्यावर ही आराम मिळतो. त्यासाठी तुम्हाला गवती चहा+दालचिनी+लवंग+सुंठ+ तुळशीचे पाने हे एकत्र करून, चहा पावडर व त्यात दूध टाकून, किंवा कोरा चहा खळखळ उकळून मुलांना द्यावे. मुलांना तुम्ही हा चहा  दिवसातून दोन वेळेस देऊ शकतात. त्याने काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. उलट मुलांच्या छातीतील कफ, लवकर बाहेर निघण्यास मदत होते. 

सुंठ पावडर व जेष्ठमधाचा वापर करा

ज्या वेळी लहान मुलांना सर्दी खोकला होतो, त्यावेळी त्यांचे डोके ही जाम दुखतेय, डोळ्यातून पाणी येते, अशा वेळी तुम्ही सुंठ पावडर + ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून त्यामध्ये, मध टाकून, त्याचे चाटण करायला द्यावे. मुलांना तुम्ही हे दिवसातून तीन वेळेस करायला द्यावे. त्यामुळे त्यांचे सर्दीमुळे डोके दुखणे, अंग दुखणे, घसा दुखणे, तोंडाची चव जाणे, या सारख्या समस्यांवर त्यांना आराम पडेलच. 

सितोपलादि चूर्ण द्या

सितोपलादि चूर्ण हे पूर्वीच्या काळापासून सर्दी खोकल्यावर वापरले जाते. ज्यावेळी मुलांना सर्दी खोकला होतो, त्यावेळी त्यांना शारीरिक समस्याही उद्भवतात. सारखे सारखे खोकून-खोकून त्यांच्या घशात दुखायला लागते, नाक चुळचुळ करते. डोके दुखते, छातीत घरघर आवाज येतो, त्यामुळे मुलांचा चेहरा अगदी कोमेजुन जातो. अशा वेळी जर मुलांना तुम्हीच सितोपलादी चूर्ण दिले, तर त्यावर तुम्हाला आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला सितोपलादि चूर्ण हे आणायचे आहे. हल्ली मार्केटमध्ये कुठेही, तुम्हाला आयुर्वेदिक भांडार मध्ये, मेडिकल्स मध्ये, सितोपलादि चूर्ण हे मिळेल. मग ते चूर्ण तुम्हाला एक चमचा घेऊन, त्यात मध टाकायचे आहेत. त्याचे एकत्र मिश्रण करून मुलांना दिवसातून तीन वेळेस चाटण करायला द्यायचे आहेत. याने मुलांच्या सर्दी खोकल्यावर लवकरात लवकर आराम मिळतो. विशेष म्हणजे या चूर्णाचा काहीही साईड इफेक्ट नाही. 

वाचा  दुधी भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ओवा चा वापर करा

ओवा हे उष्ण असतात. जे तुमच्या शरीरातील कफ वर फार फायदेशीर ठरतो. ज्यावेळी मुलांना सर्दी खोकला होतो, त्यावेळी मुलांचा श्वास घेण्याच्या वेळी छातीमध्ये घरघर आवाज येतो, अशावेळी तुम्हाला ओवा तव्यावर भाजून घ्यायचे आहे, व त्या सुती कापडाच्या रुमाला मध्ये, बांधून त्याची पोटली करायची आहे, व त्याने तुम्हाला मुलांची छाती शेकायचे आहेत. शेकतांना अति गरम असता कामा नये,  मुलांना छातीला जखम होऊ शकते, कोमट कोमट मुलांच्या छातीवर, माथ्यावर, व नाकाजवळ, शेक द्यायची आहे. त्याने तुमच्या मुलांच्या छातीमधील, कफ लवकरात लवकर वितळतो, व मुलांची सर्दी लवकर मोकळी होऊन, त्यांना आराम मिळतो. 

मुलांना गरम पाण्याची वाफ द्या

सर्दी खोकला झाला, की मुलांना अक्षरशः चेहरा कोमजुन जातो, त्यांना जेवणाची इच्छा होत नाही, अशावेळी तुम्ही मुलांना दिवसातून दोन वेळेस गरम पाण्याची वाफ द्यावे, गरम पाण्याची वाफ घेताना तुम्ही त्यांच्या बाजूला बसावे, आता हल्ली मार्केटमध्ये गरम पाण्याच्या वाफ घेण्याचे औषधेही मिळते, ते पाण्यामध्ये टाकून, मशिनच्या साह्याने मुलांना तुम्ही त्याची वाफ द्यावे. त्याने सर्दी लवकरात लवकर मोकळी होते व त्यांना आराम मिळतो. 

निलगिरीच्या तेलाचा वापर करा

 मुलांना सर्दी खोकला होतो, त्यावेळी त्यांचे डोकेदुखीचे ही समस्या वाढतात. अशा वेळी तुम्ही मुलांच्या कपाळावर, निलगिरी चा तेलाचे थेंब लावावेत, व नाकावर ही निलगिरीचे तेलाने वास घ्यावा, तसेच रात्री त्यांच्या छातीवर ही चोळून द्यावे. त्याने सर्दी चे इन्फेक्शन लवकर निघण्यास मदत मिळते. 

तुळशीच्या पानांचा काढा द्यावा

तुळशी घरात सगळ्यांकडे असते. तुळशी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोणतेही शारीरिक समस्येवर तुळशीचा रस चा उपयोग आपल्याला होतो. तुळशीमध्ये अँटीसेफ्टीक, अँटिबायोटिक्स, गुणधर्म असतात. ज्यावेळी तुमच्या मुलांना सर्दी व खोकला होते, अशा वेळी जर तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा मुलांना दिला, तर लवकरात लवकर फरक पडतो. अशा वेळी तुम्ही तुळशीचे 20 ते 25 पाने तोडून, एका पातेलीत टाकावे, त्यामध्ये दोन ते तीन काळेमिरे टाकावे, व त्यामध्ये लवंगाचे दोन-तीन तुकडे टाकावे, व ते एक ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत, उकळून घ्यावेत. नंतर कोमट कोमट झाल्यावर, मुलांना दिवसातून तीन वेळेस प्यायला द्यावेत  असे केल्यास मुलांचा सर्दी खोकला 7 ते 8 दिवसात लवकर जाण्यास मदत मिळते. शिवाय मुलांना तोंडाची चव जाणे, भूक न लागणे, या समस्येवरही त्वरित आराम मिळतो. 

वाचा   गावरान तूप खाण्याचे फायदे

लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास, काय काळजी घ्यावी? 

सर्दी-खोकला होणे, म्हणजे सामान्य आजार आहे. पण ज्यावेळी तो मुलांना होतो, त्या वेळी अत्यंत कोमेजून जातात. त्यांची काहीही खायची इच्छा होत नाही, शिवाय त्यामध्ये ते जास्त चिडचिड करतात. अशा वेळी आपण मुलांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. मग ती नेमकी कोणती, चला तर मग जाणून घेऊयात. 

  • लहान मुलांना सर्दी खोकला होतो, त्यावेळी त्यांच्यासोबत तुम्ही कॉटन चा रुमाल नेहमी द्या. जेव्हा खोकला येतो, त्यावेळी त्यांना तोंडाला रुमाल लावायला लावावेत. कारण सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन हे व्हायरल असते, खोकते वेळी रुमाल लावल्याने, त्यामुळे घरात कोणालाही लगेच, त्याचे परिणाम होत नाही. 
  • मुलांना बाहेर धुळीच्या वातावरणात जाऊ देऊ नका, कारण बाहेरच्या धुळीमुळे, सर्दी खोकला झाल्यावर, त्याचे विषाणू मुलांच्या नाकात जाऊन, अजून दुसरे आजार होण्याची शक्‍यता असते. तसेच हल्ली तर कोरोना सारखे जिवाणू सर्दी खोकला झाल्यावर, लवकर मुलांना पकडतात. त्यामुळे इन्फेक्शन अजून वाढते. 
  • बाहेर जातेवेळी मुलांच्या तोंडाला मास्क लावावा. 
  • मुलांना सतत गरम पाणी प्यायला द्यावे. 
  • तसेच मुलांना दिवसभरातून तीन वेळेस वाफ द्यावी. 
  • सर्दी खोकला झाल्यावर, मुलांना जेवण जात नाही, अशा वेळी तुम्ही त्यांना दिवसातून दोन वेळेस सूप प्यायला द्यावे. त्याने तोंडाची चव येते व मुले जेवण मागतील. 
  • मुलांना पुरेशी विश्रांती करायला लावावेत. कारण सर्दी खोकला मध्ये मुलांनी जेवढा आराम केला, तो तेवढा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो. 
  • सर्दी खोकला झाल्यावर मुलांना आंबटचिंबट पदार्थ, खायला देऊ नका. 
  • तसेच सर्दी खोकला झाल्यावर मुलांना जास्तीत त्रास होत असेल, तर डॉक्टरांना दाखवावे. 
  • मुलांना कुठे बाहेर शाळेत किंवा कामानिमित्त जायचे असेल, अशावेळी त्यांच्या रुमालावर तुम्ही निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकावेत, आणि त्याने सतत  वास घ्यायला लावावेत. 
  • तसेच तुम्ही मुलांच्या रुमालावर कापूर चुरगळून, तो रुमालावर लावावेत. त्याचा वास घेतल्याने, सर्दीवर आराम मिळतो. 

जाणून घ्या : लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला मुलांना सर्दी खोकला झाल्यास, कोणते उपाय करावेत. सर्दी खोकला कोणत्या कारणांनी होतो, तसेच सर्दी खोकला झाल्यावर, मुलांची तुम्ही कोणती काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, जर मुलांना फरक पडत नसेलच, तर तुम्ही त्यांना एकदा डॉक्टरांकडे दाखवावे, त्यावर तुम्हाला डॉक्टर अँटिबायोटिक्स औषधी व सिरप देतील. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. अजून माहिती साठी येथे पाहू शकता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here