लहान मुलं म्हटले की त्याला बघून आपल्या दिवसभरातील थकवा दूर होतो. चला तर मग आपण जाणून घेऊया लहान मुले लवकर बोलण्यासाठी काही उपाय आईच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या मुलाला बघते आणि प्रत्येक पालकाची इच्छा असते की हा लवकरात लवकर बोलायला शिकावा. याचे पहिले बोल आई किंवा बाबा असावे. तर मुलं बऱ्याच वेळेस बोलायला शिकतांना आपलच बघून बोलायला शिकतात. तसेच आपण त्या मुलासोबत सतत खेळत असू एकच शब्द जर आपण वारंवार बोलत असू तर तो मुलगा तो शब्द बोलायला लवकर शकतो. कारण लहान मुलांना मोठ्यांचे अनुकरण करायची सवय असते. आणि जसजसे तुम्ही कोणतीही गोष्ट करतात त्याप्रमाणे हे लहान मुलं त्या गोष्टीचे अनुकरण करण्यासाठी प्रयत्न करतात.
लहान मूल हे फार नाजूक असता लहान मुलांना सांभाळणे इतके कठीण काम कोणतेही नाही. तसेच लहान मुलांना काय होत आहे काय नाही हे लवकर समजून येत नाही. आई-वडिलांचा पूर्ण दिवस कामावर जात असेल तर त्या मुलांना पाळणा घरामध्ये सोडले जाते. त्या मुलाची काळजी घेतली जाईल किंवा नाही हे कशावरून. लहानपणापासून जर तुम्ही त्या मुलावर हळूहळू संस्कार करत असाल त्याच्याशी बोलत असाल त्याला बोलायला शिकवत असाल. तर तो मुलगा किंवा मुलगी कोणत्याही गोष्टी पटापट शिकतात. कारण लहान मुलांचा मेंदू फार तल्लक असतो ज्या गोष्टी आपल्यालाही लक्षात राहणार नाही त्या गोष्टी त्या मुलांना लक्षात राहतात. म्हणूनच ते आपले अनुकरण अगदी हुबेहूब करतात.
तरी त्यांचा वय हे खूपच झाले असेल तर मित्रांनो आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत की एखादं लहान मूल जन्मल्यानंतर ते की किती महिन्यांनी बोलायला लागतं आणि मुलं लवकरात लवकर बोलायला लागावी म्हणून आपण काय करू शकतो. आपल्या घरामध्ये छोट्यातला छोटा बदल करून पण त्या मुलाला लवकर बोलायला शिकवू शकतो ते आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग बघुया.
Table of Contents
लहान मुलं किती वर्षापासून बोलायला लागतात
तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नक्की लहान मुलं किती वर्षाचे झाल्यावर किंवा किती महिन्याचे झाल्यावर बोलायला लागतात. काही पालकांचे हे पहिले मुल असल्यामुळे त्यांना माहिती नसते की नक्की बाळाचे संगोपन कसे करावे. तसेच बाळ कितव्या महिन्या ला बोललेला लागते? बरेच मुलं साधारणता नऊ महिन्यानंतर बोबडे बोल बोलायला लागते आणि त्यामध्ये देखील ते बाळ फक्त सोपे सोपे व छोटे शब्दच उच्चारू व बोलू शकतात. जसे की आई, बाबा, मामा, काका, असे छोटे शब्दच बोलतात. याच प्रकारे तुम्ही अजून थोड्या वेळा नंतर त्या मुलाला ए बी सी डी व इतर काही शब्द अक्षर शिकवावी आणि त्याच्यापुढे ते सतत बोलावे जेणेकरून तोदेखील तेच ऐकून ऐकून बोलायला शिकेल.
लहान मुले लवकर बोलण्यासाठी काय करावे
मुलं किती वर्षाचे झाल्यानंतर बोलतात किंवा किती महिन्याचे झाल्यानंतर बोलतात हे आपण बघितले. आता आपण जाणून घेऊया की लहान मुलांना लवकर बोलण्यासाठी आपण काय काय करू शकतो चला तर मग बघुया.
एका शब्दाचे वारंवार उच्चार करा
असे म्हटले जाते की जे सतत आपल्या कानावर पडते ते आपण लवकर शिकतो. म्हणजेच हेच बघा की जर कोणतीही गाणी तुम्हाला सतत ऐकवली गेली तर ती गाणी तुम्हाला पाठ होते. ते नंतर तुम्हाला सांगायची गरज नसते तरी देखील तुमचे ते गाणे आपोआपच पाठ होण्यास सुरुवात होते. तसंच जर तुम्हाला लहान मुलाला कोणत्याही प्रकारचा शब्द किंवा वाक्य शिकवायचा असेल तर त्याच्यासमोर ते वाक्य वारंवार उच्चारा जेणेकरून तो मुलगा ते वाक्य वारंवार ऐकेल आणि बोलण्याचा प्रयत्न करेन. बरेच वेळेस असे केल्याने मुलं लवकर बोलायला लागतात आणि हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण लहान मुलं अनुकरण करण्यास सर्वात चांगली असतात. जे आपण बोलतो जे आपण करतो तेच ते करण्याचा प्रयत्न करतात म्हणून लहान मुलांच्या समोर सोपे शब्द वारंवार उच्चारा.
मोबाईल पासून दूर ठेवा
बऱ्याच वेळेस आपण मुलांना मोबाईल घेऊन देतो मग ते एका ठिकाणी गप बसून तो मोबाईल खेळत बसतात. असे न करता तुम्ही त्या मुलाला वेगवेगळे चित्र काढण्यासाठी सांगितले पाहिजे किंवा एबीसीडी किंवा असे शैक्षणिक छोटे-मोठे सीडी टीव्ही ला लावून दाखवली पाहिजे. जेणेकरून ते मुलं ते शब्द ऐकून लवकर बोलल्यास सुरुवात होईल. तसेच जर तुम्ही मोबाईलवर शिकवणिचे व्हिडिओ लावत असाल तर तो मोबाईल दिवसभर मधून दोन तासांपेक्षा जास्त वेळ त्या मुलासमोर ठेवू नये.
मुले बोबडे का बोलतात
तर मुलं लवकर कसे बोलायला लागतील हे आपण आज बघितले तसेच आता आपण जाणून घेऊया बऱ्याच वेळेस मुलं बोबडी बोलायला लागतात तर ती बोबडी का बोलतात हे आपण बघूया चला तर मग.
या वयापर्यंत बोबडी बोलतील
साधारणता मुलं दोन वर्षांची होईपर्यंत थोडे बोबडे बोलतात. असे सर्व मुलांसोबत होते असे नाही पण बऱ्याच वेळेस काही मुलं दोन वर्षापर्यंत बोबडे बोलतात त्या नंतर हळू हळू टप्प्याटप्प्याने त्यांचे बोल स्पष्ट होत जाते. तसं बघायला गेलं तर ही एक पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. बरेच वेळेस असे होते की बऱ्याच मुलांची जीभ जड किंवा जाड असते ज्यामुळे ती लवकर उचलली जात नाही. शब्द लवकर उच्चारला जात नाही. हे देखील एक कारण असू शकते मुलं बोबडे बोलण्याचे. तुम्ही मुलाला आ करून त्याच्या जिभेला टोक आहे की नाही हे बघु शकता. जर मुलाच्या जिभेला कमी टोक असेल तर तो भविष्यामध्ये देखील थोडासा बोबडा बोलू शकतो. तरी देखील जर तुम्हाला मुलांचे बोल स्पष्ट करायचे असेल तर मुलगा जो शब्द बोबडा बोलत आहे त्या शब्दाचे स्पष्ट उच्चार करून तुम्ही त्याचे बोल स्पष्ट करू शकता.
आवळा खायला देऊ शकता
मुलगा जर बोबडा बोलत असेल तर तुम्ही त्याला कच्चा आवळा खायला देऊ शकता किंवा साजूक तुपामध्ये आवळ्याची पावडर घालून देखील तुम्ही त्या मुलाला खायला देऊ शकता. बरेच वेळेस असे बघितले गेले आहे की आवळा खाल्ल्यामुळे मुलांचे बोल स्पष्ट होण्यास मदत होते.
तर आज आपण बघितले की मुलांना लवकर बोलायला शिकवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तसेच आपण हे देखील जाणून घेतले की बरीच मुलं बोबडी का बोलतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.