निलगिरीच्या तेलाचे फायदे

0
822
निलगिरीच्या तेलाचे फायदे
निलगिरीच्या तेलाचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, निलगिरीच्या तेलाचे फायदे याबद्दलची माहिती. या निसर्गामध्ये बऱ्याचशा वनस्पती आहे. ज्यांचा आयुर्वेदानुसार खूप काही महत्वपूर्ण उपयोग आपल्याला होत असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक वनस्पतीचे प्रत्येक पदार्थाचे काही ना काही महत्व, गुणधर्म असते. पूर्वीच्या काळी तर मोठमोठे जंगल असायचेत. पूर्वीच्या काळी जर कोणाला दुखापत झाली किंवा कोणी आजारी पडले तर त्यावेळी मोठे मोठे दवाखाने नव्हते सोयी सुविधा नव्हत्या शिवाय प्रवास करण्यासाठी देखील गाडी वगैरे असे साधने नव्हती.

पूर्वीची लोक हे प्रवास करायचा म्हटलं तर पायीच प्रवास करत असत. शिवाय प्रवास हा जंगलातून झाडां मधूनच करावा लागत असे. प्रवास करताना जर काही दुखापत झाली, गोळा आली किंवा आजारी पडल्यास लोक जंगलातील वनस्पती मधूनच औषधी वनस्पती शोधून त्यातून उपचार घेत असत. परंतु, आजच्या काळात विकास हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. थोडा जरी आपण लागला तर आपण लगेच दवाखान्याचा रस्ता गाठतो. परंतु पूर्वीच्या काळातील लोक जंगलातून आयुर्वेदिक वनस्पतींचा शोध घेऊन या वनस्पतींपासून औषध तयार करून त्याचे सेवन करत असे.

त्यामुळे त्यांना बरेच देखील वाटत असल्याशिवाय त्यांचा आजार देखील चांगला होत असे. या निसर्गात वनस्पती म्हटल्या तर, अनेक औषधी आयुर्वेदिक वनस्पती आढळून येतात. शिवाय प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही वेगळे महत्त्व गुणधर्म असते. “निलगिरी” हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. निलगिरी या झाडाच्या पानांचा एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून उपयोग होत असतो. निलगिरीच्या झाडाचे साधे पान जरी तोडले तरी लगेच तिचा सुगंध येत असतो. निलगिरीच्या झाडाच्या पाण्याचा सुगंध हा वेगळाच असतो त्यामुळे ते लवकर ओळखला जातो. निलगिरी या झाडाच्या फळांपासून तेलाची निर्मिती केली जाते, त्यालाच आपण निलगिरीचे तेल असे देखील संबोधतो.

तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना निलगिरी हे तेल माहीत असेल. निलगिरीच्या तेलाचा वापर करणे देखील फायदेशीर ठरते. निलगिरी तेलाचे उपयोग व फायदे काय होऊ शकतात? याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तुम्हाला देखील निलगिरीचे तेल याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे का? निलगिरीच्या तेलाचा फायदा कशा प्रकारे होतो हे जाणून घ्यायचे आहे का? तर मित्रांनो आज आपण निलगिरी तेलाचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग निलगिरीच्या तेलाचे फायदे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

निलगिरीच्या तेलाचे फायदे:-

निलगिरीचे झाड तर तुम्ही बघितलेच असेल. निलगिरीचे एक पान जरी तोडले तरी त्याचा छान सुगंध येत असतो. निलगिरीच्या झाडांपासून पानापासून निलगिरीचे तेल बनवण्यात येते. निलगिरीचे तेल वापरणे यामुळे अनेक आयुर्वेदिक आरोग्यदायी फायदे आपणास होतात. तर मित्रांनो या तेलाचे कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता सर्वप्रथम जाणून घेऊयात.

  • वातावरण बदलामुळे अथवा संसर्गामुळे आपला सर्दी होत असते. सर्दी झाल्यावर आपला खोकला निकाल लागण्याची शक्यता असते तर सर्दी झाल्यास तुम्ही निलगिरीच्या तेलाचा उपयोग करू शकतात. निलगिरीच्या तेलाचा सुगंध घेतल्यामुळे शिवाय निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यामुळे तुमची सर्दी जाण्यास मदत होऊ शकते. शिवाय निलगिरीच्या तेलाची वाफ घश्यामध्ये लागल्यामुळे देखील घसा चांगला होण्यास मदत होऊ शकते.
  • निलगिरी तेलाचा तुम्ही एक अँटीसेप्टीक म्हणून देखील वापर करू शकतात. एक प्रकारे बॅक्टेरिया निघून जाण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा उपयोग होत असतो.
  • जर तुम्हाला श्वास घेण्यासंबंधीचा त्रास होत असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही निलगिरीच्या तेलाचा उपयोग करू शकतात.
  • अनेक वेळा सर्दी झाल्यामुळे आपल्याला ग सादर दुखतो शिवाय कान दुखण्याची वेळ देखील येत असते. अशा वेळेस जर तुम्ही निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला तर, कानदुखी पासून तुम्हाला आराम मिळू शकतो. कान दुखी चा त्रास हा कमी प्रमाणात होऊ शकतो.
  • अनेक कारणांमुळे शरीरावर सूज येण्याची शक्यता असते. धकाधकीचे जीवन धावपळ करण्यामुळे देखील लवकर पाय दुखण्याची समस्येत असते. शरीराच्या ज्या भागावर तुम्हाला शूज आणले असेल अथवा तुमचे पाय दुखत असल्यास अशा वेळी तुम्ही निलगिरीच्या तेलाने त्याठिकाणी हळुवारपणे मसाज करावी. निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो शिवाय ज्या ठिकाणी सूज आलेली असेल तर ते सूज उतरण्यास देखील मदत होऊ शकते.
  • जर तुम्हाला दाता संबंधीचे अथवा हिरड्या सुजणे याचा त्रास होत असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही निलगिरीचे तेलाचा उपयोग करू शकतात. कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे दातांवर लवकर बॅक्टेरिया जमत असतात तर ते बॅक्टेरिया निघून जाण्यासाठी देखील निलगिरीच्या तेलाचा उपयोग होऊ शकतो.
  • निलगिरीच्या तेलामध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.
  • जर तुम्ही अधून मधून निलगिरीच्या तेलाचा वास घेत राहिलात तर तुम्ही सर्दी पडसे खोकला यापासून दूर राहू शकाल.
  • तसेच याने तुम्ही गुळण्या केल्याने देखील फायदा होऊ शकतो यासंबंधीचे विकार जाण्यास मदत होऊ शकते.
  • कामाच्या अतिताणामुळे माणसे टेन्शन मुळे जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर अशा वेळेस देखील तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. निलगिरीच्या तेलाचा वास घेतल्यामुळे आपली डोकेदुखी थांबण्यास मदत होऊ शकते.
वाचा  पायासाठी चप्पल कशी वापरावी

मित्रांनो, निलगिरी च्या झाडाच्या पानांचा, तसेच निलगिरीच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेले निलगिरीचे तेल हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ नये त्यासाठी तुम्ही अजून मधून निलगिरीचे तेलाचा वास घेतला पाहिजे. शिवाय निलगिरीच्या तेलाचा वास घेतल्यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील उद्भवत नाही. निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यामुळे आपले नाक मोकळे राहते. शिवाय सर्दी झाल्यावर निलगिरीच्या तेलाचे वाफ तुम्ही घेतली पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला लवकर बरे वाटू शकते.

सर्दी, खोकला झाल्यास निलगिरीच्या तेलाचा वापर हा कशाप्रकारे करावा ?

 थंड वातावरणामुळे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे अथवा वातावरणातील बदलामुळे आपल्याला लवकर सर्दी-पडसे होत असते. आणि सर्दी-पडसे झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील होतो शिवाय सर्दी झाल्यामुळे कान दुखण्याची समस्या निर्माण होत असते. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर त्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करायला हवा. निलगिरीच्या तेलाची वाफ घ्यायला हवी. परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या तेलाची वाफ नेमकी कशी घ्यावी? तर मित्रांनो, निलगिरीचे तेलाची वाफ घेणे यात काही कठीण नाही. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवावे. पातेल्यातील पाणी हे व्यवस्थित गरम डोक्यावर रुमाल टाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी अशा पद्धतीने तुम्ही निलगिरीच्या तेलाची वाफ घेऊ शकता.

हल्ली आज-काल बाजारामध्ये अथवा मेडिकलमध्ये वाफ घेण्याचे मशीन देखील मिळत आहे. वाफेचे मशीन यामध्ये देखील तुम्ही या तेलाचे दोन-तीन थेंब टाकून घ्यावेत आणि नंतर वाफेचे मशीन मधून तेलाची वाफ घ्यावी असे केल्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात तुमच्या सर्दी-पडसे जाण्यास मदत होऊ शकते शिवाय तुमचे नाव जर मोकळे झाले नसेल श्वास घेण्यास त्रास होत असेल तर निलगिरीचे तेल आणि वात घेतल्यामुळे तुमच्या नाक मोकळे होण्यास मदत होते शिवाय, डोकेदुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. कान दुखी चा त्रास देखील कमी होण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो तुम्हाला सर्दी-पडसे झाले असेल तर नक्कीच तुम्ही निलगिरीचे तेलाची वाफ घेऊन बघू शकतात यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल व तुमचे सर्दी-पडसे लवकर झाल्यास मदत होऊ शकते.

वाचा  तोंडली खाण्याचे फायदे

मित्रांनो,निलगिरीचे तेलाचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात जर आपल्या शरीरावर सूज आलेली असेल तर त्यासाठी तुम्ही निलगिरीच्या तेलाने मसाज करावी यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. वरील प्रमाणे आपण निलगिरी तेलाचे फायदे या विषया बद्दल जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here