पायी चालण्याचे फायदे? 

0
792
पायी चालण्याचे फायदे
पायी चालण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो पायी चालण्याचे फायदे आपल्याला खूप सारे फायदे असतात. पण आपण कंटाळा करतो. पूर्वीच्या काळी तर कितीतरी मैल चालून लोक त्यांचा प्रवास करायचे. अगोदर वाहनांची सुविधा ही नव्हती, हे गाव तेथे गाव अक्षरशः त्यांना पायी चालून जावे लागायचे. अगोदर शेतामध्ये सुद्धा त्यांना पायी जावे लागायचे. तसेच विहिरीचे पाणी कितीतरी दुरून दुरून लोक आणायचे, तसेच शहरात कामानिमित्त तसेच, मुलांना शाळे निमित्त वाहनांच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांचा प्रवास हा पायीच राहायचा, अगदी लहानपणापासून तो वयस्कर व्यक्ती हे पायी प्रवास करायचे. पण आताच्या जमान्यात बघितले, तर पायी चालणे अक्षरशः कंटाळवाणे वाटते.

आता हल्ली आपल्याला पाच मिनिटाच्या अंतरावर जायचे राहिले, तरी आपण गाडी काढतो. आपल्या कडे आता वाहनांची सुविधा असल्यामुळे, आपण चालण्याचा कंटाळा करतो, म्हणतात ना! जवळ वस्तू असली, की आपण आळशी बनतो. तसेच आपले ही झाले आहे. आपल्या जवळ वाहनांच्या सुविधा राहिल्यामुळे, आपण कुठे बाहेर पायी जायला कंटाळा करतो. आपण आपल्या शरीरासाठी नियमित चाल  ठेवायला हवी. त्यामुळे तुमचे शरीर सुदृढ व निरोगी राहते. चला तर मग मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, की पायी चालण्याचे फायदे किंवा पायी चालण्यामुळे तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे होतात ? चला मग जाणून घेऊयात ! 

पायी चालल्याने गुडघ्यांचा त्रास होत नाही ? 

मित्रांनो, बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. तसेच हल्ली गुडघेदुखीचा त्रास हा लवकर कमी वयात सुरू होतो. त्यासाठी जर तुम्ही नियमित चालण्याचे व्यायाम केले, तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत नाही. शिवाय गुडघ्याना चालण्याची सवय नाही राहिली, तर त्यांचा आवाजही येतो. चालल्यामुळे त्यांना लवचिकता मिळते व तुम्हाला पुढे जाऊन गुडघेदुखीचा त्रास होत नाही. 

वाचा  स्वप्नात पाण्याची टाकी दिसणे शुभ की अशुभ

वजन कमी होते :

हल्ली बैठे काम, सतत बाहेरचं जंकफूड खाणे, व्यायामाचा अभाव, जीवनशैलीमध्ये आपल्या शरीरावर परिणाम होतो. तसेच स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये, अनियमितता येणे, यामुळे वजन वाढीच्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. यासाठी जर तुम्ही नियमित तुमच्या शरीराला चाल ठेवली, तर तुमचे वजन कमी होते. त्यासाठी तुम्हाला नियमित तीस मिनिटे जरी चालले, तरी तुम्हाला त्याचे पासून होणारे फायदे फारच अद्भुत आहेत. कारण चालल्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होते. तेही बिना डायट करता, तसेच बिनखर्चिक तुम्ही वजन कमी करू शकतात. 

हृदयासाठी फायदेशीर ठरते :

शरीराला चाल नाही ठेवली, तर तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमच्या शरीरात हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच शरीरात एकदाच फॅट वाढला, की रक्तभिसरण क्रियेमध्ये सुद्धा त्याचा अडथळा येण्याची संभावना असते. त्यामुळे नियमित चालल्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन क्रियाही सुरळीत राहते. शिवाय तुम्हाला हृदयविकाराचा धोका टळतो. 

तुमची हाडे मजबूत राहतात :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण चालल्याने हाडे कस काय मजबूत होतात. तर हो चालल्याने तुमची हाडे मजबूत होतात. तुमच्या हाडांमध्ये लवचिकता येते व हाडांचे घर्षण सुरळीत होते. त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या होत नाही. शिवाय चालल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होते व तुम्ही सुदृढ व निरोगी राहण्यास मदत मिळते. 

शुद्ध ऑक्सिजनची तसेच विटामिन डी ची पूर्तता मिळते :

मित्रांनो, चालणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. शिवाय जर तुम्ही नियमित चालले, म्हणजे जर तुम्ही सकाळच्या वेळी चालायला गेले, तर तुम्हाला सकाळ चा शुद्ध ऑक्सिजन मिळतो. शिवाय सकाळचे कोवळे ऊन, म्हणजेच सूर्य उगवत्या सूर्याचे ऊन तुम्ही तुमच्या अंगावर घेतले, की तुम्हाला व्हिटॅमिन डी ची पूर्तता मिळते. सकाळच्या उन्हामध्ये विटामिन डी असते. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच सकाळी जर तुम्ही बिना चपलेचे गवतावर चालल्यामुळे तुम्हाला खूप फायदे होतात. 

वाचा  कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे

मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते :

ज्या लोकांना डायबेटीस म्हणजेच मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी चालणे, हे फार प्रभावशाली ठरते. कारण नियमित चालल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डॉक्टर त्यांना नियमित चालण्याचा सल्ला देतात, शिवाय त्यांच्या मधुमेहावर ही त्यावर फायदा मिळतो. 

तुमच्या सौंदर्यावर ही त्याचा चांगला परिणाम होतो :

हो, पण खरंच चालल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या सौंदर्यावर ही होतो. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच वातावरणातल्या बदलामुळे, त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर पडतो. तसेच काही जण वेळेच्या आधीच वयस्कर दिसायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यांचे प्रमाणही वाढते. पण तुम्ही तुमच्या शरीराला नियमित चाल चालू ठेवली, तर तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते, शिवाय शरीर शरीरावर मेद येत नाही, व तसेच चालल्यामुळे तुमचे रूप ही निखारते, शिवाय तुमच्या चेहऱ्यावर हि  सुरकुत्या लवकर येत नाही. 

कित्तेक आजार तुमच्यापासून दूर राहतात :

हो, चालले आपल्या शरीरासाठी फिट आणि हिट राहते. म्हणूनच तर पूर्वीचे लोक सारखे सारखे आजारी पडायचे नाहीत. तर चालल्यामुळे ते किती  निरोगी रहायचे, शिवाय त्यांना आजारही लवकर व्हायचे नाहीत. त्यामुळे नियमित चालणे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असते. नियमित चालल्यामुळे तुम्ही खूप सार्‍या आजारांना दूर ठेवू शकतात. जसे की उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या धोका, मधुमेह, तसेच वजन वाढणे, पोटात गॅसेस होणे, तसेच अपचन, अजीर्ण, थायराइड या सारख्या आजारांपासून तुम्ही खुप प्रमाणात दूर राहतात. शिवाय तुम्ही निरोगी राहतात. 

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात

हल्ली बघायला गेलो, तर स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी खूप व्हायला लागलेल्या आहेत. त्यामध्ये गर्भाशयामध्ये गाठी होणे, गर्भाशयावर फॅट चढणे, तसेच मासिक पाळी अनियमितता, शिवाय पीसीओडी, पीसीओएस, सारखे आजार त्यांना व्हायला लागलेले आहेत. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या शरीरासाठी नियमित चाल चालू ठेवली, तरीही आजारांवर त्यांना मात करण्याची क्षमता मिळते. शिवाय चालल्यामुळे त्यांच्या शरीरातील मेद कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे त्यांनी नियमित पाच ते सहा किलोमीटर चालायला हवे. 

वाचा  पलंगावर बसून जेऊ नये असे का म्हणतात

नियमित चाल कशी ठेवावी ? 

हा, प्रश्न अनेकांना पडतो, की चालायचे म्हणजे कसे चालायचे ? तर चालण्याची नियम असतात का ? तर हो, चालल्याचे नियम असतात. चालताना नेहमी तुम्ही स्ट्रेट चालावे. वाकून चालू नये, चालल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच चालताना एकाग्र शांत चित्ताने चालावेत. चालताना कोणाशी फोनवर बोलू नये, कारण आपलं चालल्यात लक्ष राहत नाही, त्यामुळे आपल्याला समोर खड्डा जरी आला, तरी तो दिसत नाही, किंवा त्याच्यात पाया जाऊन आपण पडण्याचे चान्सेस असतात.

त्यामुळे चालताना आपले एकाग्रतेने चालावे. तसेच चालताना तुम्ही स्पीडमध्ये ही चालू शकतात. पण तुम्ही  वयस्कर असाल तर हळू चालावे.  तसेच तुम्ही नॉर्मल पळू ही शकतात. त्यामुळे तुमच्या शरीराला सुडोल बनवण्यास मदत मिळते. तसेच चालताना, पळतांना सुरुवातीला काही दिवस हळुवारपणे चालवावे. नंतर तुमचा स्पीड वाढवावी. तसेच चालताना तुम्हाला जास्ती त्रास होत असेल, तर डॉक्टरांना विचारूनच चालण्याचे व्यायाम करावेत. चालताना तुम्ही बूट वापरावेत. उंच टाचेच्या चप्पल, सँडल्स वापरू नयेत. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पायी चालण्याचे फायदे, किंवा पायी चालल्याने कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगावेत. 

 

 धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here