स्वप्नात कोरडी विहीर दिसणे शुभ की अशुभ

0
513
स्वप्नात कोरडी विहीर दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात कोरडी विहीर दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्नांची वेळ नसते, सीमा नसते, तसेच ते आपल्याला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ मध्ये झालेल्या किंवा होणाऱ्या घटनांबद्दल संकेत देणारे येतात. तर मित्रांनो, त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये कोरडी विहीर दिसणे. मित्रांनो, विहीर ही सगळ्यांनीच बघितली असेल. शेतामध्ये विहीर ही असतेच. पूर्वीचे लोक विहिरीचे पाणी प्यायचे. तसेच जुन्या पारंपारिक रूढीमध्ये काही जणांच्या घरांमध्ये विहीर असते. पूर्वीचे लोक विहिरीवरून पाणी आणायचे आणि त्यांचे जीवन जगायचे. तसेच मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नामध्ये विहीर दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नात विहीर का बरं दिसली असेल? तसेच स्वप्नात विहीर दिसण्यामागे काय कारण असू शकते? तसेच ती काय संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण स्वप्नात कोरडी विहीर दिसणे शुभ की अशुभ याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात विहीर दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात विहीर दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात विहीर दिसणे हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. म्हणजेच त्याचे शुभ संकेतही असतात, तसेच अशुभ संकेतही असतात. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये विहीर कशी दिसली? कशा स्वरूपात दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात तबला दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात कोरडी विहीर दिसणे
स्वप्नात कोरडी विहीर दिसणे

स्वप्नात विहीर दिसणे : Swapnat Vihir Disne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात विहीर दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये कठीण प्रसंगातून मोठी यश मिळणार आहे. मेहनतीची फळ तुम्हाला फार लवकरच मिळते. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

विहिरीला पाणी लागलेले दिसणे : Vihirila Pani Lagne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात विहिरीला पाणी लागलेले दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही दिवसात तुम्हाला आनंददायी गोष्टींची वार्ता मिळणार आहे. शुभ गोष्टी कळणार आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य भरभरून मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

कोरडी विहीर दिसणे : Koradi Vihir Disne

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला कोरडी विहीर दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला ताण-तणाव तसेच अडचणी येणार आहेत. कर्ज घ्यावे लागणार आहे. आर्थिक टंचाई तुम्हाला जाणवणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

तुम्ही विहिरीत उडी मारताना दिसणे : Vihirit Udi Marne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही स्वतःला विहिरीत उडी मारताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. तुम्ही धैर्यवान वृत्तीचे आहेत. तसेच कोणत्याही गोष्टीला समोर उभा राहून सामना करतात, त्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगातून मोठे यश मिळवू शकतात. असे संकेत हे स्वप्न तुम्हाला देते. 

विहिरीचे पाणी खारे लागणे : Vihiriche Pani Khare Lagne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात विहिरीचे पाणी जर तुम्हाला खारे लागत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या परिवारामध्ये मतभेद होऊ शकतात. वाद विवाद होऊ शकतात. परिवारामध्ये एक प्रकारची तूट निर्माण होऊ शकते. किंवा नोकरीच्या ठिकाणीही फार ताण- तणाव येऊ शकतो. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट हिमतीने तोंड दिले, तर तुम्ही त्यातून लवकर बाहेर निघणार, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात शेवंती दिसणे शुभ की अशुभ

विहिरीचे पाणी गोड लागलेले दिसणे : Tiche Pani Goad Laglele Baghne

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला विहिरीचे पाणी गोड लागत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

तुम्हाला विहीर पूर्ण भरून वाहताना दिसणे : Vihir Purn Bharun Vahne

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला विहीर पूर्ण भरून वाहताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनात आनंदमय वातावरण राहणार आहे. परिवारामध्ये प्रेम वाढणार आहे. तसेच तुमच्या कामाचे कौतुक केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात विहीर दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here