नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसे असावे हल्ली बरेच जण हे वास्तुशास्त्र ची माहिती घेऊन घराचे बांधकाम करताना दिसून येत आहेत. वास्तु तथास्तु म्हणत असते, असे म्हटले जाते. वास्तु आनंदी असेल तर आपोआप घर कुटुंब व्यक्ती आनंदी राहून जीवन सुख आणि शांतपणे जगू शकतात. वास्तुशास्त्र हे भारतीय वास्तुकलेचे शास्त्र आहे. ही संपत्ती, आनंदी आणि सुसंवाद साधण्यासाठी एक सुसंवाद वातावरण तयार करण्यास मदत करते. चांगल्या आयुष्यासाठी वास्तू संतुलन निर्माण करते, असे सांगितले जाते. अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीत यश मिळावे, म्हणून आपले शंभर टक्के त्यासाठी खर्ची करतो. पण तरी आपणास हवं तसं यश मिळत नाही. काहीतरी उलट होतं आणि मग ते ऑफिसमधले प्रमोशन असो वा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी केलेली तयारी असो व यशस्वी आयुष्याबाबत असो प्रत्येक वेळी एखादा काम नाहक रखडते किंवा होतच नाही या सर्व गोष्टी साठी जबाबदार असू शकते तुमची झोप. कारण झोपेचा संबंध हा तुमच्यातील ऊर्जेशी असतो तुम्ही जेवढे गाढ झोपाल तेवढी तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते. उशिरा झोप लागणे, रात्री वारंवार झोप मोडणे यांसारख्या समस्या असल्यास त्याचा संबंध तुमच्या बेडरुमच्या वाईट वास्तूशी असू शकतो. जर तुम्ही तुमच्या बेडरुम मधील काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचं गुडलक नेहमी चांगलं राहील. मित्रांनो, घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार बांधणे योग्य ठरते. वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडरूम कोणत्या दिशेला असायला हवा? तसेच बेडरूमचा दरवाजा हा कुठल्या दिशेला असावा? वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील बेडरूम चा कलर कसा असावा? बेडरूमचा दरवाजा चा कलर हा कोणता असावा? याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कसा असावा याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.
Table of Contents
वास्तुशास्त्राप्रमाणे घरातला बेडरूम कोणत्या दिशेला असावा?
कुटुंबामध्ये जितकी लोक असतात तेवढे वेगवेगळे असतात मास्टर बेडरूमच्या दिशा वेगवेगळ्या सांगण्यात आलेल्या आहे चला तर मग जाणून घेऊया वास्तूनुसार घरातील कोणत्या सदस्यांचे बेडरूम कोणत्या दिशेला असावे याविषयी.
मास्टर बेडरूम म्हणजे घरातील मुख्य व्यक्ती ज्या खोलीत झोपतात बेडरूम चा नैऋत्य कोण, दक्षिण-पश्चिम दिशेचा कोपरा असला पाहिजे. हे त्या व्यक्तीसाठी शुभ मानले जाते. मुलांची बेडरूम हे नेहमी पश्चिम दिशेला असावी. हे त्यांच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ देत नाही अविवाहित मुले आणि पाहुण्यांसाठी असलेले बेडरूम हे उत्तर – पश्चिम दिशेला असावा. घराच्या मध्यभागी बेडरूम असणे योग्य मानले जात नाही आणि या भागाला ब्रम्हाचे स्थान मानले जातात.
वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील बेडरूम चा कलर कसा असावा
रंगाच आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे आणि हे योग्यही असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. कारण रंग हे आपल्या मनो विश्वावर प्रभाव टाकतात. खरंतर काही खास रंग हे खास भावना निर्माण करतात त्यामुळे बेडरूममध्ये आपण जिथे जास्तीत जास्त वेळ घालवत असतो, तेथे रंगाचे संतुलन होणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे शांतीपूर्ण जीवन आपल्याला जगता येईल. वास्तुशास्त्रा प्रमाणे घरातील बेडरूम ला कलर देताना योग्य विचार करूनच दिला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार मुलांची बेडरूम मध्ये भिंतींना पांढरा किंवा हलका रंग असला पाहिजे. तर मास्टर बेडरूम मध्ये हलका निळा कलर दिला पाहिजे. बेडरूम साठी सर्वात योग्य रंग हलका गुलाबी,राखाडी हलका निळा, चॉकलेट हिरवा आणि इतर प्रकाश आणि सकारात्मक छटा हे कलर तुम्ही वापरू शकतात. तसेच पिवळा कलर देखील वापरू शकतात
नवरा बायको साठी वास्तुशास्त्रानुसार बेडरूम ची रचना
- बेडरूम मध्ये कपडे ठेवायचे कपाट हे उत्तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं.
- बेडरूम मध्ये कोणते इलेक्ट्रॉनिक प्रकारचे सामान असल्यास ते दक्षिण- पूर्व कोपऱ्यात ठेवावे.
- बेडरूममधील दक्षिण-पश्चिम कोपरा कधी रिकामा असू नये तिकडे खुर्ची किंवा टेबल जरुर ठेवावा.
- बेडरूममध्ये झोपताना कपल्स नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावे.
- बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करू नये कारण ही खोली प्रेम आणि आराम करण्यासाठी आहे. भांडण किंवा वाद करण्यासाठी नाही.
- बेडरूम मध्ये भिंती कोणत्याही प्रकारे तोडफोड झालेल्या नसाव्या.यामुळे कपलच्या आयुष्यातही दुरावा येण्याची शक्यता असते.
- बेडरूम मध्ये असा कोणताही फोटो लावू नये ज्यामध्ये हिंसा दाखवण्यात आली असेल तसेच बेडचा डोकं असलेल्या बाजूला फ्रेम किंवा घड्याळ लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, तसेच कुठल्या गोष्टी ठेवाव्यात कुठल्या गोष्टी ठेवू नये याविषयी आपल्याला माहिती जाणून घेणे फार गरजेचे आहे. तसेच बेडच्या आसपास जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. शक्य असल्यास बेड सरकवून खाली धुळ साफ केली पाहिजे कारण, जर बेडच्या खाली धूळ, घाण असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो तसेच घरातील कोणी ना कोणी सदस्य आजारी राहतो. त्यामुळे, बेडरूम मध्ये जेवढे स्वच्छ करता येईल तितकी स्वच्छता राखावी. तसेच बेडरूम मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा व कुठल्या गोष्टींचा समावेश नसावा हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया
- तुमची खोली अशाप्रकारे असावी की जेणेकरून पाहुणे आल्यास दरवाजातून त्यांना तुमच्या बेडरूममधील बेड समोरच दिसणार नाही. जर तुमचा बेड दरवाजासमोर असेल तर तो थोडा शिफ्ट करावा नाहीतर वास्तुदोषामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनात संकट येऊ शकते.जर तुमची खोली छोटी असेल तर बेड शिफ्ट करणे शक्य नसल्यास दरवाज्याचा पडदा लावावा.
-
- तुमच्या बेडरूम मध्ये अशी कोणतीही गोष्ट नसावी ज्याने आवाज होईल. जसे, रेडिओ, टीव्ही किंवा एखाद्य वाद्य यामुळे आर्थिक समस्या मानसिक तणाव आजार यांसारख्या समस्या उद्भवत असतात. तुमच्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंड चाईम लावा जिथे हवा खेळती राहील विंडचाईमचा मधुर आवाज तुमच्या कानावर पडत राहिला पाहिजे. म्हणजे त्याच्या मधुर आवाजाने तुम्हाला शांतता मिळेल आणि घरात भरपूर सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
- चुकूनही बेडच्या आसपास खाण्याच्या कोणत्याही गोष्टी ठेवू नका किंवा बेडरूममध्ये खाऊ नका असं करणं दारिद्र्याचं जीवन होऊ शकते. जेवण हे नेहमी किचन किंवा डायनिंग रूम मध्ये बसून स्वच्छ जागेवर खावं.
- आजकालच्या मॉडर्न काळात बेडरूम मध्ये चपला-बूट ठेवण्यात येतात हे योग्य नाही तुम्ही झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालायच्या चपला किंवा बूट ठेवू नये त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे यातून निगेटिव्ह ऊर्जा घरात येते प्रयत्न करा की बेडरूमच्या बाहेर चपला-बूट ठेवण्यासाठी वेगळी जागा करा.
- बेडच्या समोर कधी आरसा नसावा वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठून कधीच पहिल्यांदा आरसा पाहू नये. जर तुम्ही असं केलं तर दिवसभर तुमच्यासोबत अयोग्य गोष्ट होऊन तुम्ही दुःखी व्हाल सकाळी उठून असा फोटो पहावा ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल.
तसेच बेडरूमचा दरवाजा हा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा तसेच दरवाजा हा डबल असायला नको तर तो सिंगलच असावा. मित्रांनो, वरील प्रमाणे आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घरातल्या बेडरूम कोणत्या दिशेला असावा तसेच बेडरूम मध्ये कोणता कलर देणे फायदेशीर ठरेल तसेच बेडरूमची रचना कशी असावी कोणत्या वस्तू ठेवाव्यात कोणत्या वस्तू ठेवू नयेत याविषयी आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे. वास्तुशास्त्रानुसार,बेडरूम विषयक अजून तुम्हाला जास्तीची माहिती जाणून घ्यावयाचीअसेल तर तुम्ही वास्तुतज्ञ चा सल्ला घेऊ शकतात. मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.
वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन कसे असावे