स्वप्नात स्वस्तिक दिसणे शुभ की अशुभ

0
809

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे अगदी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. तसेच असे म्हटले जाते की, सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर पडलेले स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देतात. त्यातील काही खरे ही होतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये स्वस्तिक दिसणे. मित्रांनो, स्वस्तिकला हे शुभचिन्ह मानले जाते. घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असो, विवाह असो, किंवा कोणतीही पूजा असो, त्यामध्ये स्वस्तिक ही काढली जाते. स्वस्तिक काढल्याने नकारात्मक प्रभाव हा दूर होतो आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये स्वस्तिक दिसत असेल, तर तुम्ही अगदी गोंधळून जातात. मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला माझ्या स्वप्नात स्वस्तिक का बरं दिसले असेल? तसे स्वप्नामध्ये स्वस्तिक दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न मनात गोंधळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात स्वस्तिक दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. 

स्वप्नात स्वस्तिक दिसणे
स्वप्नात स्वस्तिक दिसणे

स्वप्नात स्वस्तिक दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये स्वस्तिक दिसणे हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये स्वस्तिक कशी दिसते? कुठे दिसते? कशा अवस्थेत दिसते? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

स्वप्नात स्वस्तिक दिसणे

मित्रांनो स्वप्नात स्वस्तिक दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुमच्या घरी काहीतरी शुभारंभ होणार आहेत. किंवा मंगलकार्य होणार आहेत. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात खेळायचे पत्ते दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही स्वस्तिक काढताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही स्वस्तिक काढताना दिसत असाल, तर हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या घराचे किंवा वास्तूचे स्वप्न लवकरच साकार करणार आहेत. तसेच येत्या काही काळात तुम्हाला बढोतरी चे संकेत संभवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही इतर कोणाला स्वस्तिक काढताना बघणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्ही इतर कोणाला तरी स्वस्तिक करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, लवकरच तुमचा विवाह होणार आहे आणि विवाह झाला असेल तर तुमच्या पती-पत्नी मधील प्रेम हे वाढणार आहेत. सौभाग्य प्राप्ती होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात स्वस्तिक तुम्हाला तुमच्या दारात दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात स्वस्तिक जर तुम्हाला तुमच्या दारात दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुम्हाला धनलाभ होण्याची संकेत दर्शवत आहेत. तसेच लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी लवकरच होणार आहे. असे संकेत हे स्वप्न दर्शवत आहे. 

स्वप्नात स्वस्तिक पुसलेल्या अवस्थेत दिसणे

मित्रांनो स्वप्नात जर स्वस्तिक तुम्हाला पुसलेल्या अवस्थेत दिसत असेल, तर हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार हे स्वप्न तुमची नुकसानदायी स्थिती निर्माण होणार आहे. असे सांगत आहे. तसेच येत्या काही काळामध्ये तुम्हाला ताण-तणाव जाणवणार आहेत. किंवा कर्ज घ्यायची वेळ सुद्धा येऊ शकते. असे संकेत दर्शवत आहे. 

स्वप्नात स्वस्तिक तुम्हाला गाडीवर दिसणे

मित्रांनो स्वप्नात जर स्वस्तिक तुम्हाला गाडीवर दिसत असेल, तर ते शुभ मानले जाते. हे स्वप्न तुमच्या घरात एखाद्या नवीन वास्तूचे आगमन होणार आहे. असे दशावत आहे. म्हणजेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहे, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. तसेच एखाद्या वाहन खरेदीचे योग ही स्वप्न दर्शवत आहे. 

वाचा  स्वप्नात बीट दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात लाल रंगाचे स्वस्तिक हे खूप श्रेष्ठ मानले जाते. कोणत्याही पूजेमध्ये या स्वस्तिकाचा वापर केला जातो. हे स्वप्न तुमच्या जीवनामध्ये आनंददायी क्षणांचा अनुभव देत आहे. म्हणजेच तुम्ही जीवनामध्ये खूप मोठ्या कार्यामध्ये गुंतणार आहेत. मोठे स्थान किंवा पद मिळणार आहेत. तसेच मानसम्मानाचे योगही दर्शवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये स्वस्तिक दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                         धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here