नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान आपल्याला विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात. मित्रांनो स्वप्न ही सर्वांनाच पडत असतात. असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला स्वप्न पडत नसतील. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. आपण जो विचार दिवसभरात करत असतो, त्याचा आपल्या स्वप्नावर परिणाम होत असतो, त्या प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात. स्वप्नामध्ये बऱ्याच जणांना नदी-नाले, झाडे-झुडपे दिसत असतात. काही जणांच्या स्वप्नात त्यांना डोंगर देखील दिसत असतात. मित्रांनो, डोंगर तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहेत अनेक ठिकाणी डोंगर आढळून येत असतात. सह्याद्री, सातपुडा, पर्वत रांगा, हिमालय, माऊंट एव्हरेस्ट यांची नावे तुम्ही ऐकलेले असतील. मित्रांनो उत्तर भारतामध्ये आणि डोंगर भाग आढळून येत असतात. बऱ्याच ठिकाणी तर पावसाळ्यामध्ये डोंगरावरून वाहणारे पाणी म्हणजेच धबधबे हे खूप सुंदर दिसत असतात. पावसाळ्याच्या दिवसात अनेक जण या सौंदर्याचा अनुभव घेत असतात. तर मित्रांनो, स्वप्नात डोंगर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्न डोंगर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!
Table of Contents
स्वप्नात डोंगर दिसणे शुभ की अशुभ
अनेकांना स्वप्नामध्ये डोंगर दिसत असतात. जसे की, स्वप्नात डोंगरवर चढताना दिसणे? डोंगरावरून खाली उतरताना दिसणे? स्वप्नात डोंगरावर अनेक झाडे दिसणे? स्वप्नात उंच उंच डोंगर, पर्वतरांगा दिसणे? स्वप्नात डोंगर खाली कोसळताना दिसणे? वगैरे,स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!
स्वप्नात डोंगर दिसणे : Swapnat Dongar Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात डोंगर दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या कामात अनेक छोट्या-मोठ्या अडचणी येणार आहेत. त्यामधून तुम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती ही कोणतीही असो, तरी त्या परिस्थितीतून तुम्हाला मार्ग शोधता आला पाहिजे त्यासाठी तुम्ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे.
उंच डोंगर दिसणे : Unch Dongar Baghne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात उंच डोंगर दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामांमध्ये तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे परंतु, मित्रांनो संकटे आल्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचे मानसिक टेन्शन न घेता न घाबरता संकटावर मात केली पाहिजे. त्यासाठी, तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागली तरी मदत घेतली पाहिजे.
छोटा डोंगर दिसणे : Chota Dongar Baghne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला छोटा डोंगर दिलेला असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या जीवनामध्ये अनेक छोट्या मोठ्या समस्या येत राहणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला शोधला तर मार्ग सापडत राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
तुम्हाला बर्फाचे डोंगर दिसणे : Barfache Dongar Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात बर्फाचे डोंगर दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कामात अगदी मेहनत न घेता जास्त कष्ट न करताही तुम्हाला चांगले यश मिळणार आहे. तुम्ही यशस्वीरित्या तुमचे काम पार पाडणार आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात चांगला फायदा देखील होणार आहे.
डोंगरावरून खाली उतरताना दिसणे : Dongravrun Khali Utarne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही डोंगरावरून खाली उतरताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामात यशापर्यंत पोहोचूनही तुम्हाला अपयश मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणाच्यातरी पुढे नमवे लागणार आहे तुम्ही अशा कुठल्याही कामात सहभाग घेऊ नयेत ज्यामध्ये तुम्हाला यश तर मिळेल परंतु त्यामुळे तुम्हाला इतरांसमोर नमावे लागेल, त्यांचे ऐकावे लागेल.
डोंगरावर चढताना दिसणे : Dongravr Chadhne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही डोंगरावर चढताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही काम हाती घेतलेले आहे त्या कामांमध्ये तुम्हाला चांगले यश मिळणार आहे तुमची प्रगती होणार आहे. उच्च पदावर तुम्हाला स्थान मिळणार आहे. त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.
डोंगरावरून पाणी पडताना दिसणे : Dongravrun Pani Padne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही डोंगरावरून पाणी पडताना बघितलेले असेल एखादा धबधबा तुम्हाला दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या भविष्यामध्ये अनेक बदल घडणार आहेत जे तुम्ही साठी खूपच चांगले ठरणार आहेत. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहणार आहे. येणाऱ्या काळात तुमचे सर्व कार्य यशस्वी होणार आहेत तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे अनेक संकटांपासून तुम्ही दूर होणार आहात तुमच्यावरील सर्व संकट नष्ट होणार आहेत. तुमच्या पुढील भविष्य हे सुखद असणार आहे.
तुम्हाला डोंगरावर मंदिर दिसणे : Dongravr Mandir Disne
स्वप्न शासनुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये डोंगरावर मंदिर दिसलेले असेल तर अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून निराशा मिळणार आहे तुम्ही ज्या व्यक्तीवर जास्तीत जास्त विश्वास ठेवाल त्या व्यक्ती तुमची फसवणूक करणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत तुमच्या कामांमध्ये इतरांची जास्तीत जास्त मदत न घेता तुमचे स्वतःचे निर्णय घेऊन तुम्ही पुढे गेले पाहिजे.
तुम्हाला डोंगर कोसळताना दिसणे : Dongar Koslne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला डोंगर कोसळताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे तुमच्या कामात असे मोठे संकट निर्माण होणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे असे स्वप्न दिसल्यास तुम्ही सावध झाले पाहिजे.
डोंगरावर भरपूर झाडे दिसणे : Dongravr Jhade Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला डोंगरावर भरपूर झाडे दिसलेले असतील, डोंगर झाडांनी डोंगर झाकलेला दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी फिरायला जायला मिळणार आहे. पर्यटन स्थळाला भेट देता येणार आहे.
तुम्हाला अनेक डोंगररांगा दिसणे : Anek Dongarranga Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही अनेक डोंगर रांगा बघितलेल्या असतील, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे काम करताना कुठले निर्णय घेताना अगदी काही गडबडीत न घेता त्यावर नीट विचार केला पाहिजे. इतरांचा सल्ला त्यामध्ये घेतला पाहिजे. योग्य असल्यानुसारच तुम्ही निर्णय घेऊन काम केले पाहिजे. नाहीतर, तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
मित्रांनो स्वप्नात डोंगर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.