स्वप्नात मोती दिसणे शुभ की अशुभ!

0
760

 

नमस्कार मित्रांनो शांत झोपेच्या दरम्यान आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात.  मित्रांनो, ही स्वप्न कधी चांगले असतात तर कधी वाईट देखील असतात. कधी या स्वप्नांचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येत असतो. परंतु, कधीकधी नकारात्मक प्रभाव ही दिसू शकतो. स्वप्नांची दुनिया ही फारच वेगळी असते. आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरलेले असणार अथवा जास्तीत जास्त एका विषयाबद्दल विचार केलेला असेल, तर त्या स्वरूपाचे स्वप्न आपल्याला झोपेच्या दरम्यान दिसत असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादी इच्छा असेल अथवा त्याने एखादी इच्छा मनात बाळगली असेल आणि ती पूर्ण होत नसेल, तर त्या स्वरूपाचे स्वप्न त्या व्यक्तीला दिसू शकते. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मोती दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

स्वप्नात मोती दिसणे
स्वप्नात मोती दिसणे

मोती हा अनेक रंगांमध्ये आढळून येत असतो. सागराच्या पाण्यात मोती आढळून येत असतात. मित्रांनो मोतीची माळ घालायला अनेक स्त्रियांना आवडत असते. मोती चा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यातही होत असतो. मित्रांनो जर दिवसभरामध्ये तुम्ही मोती या संदर्भात विचार केलेला असेल मोतीची माळा बघितलेली असेल, स्वतः घातलेली असेल, तर या स्वरूपाच्या स्वप्न तुम्हाला झोपेच्या दरम्यानही पडू शकते. परंतु मोतीचे स्वप्न तुम्ही नेमके कोणते स्वरूपात बघितले? त्यानुसारच तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. जसे की स्वप्नात मोतीची माळा घालताना दिसणे, स्वप्नात मोतीची माळा तुटताना दिसणे, स्वप्नात काळा रंगाचा मोती दिसणे,  स्वप्नात तुम्हाला मोती विखुरलेले दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात तरी स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात मोती दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात एका पुरुष व्यक्तीने मोती बघितलेला असेल तर त्याचे आयुष्य कमी होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या स्त्रीने स्वप्नात मोती बघितलेला असेल, तर तिचे दागिने चोरीला जाण्याची शक्यता आहे. मोती बघणे हे शुभ ही मानले जाते परंतु अशुभ ही मानले जाते.

वाचा  स्वप्नात पाण्याची टाकी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नामध्ये तुम्ही मोतीची माळ घालताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मोतीची माळा घालताना तुम्हाला दिसले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचा समाजात मानसन्मान वाढणार आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला फसवू बघतात परंतु, त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे.

स्वप्नात मोतीची माळ तुटताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मोतीची माळा तुटताना तुम्हाला दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे तुमच्या आर्थिक नुकसानही होऊ शकते.

स्वप्नामध्ये तुम्ही मोती खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मोती खरेदी करताना तुम्हाला दिसली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मोठमोठ्या वस्तूंची खरेदी करणार आहात. तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

स्वप्नात तुम्ही मोती विकताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मोती विकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या  काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होणार आहे. तुमच्या कार्यात्मे नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नामध्ये तुम्हाला काळया रंगाचा मोती दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला काळया रंगाचा मोती दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रगतीतही कमीपणा येऊ शकतो.

स्वप्नात मोती विखुरलेले दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मोती विखुरलेले दिसलेले असतील तर हे अशुभ संकेत  देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरातील सदस्यांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे मतभेद होण्याची शक्यता आहे.

वाचा  स्वप्नात कैची दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नामध्ये तुम्हाला खूप सारे मोती दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला खूप सारे मोती दिसलेले असतील तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला अनेक बाजूंनी आर्थिक फायदा होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे.

स्वप्नात तुम्हाला मोतीची अंगठी दिसणे.

     स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला मोतीची अंगठी दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरात शुभ कार्य घडणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात.

स्वप्नामध्ये तुम्हाला मोती तुटलेला दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मोती तुटलेला दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्यातरी गोष्टीची चिंता सतावणार आहे. तुम्ही मानसिक टेन्शन घेणार आहात. तुमच्या कार्यात तुम्हाला अपयश मिळण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला नकली मोती दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला नकली मोती दिसले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचा समाजातील मानसन्मान कमी होणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यात अयशस्वी ठरणार आहात.

      मित्रांनो स्वप्नात मोती दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

          धन्यवाद…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here