स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ

0
335
स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ
स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नामध्ये एक अर्थ लपलेला असतो मित्रांनो दिवसभरामध्ये आपण ज्या घटना बघत असतो, जे विचार केलेले असतात अथवा ज्या ठिकाणी फिरायला गेलेलो असतो, तर त्या स्वरूपाचे देखील स्वप्न आपल्याला झोपेच्या दरम्यान पडत असतात. स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे हे स्वप्न सतत वैयक्तिक विचार करणार्या माणसांना पडतात.

झोपेच्या दरम्यान आपले मन हे अशांत असते. त्यामुळे अनेक स्वरूपाची स्वप्न आपल्याला पडत असतात. काही स्वप्नही चांगल्या स्वरूपाची असतात,  तर काही स्वप्नही वाईट स्वरूपाची देखील असू शकतात. काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले, पशुपक्षी, प्राणी वगैरे. अथवा ठिकाण शहरे दिसत असतात.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एका विशिष्ट प्रकारच्या स्वप्नाबद्दल सांगणार आहोत. स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चढउतार येत असतात. कधी कधी वेळ ही सुखाची येते, तर कधी वेळ ही दुःखाची देखील येत असते. जर आपल्या जीवनामध्ये सर्वच काही घटना सुखद येत राहिल्यात, आपण जीवनात यशस्वी होत राहिलो, तर आपले हे सुखाचे दिवस असतात.

परंतु, जर एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या कार्यामध्ये अपयश मिळाले तर आपण नाराज होत असतो, दुःखी देखील होत असतो. परिणामी, याविषयी अथवा यास्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडू शकतात. मित्रांनो, स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ!

काहीजण स्वतःला स्वप्नामध्ये विशिष्ट भावनेमध्ये बघत असतात. जसे की, स्वप्नात ते स्वतःला दुःखी अवस्थेत दिसणे, स्वप्नात स्वतःला खुश होताना दिसणे, स्वप्नात इतरांना खुश ठेवताना दिसणे, स्वप्नात इतरांना नाराज करताना दिसणे, स्वप्नात हसताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात चादर दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही स्वतःला दुःखी बघितलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची तुमच्या नातेवाईकांकडून अथवा तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादे मोठे मानसिक टेन्शन येण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात तुम्ही स्वतःला खुश होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही स्वतःला खुश होताना बघितलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा कि येणाऱ्या दिवसात लवकरच तुमच्या मनाची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही ज्या कार्यासाठी खूप मेहनत घेतली होती कष्ट केले होते, असे तुमचे कार्य लवकरच पूर्ण होणार आहेत. तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या आर्थिक प्रगती होणार आहे.

स्वप्नात तुम्ही इतरांना खुश ठेवताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही इतरांना खुश ठेवताना तुम्हाला दिसले असेल, तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा कि येणाऱ्या दिवसात तुम्ही स्वतः पेक्षा इतरांचा जास्तीत जास्त विचार करणार आहात. इतरांच्या सुखाबद्दल विचार करणार आहात. तुमच्या घरातल्या सदस्यांची, नातेवाईकांची मने तुम्ही जिंकणार आहात. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्ती रडताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्ती या रडताना दिसलेल्या असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमची अपूर्ण राहिलेली कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही इतरांना नाराज करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्ही इतरांना नाराज करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या हातून इतरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या चुकीमुळे इतर लोक तुमच्यावर नाराज होणार आहेत.

वाचा  स्वप्नात रेडा दिसणे शुभ की अशुभ 

स्वप्नात तुम्ही रडताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही स्वतः तुम्हाला रडताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमच्यावर कुठलेतरी मोठे संकट येण्याची शक्यता आहे. स्वप्नात तुम्ही स्वतः रडताना दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात हसताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही स्वतः असताना तुम्हाला दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुम्ही टेन्शन मुक्त होणार आहात. संकट मुक्त होणार आहात. येणारे दिवस हे तुमच्यासाठी सुखाचे ठरणार आहेत.

स्वप्नात तुम्ही रुमालाने डोळे पुसताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही तुम्हाला रुमालाने डोळे पुसताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही टेन्शन मुक्त होणार आहात. संकट मुक्त होणार आहात. तुमच्या कामातल्या अडचणी, अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो, स्वप्नात स्वतःला दुखी बघणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here