स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे शुभ की अशुभ

0
320
स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्रच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पडत असतात. तसेच स्वप्नामध्ये आपण खूप गोष्टी अशा बघू शकतो, ज्या आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती देत असतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे.

मित्रांनो, विश्वकर्मा या देवांनी पृथ्वीवर अनेक वस्तूंची निर्मिती केलेली होती. म्हणजेच महाल, अनेक वास्तू, तसेच शस्त्र देवांसाठी राजवाडे, तसेच श्रीकृष्णासाठी द्वारका, रावणासाठी लंका, तसेच पांडवांसाठी  इंद्रप्रस्थ तसेच देवांना प्रवास करण्यासाठी पुष्पक विमानांची सोय सुद्धा विश्वकर्मा या देवाने केलेली होती व कृष्ण त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते.

तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये विश्वकर्मा हे देव दिसत असतील, तर तुम्ही मनातून एकदम गोंधळून जातात. निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला माझ्या स्वप्नात भगवान विश्वकर्मा का बरं दिसले असेल? तसेच स्वप्नात विश्वकर्मा दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात गोंधळू लागतात. तर त्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला भगवान विश्वकर्मा दिसत असतील, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये भगवान विश्वकर्मा हे कुठे दिसले? कशा प्रकार दिसले? तुम्ही काय करताना दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात दशक्रिया विधी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात भगवान विश्वकर्मा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये भगवान विश्वकर्मा जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुम्ही जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. तुम्हाला एखाद्या वास्तूचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. असे संकेत दर्शवत आहे. 

स्वप्नात तुम्ही भगवान विष्णूकर्मा ची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही भगवान विश्व कर्माची पूजा करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. येत्या काही काळामध्ये तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. किंवा तुम्हाला एखाद्या जागे संदर्भात किंवा संपत्ती संदर्भात काहीतरी फायदे होण्याचे संकेत हे स्वप्न दर्शवत आहे. 

स्वप्नात भगवान विश्वकर्माची मूर्ती दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला भगवान विश्वकर्माची मूर्ती दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा अर्थ होतो की, तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, जे काम हाती घेतले आहे, त्यामध्ये प्रगती करणार आहेत. यशस्वी वाटचाल करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात भगवान विश्वकर्मा यांच्याशी बोलताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही भगवान विश्वकर्मा यांच्याशी बोलताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनात चाललेले ताण-तणाव कमी होणार आहेत. तुम्ही सकारात्मक दृष्टीने बदलणार आहेत. तसेच जीवनामध्ये नवीन मार्ग तुम्ही निर्माण करणार आहेत. आनंददायी दिवसांची सुरुवात आता होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात भगवान विश्वकर्मा यांचे मूर्ती फुटलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला भगवान विश्वकर्मा यांची मूर्ती फुटलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुमच्या जीवनामध्ये काहीतरी संकट ओढावून येणार आहेत. आर्थिक टंचाई सुद्धा जाणवू शकते, किंवा घरात नकारात्मक प्रभाव पडू शकतो. किंवा तुमचे आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात कॅलेंडर दिसणे swapnat calendar disne

स्वप्नात भगवान विश्वकर्मा रागात दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये भगवान विश्वकर्मा जर तुम्हाला रागात दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न येत्या काही काळात तुम्हाला काहीतरी नुकसानकारक स्थिती बघावी लागू शकते, असे संकेत दर्शवत आहेत. तसेच तुम्ही जे कार्य करत आहेत, त्यामध्ये काहीतरी चूक करत आहेत, किंवा कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवत आहे, त्यामुळे तुमची फसगत होऊ शकते, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात भगवान विश्वकर्मा तुम्हाला आशीर्वाद देताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला भगवान विश्वकर्मा आशीर्वाद देताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, लवकरच तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजन होणार आहेत. तुमच्या कधीपासूनच्या इच्छा ज्या अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत.

तसेच तुमचे एखादे वास्तूचे किंवा वाहनाचे स्वप्न लवकर साकार होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये भगवान विश्वकर्मा दिसणे, शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here