स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ

0
1305
स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ याबद्दलची माहिती. मित्रांनो जेव्हा आपण शांत झोपलेले असतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारची स्वप्ने पडत असतात. स्वप्नांमध्ये आपण विविध प्रकारचे चित्र, विचित्र हालचाली, आकार, व्यक्ती, पशुपक्षी, घटना बघत असतो. अनेक जण स्वप्न बघत असतात आणि उठल्यावर ते विसरूनही जात असतात. काही स्वप्ने एवढी भयानक असतात की त्यांना घाबरून जाग असते. तर काही स्वप्न आपण दीर्घकाळ लक्षात ठेवतो, ते कधीही विसरले जात नाहीत.

मित्रांनो, खरंतर आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टी बघितलेल्या असतात, त्या आपल्या स्वप्नांमध्ये दिसत असतात आणि ज्या गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात, त्यांचे रूपांतर ही आपण स्वप्नांमध्ये बघत असतो. तर काही गोष्टी अशा असतात, काही स्वप्न अशी असतात की, ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो. आपल्या मनातही नसतात, अशा गोष्टी देखील आपल्याला स्वप्नात दिसत असतात. कदाचित अशी स्वप्न ही तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील. तुमच्या पुढील जीवनाबद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्नही करत असतील.

अनेक जणांना त्यांच्या दाता विषयीचे स्वप्न पडत असते अथवा स्वप्नांमध्ये त्यांना दात पडलेला दिसत असतो. अनेक जण हे स्वप्न बघून घाबरून जात असतात. दात हे आपल्या शरीराचे महत्वाचे घटक आहेत. दाता मुळे आपण जेवण व्यवस्थित करू शकतो. अन्न बारीक चाऊन खाऊ शकतो. आपल्यासाठी दात हे खूप महत्त्वाचे आहे. काही जणांच्या स्वप्नामध्ये दात पडलेला दिसतो अथवा दात हे तुटलेले दिसतात. परंतु, हे स्वप्न शुभ आहे की अशुभ आहे हे त्याच्या स्वरूपावर आपल्याला कळू शकते.

मित्रांनो, तुमच्या स्वप्नात देखील तुम्ही दात पडलेले बघितलेले आहेत का? जर तुम्ही दाताचे स्वप्न बघितलेले असेल, तुमच्या स्वप्नामध्ये दात हे पडलेले असतील?तर दाताचे स्वरूप हे तुम्ही वेगळ्या पद्धतीचे बघितलेले असेल, तर त्यावरून, तुम्हाला शुभ संकेत ही मिळू शकतात अथवा अशुभ संकेतही मिळू शकतात, हे तुम्ही खालील प्रमाणे जाणून घेऊ शकतात.

स्वप्नात दात पडलेला दिसणे शुभ की अशुभ :

मित्रांनो, दात हे आपले महत्त्वाचे अवयव आहेत. दातामुळे आपण अन्न, जेवण बारीक करून खाऊ शकतो. आपले आवडते पदार्थ सेवन करू शकतो. म्हणून आपण आपल्या दातांचे आरोग्यही जपले पाहिजे. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. दातांची व्यवस्थित काळजी घेतली, तर त्यांना कीड लागणार नाही. परिणामी दात काढण्याची समस्या निर्माण होणार नाही. अनेक वेळा काही जणांना दातांना कीड लागल्यामुळे, दात खराब झाल्यामुळे दात काढावा लागत असतो. जर त्यांना दातांची समस्या असेल, अथवा त्या व्यक्तीचा दात दुखत असेल, तर अशा व्यक्तींना स्वप्नामध्ये दात दिसत असतात.

तर काही व्यक्तींनी दातांचा साधा विचारही केलेला नसतो, तरीही त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये दात पडलेला दिसत असतो. तर असे स्वप्न हे तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्नही करू शकते. त्यामुळे अशा स्वप्नाकडे तुम्ही दुर्लक्ष न करता वेळीच सावध झाले पाहिजे. जर तुमच्या स्वप्नात दात तुम्हाला पडलेला दिसलेला असेल, किंवा दाताचे स्वरूप हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे दिसलेले असेल, तर त्यावरून तुम्हाला शुभ व अशुभ संकेत कळू शकतात.

स्वप्नात दात पडलेला दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात दात पडलेला तुम्हाला दिसलेला असेल, तर हे अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आजाराला सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या भावाला नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

स्वप्नात दात किडलेले दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात दात कीडलेले दिसलेले असतील, तर हे स्वप्न चांगले नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही एखाद्या समस्यांमध्ये अडकलेला आहात. ज्याबद्दल तुम्हाला लवकर निर्णय घेता येत नाहीये. तुमच्या मनातील जुने पुराने विचार काढून, तुम्ही नवीन विचारांचा स्वीकार केला पाहिजे. भविष्यात नवीन गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे.

वाचा  स्वप्नात भिकारी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात एखाद्या व्यक्तीला बिना दातांचे बघणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही एक स्वप्नांमध्ये एखाद्या व्यक्तीला बिना दातांचे बघितले असेल, ज्या व्यक्तीला एकही दात नाही, तर हे स्वप्न चांगले नाही. याचा अर्थ असा की, कोणीतरी तुम्हाला भारी नुकसान पोहोचवणार आहे. कुठलेही काम तुम्ही एकदम सावधगिरी बाळगूनच केले पाहिजे.

स्वप्नात सर्व दात तुटलेले दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नांमध्ये सर्व दात तुटलेलेक बघितले असतील, तर हे स्वप्न अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की, तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तुमचे मोठे नुकसान होणार आहे. तुमच्या नातेवाइकांमध्ये तुमचे काहीतरी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही वेळीच सावध होऊन सगळ्यांशी प्रेमाने वागले पाहिजे.

स्वप्नात तुमचे दात दुखणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही दात दुखताना तुम्हाला बघितले असेल, तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमची प्रगती होणार आहे.

स्वप्नात तुमचे दात काढताना दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुमचे दात काढताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वतःला मानले जाते. याचा अर्थ असा की, तुम्ही एखादी जमीन खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला फायदा होणार आहे.

स्वप्नात दात हलताना दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला दात हलताना दिसला असेल, तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमच्याकडे जीवनामध्ये जी हानी येणार होती ती टळलेली आहे. तुम्हाला ज्या संकटातून सामोरे जावे लागलेले आहे जे संकट कठीण परिस्थिती तुम्ही बघितलेली असेल ती लवकरच दूर होणार आहे.

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene

स्वप्नात तुटलेल्या अवस्थेतील दात दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये तुटलेल्या अवस्थेतील दात बघितलेले असतील, तर हे स्वप्न चांगले नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, ते तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही ते पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तुम्ही स्वतःवर प्रेम केले पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कुठलेही काम हे पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण केले पाहिजे.

स्वप्नात दात घासताना दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात दात घासताना दिसणे, याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या दिसण्याबद्दल शंका मनात बाळगत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तुम्ही अभिव्यक्त होत नाहीत. मनातल्या इच्छा या मनामध्येच दाबून ठेवत आहात.

स्वप्नात दात तडतड करताना दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्ही दात  तड तड करताना बघितलेले असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतः नुकसानही करायला तयार आहात. तुम्हाला स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी आहे. दुसऱ्यांसाठी तुम्ही स्वतःची नोकरी-व्यवसाय ही सोडायला तयार आहात.

मित्रांनो, जर स्वप्नामध्ये तुम्ही दात तूटलेल्या अवस्थेत बघितलेला असेल, दाताचे स्वप्न बघितले असेल, तर जास्त घाबरून जाऊ नका. कारण, लहानपणी आपले दात पडतात तेव्हा दुसरे नवीन दातही येत असतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही दाताचे स्वप्न बघितले असेल, तर कदाचित तुमच्या जीवनातल्या काही समस्या तुमच्यापासून दूर होत असतील परंतु दाताचे स्वप्न तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले असेल, त्यावरूनच तुम्हाला शुभ अशुभ संकेत कळू शकतील.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here