नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात. मित्रांनो, काही स्वप्न ही आपल्याला शुभ संकेत देतात, तर काही स्वप्न ही आपला अशुभ संकेत देखील देत असतात. खरंतर स्वप्न ही आपल्या आयुष्यावर आधारित आपल्याला पडत असतात. स्वप्नात मशाल दिसणे हे स्वप्न म्हणजे तुम्ही सतत कोणते ना कोणते ऐतिहासिक चित्रपट पाहत असाल असे मानले जाते.
आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना यांवरही स्वप्न आपल्याला पडू शकतात. असे म्हटले जाते की, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर बघितलेली स्वप्ने ही लवकरच खरी होत असतात. अनेकांना याचा अनुभवही आलेला आहे. मित्रांनो, जर दिवसभरामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार केलेला असेल, तर त्याही स्वरूपाची तुम्हाला रात्री झोपेच्या दरम्यान स्वप्न पडू शकते.
आपण बघितलेल्या स्वप्नांचा अर्थ देखील आपण जाणून घेतला पाहिजे. कारण काही स्वप्न ही असे असतात की, जी आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल संकेत देण्याचे प्रयत्न करत असतात.
मित्रांनो, आज आपण स्वप्नात मशाल दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. मशाल तर तुम्हाला माहीतच असणार. मशाल ला मराठी मध्ये दिवटी असे देखील म्हटले जाते. तर इंग्लिश मध्ये याला टॉर्च असेही म्हणतात.
मित्रांनो, फार पूर्वीच्या काळी अंधारातून प्रवास करताना अनेक जण मशालीचा वापर करत असे. मशाल म्हणजेच एक काठी असून वरच्या टोकाला कापडाचे चिंध्या गुंडाळून त्याला रॉकेल अथवा तेल लावून अग्नी पेटवले जाते यालाच मशाल असे म्हटले जाते.
फार पूर्वीच्या काळी तर अनेक जण रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करताना मशालीचा वापर करत असे, आगीला घाबरून अनेक जनावरेही दूर राहत असे.मशाल ही उजेड देण्याची कार्य करत असते.
मित्रांनो, तुम्हाला स्वप्नामध्ये मशाल दिसलेली आहे का? परंतु, मशाल ही तुम्ही कोणत्या स्वरूपात बघितलेली असेल, त्यानुसारच तुम्हाला त्याचे संकेत कळू शकतात जसे की, स्वप्नात मशाल दिसणे, स्वप्नात मशाल तयार करताना दिसणे, स्वप्नात मशाल पेटवताना दिसणे, स्वप्नात मशाल विझलेली दिसणे, स्वप्नात मशाल तुटलेल्या अवस्थेत दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!
Table of Contents
स्वप्नात मशाल दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मशाल दिसलेली असेल, जर तुम्ही मशाल घेऊन जाताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहेत. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात. अगदी कमी काळामध्ये तुमची मोठी प्रगती होणार आहे. तुमचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
स्वप्नात तुम्हाला इतरांच्या हातात मशाल दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला इतरांच्या हातात मशाल दिसलेली असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश तर मिळेल. परंतु, इतरांची मदत घेऊनच तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळू शकते. ज्येष्ठ वरिष्ठान मंडळींचे सल्ले घेऊन तसेच, इतर व्यक्तींचे सहकार्य घेऊन तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात.
स्वप्नात तुम्ही मशाल घेऊन पळताना तुम्हाला दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्ही मशाल घेऊन पळताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ करणार आहात, परंतु अति घाई गडबड केल्यामुळे तुमच्या कार्यात तुमच्या हातूनच मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.
स्वप्नात तुम्ही मशाल तयार करताना दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्ही मशाल तयार करताना तुम्हाला दिसले असेल तर हे चांगले स्वप्न मांडण्यासाठी या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या कामांमध्ये खूप मेहनत घेणार आहात. खूप कष्ट करणार आहात. त्यानुसार तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये आर्थिक फायदाही होणार आहे. तुमची कमी वेळात प्रगती होणार आहे.
स्वप्नात मशाल पेटवताना दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मशाल पेटवताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठलेही काम हाती घेताना अगदी सकारात्मक भावनेने ते पूर्ण करणार आहात. प्रत्येक गोष्टीत तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणार आहात. त्यामुळे न होणारे कामही तुमची लवकरच पूर्ण होणार आहेत. तुमच्या मार्गातील अनेक अडथळे नष्ट होणार आहेत.
स्वप्नात तुम्हाला विझलेली मशाल दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला विझलेली मशाल दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या कामांमध्ये अपयशी ठरणार आहात. तुम्ही तुमच्या मार्गावरून भटकणार आहात. खूप प्रयत्न करूनही तुम्ही तुमच्या कार्यामध्ये अयशस्वी होणार आहात. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळेत सावध झाले पाहिजे. कुठलेही काम करताना अगदी शांततेपूर्वक योग्य निर्णय पूर्वक तसेच, आत्मविश्वासाने पूर्ण केले पाहिजे. इतरांचेही सहकार्य तुम्ही तुमच्या कामांमध्ये घेतली पाहिजे.
स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या मशाल दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या मशाल दिसलेल्या असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडून येणार आहेत नवनवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत आलेल्या संधीचा तुम्ही लाभ घेणार आहात. तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमची प्रगती होणार आहे.
स्वप्नात तुम्हाला तुटलेली मशाल दिसणे.
स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला तुटलेली मशाल दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या मार्गामध्ये अनेक जण अडथळे निर्माण करणार आहेत. तुमच्यावर छोटे-मोठे संकटे येणार आहेत. तुमच्यातील आत्मविश्वास कमी होणार आहे. परंतु कितीही संकटे आले तरी तुम्ही संकटांवर मात केली पाहिजे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढवला पाहिजे. असे केले तरच तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतात.
मित्रांनो, स्वप्नात मशाल दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.