स्वप्नात भाला दिसणे शुभ की अशुभ!

0
219
स्वप्नात भाला दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात भाला दिसणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, आपला झोपेच्या दरम्यान जी काही स्वप्न पडत असतात त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो प्रत्येक स्वप्नामध्ये काही ना काही संकेत लपलेला असतो. मित्रांनो, स्वप्न बघितल्यावर आपण त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसतो, किंवा असे स्वप्न का पडले असावे? हेही समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतो. स्वप्नात भाला दिसणे हे एक स्वप्न आपण खेळाडू च्या मनातील स्वप्न मानले जाते.

परंतु, काही स्वप्न ही असे असतात, की जी आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल आधीच संकेत देण्याचे कार्य करत असतात. म्हणून आपण स्वप्नांचा अर्थ ही जाणून घेतला पाहिजे.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात भाला दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. फार पूर्व काळापासून भाला याचा उपयोग होत आलेला आहे पूर्वीच्या काही आदिमानव झाडाची एखादी मोठे लाकूड घेऊन त्याला काठीच्या स्वरूपात आकार देऊन पुढील टोक काढून शिकार करण्यासाठी या भाल्याचा वापर करत असे. पूर्वीच्या काळी लढाया म्हणजेच युद्धामध्ये देखील भाल्याचा उपयोग होत असे.

मित्रांनो, भाला लाकडी तसेच, लोखंडी स्वरूपातही असतो. आजकल तर भाल्याचे खेळही खेळले जातात अनेकजण भालाफेक स्पर्धेमध्येही उत्तम रीतीने खेळताना दिसून येतात. मित्रांनो नीरज चोपडा यांनी देखील भालफेक स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक मिळवलेले आहे. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नामध्ये भाला दिसलेला आहे का? जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल? तर त्याचा नेमका अर्थ काय असू शकतो? हेही तुम्ही जाणून घेतले पाहिजे?

भाला हा तुम्ही नेमका कोणत्या स्वरूपात बघितलेला असेल त्यानुसारच तुम्हाला त्याचे संकेत मिळू शकतात. जसे की, स्वप्नात भाला दिसणे, स्वप्नात तुम्ही भाला फेकताना दिसणे, स्वप्नात तुम्ही भाल्याचा खेळ करताना दिसणे, स्वप्नात इतरांच्या हातात भाला दिसणे, स्वप्नात तुम्ही भाला फेक स्पर्धेत भाग घेताना दिसणे, वगैरे. स्वरूपाची स्वप्ने पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

स्वप्नात भाला दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भाला दिसलेला असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होणार आहात. तुमच्यातील आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला एक नवीन दिशा मिळणार आहे. तुम्ही कुठलेही काम हाती घेतलेले असेल तर ते अगदी आत्मविश्वासाने पूर्ण करणार आहात. त्यामुळे, तुम्हाला चांगले यश मिळून आर्थिक फायदा देखील होणार आहे.

वाचा  स्वप्नात शनिमंत्र ऐकणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही भाला फेकताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही भाला फेकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवणार आहात. तुम्ही ज्या कामासाठी खूप मेहनत घेतली होती, कष्ट केले होते, अशा कार्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे  तुमची कमी वेळेत प्रगती होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे.

स्वप्नात तुम्ही भाल्याचा खेळ करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही भाल्याचा खेळ खेळताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अनेक अडथळे निर्माण होणार आहेत आणि अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. खूप मेहनत करून कष्ट करून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होणार आहात.

स्वप्नात तुम्हाला इतरांच्या हातात भाला दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला इतरांच्या हातात भाला दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचे सहकारी तुमचे जवळचे मित्र तुमच्या कामात अडचणी निर्माण करणार आहेत. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुठलेही काम करताना तुम्ही विचारपूर्वकच केले पाहिजेत. इतर व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवायला नकोत. नाहीतर, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

स्वप्न तुम्हाला खूप सारे भाले दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुम्हाला खूप सारे झाले दिसलेले असतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहणार आहेत. तुमच्यावर अनेक छोटे मोठे संकटे येत राहणार आहे. परंतु, तुम्ही तुमच्यातील आत्मविश्वास कमी न होऊ देता संकटांशी दोन हात केले पाहिजे. तुमच्यातील हिंमत न खचू देता तुम्ही धैर्याने संकटांचा सामना केला पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला भाल्याचे दुकान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भल्याचे दुकान दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्ही एखाद्या नवीन काम हाती घेणार आहात. तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहात. त्यामध्ये अनेकांचे सहकार्य देखील तुम्हाला लाभणार आहे.

वाचा  स्वप्नात शरीराला ताप येणे swapnat sharirala tap yene

स्वप्नात तुम्ही भालाफेक स्पर्धेत भाग घेताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही भालाफेक स्पर्धेत भाग घेताना तुम्हाला दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला अनेकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. कमी गतीने कामे न करता तुम्हाला तुमच्या कामांमध्ये गती वाढवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात भाला दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here