वेखंड चे फायदे

0
5748
वेखंड चे फायदे
वेखंड चे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया वेखंड चे फायदे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये विविध आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यांचे उपयोग वेगवेगळ्या प्रकारे, आपण आपल्या शरीरातील समस्येवर करू शकतो. त्यामध्ये वेखंड ही सुद्धा एक औषधी द्रव्य वनस्पती आहे. त्याचा वापर आपण आपल्या शरीरासाठी करू शकतो. वेखंड हे चवीला थोडे कडू, थोडे तिखट अशी वनस्पती आहे.

वेखंड चा वापर अगदी पूर्वीच्या काळापासून औषधी वनस्पती मध्ये केला जात आहे. तसेच वेखंडचा वापर हा लहान बाळांच्या बाळगुटी मध्ये केला जातोय. त्यामुळे लहान बाळांना सर्दी पडसे सारखे तक्रारी वर आराम मिळतो. तर मित्रांनो, आज आपण वेखंड खाण्याचे फायदे, तसेच वेखंड आपल्या शरीरासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते? व त्याचा उपयोग कसा करावा? याबाबतीत आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात. 

वेखंड खाण्याचे फायदे नेमके कोणकोणते ? 

मित्रांनो, वेखंड खाण्याचे फायदे, हे अनेक लोकांना माहिती नसते. चला, तर मग जाणून घेऊयात ! 

डोकेदुखी साठी फायदेशीर ठरते :

बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढता ताणतणाव, वेळेवर जेवण न होणे, झोप पूर्ण न होणे, शारीरिक थकवा, यासारख्या गोष्टींमुळे आपल्याला डोकेदुखी यासारख्या समस्या होतात. अशा वेळी जर तुम्ही वेखंडाचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला वेखंड हे पाण्यात उगाळून घ्यायचे,  किंवा मार्केटमध्ये वेखंड पावडर मिळते ती पावडर पाण्यामध्ये मिसळून, तुम्ही तुमच्या कपाळावर ते 20 मिनिटे लावावे. त्यामुळे तुमच्या डोक्‍यात दुखीवर आराम मिळतो. 

वाचा  उगवत्या सूर्य प्रकाश मध्ये बसण्याचे फायदे

पोटदुखीचे त्रासावर आराम मिळतो :

आपल्या आहारामध्ये काही बदल झाला, किंवा उग्र पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला पोटामध्ये पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्या वेळी तुम्ही वेखंड चा वापर केला, तर तुम्हाला पोटदुखीच्या समस्येवर आराम मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक ग्लास ताकात,  वेखंड पावडर मिक्स करून, त्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ, टाकून प्यायचे आहे. त्यामुळे तुमची पोट दुखीचे समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

उलटी तसेच मळमळचा त्रास होत असेल, तर फायदेशीर ठरते :

तुम्हाला अपचन, पित्त यासारख्या गोष्टींमुळे उलट्यांचा त्रास होत असेल, तसेच फुडइन्फेक्शन झाल्यावर, उलट्या होत असतील, तर तुम्ही वेखंड पावडरचा उपयोग करू शकतात. अशा वेळी तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा वेखंड पावडर, त्यामध्ये पाव चमचा मीठ, यांचे मिश्रण एकजीव करून, ते पाणी प्यावेत. त्यामुळे तुम्हाला उलट्यांवर मिळेल. 

सर्दी-पडशाचा त्रास यावर आराम मिळतो :

सर्दी-पडशाचा त्रास हा अगदी त्रासदायक असतो. कारण त्यामध्ये आपल्याला शारीरिक समस्यांना सामना करावा लागतो. त्या वेळी अंग दुखते, डोके दुखते, नाक जाम होतो, श्वास घेताना त्रास होतो, असे वेळी जर तुम्ही वेखंड पावडर चा वापर केला, तर तुम्हाला त्या समस्येवर आराम मिळू शकतो. कारण वेखंड हे उबदार असते. तसेच त्यामध्ये घटक द्रव्य आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यासाठी सर्दी-पडशाचा त्रास झाल्यावर, तुम्ही वेखंड पावडर पाण्यामध्ये उगळून, तुमच्या कपाळावर, नाकाच्या बाजूला, तसेच लावून ठेवल्याने, कफ लवकर वितळतो. तसेच सर्दी-पडसे वर आराम मिळतो. तसेच लहान मुलांना ही तुम्ही हा उपाय करू शकतात. 

भूक लागत नसेल तर :

सहसा करून लहान मुलांच्या बाबतीत या समस्या भरपूर प्रमाणात असतात. त्यांना भूक न लागणे, जेवण न जाणे, यासारख्या समस्या होतात. कारण लहान मुलांना पोटात जंत झाल्यास, या गोष्टी होऊ शकतात. यासारखा त्रास होऊ शकतो. लहान मुले कुठलीही गोष्ट तोंडात घालतात. तसेच खडू खाणे, पेन्सिल खाणे, माती खाणे, अति गोड पदार्थ खाणे, चॉकलेट जास्त प्रमाणात खाणे, यासारख्या गोष्टींमुळे पोटामध्ये जंतू होतात.

वाचा  सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिण्याचे फायदे:-

अशा वेळी जर  वेखंड पावडर चा वापर केला, तर तुम्हाला फायद्याचे ठरते. त्यासाठी तुम्हाला लहान मुलांना अर्धा ग्लास पाण्यामध्ये वेखंड पावडर, चिमूटभर सैंधव मीठ यांचे मिश्रण एकजीव करून, ते प्यायला द्यावेत. त्यामुळे पोटातील जंतू /कृमी असतील, तर ते असे जाण्यास मदत मिळते. असे हप्त्यातून तुम्ही त्यांना तीन वेळेस द्यावे. त्यामुळे पोटातील जंत कमी होऊन, मुले स्वतःहून जेवण मागतील. 

अंगदुखीवर फायदेशीर ठरते :

रोजची तीच धावपळ, वाढता ताणतणाव काम, या साऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपल्याला थकवा येतो, तसेच आपले अंग दुखते. अशावेळी तुम्ही वेखंड पावडर चा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. अशा वेळी तुमच्या अंगाचे जो भाग दुखतो, त्या जागेवर तुम्ही वेखंड पावडर पाण्यात मिसळून, तिला त्या जागेवर लावावेत. त्यामुळे तुमची अंगदुखी कमी होऊन, तुम्हाला आराम मिळतो. 

युरिन इन्फेक्शन वर आराम मिळतो :

काही जणांना युरिन इन्फेक्शन होते,  तसेच युरीन करताना जळजळ होणे, आग होणे, तसेच थेंब थेंब पडणे, यासारख्या समस्या होतात. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये वेखंडाचा वापर करायला हवा. वेखंडे आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे, त्याचे तुम्हाला फायदे होतात. त्यासाठी तुम्हाला वेखंड पावडर, एक ग्लास दुधामध्ये, एक चमचा टाकून त्यामध्ये पाव चमचा साखर टाकून, यांचे मिश्रण एकजीव करून, ते संध्याकाळच्या वेळी द्यावे. असे तुम्ही दोन ते तीन दिवस लगातार करावेत, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 

पोटातील गॅसेस चे प्रमाण कमी होतात :

काहीजणांना पोटात गॅसेस होणे ही समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळते. त्यामुळे पोटात गॅसेस झाल्यामुळे पोट दुखते, पोट फुगल्यासारखे वाटते, अजीर्ण झाल्यासारखे वाटते, तसेच पोटातून आवाज येतो, तसेच ढेकर ही येतात. अशावेळी तुम्ही वेखंड चे पावडरचा वापर करावा, त्यासाठी तुम्ही खडीसाखर+ वेखंड पावडर+ आणि बडीशोप याचें एकत्र मिश्रण करून, दिवसातून चार ते पाच वेळेस सतत खात रहावेत. त्यामुळे तुमच्या पोटातील गॅसेस चे प्रमाण हे कमी होते व तुम्हाला आराम मिळतोय. 

वाचा  बाळाचे दूध बंद करण्यासाठी

घशातील इन्फेक्शन वर आराम मिळतो :

पाणी बदलामुळे, तसेच वातावरणातील बदलामुळे, घशात व्हायरल इन्फेक्शन लवकर होते. त्यामुळे घसा खवखवतो, घसा दुखतो, तसेच गिळताना त्रास होतो, घसा सुजतो, तसेच आवाज घोगरा होतो. अशा वेळी तुम्ही वेखंड पावडर चा वापर केला, तर तुम्हाला फायद्याचे राहते. त्यासाठी तुम्हाला वेखंड पावडर अर्धा चमचा+ चिमूटभर हळद+ चिमूटभर सुंठ पावडर+ अर्धा चमचा मध यांचे मिश्रण एकजीव करून, याचे चाटण करावेत. त्यामुळे तुमच्या घशातील इन्फेक्शन लवकर कमी होते, व तुमच्या घशाला आलेली सूज व तुमचा आवाज सुधारतो. 

प्रसूतीच्या वेदना सुरू होण्यासाठी फायदेशीर ठरते :

काही स्त्रियांना प्रसूतिवेदना या लवकर सुरू होत नाहीत, तसेच सुरू झाल्यावर, खूप त्रास होतो, कष्ट होतात, अशा वेळी त्यांना त्यांच्या आहारामध्ये वेखंड पावडर द्यावीत. त्यासाठी त्यांना वेखंड पावडर आणि केसर हे दुधामध्ये मिसळून प्यायला द्यावे. त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जास्त प्रमाणात होत नाही, व प्रसूती सुलभ होऊ शकते. पण हा उपाय करताना तुम्ही एकदा डॉक्टरांनाही विचारून घेऊ शकतात. 

लहान बाळांसाठी फायदेशीर ठरते :

लहान बाळांसाठी वेखंड पावडर ही फायदेशीर ठरते. कारण लहान बाळांना पोट साफ न होणे, तसेच पोटात मुरडा येणे, त्यांचे पोट दुखणे, उलटी होणे, त्यांना सर्दी-पडसे होणे, पोटात जंत होणे, तसेच शारीरिक व्याधींवर आयुर्वेदात पूर्वीच्या काळापासून वेखंड पावडर ही लहान बाळासाठी वापरली गेलेली आहे. त्यामुळे लहान बाळांसाठी वेखंड पावडर ही वापरू शकतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वेखंड चे , तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच जर तुम्हाला वेखंड पासून एलर्जी, किंवा खाज येत असेल, तर तुम्ही दिलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. तसेच आम्ही सांगितलेली, माहिती तुम्हाला आवडली असेल, व आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर मित्रांनो, तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here