मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते

0
1971
मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते
मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते

नमस्कार, आज आपण जाणून घेऊया, मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते. मानवी शरीराला जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय हे रुदय नक्की काम कसे करते याचा आपल्याला प्रश्न पडला असेलच. तसेच आजकाल बदलत्या वातावरणामुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर काय परिणाम होत आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल तर हृदयाची कार्यक्षमता आपण कोणत्या प्रकारे वाढू शकतो याचे देखील उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो तुम्हाला कधी ना कधीतरी हा प्रश्न पडला असेल की नक्की एवढ्या मोठ्या शरीराला रक्त पुरवठा करण्याचे काम हृदय करते. हृदयाचा नक्की आकार तरी केवढा मोठा असेल किंवा त्याचे वजन तरी किती असेल. कारण एका जिवंत माणसाचे हृदय किती वजनाचे असू शकते हे आपल्याला माहिती नाही. तसेच त्याचा आकार देखील किती मोठा असू शकतो हे देखील आपल्याला माहिती नसते. मित्रांनो आज आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया.

मानवी हृदय कसे काम करते ?

सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की आपले हृदय कोणत्या प्रकारे काम करते म्हणजेच आपल्या हृदयाची कार्यप्रणाली कोणकोणती व कशाप्रकारे आहे चला तर मग बघुया.

हृदयाचे एक मुख्य काम म्हणजे रक्त शुद्ध करणे म्हणजेच आपल्या शरीरातील जे अशुद्ध रक्त आहे ते शुद्ध करण्याचे काम हृदय करते. हृदयाने हे काम बंद केले तर आपल्या शरीरातील रक्त हे काळे पडण्यास सुरुवात होईल. आपले बरेचसे अवयवांचे कार्य बंद होईल रक्त गोठण्याची चालू होईल. श्वास देखील बंद होईल आणि त्या माणसाची मृत्यू होईल या सर्वां पासून वाचण्यासाठी हृदय हे न थांबता चोवीस तास काम करत असते. कारण आपल्या शरीरामध्ये नेहमी अशुद्ध रक्त हे बनतच असते म्हणून हृदय ते रक्त शुद्ध करून आपल्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचवते. 

वाचा  लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागल्यास कसे सोडवावे

हृदयामध्ये चार कप्पे असतात असे आपण म्हणू शकतो. वरच्या बाजूस कप्पा हा कणिर्का-Auricles व खालील दोन कप्पे हे जवनिका-Ventricles असतात. हृदयामध्ये उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या बाजूला शुद्ध रक्त बनवत असते. जेणेकरून ते शुद्ध रक्त तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत पोहोचेल आणि हे रक्त आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोहोचवण्याचे काम हृदय करते. ते म्हणजेच हृदयाच्या ठोक्यामुळे जसे की एक पाण्याची मोटार पाणी वरपासून खालपर्यंत कोठेही नेऊ शकते. तसेच हृदय आपल्या शरीरातील रक्त आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोचविण्याचे काम करते.

मानवाच्या हृदयाचे वजन किती असते ?

आपण हृदय कसे काम करते तर बघितले चला तर मग आता आपण जाणून घेऊया की मानवी हृदयाचे वजन नक्की किती असते. एका सामान्य माणसाचे हृदयाचे वजन हे 250 ग्रॅम पासून 300 ग्रॅम पर्यंत असू शकते आणि एका सामान्य स्त्रीच्या शरीरातील रूदयाची वजन हे 200 ग्राम पासून 250 ग्रॅम असू शकते. तुम्हाला जर हा देखील प्रश्न असेल की हृदयाचा चा आकार किती असतो. तर एका सामान्य माणसाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या तळहाताच्या आकारा एवढा असतो किंवा त्याच्या मुठ्ठी एवढा समजलं तरी चालेल.

मानवाच्या हृदयामधून किती रक्तप्रवाह पुरवठा होतो ?

मानवी हृदयात होणारा रक्तपुरवठा हा वेगवेगळा असू शकतो कारण रक्त पुरवठा माणसांच्या वयावर व त्यांचे ठोक यांवर अवलंबून असतो. एका सामान्य माणसाच्या शरीरामध्ये जवळ जवळ 4½ लिटर ते 6½ लिटर रक्त असू शकते आणि हे सर्व रक्त हृदया मार्फत शुद्ध होऊन पूर्ण शरीराला रक्त पुरवठा होत असतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणता व्यायाम करावा ?

बर्‍याच वेळेस आपल्या बदलत्या जीवन प्रणालीमुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता कमी होते. तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता कशी व कोणत्या प्रकारे वाढवावी यासाठी कोणते व्यायाम आहेत का हे आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया.

वाचा  ताक चे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

सायकलिंग करावी :

सायकलिंग हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्या सर्व अवयवांचा उपयोग होतो. त्याचप्रकारे सायकलिंग मुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते शरीर सुदृढ होते. शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि या सोबतच आपल्या हृदयाची वाढ सुद्धा चांगल्या रीतीने होते.

हृदयाची जर आपल्याला कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपण दररोज निदान तीन ते चार किलोमीटर तरी सायकल चालवली पाहिजे. याहून अधिक तुम्ही सायकल चालवली तर उत्तमच आहे. पण कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर तरी सायकल दिवसभर मधून तुम्ही चालवावी. असे केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके देखील नियंत्रण मध्ये राहण्यास मदत होईल आणि तुम्ही जर रोज सायकलींग करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये हृदयाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही.

मैदानी खेळ खेळावे :

आजकाल मुलं मोबाईल मध्ये इतके गुंतलेले आहे की ते मैदानी खेळ खेळतच नाही. यामुळे त्यांचा शरीराचा विकास चांगल्या रीतीने होत नाही. तसेच त्यांच्या शारीरिक वाढ मध्ये देखील बर्‍याच प्रकारच्या अडचणी येऊ लागलेले आहेत. पूर्वीची लोक हे मैदानी खेळ खेळायचे शारीरिक काम करायचे त्यांना जास्त दवाखान्याची डॉक्टरांची गरज पडली नाही.

पण आज कालची पिढी हि खूप नाजूक बनलेली आहे. त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी झालेली आहे. याच बरोबर त्यांच्या शारीरिक शक्ती देखील कमी झालेली आहे. तुम्हाला जर सुदृढ शरीर हवे असेल सुदृढ आयुष्य हवे असेल तर लहान पासूनच मुलांना मैदानी खेळ खेळायला शिकवावे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक संसाधन यापासून दूर ठेवावे.

आहारावर नियंत्रण ठेवावे :

फास्टफूडचे सेवन कमी प्रमाणामध्ये करावे घरचेच जेवण जेवावे तसेच हृदयाला हानी पोहोचेल असा आहार घेऊ नये. तेलकट व तुपट पदार्थांचे सेवन कमी करावे. जेणेकरून हृदयाचे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही व हृदयाला कोणत्याही प्रकारचा धोका भविष्यामध्ये उद्भवणार नाही. आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश अधिक प्रमाणे मध्ये करा. रोज दिवसभर मधून एक तरी फळांचे सेवन केल्यास पाहिजे. तसेच भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या जेणेकरून जर तुमचे रक्त व त्वचा चांगली राहील.

वाचा  पोटावर खाज येणे यावर घरगुती उपाय काय आहे

योगा करावा :

बरेच वेळेस आपला बीपी हाय होतो म्हणजेच हृदयाचे ठोके त्याच्या मर्यादेच्या बाहेर जातात. त्यालाच आपण बीपी हाय होणे असे म्हणतो. या अवस्थेमध्ये आपल्या हृदयाचे ठोके वाढत जातात आणि त्या नियंत्रण मध्ये आणण्यासाठी आपण योगाचा वापर करू शकतो. आपण जर रोज प्राणायाम किंवा छोटे-मोठे आसन केले तरीदेखील आपल्या हृदयाचे स्वास्थ हे चांगले राहू शकते.

तर मित्रांनो आज आपण बघितले की, आपले मानवी रुदय काम कसे करते तसेच आपल्या मानवी हृदयाचे वजन किती असते. याच प्रकारे आपल्याला जर हृदयाची कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपण कोणता व्यायाम करू शकतो हेदेखील आपण जाणून घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here