Table of Contents
डोळे जड वाटणे :
नमस्कार, मित्रांनो आजचे युग हे धावपळीचे युग आहे. तसेच या धावपळीच्या युगामध्ये कोराना सारख्या महामारी ने आपल्यावर, वर्क फ्रॉम होम यासारख्या बिजनेस ला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सगळ्या शाळा, कॉलेजेस, ट्युशन्स, क्लासेस बंद पडलेले आहेत, सगळे विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन स्कूल करतात. आता तर ही ऑनलाइन ची दुनिया झालेली आहे. जो तो ऑनलाइन शॉपिंग, तसेच ऑनलाईन किराणा सुद्धा आता मिळायला लागले आहेत. तसेच ऑनलाईन भाजी, या सगळ्यांच्या नजरा या मोबाईल वरच राहतात. तसेच वर्कर्स, इंजिनियर, बँक कर्मचारी, यासारखे काही कर्मचारी, घरूनच त्यांचे ऑनलाईन काम करतात. त्यांचे लक्ष सतत टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, इंटरनेट जोडलेले असते, डॉक्टर हे दवाखान्यात राहून काही औषधी, ही ऑनलाइन पुरवतात. स्क्रीन चा जास्त वापराने डोळे जड वाटणे सारख्या समस्या होतात.
मेडिकलवाले ही औषधे घरी बसून ऑनलाईन पुरवतात. यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याकडे ही लक्ष देता येत नाही. उलट घरी बसून वर्क फ्रॉम होम मध्ये, त्यांचे वजन वाढणे, शरीर , सुस्त पडणे, तसेच पोटात गॅसेस होणे, अवघडल्या- सारखे वाटणे, डोके दुखणे, सतत मोबाईल लॅपटॉप वर काम करून, डोळे दुखणे, डोळे जड वाटणे , तसेच डोळ्यातून पाणी येणे, यासारख्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. तर आजच्या या विषयांमध्ये, आपण जाणून घेणार आहोत, की डोळे जड पडणे, म्हणजे नेमके काय ? व कोणत्या कारणांनी डोळे जड पडतात? चला तर मग जाणून घेऊयात, की डोळे जड पडण्याची काही कारणे ?
डोळे जड पडण्याची कारणे ?
डोळे जड पडण्याची कारणे, आपण आता जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
- सतत टीव्ही बघितल्यामुळे, डोळे जड पडतात.
- बाहेरील धुळीची ॲलर्जी होऊन, त्याचे कन डोळ्यात गेले, तर डोळे जड पडू शकतात.
- ज्यावेळी डोके दुखते, अशावेळी डोळे जड पडू शकतात.
- कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉपवर सतत काम केल्यामुळे, डोळे जड पडू शकतात.
- डोळ्याचे एखाद्या भागाला जर इजा झाली असेल, तर डोळे जड पडू शकतात.
- जर शरीरात विटामिन ए ची कमतरता आली, तर डोळे जड पडू शकतात
- तसेच जसे तुमचे वय वाढते, अशावेळी डोळे जड पडण्याचे समस्या होतात.
- जर तुमच्या तुम्हाला चष्म्याचा नंबर आला असेल, तर डोळे जड पडतात.
- शारीरिक व मानसिक थकवा आल्यामुळे, ही डोळे जड पडतात.
डोळे जड पडल्यास त्याची लक्षणे कोणती ?
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की कोणत्या कारणांमुळे डोळे जड पडतात. आता आपण जाणून घेणार आहोत, की डोळे जड पडल्यावर, नेमकी कोणते लक्षणे आपल्याला बघावयास मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात !
- त्यावेळी उघडझाप करताना त्रास होतो.
- सुजल्यासारखे डोळे वाटतात.
- डोळे सारखे चुळचुळ करतात.
- तुम्ही नजर एकटक लावू शकत नाही.
- तसेच डोळ्यातून पाणी ही येऊ शकते.
- डोळे जड पडले असतात, तेव्हा नाकातून ही पाणी येते.
- डोळे लालसर दिसतात.
- डोळ्यांना कोरडेपणा येतो.
- डोळ्यांना कोरडेपणा येऊन, भुरकट दिसते.
- तीव्र प्रकाशात डोळे लावावेसे वाटतात.
- डोळे जड पडतात, तेव्हा थोडे डोके दुखायला सुरुवात होते.
डोळे जड पडत असल्यास, त्यावर काही घरगुती उपाय !
वरील दिलेल्या माहितीमध्ये, आपण डोळे जड पडण्याची कारणे व लक्षणे जाणून घेतली. आता आपण त्यावर काही घरगुती उपाय, जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात !
(बर्फाच्या) आईस पॅक ने शेकावे :
बऱ्याच वेळेला सतत टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वर काम करून तुमचे डोळे जड पडणे, डोळ्यांची लाली येणे, डोळ्यांची आग होणे, यासारख्या समस्या आपल्याला भरपूर प्रमाणात बघावयास मिळत आहेत. अशा यावेळी जर तुम्ही आइस पॅक एका कापडात गुंडाळून, त्याने तुमचे डोळे शेकले, डोळ्यातील पाणी येणे, जड वाटणे, यासारख्या समस्या व तुम्हाला त्वरित आराम मिळेल. शिवाय तुम्ही थंड पाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवू शकतात. त्यानेही तुमच्या डोळ्यांचा जडपणा दूर होईल.
काकडी चा वापर करून बघा :
काकडी ही डोळ्यांसाठी फार फायदेशीर असते, डोळ्यांचा जडपणा वाटणे, डोळे थकल्यासारखे वाटणे, यासाठी जर तुम्ही काकडी च्या चकत्या तुमच्या डोळ्यांवर ठेवल्यास, तुमच्या डोळ्यांचे जड – जड वाटणे, डोळ्यातून पाणी येणे, यासारखे समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
टी बॅगचा वापर करून बघा :
हल्ली तर आता कुठेही टी बॅग मिळतात. तुम्ही ज्यावेळी टी करतात, त्यावेळी त्यांच्या बॅग फेकू नका, त्यामुळें तुमच्या डोळ्याचे जड वाटण्यासारखा समस्येवर आराम मिळेल. कारण त्यांच्यात ती क्षमता असते. तुमचे डोळे जड वाटतात, पाणी येते, अशा वेळी जर तुम्ही डोळे बंद करून, त्यात डोळ्यांच्या वर 15 ते 20 मिनिटे ठेवलेत, तर तुमचे डोळे जड वाटणे, यासारख्या समस्या ते शोषून घेतात, व डोळ्यांना थंडावा मिळतो.
गाजर चा वापर करून बघा :
गाजरमध्ये व्हिटॅमिन अ असते. जे डोळ्यांसाठी फार फायदेशीर असते. जर तुमच्या डोळ्यांची आग होणे डोळे जड पडणे, डोळ्यांची निगडीत कोणतीही समस्या असली, तर त्यावर रामबाण उपाय म्हणून गाजर आहेत. अश्या वेळी तुम्ही गाजराचे काप कापून डोळ्यावर ठेवले, तरी डोळ्यातील उष्णता कमी होते, शिवाय तुम्ही गाजराचा कीस करून, एका कापडात गुंडाळून, त्या किसने डोळ्यांचे आजूबाजूला मसाज केल्यास, तुमच्या डोळ्याची उष्णता कमी होतो होते आणि डोळे जड ची समस्या कमी होते.
कोरफड चा वापर करू शकतात :
कोरफड मध्ये अंतीबॅक्टरियल तसेच ऑंटी सेप्टीक, गुणधर्म असतात. तुमचे डोळे जड पडतात, थकल्यासारखे वाटते, अशा वेळी जर तुम्ही कोरफडीचा गर काढून, डोळे बंद करून कोरफडीच्या गरच्या चकत्या डोळ्यांवर ठेवावेत. त्याने तुमच्या डोळ्यांची आग होणे, जड वाटणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला फरक पडेल. हा उपाय प्रभावशाली आहे. करून बघा. फक्त डोळ्यांवर ठेवताना डोळ्यात जाऊ न देता, डोळ्यांवर ठेवावेत. ही काळजी घ्यावी.
थंड पाण्याने डोळे धुवा :
ज्यावेळी तुम्हाला असे वाटते, की तुमचे डोळे जड पडले, डोळ्यांची आग होते, अशावेळी तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. त्याने तुमच्या डोळ्यातील थकवा, व डोळे जड होणे, यासारख्या समस्या वर थोडा आराम मिळतो.
त्रिफळा चे सेवन करा :
त्रिफळा हे तीन फळांचे संगम आहे. आवळा, हरड, बेहडा या फळांपासून त्रिफळा चूर्ण हे बनले आहे. त्रिफळा चूर्ण हे शारीरिक कोणतीही समस्या असेल, त्यावर फार लाभकारी आहेत. जर तुम्हाला सतत डोळ्यांचे त्रास, तसेच डोळे जड वाटणे, यासारख्या समस्या असतील. तर तुम्ही दिवसातून दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर, एक चमचा त्रिफळा चूर्ण प्यायचे आहे. त्याने तुमच्या डोळ्याच्या कोणत्याही तक्रारी लवकरात लवकर दूर होण्यास मदत मिळते.
विटामिन युक्त भाज्या खा :
हल्ली तर लहान असो की मोठे असो, हिरव्या पालेभाज्या खायला फार नाक मुरडतात. पण असे करू नका, कारण हिरवे पालेभाज्यांमध्ये तुम्हाला विटामिन ए, बी, सी, डी यासारखे विटामिन्स मिळतात. जे तुमच्या आरोग्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार लाभकारी आहेत. तसेच अजुन डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी तसेच अंडी, मासे यासारख्या वस्तूंचा तुमच्या आहारात समावेश करायला हवा. त्याने तुमच्या डोळ्यांसाठी पोषक असे घटकद्रव्य मिळून, डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.
पुरेशी झोप घ्या :
ज्यावेळी तुमच्या डोळ्यांना, शारीरिक थकवा आलेला असतो. अशावेळी ती जड पडतात. डोळ्यातून पाणी येते, हे कशामुळे तर तुम्ही डोळ्यांना आराम देत नाही. त्यामुळे जर तुम्ही डोळ्यांना पुरेशी झोप घेतली, तर तुमचे डोळ्यांची आग होणे, तसेच अजून पाणी येणे, डोळे जड पडणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. आपल्या शरीराला आरामाची गरज असते. ती तुम्ही करू शकतात. तेवढे करून बघा.
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की डोळे जड पडणे, या मागील कारणे, लक्षणे व त्यावर काही घरगुती उपाय, व कोणता आहार घ्यावा, तसेच आम्ही सांगितलेले, उपाय करून तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारू शकतात. तसेच डॉक्टरांकडून डोळ्यात टाकायचे ड्रॉप्स घेऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद !