कानाच्या मागे गाठ येणे

0
8763
कानाच्या मागे गाठ येणे
कानाच्या मागे गाठ येणे

नमस्कार, रोजच्या धावपळीत आपण आपल्या शरीरावर व आरोग्यावर लक्ष देत नाही. आपण आपला आहार व्यवस्थित घेत नाही. तसेच शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला शारीरिक तक्रारी जाणवत असेल, त्यावेळी आपण वरच्यावर पेंनकिलर च्या गोळ्या घेऊन, त्या थांबवतो. तसेच ती ढकली गाडी करतो. पण मुळे आपल्या शारीरिक तक्रारी वाढत जाऊन, आपल्याला मोठे दुष्परिणाम बघावयास मिळतात. सर्दी झाली, कानाच्या मागे गाठ झाली तर त्यावर दुर्लक्ष करतो, खोकला झाला, की दुर्लक्ष करतोय, ऍसिडिटी पोट दुखी झाली की तात्पुरती लिंबू पाणी पिऊन घेतो, पण असे करू नका. डोकेदुखी झाली तरी गोळ्या घेऊन घेतो, तेही डॉक्टरला न विचारता पण  त्या औषधींचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो.

आपल्या शारीरिक तक्रारी कोणत्या कारणांमुळे होतात, त्याकडे लक्ष द्यावे. तसेच आज आपण बघणार आहोत, की कानामागे गाठ झाल्यास आपण काय करायला हवे? हल्ली कानामागे गाठ ही कोणत्या कारणांमुळे तेही कोणालाच माहिती नसते ? त्यावर आपण तात्पुरता इलाज म्हणून झंडू बाम किंवा बर्फाने शेक घेऊन निवारण करण्याचे प्रयत्न करतो. पण काही दिवसांनी तिचे वाढून आपल्याला त्रास होतो. आज आपण बघूयात की, कानामागे गाठ का? व कोणत्या कारणामुळे येते ? चला तर मग जाणून घेऊयात. 

कानाच्या मागे गाठ होण्याची कारणे :

सहसा करून आपण आपल्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करतो. जर तुमच्या कानाच्या मागे गाठ असेल, तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ती गंभीर रूप धारण करू शकते. तसेच आपल्या मनात शंका येतात किती घाट कॅन्सरची तर नसेल ना त्या भीतीपोटी आपण डॉक्टरांना लवकर दाखवत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत. की कानाच्या मागे गाठ येण्याची कारणे नेमकी कोणती ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • कधी कधी कोणाला कानाच्या मागे चरबीच्या गाठी येतात.
  • तसेच लठ्ठपणामुळे तसेच अंमली पदार्थांचे व्यसन असल्यामुळे, कानाच्या मागे व शरीराला गाठी होऊ शकतात.
  • जर तुम्ही कानाची स्वच्छता न ठेवल्यास, तुमच्या कानामागे पुरळ होऊन तिची गाठ मध्ये रूपांतर होते. 
  • जर तुमच्या घशात इन्फेक्शन असेल,  तरीसुद्धा कानाच्या मागे छोटी गाठ येऊ शकते. 
  • तसेच अनुवांशिक गुण असलेल्यांना कानामागे गाठ येते. 
  • कधीकधी कर्करोगाच्या गाठी होतात. 
  • लहान मुलं मातीची संपर्कात आल्यामुळे, धुळीची ॲलर्जी होऊन कानाच्या मागे गाठ होऊ शकतात
  • ज्यांना डायबिटीस आहे, अशा लोकांना कधीकधी कानाच्या मागे गाठ येऊ शकते, त्यासाठी त्यांनी नेहमीच साखरेची लेवल चेक करत राहावे. 
वाचा  गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

कानाच्या मागे गाठ कमी करण्यासाठी काही उपचार ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला कानाच्या मागे गाठ  कोणत्या कारणांनी येते, सांगितले आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल, की तुमच्या कानाच्या मागे गाठ आहे, तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यायला हवी. तुम्ही स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. तसेच तुम्ही रोज योगा करायला हवा. योगा केल्याने तुमचे शारीरिक तक्रारी लवकरात लवकर दूर होतात. कोणता योगा ? चला तर जाणून घेऊयात. 

कानाच्या मागे गाठ असल्यास कोणता योगा करावा ? 

 जर तुमच्या कानाच्या मागे गाठ असेल, अशावेळी जर तुम्ही रोजच्या रोज सूर्यनमस्कार केला, तर तुम्हाला फरक पडू शकतो. यांनी तुमचा ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहून, शरीरात रक्ताच्या गाठी व गुठळी कुठेही होत नाही. तसेच तुम्ही अनुलोम-विलोम करू शकतात. त्याने तुमच्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते, व तुमची शारीरिक तक्रारी दूर होतात. 

तसेच तुम्ही कपालभारती व्यायाम करायला हवा. हा व्यायाम  श्वास-श्वासचा  आहे.  म्हणजे तुमच्या श्वासनलिकेत, घशामध्ये कोणतेही इन्फेक्शन झाले, त्यामुळे गाठ होऊ शकते. त्यामुळे तुमच्या या समस्या दूर होतील, जर तुम्ही व्यायाम केला, तर तुमचे आरोग्य ही दीर्घायुषी होते. 

कोरफड वापरून बघा :

कोरफडी हे अंतीबॅक्टरियल व ऑंटी सेप्टीक असते. जर तुमच्या कानाच्या मागे गाठ असेल, अशा वेळी जर तुम्ही कोरफड जेल लावून त्यावर मसाज केला, तर तुमच्या कानामागील रक्ताची गुठळी किंवा गाठ किंवा त्यात पु येऊन मोठी पुरळ असेल, तर ती हळु कमी होण्यास मदत मिळेल. 

आंबे हळद याचा वापर करून बघा :

हो, जर तुमच्या शरीरावर तसेच कानाच्या मागे गाठ असेल, अशा वेळी जर तुम्ही आंबेहळद चा वापर केला, तर फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला आंबेहळद पावडर पाण्यात टाकून गॅसवर गरम करून, थोडी कोमट कोमट झाल्यावर, कानाच्या मागे गाठ वर लावावे. त्याने त्यातील सूज व वेदना कमी होऊन, ती गाठ जाण्यास मदत मिळेल. 

वाचा  तोंड कोरडे पडणे ? यावर काही घरगुती उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या :

आपल्या शरीराला दिवसाला तीन ते चार लिटर पाण्याची आवश्यकता असते, जर तुम्ही ते पाण्याचे प्रमाण कमी केले, तर तुमच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तसेच गाठ होणे, तसेच मानसिक व शारीरिक तक्रारी होणे, या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या शरीराला पुरेसे पाणी पिले, तर तुम्हाला यासारख्या तक्रारी दूर होतात. शिवाय शरीरात गाठी व कानामागे गाठी सारख्या समस्यांवरही आराम मिळतो. 

एप्पल साइडर विनेगर चा वापर करून बघा :

एप्पल साइडर विनेगर हे तुमच्या गाठीवरील समस्यांवर थोडाफार आराम देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही एप्पल साइडर विनेगर एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन कानामागील गाठ असलेल्या जागेवर अलवार लावावे. त्याने तेथील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही एप्पल साइडर विनेगर एक कप कोमट पाण्यात दोन ते तीन थेंब टाकून पिल्याने,  यावर आराम मिळू शकतो. 

तुळशीचे पाने व कडुनिंबाची पाने यांची पेस्ट करून बघा :

हो  खरच तुळशीची पाने आणि कडुलिंबाची पाने अंतीबॅक्टरियल  ऑंटीसेप्टीक, ऑंटी इन्फेक्शन, असल्यामुळे तुमच्या शरीरात गाठी तसेच पुरळ येऊन फोड असेल, तर त्यावर फार  उपयोगी आहेत. अशावेळी तुम्ही तुळशीची पाने व कडुलिंबाची पाने यांची मिक्सर मध्ये दळून पेस्ट बनवून, त्यात चिमूटभर हळद टाकून, तुमच्या गुठळ्या व गाठी असलेल्या, ठिकाणी लावल्यास तुम्हाला फरक पडेल. 

कानाच्या मागे गाठ असल्यास कोणत्या ऑपरेशन करतात ? 

सहसा करून कानाच्या मागे गाठ असेल, तर डॉक्टर आपल्याला पेन किलर च्या गोळ्या व गाठ वितळण्याच्या गोळ्या देतात, तसेच ते आपल्या कानाच्या मागील गाठीचा अंदाज घेऊन, त्याची सिटीस्कॅन करून ती गाठ केवढी आहे, कशी आहे, कुठपर्यंत आहे, याचे प्रमाण काढले जाते. त्यानंतर तिची ऑपरेशन हा लास्ट पर्याय डॉक्टर सांगतात. ऑपरेशन ही आपली गाठ किती आहे, त्यावर अवलंबून असते, आणि त्यानुसार त्याचे खर्च असतात. 

वाचा  तुळशीची पाने खाण्याचे फायदे

काना मागे गाठ असल्यास घ्यावयाची काळजी ? 

अनेक लोकांना सवय असते, की पुरळ झाली, गाठ झाली, तर तिला दाबून फोडण्याचा प्रयत्न करतात. पण ते तसे करू नका, त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतील. तसेच कानामागे गाठ असल्यास, अति गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ नका, तसेच कानामागील गाठ जास्त दुखत असल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवावे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमची गाठ दुखत असेल आणि तुम्ही दुर्लक्ष केले तर ते गंभीर स्वरूपात बदलू शकतात. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की तुमच्या कानामागे गाठ होण्याची कारणे, आणि जर तुमच्या कानामागे गाठ असेल, तर त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच हे घरगुती उपाय करून जर तुम्हाला फरक पडत नसेल, अशा वेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here