पायाचे हाड वाढणे यावर घरगुती उपाय

0
661
पायाचे हाड वाढणे यावर घरगुती उपाय
पायाचे हाड वाढणे यावर घरगुती उपाय

अनेक जण कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. परंतु या कामाच्या धावपळीमधून देखील आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या आरोग्यासाठी वेळ काढून त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपले आरोग्य चांगले असेल, आपले शरीर हे सुदृढ असेल तर अनेक समस्यांपासून अनेक रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. पायाचे हाड वाढणे यावर घरगुती उपाय कोणते आहेत हे आपण आज बघुयात काय.

आपल्या शरीरातील प्रत्येक अंगाचे एक महत्त्वपूर्ण काम असते जे आपली भूमिका बजावत असते. आपल्या शरीराचे हात, पाय, कान, नाक, डोळे सर्वच महत्वपूर्ण अंग आहेत. या महत्वपूर्ण अंगामुळे आपण आपले कार्य व्यवस्थित रित्या पार पडत असतो. परंतु, अनेक वेळा यांबद्दल आपल्याला काही ना काही तक्रारी येत असतात काहीना काही समस्या उद्भवत असतात. आज आपण अशाच एक वेगळा समस्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आपण पायाचे हाड वाढणे या समस्येबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यावर कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो? याबद्दल जाणून घेणार आहोत. कधी कधी अचानकपणे आपल्या शरीरातील काही अवयवांची जास्तीत जास्त वाढ होत असते. कधी हातांच्या बोटांतील हाडांची तर कधी पायातील हाडांची अचानकपणे वाढ होत असते.

कुठल्याही अवयवाची जर गरजेपेक्षा वाढ झाली तर त्यामुळे आपल्याला त्रासच होत असतो शिवाय, असह्य वेदना देखील सहन कराव्या लागत असतात. तुमच्याही पायाचे हाड वाढलेले आहे का? तुम्हालाही त्रास झाला आहे का? तर यावर आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग, याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

पायातील हाड वाढणे यावर घरगुती उपाय:-

कधी कधी आपल्या शरीरातील अवयवांसंबंधित अचानकपणे समस्या येत असतात. पायातील हाड वाढणे ही देखील त्यातीलच एक प्रकारची समस्या आहे. जर गरजेपेक्षा आपल्या अवयवांची वाढ झाली तर त्यामुळे आपल्याला त्रास अधिक होत असतो. आणि या समस्याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर ही समस्या अधिक वाढू शकते म्हणून आपण वेळीच अशा समस्येकडे लक्ष दिलेले बरे.

वाचा  कानातून आवाज येणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

पायातील हाड वाढणे मागील वेगवेगळ्या प्रकारची कारणे असू शकतात. जर गरजेपेक्षा आपले पायातील हाड हे अधिक वाढले तर यामुळे अनेक प्रकारचे त्रास आपणास उद्भवू शकतात. कधी कधी या वाढलेल्या हाडामुळे असह्य वेदना सहन करावे लागतातअगदी चालताना देखील त्रास होऊ लागतो शिवाय पायावर सूज देखील येऊ शकते. तर यासाठी आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो चला तर मग, याबद्दल आता जाणून घेऊयात!

तेलाने मसाज करणे.

पायाचे हाड वाढल्यामुळे पायाला अचानकपणे सूज देखील येऊ लागते. शिवाय चालताना देखील तर त्रास होऊ लागतो. या वेदना कमी व्हाव्यात तसेच ही समस्या जाण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाने किंवा साध्या खोबरेल तेलाने तुमच्या पायाची मसाज करावी. सर्वप्रथम तुम्ही तेल हे एका वाटीत घेऊन थोडेसे कोमट करून घ्यावे आणि मग त्या तेलाने तुमच्या पायांची हळुवारपणे मसाज करावी.

मसाज केल्यामुळे तुमच्या पायाची सूज देखील कमी होईल आणि ही समस्या देखील जाण्यास मदत होऊ शकते. ही क्रिया तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकतात रात्री झोपण्यापूर्वी जर पायाला मसाज केली तर तुम्हाला व्यवस्थित आरामही मिळू शकतो आणि वेदना देखील कमी होऊ लागतात.

बर्फाने शेक द्यावी.

मुका मार लागल्यावर किंवा कुठलीही दुखापत झाल्यावर जर बर्फाने शेक दिली तर त्या समस्येवर आराम मिळतो. शिवाय वेदना देखील कमी होतात. तुमच्या पायाचे हाड वाढले असेल आणि पायाला सूज देखील आलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी बर्फाने शेक देऊन बघावे असे केल्यामुळे देखील तुमच्या वेदना कमी होतील आणि ही समस्या आहे कमी होण्यास मदत होऊ शकते.

एका कपड्यांमध्ये आईस क्यूब घेऊन ज्या ठिकाणी पायाचे हाड वाढलेले आहे किंवा पायाला सूज आलेली आहे त्या ठिकाणी हळुवारपणे शेक द्यावी. शिवाय रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हीच क्रिया पुन्हा करावी असे केल्यामुळे तुमच्या पायाची हाड वाढण्याची समस्या कमी होऊ शकते आणि सूज देखील झाल्यास मदत होऊ शकते.

वाचा    शारीरिक कसरत करण्याचे फायदे !

हळद किंवा आंबे हळदीचा वापर करून बघा.

स्वयंपाक घरात आपल्याला हळद ही सहज उपलब्ध होईल. हळदीमध्ये अँटी बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. फार प्राचीन काळापासून हळदीचा उपयोग होत आलेला आहे आणि आजही आपण हळदीचा उपयोग करत असतो. एखादी जखम झाल्यास आपण त्या ठिकाणी हळदीचा वापर करत असतो. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होत असते. हळदीच्या सेवनामुळे देखील अनेक रोगांपासून आपला बचाव होत असतो.

मित्रांनो, पायाची हाड वाढले असल्यास, सूज आलेली असल्यास त्या ठिकाणी तुम्ही हळदीचा लेप लावू शकतात या ठिकाणी तुम्ही आंबे हळदीचा देखील लेप लावू शकतात. हळदीचा किंवा आंबे हळदीचा लेप लावल्यामुळे तुमच्या पायावरील सूज कमी होण्यास मदत होणार आहे आणि ही समस्या देखील जाण्यास मदत होऊ शकते.

तर मित्रांनो, आम्ही सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकतात. यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो आणि ही समस्या जाण्यासही मदत होऊ शकते. जर हे उपाय करून देखील तुमचा त्रास कमी होत नसेल, तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे.

कुठल्याही समस्येवर वेळीच उपचार केलेत तर समस्या जाण्यास मदत होत असते आणि जर दुर्लक्ष केले तर ही समस्या अजून वाढण्याची शक्यता असते म्हणून आपण वेळीच उपचार करायला हवेत.

     मित्रांनो, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

 धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here