लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे

0
770
लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे
लहान मुले तणावात आहे हे कसे ओळखावे

              

आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे लहान मुले ताण-तणाव मध्ये असणे. बऱ्याच वेळेस मुलं सांगत देखील नाही की ते तणावामध्ये आहे. की त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास आहे बरेच वेळेस असे देखील असू शकते की पालकच समजून घेत नसतील की त्यांची मुलांना देखील तान तनाव असू शकतो. आजकालच्या जगामध्ये ताणतणाव असणे फार सामान्य झाले आहे कारण आजकाल खूप लोकांना कामाचा तणाव तर लहान मुले यांना अनेक गोष्टींचा तणाव असतो आणि हा त्यानंतर एवढा मोठा होतो की याला सामान्य देखील खूप कठीण होऊन बसते. आणि जर आपण या अवस्थेमध्ये कोणी तज्ञांचा सल्ला घेतला नाही तर आपल्यासाठी ते फार धोकादायक ठरू शकते. त्याच बरोबर आपल्या शरीरासाठी देखील ते धोकादायक ठरू शकते. कारण प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो.

आपली मानसिक स्थिती हलते आपण जेवण कमी करतो यामुळे आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा येतो या सर्व गोष्टी आपल्या सोबत होतात. पण जर का लहान मुले असतील तर या ताण-तणावाच्या धोका तर त्यांना फारच अधिक असतो. कारण मोठ्यांचा तसं नसतं मोठ्या लोकांना माहिती असतं की ताण तणाव झाल्यावर काय करावे किंवा ते स्वतःहून तज्ञांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेऊ शकता. पण लहान मुले काय करणार कारण की बर्‍याच वेळेस ते कोणाला सांगत नाही. आणि मनातल्या मनात ठेवून त्यात ताण-तणाववा सोबत सामना करतात. काही असे पावले उचलतात जी त्यांनी उचलायला नको होती. 

कारण लहान मुले बऱ्याचदा पालक ऐकत नाही काही लहान मुले पालकांना स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करतात पण पालकांना वाटते की हा अजून लहान आहे याचे काय ऐकावे. म्हणून आपण बऱ्याचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि हीच आपली एक मोठी चूक ठरू शकते. तर मित्रांनो आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की नक्की लहान मुलांना ताणतणाव आला असेल तर आपण ते कोणत्या प्रकारे ओळखू शकतो. तसेच त्यांच्या ताणतणाव आपल्याकडे काही उपाय आहे का की जेणेकरून आपण त्या लहान मुलांना ताणतणावापासून मुक्त करू शकतो चला तर मग जाणून घेऊया.

लहान मुले तणावात का येतात ?

              चला तर आपण सर्वात महत्त्वाचा व सर्वात पहिले येणाऱ्या प्रश्नाचे समाधान बघूया की लहान मुलांना नक्की तणावात का येतात चला तर मग बघूया.

वाचा  लघवीला वारंवार जावे लागणे या समस्येवर घरगुती उपाय

घरातले वातावरण :

                बाहेरच्या वातावरणाबरोबर घरातले वातावरण देखील चांगले असणे हे फार गरजेचे आहे आणि आजच्या जगामध्ये तर घरामध्ये चांगले वातावरण असलेच पाहिजे नाहीतर मुलांच्या कोवळ्या मनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच जर घरामध्ये आई वडील सतत एकमेकांशी भांडत असतील तर त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम त्यांच्या मुलांवर दिसून येतो. त्याच प्रकारे त्यांच्या मुलांच्या अभ्यासावर जेवणावर आरोग्यावर परिणाम दिसून येतो म्हणून प्रयत्न करा की तुम्ही मुलांसमोर भांडणार नाही व घरातले वातावरण मंगलमय व आनंदी असेल.

आजारपणामुळे किंवा काही इतर कारण :

                अनेक वेळा आजारपणामुळे माणूस इतका चिडचिडा होतो की त्याला खूप गोष्टींचा ताण येतो आणि त्या गोष्टी त्याच्या वयामध्ये सहाजिक असतात म्हणून कधीही आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याच्या कडे लक्ष द्या मुलगा जर फारच छोटा असेल तर अनेक वेळा लहान मुलं झोपे मध्येच लघवी करतात किंवा त्यांना ऍसिडिटी होते त्यांचे पोट दुखू शकते. अशी बरीच कारणे असू शकतात की ज्यामुळे लहान मुलं ताणतणाव मध्ये येऊ शकतात. मोठ्या माणसांचं एक बरं असतं की ते सांगू तरी शकतात पण अगदी लहान मुलगा असेल तर तो सांगू शकत नाही की त्याला नक्की झाले तरी काय आहे अशा वेळी त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

लहान मुले तणावामध्ये आहे कशावरून ओळखावे :

                   तर आत्ताच आपण बघितले की मुलांना तान तनाव येण्याची कारणे आता आपण जाणून घेऊया नेमकं आपण कशावर ओळखू शकतो की हा मुलगा आत्ता नावामध्ये आहे चला तर मग बघुया.

मुलांना राग येणे :

                बऱ्याच वेळेस जर मुलगा चिडचिड करत असेल तर राग राग करत असेल तर समजावे त्याला काहीतरी अडचण आहे. किंवा हा कोणत्या तरी त्या ताण तणावामध्ये आहे बऱ्याच वेळेस मुलं जर कोणत्या तणावामध्ये असतील तर ते खूप राग करतात चिडचिड करतात त्यांचे कोणत्याही कामांमध्ये लक्ष लागत नाही. जर असे काही झालं तरी त्यांना राग येतो तर यावरून तुम्ही ओळखू शकता की हा मुलगा नक्कीच तणावामध्ये आहे.

वाचा  तिळाच्या तेलाचा वापर केल्या मुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

नख खातात :

               मुलं जर नखं खात असतील तर समजावे की ते काहीतरी विचारात आहे म्हणजेच ते एका गोष्टीचा सतत विचार करतायेत आणि हा एक प्रकारचा ताण असू शकतो. म्हणून वेळीच मुलांकडून जाणून घ्या की नक्कीच एक कोणत्या गोष्टीचा सतत विचार करत आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा एवढा विचार करणे चांगले नसते.

मुलांना तणावातून बाहेर कसे काढावे :

              आता आपण जाणून घेऊया की जर मुलाचा तणावामध्ये असेल तर त्यांना त्याच्या तणावातून बाहेर कसे काढावे चला तर जाणून घेऊया.

पुरेशी विश्रांती द्या :

              सर्वात सोपा व चांगला मार्ग ताण तणावातून बाहेर काढण्यासाठी तो म्हणजे पुरेशी विश्रांती देणे. म्हणजेच बरेच वेळेस तान तनाव मध्ये आपण पुरेशी विश्रांती घेत नाही आणि त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. म्हणून तुम्ही पुरेशी विश्रांती घ्यावी पुरेशी विश्रांती घेतल्याने बऱ्याच समस्यांचे समाधान आपल्याला आपोआपच मिळते.

मुलांच्या कलेने घेऊन बघा :

             मुलांचा ताणतणाव दूर करायचा असेल तर सर्वात पहिले आपण म्हणजेच पालकांनी मुलांच्या कलेने घेणे गरजेचे आहे. तुम्ही त्याला जे काही अडचण असेल ती पहिले ऐकून घ्या आणि ती कशी सोडवता येईल यावर विचार करा. तसेच त्या मुलाला दोन प्रेमाच्या गोष्टी सांगून या तणावातून बाहेर काढा.

              तर आज आपण बघितले मुलं ताण तणावामध्ये का असतात तसेच आपण कसे ओळखावे की मुलतान तणावामध्ये आहे. याच प्रकारे आपण त्यांचा ताण तणाव कसा दूर करावा हे देखील बघितले. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here