झोपताना डोक्याची मालिश का करावी ? 

0
1356
झोपताना डोक्याची मालिश का करावी
झोपताना डोक्याची मालिश का करावी

 

नमस्कार, आजचे युग हे सगळ्यांनाच माहिती आहेत. रोजची धावपळ, रोजचे तेच कॉलेज, स्कूल, ऑफिस, ट्राफिक, यातून आपण एकदम थकून जातो, व अक्षरशहा तो थकवा आपल्या चेहऱ्यावर आणि केसांवरही दिसतो. आजच्या धावपळीत आपण आपल्या स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. तसेच रोजची धावपळ आल्यामुळे आपल्याला असे वाटते, की कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जावे. पण तिथेही आपल्याला शांती मिळत नाही, तिथेही गजगज, पर्यटक हे ठिकाण  बघावे, ते ठिकाण बघावे, यातच आपण राहून जातो.  तर मग ही शांती आपल्याला कुठे मिळेल? तर ही शांती तुम्हाला झोपताना डोक्याला मालिश केल्यावर मिळेल, हो खरंच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल!  खरंच डोक्याची मालिश हा असा पर्याय आहे, जो तुमचा दिवसभराचा थकवा दूर करेल, तुम्हाला अतिशय शांत वाटेल.

तुमचा दिवसभराचा थकवा निघून जाईल.  डोक्याची मालिश हा प्रकार पूर्वीच्या काळापासून पिढ्यानपिढ्या चालू आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या युगात आपण आपल्याकडे लक्ष देत नाही. आता मालिश हा प्रकार सुद्धा कमी होत चाललेला आहे, पूर्वी तर आजी, आई, मुलगी, नातवंडे या पासून सगळेजण मालिश करायचे, हल्ली तर कोणाला तेलही लावायला आवडत नाही, तेल मालिश कुठे करणार. ऑफिसला जाताना कामाला जाताना किंवा कुठेही जाताना तेल लावून जायला भरपूर जणांना कंटाळा येतो पण खरंच सांगतो, मालिश केल्याने तुम्हाला भरपूर फायदे होऊ शकतात. डोक्याची मालिश केल्याने तुम्हाला कोण कोणते फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात! 

डोक्याची मालिश केल्याने नेमके कोणकोणते फायदे होतात? 

पूर्वीच्या काळापासून रात्री झोपताना, डोक्याची, केसांची मालिश ही केली जाते. पण हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणाला वेळच नाही, तर डोक्याची मालिश कुठे करणार, दिवसभराचा थकवा, धावपळ यामध्ये आपण स्वतःचे कडे लक्ष देत नाही, तर मालिश कुठे करणार बरे.            पण खरे सांगू डोक्याची मालिश ही आपल्यासाठी फार फायदेशीर आहे. कारण मालिश केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात, त्यासाठी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं तरी डोक्याला  मालिश करायला हवी. चला तर मग जाणून घेऊया की डोक्याची मालिश केल्याने तुम्हाला होणारे फायदे! 

 • जर तुम्ही रात्री झोपताना डोक्याची मालिश केली, तर तुम्ही तनाव मुक्त राहणार. 
 • तुमचे अकाली केस पांढरे होणे थांबते. 
 • केस गळती च्या समस्या असतील, तर त्या कमी होतात. 
 • केसात कोंडा झाला असेल, तर तो कमी होण्यास मदत मिळते. 
 • डोक्यातील नसांचे रक्तभिसरण सुधारते. 
 • डोकेदुखी कमी होते. 
 • केसांची मुळे मजबूत होतात. 
 • अर्धशिशीचा त्रास हा कमी होतो. 
 • शांत झोप लागते. 
 • दिवसभराचा धावपळीचा थकवा दूर होतो. 
 • तुमची केस मुलायम व चमकदार होतात. 
वाचा  ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

झोपताना डोक्याची मालिश कशी करावी

वरील दिलेल्या माहितीमध्ये डोक्याची मालिश केल्याने, तुम्हाला कोण कोणते फायदे होतात, ते आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे. तसेच झोपताना डोक्याची मालिश कशी करावी? हे अनेक जणांना माहिती नसते, चला तर मग जाणून घेऊयात की डोक्याची मालिश कशी करावी? 

     झोपताना तेलाची मालिश ही नेहमी खोबरेल तेलाने करावी, खोबरेल तेलाचा वापर हा अगदी पूर्वीच्या काळापासून केला जात आहे. खोबरेल तेल हे उष्ण आणि डोक्यासाठी एकदम शांत असते. झोपताना केसाची मालीश करण्यापूर्वी खोबरेल तेल, तुम्ही एका वाटीमध्ये गरम करुन, ते कोमट करून केसांना हळूवारपणे, अलगद सर्कुलेशन पद्धतीने गोल गोल फिरवावे. डोक्यामध्ये काही प्रेशर पॉईंट असतात. एक कानाजवळ, एक कपाळावर, एक कानाच्या मागे, आणि एक मानेजवळ मागच्या बाजूला मधोमध, या प्रेशर पॉईंट ला हळूवारपणे सर्कल करून प्रेस करावे. असे केल्याने तुमच्या डोक्यातील नसांचे रक्ताभिसरण सुरळीत  होण्याचे काम होते, आणि तुमचा दिवसभराचा थकवा हा त्याने दूर होतो.

डोक्याला मालिश करताना एकदम शांत वातावरण असायला हवे, एखादे मधुर संगीत लावून, ही तुम्ही डोक्याला शांतपणे मसाज करू शकतात. तसेच जर तुम्हाला खोबरेल तेल आवडत नसेल, तर तुम्ही मार्केटमध्ये अजून तेल आहेत, त्या तेलाने तुम्ही मालिश करू शकतात. मग ते तेल कोणत्या प्रकारचे आहेत, चला ते जाणून घेऊया! 

 • खोबरेल तेल
 • जसे की राई चे तेल
 • करडईचे तेल
 • जास्वंदीचे तेल
 • तिळाचे तेल
 • बदामाचे तेल

अशी काहीच तेलांची नावे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, जर तुमच्या डोक्यात कोणत्या तेलाची ॲलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लावू शकतात. 

झोपताना डोक्याची मालिश करताना कोण कोणती काळजी घ्यावी

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला झोपताना डोक्याची मालिश का करावी? कशी करावी? त्यासाठी तुम्ही कोण कोणते तेल वापरू शकतात? हे सांगितलेले आहेत. तसेच आता आपण झोपताना डोक्याची मालिश करताना, नेमकी कोणती काळजी घ्यावी? त्यात काय काळजी घ्यावी हे सारखे आहे, ते जाणून घेऊयात. 

 • तेल अतिशय उष्ण नको, तेल कोमट करूनच अगदी मुळापासून केसांना लावावे. 
 • मालिश करतेवेळी हाताची बोटे ही एकदम घासून लावू नका, अगदी हळुवारपणे डोक्यात वर्तुळाकार फिरवावे. 
 • मालिश करतेवेळी नखे कापून घ्यावी,  कारण डोक्यातील टाळूला नखे लागून, इजा होण्याची शक्यता आहे. 
 • डोक्याला मालिश करून झाल्यावर मानेवर ही मसाज करावा, त्याने तुम्हाला फायदा होईल. 
 • जर तुमच्या डोक्यात पुरळ असतील, तर मालिश करतेवेळी हळुवार करावे, नाहीतर फंगल इन्फेक्शन ही होऊ शकते. 
 • डोक्याला मालिश केल्यानंतर, डोक्याला, केसांना कंगव्याने विंचरू नका, कारण मालिश केल्यानंतर, तुमचे मस्तीक्ष एकदम शांत असते. त्यावेळी तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटते. 
वाचा  साबुदाणा खाण्याचे फायदे व नुकसान जाणून घेऊयात काय आहेत?

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला डोक्याला मालिश का करावी, कशी करावी, त्याने तुम्हाला कोणते फायदे होतात, मालिश केल्यानंतर तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगावे. 

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here