केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांचे उपाय

0
3617
केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांचे उपाय
केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांचे उपाय

केस गळताय, मग केस वाढवण्यासाठी काय कराल ?

      मित्रांनो हल्ली केस गळतीची समस्या ही अनेकांना उद्भवत आहे केस गळती चे एक ना अनेक कारणे असू शकतात. सतत केस गळती मुळे केस विरळ होतात आणि टक्कल पडण्याची देखील दाट शक्यता असते. प्रत्येकालाच असं वाटत असते की आपले देखील केस हे इतरांप्रमाणे सुंदर, स्वच्छ, लांबसडक व दाट व्हावे तसेच केस वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही याचा त्याचा देखील सल्ला घेऊ लागतात. तसेच,  तुम्ही तुमच्या केसांवर  वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि वेगवेगळी घरगुती उपाय देखील करत असतात. काहीजण तर मग बाजारातून महागडे प्रोडक्स आणून त्यांच्या केसांवर त्याचा वापर करत असतात.परंतु मित्रांनो, यामुळे अजून केसान विषयीच्या समस्या उद्भवू शकतात. तुमचे केस हे अकाली पांढरे होऊ नयेत, काळे,दाट व्हावेत तसेच, तुमचे केस लांब सडक व्हावेत, मऊ व मुलायम रहावेत यासाठी तुम्ही स्वागत तोडकर सरांनी सांगितलेले उपाय करून बघू शकतात. आज आम्ही तुम्हाला केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांचे उपाय सांगणार आहोत.  चला तर मग जाणून घेऊया केस वाढवण्यासाठी उपाय व या विषयी माहिती.

 

केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांनी सांगितलेले उपाय व ते कसे करावे

       

मित्रांनो, स्वागत तोडकर सरांनी केसांवर अनेक उपचार सांगितले आहेत. तसेच केस गळती होऊ नये,केस दाट व लांब सडक व्हावीत व मुलायम कसे होतील याविषयी बरेच काही माहिती सांगितली आहे. ती माहिती नेमकी कोणती? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वागत तोडकर सरांनी सांगितले केसांवरील उपाय कोणते व ते कसे करावे याविषयी जाणून घेऊया.

 

✳️केस वाढवण्यासाठी ✳️ 

 

  मित्रांनो,स्वागत तोडकर यांनी सांगितलेले उपाय नुसार ज्यांना केस वाढवायचे आहेत व ज्यांना केस गळती कमी करायची आहेत त्यांनी वडाच्या झाडाच्या पारंब्या आणायच्या. पारंब्या  आणताना त्या कवळ्या म्हणजेच खालच्या पांढऱ्या रंगाच्या आणाव्यात. आणल्यानंतर त्या स्वच्छपणे धुवून त्यांना खोबरेल तेलात एक आठ दिवस भिजू द्यावेत. पंधरा दिवस ठेवले तरी चालतील त्यानंतर  ते एका भांड्यात काढून व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर गाळून घ्यायचं आणि परत एक चार-पाच दिवस ते तसेच ठेवायचे.त्यानंतर त्या तेलाचा वापर तुम्ही करू शकतात.एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड तुमच्या केसांना लावून बघा. तीन महिन्यातच तुम्हाला केस विचारताना कंटाळा येईल इतक्या छान पद्धतीने केस कसे वाढतील. स्वागत तोडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे, केस गळती ही दोन कारणांमुळे होत असते. एक  म्हणजे उष्णता व दुसरे म्हणजे कॅल्शियमची कमतरता. शरीरात कॅल्शियमची कमतरता व उष्णता जास्त वाढल्यामुळे केस गळू लागतात. तसेच पाणी दूषित किंवा खराब असल्यामुळे देखील केस गळू लागतात. 

वाचा  रक्त शुद्ध करण्यासाठी घरगुती उपाय कोणते? 

 

✳️केस गळती रोखण्यासाठी उपाय ✳️

 

         स्वागत तोडकर सरांनी केस गळती रोखण्यासाठी देखील उपाय सांगितले आहेत तर केस गळती रोखण्यासाठी कोणते उपाय करावेत हे  स्वागत तोडकर सरांनी सांगितले उपाय आपण जाणून घेऊया. 

  • केस गळती रोखण्यासाठी स्वागत तोडकर सरांनी खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला दिलेला आहे.खोबरेल तेल हे एका वाटीत काढून ते के तेल केसांना लावण्याआधी ते कोमट करून घ्या आणि नंतर केसांच्या मुळांशी त्या तेलाने मालिश करा. रात्रभर ते तेल तसेच केसांना राहू द्या व दुसऱ्या दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुऊन टाका असे  केल्याने काय आठवड्यातच तुमच्या केसांना फरक जाणवत येईल. 
  • तसेच स्वागत तोडकर सरांनी घरगुती तेल कसे बनवावे हे देखील सांगितले आहे. यासाठीएका कढईमध्ये शंभर एम एल मोहरीचे तेल +कलोंजी दीड चमचा +  मेथीचे दाणे दीड चमचा आता हे मिश्रण मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे. हे मिश्रण उकळत असताना त्याला सारखे हलवत राहायचे आहे आणि शेवटचा घटक म्हणजेच  हिना मेहंदी दीड चमचा घेऊन तेलामध्ये टाकायचे आहे.अजून पाच मिनिटेहे तेल उकळून घ्यायचे आहे. पाच मिनिटे उकळून घेतल्यानंतर हे तेल काळा कलर चे दिसून येईल. आता हे तेल एक तास थंड होऊ द्या व ते गाळणी च्या साह्याने व्यवस्थित गाळून घ्या आणि एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या. हे तेल साधारण एक महिना टिकू शकते. हे तेल लावणे आधी काचेची बॉटल व्यवस्थित हालवून एका वाटीत काढून घ्या. हे तेल लावन्याआधी तेल कोमट करून घ्या आणि याची केसांच्या मुळांशी मालिश करा. रात्रभर ते तसेच राहू द्या व दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. याच्या नियमित वापराने तुमचे केस पूर्णपणे गळणे बंद होऊ शकेल व दुसरे नवीन केस येण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  • पाव किलो खोबरेल तेल घ्या.त्यात तुळशीचे पाने दोन+ जास्वंदाचे  दोन पाने+ मधमाशांचे पोळ्यातील मेण + दोन चमचे आवळा पावडर + दोन चमचे ब्राम्ही पावडर एकत्र करुन आठ दिवस ते तसेच झाकून ठेवा. आणि आठ दिवसानंतर काढून ते कडक उकळून घ्या आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. हे तेल पूर्ण तीन आठवडे तसेच झाकून ठेवा. तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतर हे तेल पुन्हा कडक उकळून घ्या .त्यानंतर तुम्ही हे तेल वापरू शकतात. हे तेल वापराणे तीन महिन्यातच तुमचे केस इतके वाढतील की तुम्हाला केस विंचरताना देखील कंटाळा येईल, असे स्वागत  तोडकर सांगतात. 
वाचा  मणक्याच्या वेगवेगळ्या आजारावर व विविध समस्यांवर वेगवेगळे घरगुती उपचार :-

 

✳️केस अकाली पांढरे होऊ नयेत व लांब सडक व्हावेत यासाठी उपाय✳️

 

     मित्रांनो केस अकाली पांढरे होऊ नयेत व लांब सडक व्हावेत यासाठी देखील स्वागत तोडकर सरांनी उपाय सांगितले आहे ते आपण जाणून घेऊया.

        तुळशीचे 21 पाने घ्या.+ साधारण तीन ते चार चमचे आवळ्याचे चूर्ण घ्या.+एक मोठे भांडे घेऊन त्यामध्ये 21 तुळशीचे पान व आवळ्याचे चूर्ण व्यवस्थितपणे भिजवत ठेवा. साधारण पंधरा ते वीस मिनिटे ते ठेवायचे आहे. त्यानंतर केसांच्या मुळांना व केसांना सगळीकडे त्या पाण्याने मसाज करायचे आहे आणि कमीत कमी केसांच्या मुळांपर्यंत पोचेपर्यंत  एक ते दोन तास तसेच राहू द्या आणि मग आंघोळ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा जास्तीत जास्त वेळा करू शकतात. त्या दिवसापासून तुमच्या केसांचे सगळेच प्रॉब्लेम कमी होतील, असे स्वागत तोडकर सर सांगतात. तसेच हा उपाय केल्याने तुमची केस देखील काळे होण्यास मदत होणार आहेत. केस अकाली पांढरे होणार नाहीत व केस लांब सडक व वाढण्यास देखील मदत होऊन होणार आहे. 

 

  

केस वाढवण्यासाठी स्वागत तोडकर यांच्यानुसार केसांची काळजी कशी घ्याल.

 

मित्रांनो स्वागत तोडकर सरांनी केसांबद्दल कशी काळजी घ्यावी याविषयी देखील माहिती सांगितले आहे तर स्वागत तोडकर यांच्या सल्ल्यानुसार केसांबद्दल कशी काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया.

 

  • स्वागत तोडकर सर यांच्या सल्ल्यानुसार, केसांना साधरण साधेच तेल लावावे म्हणजेच तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकतात.
  • ज्यांचे केसांना चाई पडत असेल त्यांनी सिताफळाचे पाने आणून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. व ते दगडावर वाटायचीत आणि त्याचा लेप करून घ्यावा. आणि हा लेप ज्या ठिकाणी चाई पडली असेल त्या ठिकाणी लावा 21 दिवसानंतर तिथे केस येण्यास सुरुवात होते, असे स्वागत तोडकर सर सांगतात.तसेच त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे. 
  •  केस लांब सडक जर हवे असतील तर,त्रिफळा चूर्ण व गूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यावा आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि रोज रात्री जेवल्यानंतर एक गोळी चोखन खायची व त्यावर कोमट पाणी प्यायचे, असे स्वागत तोडकर सरांनी सांगितले आहे.
  • स्वागत तोडकर सर यांच्या सल्ल्यानुसार गाईच्या दुधात थोडी खसखस घेऊन ती चांगल्या प्रकारे रगडून घ्यावी व हे दूध चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे,हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. असे केल्याने तुम्हाला काही महिन्यातच तुमच्या केसांमध्ये फरक जाणून येईल. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन, शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढेल आणि केस गळतीची समस्या कमी होईल.
  • केस धुण्यासाठी शाम्पू चा वापर न करता आवळा शिकाकाई, रीठा, मिश्र पाणी याने केस धुवावेत. या माय केस काय तर होतीलच शिवाय केस गळती देखील कमी होईल.
वाचा  जेवण करताना घाम येणे

   वरील प्रमाणे स्वागत तोडकर सर यांच्या सल्ल्यानुसार केस वाढवण्यासाठी केसांची काळजी तुम्ही घेऊ शकतात. मित्रांनो आपण स्वागत तोडकर सर यांनी केसान विषयी सांगितलेले उपाय कोणकोणते आहेत तसेच, केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे.आम्ही सांगितलेले वरील प्रमाणे माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

     धन्यवाद.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here