मनरेगा योजना – जाणून घ्या रोजगार योजने बद्दल

0
793
मनरेगा योजना
मनरेगा योजना

मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत भारत सरकारच्या मनरेगा योजना म्हणजेच ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजना’ या रोजगारविषयक योजनेविषयी. मनेरेगा योजना आज भारताततील बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांचे दारिद्र्य निर्मूलनदेखील करत आहे तसेच त्यांच्या राहणीमनाचा दर्जाही उंचावत आहे.

मनरेगा म्हणजे काय असते ? मनरेगा म्हणजे कामाची गॅरंटी ! चला तर मग जाणून घेऊया सरकारच्या या योजनेबद्दल. तसेच आपण जाणून घेऊया या योजनेचे व महाराष्ट्र शासनाचे काय संबंध आहेत.

योजनेची माहिती:-

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना ही स्वतंत्र भारतातील आजवरची ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देणारी सर्वात मोठी योजना आहे. योजनेची सुरुवात 2005 पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून करण्यात आली,  2009 पासून तिचे नाव मनरेगा असे करण्यात आले.

या योजनेविषयी आपल्याला पुढील माहिती जाणून घेताना आनंद होईल की या योजनेचा उगम हा आपल्या महाराष्ट्र राज्यातूनच झालेला आहे. 1976 मध्ये महाराष्ट्र राज्याचे रोजगार राज्यमंत्री असलेले वि.स.पागे यांनी एक उपक्रम राबवला. दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळत होता तर त्याच वेळी त्यांनी ‘कामाच्या बदल्यात अन्न’ हा उपक्रम चालू केला. या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारत सरकारने ही योजना संपूर्ण भारतात राबविण्याचा विचार केला आणि त्याचाच स्वीकार करत भारत सरकारने अखिल भारतीय स्तरावर ही योजना लागू केली व आज ही योजना भारतातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि गरीबांना रोजगार पुरवून त्यांचे दारिद्र्य दूर करत आहे तसेच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत आहे.

चला तर मग जाणून घेऊया या योजनेत आपण कसे सामील होऊ शकतो व रोजगार मिळवून एक सुखी जीवन कसे जगू शकतो.

मनरेगा योजना साठी अर्ज कसा कराल:

मनरेगा योजना मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील ग्रामपंचायतीमधील तीन पद्धतींनी अर्ज करता येऊ शकेल.

  1. कोऱ्या कागदावर ग्रामपंचायतीस आवेदन करून,
  2. ग्रामपंचायतीत उपलब्ध असलेल्या छापील अर्जाद्वारे,
  3. ग्रामपंचायतीत जाऊन तोंडी अर्ज देखील आपण करू शकतो.
वाचा  टमाटर चे फायदे

या योजनेच्या माध्यमातून गावातील लोकांनी ग्रामपंचायतला अर्ज केल्याच्या 15 दिवसाच्या आत त्याला गावाच्या जवळ पाच किलोमीटर परिसरात रोजगार मिळतो अट फक्त एवढीच की, अर्जदार भारताचा नागरिक असावा तसेच तो ज्या ग्रामपंचायतीत अर्ज करणार आहे तेथील तो रहिवासी असावा आणि त्याची अंग मेहनतीची तयारी असावी कारण ही योजनाच मुळात अकुशल आणि अंग माहितीचे काम करणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे.

मनरेगा योजनेचे फायदे :-

1. अर्ज कर्त्याला कमीत कमी शंभर दिवस रोजगार देण्याची गॅरंटी सरकारने घेतली आहे.

2. अर्जदार त्याच्या कामाची जबाबदारी घरातील इतर प्रौढ व्यक्तीवर देऊ शकतो किंवा कामाचे विभाजन करू शकतो अशा प्रकारची ही एकमेव योजना आहे.

3. कामास इच्छुक व्यक्ती ग्रामपंचायतीकडे नोंदणी करू शकतो त्यामध्ये वयस्क सदस्याचे नाव, वय, लिंग तसेच पत्त्याची नोंदणी करावी.  ही नोंदणी पाच वर्षापर्यंत वैद्य राहील.

4. वरीलप्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत कडून एक जॉब कार्ड मिळेल ज्या अंतर्गत अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत काम तेही गावाच्या पाच किलोमीटर परिसराच्या आणि पाच किमी क्षेत्राच्या बाहेर गेल्यास दहा टक्के जास्तीची मजुरी मिळेल आणि रोजगार जर नाहीच मिळाला तर 25 ते 50 टक्के बेरोजगारी भत्ता मिळेल.

5. योजनेअंतर्गत मजुरीचे दर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे आहेत सर्वात जास्त दर हा हरियाणा मध्ये 281 रुपये तर महाराष्ट्र मध्ये प्रति दिवस 206 रुपये एवढा मजुरी दर मिळतो.

6. मिळणारी मजूरीची रक्कम  ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

योजना 90 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यसरकार अंमलबजावणीसाठी एका योजना अधिकाऱ्याची निवड करते. कामाची निवड मात्र ग्रामपंचायत करते कारण ग्रामसभेच्या शिफारशीनुसारच प्रकल्पाची निवड अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.

या सर्व गोष्टीमुळे ही योजना आज पर्यंत ची एक सर्वात यशस्वी आणि ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारी योजना ठरली आहे याचा लाभ तुम्हीपण घेऊ शकता, तर मग कशी वाटली ही योजना सांगण्यासाठी कमेंट अवश्य करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here