नमस्कार, मित्रांनो हल्ली आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.आपण आपल्या आरोग्यावर लक्ष द्यायला हवे. आपण कोणतेही पदार्थ, कोणत्याही वेळी खातो. तसेच अवेळी झोपणे, अवेळी खाणे, चहा-कॉफीचे पदार्थ जास्त पिणे, तंबाखू, सिगरेट अमली पदार्थाचे सेवन, दारू या गोष्टींचा अति वापर करणे, याचा परिणाम शरीरावर होतो. शिवाय आपल्या शरीरातील अवयवांवर होतो. अशा पदार्थांच्या वापरामुळे तुमच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात. तसेच आपल्या शरीरातील रक्त शुद्ध नाही राहिले, तर आपल्याला खूप सार्या समस्या होतात.
त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरातील रक्त हे काही घरगुती उपाय मार्फत शुद्ध करू शकतात. तसेच रक्तातील अशुद्ध करणे, शरीरातील घाण डीटॉक्स करू शकतात. जर तुमच्या शरीरातील रक्त अशुद्ध असेल, तर तुम्हाला खूप साऱ्या समस्या होतात, जसे की उच्च रक्तदाब, हार्ट अटॅकचा धोका, तसेच मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, यासारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. त्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत, की रक्त शुद्ध करण्यासाठी, काही घरगुती उपाय योजना ! चला तर मग जाणून घेऊयात.
शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय ?
मित्रांनो आपल्या शरीरातील रक्त शुद्ध झाले, तर आपण खूप सार्या व्याधींपासून दूर राहतो. त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, चला तर मग जाणून घेऊयात.
पुरेसे पाणी प्या :
हो, हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो कोणीही करू शकतो, जर तुम्ही तुमच्या शरीराला पुरेसे पाणी पिले, तर तुमच्या बॉडी मधील रक्त प्युरिफायर होते, रक्त शुद्ध होते, पण तेही प्यायला, आपण कंटाळा करतो. आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. दिवसातून तुम्ही सात ते आठ लिटर पाणी प्यायला हवेत. पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होतेच, शिवाय तुम्हाला डीहायड्रेशन सारख्या समस्या होत नाही.
आहारात नेहमी दूध हळदीचा वापर करा :
हळदीमध्ये ऑंटीबॅक्टरियल तसेच ऑंटी सेप्टीक गुणधर्म असतात. तसेच शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत प्रभावी ठरते. तसेच दुधामध्ये कॅल्शियम असतात, ते शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत करतात. जर तुम्ही दोघं एकत्र करून पिले, तर तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होतेच. शिवाय शरीरामध्ये इन्फेक्शन झाले असेल, तर तेही बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच दूध पिल्याने हाडे मजबूत होतात. शिवाय तुमचा रंग ही उजळतो.
तुळशीच्या पानांचा वापर करा :
तुळशीचे पान अँटिव्हायरस, अंतीबॅक्टरियल असतात. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच तर औषधांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तसेच शरीरात कुठलीही व्याधी झाली, तर तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करू शकतात. तुळशीचे पानाचा वापर अगदी पूर्वीच्या काळापासून केला जात आहेत. त्यासाठी तुम्हाला शरीरातील रक्त शुद्ध करायचे असेल, शरीर डिटॉक्स करायचे असेल, तर अशावेळी तुम्ही नियमित दिवसाला दहा ते पंधरा तुळशीचे पाने घ्यायची आहे. त्यांना स्वच्छ धुऊन एक ग्लास पाण्यात खळखळून,अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायचे आहे.
त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर, नियमित रोज, सकाळी उपाशी पोटी प्यायचे आहे, ते पाणी पिल्यावर तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते. शिवाय शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही जर आज सारखे सारखे आजारी पडत असाल, तर त्यावरही फायदा होतो. तुळशीच्या पानांचा काढा पिल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शिवाय तुमच्या हार्ट संबंधित कोणतीही समस्या लवकर उद्भवत नाहीत.
नियमित लिंबूपाणी प्या :
हो, मित्रांनो लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते. तसेच विटामिन सी असते, ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच तुम्हाला शरीरातील रक्त शुद्ध करायचे असेल, शरीरातील घाण बाहेर टाकायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात नियमित लिंबू पाणी प्यायला हवेत. त्यासाठी तुम्हाला सकाळी उठून कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून, त्यामध्ये दोन ते तीन थेंब मधाचे टाकायचे आहे, हे पिल्यानंतर तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होतेच, पण शरीरातील घाण तुमच्या लघवी मार्फत बाहेर टाकण्यास मदत मिळते. तसेच तुमचे वजन वाढले असेल, तर तेही कमी होण्यास मदत मिळते. कारण लिंबू पाणी पिल्याने तुमची पचनाची संबंधित समस्या दूर होतात. तुमच्या शरीरातील घाण पाणी बाहेर टाकले जाते, व वजन कमी होते.
भरपूर प्रमाणात फळे खावे :
तुम्ही तुमच्या आहारात फळांचा उपयोग करावा. तुम्ही नियमित फळ खाल्ल्यावर तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होते. शिवाय विषारी घटक द्रव्ये बाहेर निघते. शिवाय त्या मधील घटक तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त व निरोगी राहतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सफरचंद, अननस, संत्री, मोसंबी, कलिंगड, पपई, किवी, नासपती या सारखे फळ तुम्ही तुमच्या आहारात खायला हवेत. कारण त्यामध्ये जीवनसत्त्वाचे गुणधर्म मोठ्याप्रमाणात असतात.
हिरव्या पालेभाज्या खा :
हिरव्या पालेभाज्या मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, लोह यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर तेही जाण्यास मदत मिळते. शिवाय तुमच्या शरीरातील रक्त हे प्युरिफायर होते. तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रियाही सुरळीत होते व रक्त शुद्ध होते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालक, मेथी, शेपू ,चवळी, तांदुळजा यासारख्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये गुणधर्म, विटामिन्स, खनिजे, मिनरल तुम्हाला मिळतात. शिवाय तुम्ही निरोगी रहातात व तुमच्या चेहऱ्यावरही त्याचा प्रभाव पडतो, तुम्ही सुंदर व निरोगी दिसतात.
गुळ खा :
गुळ हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. गुळ हा उष्ण जरी असला, तरी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास फार प्रभावशाली ठरतो. मध्ये ऑंटीएक्सीडेंट चे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात नियमित गुळ आणि दूध एकत्र करून प्यायला हवेत. गुळ आणि दूध एकत्र करून पिल्यामुळे तुमचे शरीरातील रक्त शुद्ध होतेच, तसेच तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया ही सुरळीत होते.
बीट व गाजर नियमित हवेत :
बीट आणि गाजराचे यांचा सलाड किंवा कोशिंबीर करून तुम्ही नेहमी तुमच्या आहारात घ्यावी. कारण या दोघ गोष्टींमुळे तुमच्या शरीरात रक्त वाढते. हिमोग्लोबिन वाढते. तसेच तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. तसेच यकृत जपण्यास ते फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील अशुद्ध रक्त हे शुद्ध करण्याची क्रिया या दोघांमध्ये असते. तसेच बीट आणि गाजर नियमित आहारात खाल्ल्यामुळे त्याचा सौंदर्यावर ही प्रभाव पडतो. तुमच्या चेहरा उजळण्यासाठी मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरील डाग असेल, तर तेही जाण्यास मदत मिळतात.
चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध असल्यास, तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे उपाय घरगुती उपाय करू शकतात, तेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करण्यापूर्वी एकदा तुम्ही डॉक्टरांकडून खात्री करू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !