लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी उपाय

0
1585
लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी उपाय
लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी उपाय

नमस्कार, मित्रांनो हल्ली आपण अनेक पालकांच्या तक्रारी बघत असतो, माझा मुलगा जेवत नाही, खात नाही, त्याची तब्येत भरत नाही.  तो जे खातो ते त्याच्या अंगी लागत नाही, अशा तक्रारी घेऊन पालक डॉक्टरांकडे जातात. तसेच लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी डॉक्टरांकडून ते टॉनिकच्या औषधी आणतात. ते घेऊनही त्यांना फरक थोडाफार फरक पडतो. पण पण तरीही त्यांच्या मुलांचे वजन वाढत नाही. पण खरे सांगू, जर तुम्ही तुमच्या मुलांना घरचा सात्विक, योग्य आहार दिला, तर मुलांचे वजनही वाढेल, आणि तब्येतही ठणठणीत होईल. पण हल्लीची मुले, तर बाहेरच खायला खूप मागतात. जसे की कचोरी, समोसा, वडापाव, चाईनीज, पिझ्झा, बाहेरचे हे पदार्थ आवडीने खातात. पण घरातले पदार्थ खायला ते नाक मुरडतात. अशावेळी तुम्ही त्यांना योग्य पद्धतीचा आहार द्यायला हवा. परत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवून द्यायला हव्यात, म्हणजे जेणेकरून त्या वस्तूंकडे त्यांना आकर्षण वाटेल, आणि ते जेवण करतील.

तुम्ही त्यांना रोजच्या रोज खाण्याची वेळेचे कॅलेंडर तयार करावे, ते नियमानुसार व्यवस्थित खातील, आणि त्यांची तब्येत ठणठणीत व उत्कृष्ट होतील. मग ते असा कोणता आहार आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी, शिवाय त्यांना तंदुरुस्त बनवण्यासाठी, कोणते उपाय तुम्ही करू शकतात? ते आज आपण जाणून घेऊयात ! 

केळ खायला द्या :

लहान मुलांची वजन वाढत नसेल, अशा वेळी तुम्ही जर मुलांना केळ त्यांच्या आहारात दिले, तर तुम्हाला त्याने नक्की फायदा होईल. कारण केळ्यामध्ये विटामिन बी 6 असते. तसेच केळी खाल्ल्याने तुमच्या मुलांचे वजन वाढण्यास मदत मिळते. तुम्ही दिवसातून दोन केळी लहान मुलांना खायला देऊ शकतात. तसेच तुम्ही मुलांना आकर्षक वाटावे, म्हणून बनाना  मिल्कशेक मुलांना देऊ शकतात. व ते सजवून मुलांना द्यावे, त्यामुळे मुलांना आकर्षक वाटेल आणि त्यांना खायची इच्छा होईल. 

वाचा  ओठ काळे का पडतात ?

मिल्क शेक कसा तयार करावा :-

तर तुम्हाला दोन तीन केळी घेऊन, त्यांना मॅश करून, ते मिक्सर मध्ये टाकून, त्यात साखर व दूध एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, काजू  , बदाम, पिस्ता, यांचे मिश्रण टाकून, तुम्ही एका ग्लास मध्ये सर्व करावे, आणि मुलांना आकर्षक वाटावे, यासाठी तुम्ही चॉकलेटचे सिरप त्यावर  टाकु शकतात. आणि ते मुलांना दे द्यावे, त्यामुळे तुमच्या लहान मुलाचे वजन वाढवण्यासाठी मदत होईल. 

रोज सकाळी उठल्यावर बदाम खायला द्या :

जर तुम्ही मुलांना सकाळी उठल्यावर रोजच्यारोज तीन ते चार बदाम खायला दिले, तर तुमच्या मुलांचे आरोग्य उत्तम राहील, कारण बदाम मध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स असतात. जसे की विटामिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड, मुबलक प्रमाणात असतात. जर तुमच्या मुलांना तुम्ही सकाळी रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खायला दिले, तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. शिवाय त्यांची तब्येतही सुधारते. 

 मुलांना दुग्धजन्य पदार्थ खायला द्या :

अनेक पालक त्यांच्या मुलांच्या वजन वाढत नाही, या गोष्टीवरून फार त्रस्त असतात. अशा वेळी त्यांनी त्यांच्या मुलांना पिण्यासाठी दूध द्यायला हवे, पण हल्लीची मुले दुध प्यायला नखरे करतात, त्यासाठी तुम्ही त्यांना दूध हे मिल्कशेक प्रमाणे किंवा दूध मध्ये तुम्ही एप्पल, चिकू, बनाना यासारखे पदार्थ मिक्स करून तुम्ही देऊ शकतात. त्याने मुलांना त्या दुधात चवही येईल, आणि त्याची तब्येत कशी सुधारेल. वजन हे वाढेल, शिवाय मुलांनी दुग्धजन्य पदार्थ खाल्ले, तर त्याचे वजन हे झटपट वाढते. मग ते कोणतेही जसे की तूप, बटर, लोणी, दही यासारखे पदार्थ मुलांच्या आहारात असले. तर त्यांचे वजन लवकरात लवकर वाढते. 

बटाट्याचे पदार्थ खायला द्या :

जर तुम्ही लहान मुलांना बटाट्याचे पदार्थ खायला दिले, तर त्यांचे वजन वाढू शकते. त्यासाठी तुम्ही बटाटे उकडून त्यावर मीठ टाकून खायला दिले, तरी चांगले लागते. लहान मुलांना ते आवडेल, तसेच तुम्ही मुलांना बटाट्याचा शिरा, बटाट्याची खीर, बटाट्याचे पराठे, बटाट्याचे भजी करून देऊ शकतात. त्याने मुलांचे वजन वाढण्यास मदत मिळते. 

वाचा  कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

गावठी तुपाचा वापर करा :

जर तुमच्या लहान मुलांचे वजन वाढत नसेल, अशा वेळी जर तुम्ही त्यांना त्यांच्या आहारात गावठी तुपाचा वापर केला, तर त्यांची वजन वाढण्यास मदत मिळते. शिवाय त्यांची पचनसंस्था ही सुरळीत राहते. काही काही वेळा काही लहान मुलांना शौचास जाण्याचा त्रास होतो, शिवाय पोटात दुखते, अशा वेळी जर तुम्ही त्यांना तुपाचा आहार दिला, त्यांना शौचास साफ होऊन, त्यांची पचनसंस्था सुरळीत राहते. अशा वेळी तुम्ही त्यांना गावठी तुपाचा शिरा, बेदाणे टाकून,  खायला द्या. तसेच तुम्ही शुद्ध गावठी तूप हे त्यांना चहा मध्ये किंवा दुधामध्ये टाकून प्यायला द्यावे, शिवाय तुम्ही त्यांना दाळभात वर गावठीचा वापर करावा. त्यांना ते खाण्यास रुचकर व त्यांचे वजन वाढण्यास मदत मिळेल. 

उकडलेली अंडी खायला द्या :

अंड्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तसेच अंड्यामध्ये विटामिन्स, फॅट्स असतात, ते मुलांचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते, जर तुम्ही मुलांना रोजच्या रोज उकडलेली अंडी खायला दिले, तर त्यांचे वजन वाढते. शिवाय ते हेल्थी होतात. तसेच तुम्ही मुलांना अंड्याची भुर्जी, अंड्याचे आमलेट, ब्रेड अंडी, अंडाकरी,  खायला दिले, त्यांचे वजन झपाट्याने वाढते.

पांढऱ्या वस्तूंचा आहार द्यावे :

तुम्ही तुमच्या मुलांना पांढऱ्या वस्तूंचा आहार दिला, तर त्यांची वजन झपाट्याने वाढते. मग ते कोणते? तर जसे की दूध, तूप, साखर, मैदा, बटाटे, रवा, भात, रताळू यासारख्या पदार्थांचा वापर करून, तुम्ही त्यांना निरनिराळे डिशेश बनवून खायला द्या. त्यांचे वजन झपाट्याने वाढेल.

हिरव्या पालेभाज्या खायला द्या :

तुम्ही मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला द्या.  कारण हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, मुलांचे रक्त भिसरण सुरळीत होते, हिरव्या पालेभाज्यांनी रक्त वाढते. डोळे चांगले राहतात. तुमच्या मुलांचे आरोग्य सुदृढ राहील.  पालेभाज्या खायला, हल्ली मूलं नाक मुरडतात. अश्यावेळी जर तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे निरनिराळे बनवून, मुलांना खायला दिलेत, तर त्यांना विटामिन, प्रथिने, झिंक, प्रोटीन, आयोडीन, लोह, कॅल्शियम भरभरून मिळतील. तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, मुलांचे वजन देखील वाढेल. तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे जसे की पालक ची पुरी, पालकची भाजी, मेथीचे पराठे, तसेच घावणे, यासारखे डिश करून मुलांना खायला द्या.

वाचा  जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी किती धोकादायक असते?

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला तुमच्या लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी, काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत.  हे उपाय करूनही जर तुमचे मुलं खात नसेल, तर तुम्ही एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे दाखवून उपचार करून घ्यावेत. तसेच आम्ही सांगितलेले उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावे.

 

                           धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here