डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते ?

0
627
डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते
डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते

डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते ?

नमस्कार मित्रांनो. हल्ली प्रत्येकाचे कामामध्ये गुंतल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. बऱ्याच लोकांमध्ये फक्त मोजके जणी आपल्या आरोग्याकडे व्यवस्थितरीत्या लक्ष देत असतात. आणि बरेच लोक हे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. मित्रांनो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीराचे अवयव हे फार अमूल्य आहेत. बऱ्याच लोकांचे काम हे संगणका शिवाय होऊ शकत नाही. हल्ली ऑनलाइन काम झाले असल्यामुळे कम्प्युटर मोबाइल यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. परंतु मित्रांनो, याचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होत असतो, डोळ्यांसाठी जास्त वेळ स्क्रीन वापरणे योग्य नाही. हल्ली तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण मोबाईलचा वापर करताना दिसून येत आहे. तसेच अनेक जरा टीव्हीसमोर बसून जेवायची सवय असते. जेवताना टीव्ही बघितल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही असे झालेले आहे. तर बरेच जण हे मोबाईल बघण्या मध्ये तासन तास घालवतात.

परंतु या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होत असतो. मित्रांना डोळे हे फार मौल्यवान आहेत. डोळ्यांमुळे आपल्याला अनेक कामे ही सहजरित्या करता येतात तसेच ज्याद्वारे आपण रंगीबिरंगी जग बघू शकतो त्या डोळ्यांन बाबत आपण जागृत का नसावे? आपले डोळे चांगले राहावेत यासाठी आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे ज्या गोष्टींमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होत असेल त्या गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजेत. मित्रानो कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल फोन यांसारखे उपकरणे यांमधून जास्तीचा प्रकाश बाहेर पडत असतो, आणि  ह्या प्रकाशाचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत असतो.

म्हणून याचा वापर आपण जेवढा कमीत कमी करू तेवढे आपल्यासाठी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरेल. कारण बऱ्याच जणांना यामुळे चष्मा लागत असतो. तसेच चष्म्याचा नंबर देखील वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो,यासाठी तुम्ही डोळ्यांचा व्यायाम करणे गरजेचे ठरते. तर मित्रांनो आज आपण डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग डोळ्यांसाठी उपयुक्त व्यायाम कोणते करू शकतो याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  तुळशीची पाने खाण्याचे फायदे

डोळ्यांसाठी कोणते उपयुक्त व्यायाम करता येतील ?

      मित्रांनो, शरीरातील इतर अवयवांत पैकी  डोळे हे अवयव खूप किमती व मौल्यवान असे अवयव आहेत. डोळ्यां शिवाय आपण कुठलेही काम व्यवस्थित रित्या करूच शकत नाही. या  डोळ्यामुळेच तर आपण सुंदर आणि रंगीबिरंगी जग बघू शकतो. बऱ्याच लोकांचे काम हे तासन तास संगणक, कंप्यूटर,मोबाईल शिवाय होत नसतात. परिणामी त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तर बऱ्याच जणांना या कारणामुळे चष्मा देखील लागलेला असतो.

अगदी लहान मुले देखील मोबाईलचा जास्त वापर करताना दिसत आहेत येत आहे. त्यामुळे देखील त्यांच्या लहान वयात असताना चष्मा लागण्याची शक्यता असते. आपले डोळे चांगले राहावेत यासाठी आपण डोळ्यांसाठी एक्सरसाईज केली पाहिजे नियमित पणे डोळ्यांसाठी व्यायाम करणे आवश्यक ठरते. डोळ्यांचा व्यायाम केल्यामुळे ज्यांना चष्मा लागलेला असेल, तर त्याचा चष्मा निघून जाण्यास देखील मदत होऊ शकते. तर मित्रांनो, डोळ्यांसाठी आपण कोणते व्यायाम करू शकतो हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

आईज रोटेशन अशा प्रकारे व्यायाम करून बघा :

      मित्रांनो, तुम्ही जर डोळ्यांचा व्यायाम हा नियमितपणे करत गेलात तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. आईज रोटेशन हा व्यायाम करण्याआधी सर्व प्रथम तुम्ही डोळे स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावेत. ज्यांना चष्मा लागला असेल त्यांनी चष्मा हा बाजूला काढून ठेवावा. व्यायाम सुरू करण्यासाठी सर्वप्रथम व्यवस्थित बसून घ्या. ज्याना बसायला त्रास होत असेल त्यांनी खुर्चीवर बसले तरी चालेल. सर्वप्रथम डोळे हळुवारपणे बंद करा. आता डोळे हळुवारपणे खोला आता हळूवारपणे डोळे खाली करा. खालच्या पोझिशन मधून डोळे इन हेल करत आयब्रो च्या  वरती बघा. आता हळुवारपणे आयब्रो च्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डोळे खाली करा. नंतर हळुवारपणे वरती बघा. आता खाली बघा. पुन्हा वर बघा. हळुवारपणे पुन्हा खाली बघा.

अशाप्रकारे हा व्यायाम तुम्ही दहा ते वीस मिनिटे करावा. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्याचे मसल्स हे ऍक्टिव्ह  होतात. हा व्यायाम करताना जर डोळ्यातून पाणी येत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कारण, हे क्लिंझिंग प्रोसेस असते. त्यामुळे आपले डोळे देखील क्लीन होतात. म्हणून डोळ्यातून  पाणी येते. डोळ्यातून पाणी येते म्हणजे आपण केलेला व्यायाम हा काम करतोय असे समजले जाते.

दुसरा व्यायाम आपण बघणार आहे तो म्हणजे पॉईंट पोज :

 मित्रांनो, हा व्यायाम कसा करतात हे आपण जाणून घेऊया. पॉईंट पोज व्यायाम करताना सर्वप्रथम डोळे बंद करावेत. आणि एका हाताच्या फिंगर आपल्या भुवया मध्ये ठेवावी. यानंतर डोळे उघडून घ्यावे आणि आता हाताचे फिंगर  मध्ये ठेवलेले आहे ते फिंगर हळुवारपणे वरच्या दिशेने सरळ रेषेत न्यावे. आणि त्या फिंगर च्या पॉईंट कडे वरच्या टोकाकडे एकसारखे नजर देत बघावे. तुमचे कॉन्सन्ट्रेशन फिंगर च्या वरच्या टोकाकडे असायला हवे.

वाचा  उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी घरगुती उपाय

त्यानंतर जो हात सरळ रेषेत वर नेलेला आहे तो हात हळुवारपणे पुन्हा डोळ्यांच्या भुवयामध्ये आणावे आणि अशा वेळेस डोळे बंद करावीत. अशी क्रिया तुम्ही सतत दहा वेळा तरी करावी. सुरुवातीला पाच मिनिटे करा व हळूहळू पाच मिनिटे वाढवावीत. हा व्यायाम केल्यामुळे तुमच्या डोळ्याचे मसल्स ऍक्टिव्ह होत असतात. त्यामुळे हा व्यायाम करने तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल.

तिसरा व्यायाम आपण बघणार आहोत तो म्हणजेच ब्लींक पोज :

मित्रांनो, हा व्यायाम कसा करतात हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात. ब्लिंक पोज हा व्यायाम करताना सर्वप्रथम डोळे बंद करावेत नंतर हळुवारपणे ओपन करावीत. आता अप आणि डाऊन, अप आणि डाऊन ही क्रिया साधारण दहा वेळा तरी करावी. अशी क्रिया दहा वेळा केल्यानंतर डोळे बंद करावे आणि ओपन करावे. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. बरेच जण हे लॅपटॉप समोर, कम्प्युटर समोर बसून काम करावे लागत असते. आणि अशावेळी जर डोळ्यांमधून पाणी असेल तर तुम्ही एक दोन मिनिट ब्रेक घेऊन हा व्यायाम करू शकतात. हे ऑफिसमध्ये बसल्या – बसल्या देखील हा व्यायाम तुम्हाला करता येऊ शकतो. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम  मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्यायाम नक्कीच करून बघा.

चौथा व्यायाम आपण बघणार आहोत तो म्हणजेच शिफ्ट पोज :

     मित्रांनो शिफ्ट पोज हा व्यायाम कसा करतात हे आपण आता जाणून घेऊया. सर्वप्रथम एका हाताचा अंगठा हा डोळ्यांच्या अगदी समोर सरळ रेषेत वरती न्यायचा. आणि त्या अंगठ्याकडे एक सारखे बघत राहायचे नंतर हा अंगठा इन हेल करत नाकाजवळ आणायचा आणि त्याच पॉइंटला बघत बसायचे जेव्हा नाकाजवळ तो असेल तेव्हा. पुन्हा अंगठा डोळ्यांच्या सरळ दिशेने हळुवारपणे न्यावा आणि त्या दिशेने डोळ्याची नजर असावी आणि पुन्हा परत नाकाजवळ आणावा म्हणजे सतत अशी ही क्रिया तुम्ही दहा वेळा करायची आहे. यामुळे देखील तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे.

पाचव्या आपण बघणार आहोत तो म्हणजे पालमिंग :

  मित्रांनो पालमिंग हा व्यायाम कसा करायचा हे आपण आता जाणून घेऊयात. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम दोघे हातांचे तळवे हे एकमेकांना घासायचेत. म्हणजेच पूर्ण हिट जनरेट होईपर्यंत म्हणजे हात गरम होण्यापर्यंत ते एकमेकांना घासायचे आहेत. हाताचे तळवे जोरात घासायचीत आणि हे तळवे गरम झाल्यावर डोळे बंद करून डोळ्यांवर दोघ हात ठेवायचेत. डोळ्यांना जास्त दाब न देता फक्त हळुवारपणे ठेवायचे आहेत. आणि रिलॅक्स पोझिशन मध्ये यायचे आहे. अशी क्रिया दहा पाच मिनिटे तरी करावी. त्याने बऱ्याच प्रमाणात हा डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. तर मित्रांनो नक्की हा व्यायाम तुम्ही करून बघू शकतात.

वाचा  दीर्घ श्वास घेण्याचे फायदे

           तसेच वरील सर्व व्यायाम केल्याने डोळ्यांना आराम मिळण्यास फायदा तर होईलच शिवाय तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा. तसेच विटामिन सी आणि विटामिन ई युक्त पदार्थांचा समावेश नक्कीच आहारात करावा. तसेच डोळ्यांसाठी पपई खाणे देखील फार उपयुक्त ठरत असते. म्हणून पपईचे सेवन देखील नक्की करावे.

डोळे चांगले राहावेत म्हणून काय काळजी घ्यावी ?

     मित्रांनो डोळे हा शरीराचा अगदी खूपच नाजूक अवयव आहे. त्यामुळे आपण डोळ्यांची जेवढी जास्त जास्त काळजी घ्यावी तेवढी आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे देखील जाणून घेणे आपला खूप गरजेचे आहे.

  • डोळे चांगले राहावेत म्हणून सतत मोबाईल वापरणे टाळावे बऱ्याच लोकांना मोगली समर्थ तासन-तास बसण्याची सवय असते त्यामुळे त्यातला जास्तीचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर असतो त्यामुळे परिणामी चष्मा लागण्याची देखील संभावना असते.
  • अगदी लहान मुलंदेखील मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. टीव्ही मोबाइल पासुन मुलांना जितक्या जास्तीत जास्त दूर ठेवता येईल तितक्या जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • नियमित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करावा.
  • विटामिन सी आणि विटामिन के युक्त पोषक तत्वांचा समावेश नियमित आहारात करावा.
  • गाजर,पपई यांचा समावेश देखील रोजच्या आहारात करावा यामुळे डोळे चांगले राहण्यास देखील मदत होत असते.
  • डोळ्यात जळजळ होत असेल अथवा डोळ्यातून पाणी येत असेल तर डोळे हे नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावेत.
  • डोळ्यांत संदर्भात जास्तीचा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा.
  • दिवसभरातून डोळ्यांना आराम मिळावा यासाठी विश्रांती घेणे आवश्‍यक ठरते. म्हणून पुरेपूर झोप घ्यावी.

       मित्रांनो, वरील प्रमाणे आपण डोळ्यांसाठी कोणते उपयुक्त व्यायाम करता येतील?  याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला  डोळ्या संदर्भात अधिक त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार तुम्ही घेऊ शकतात. वरील प्रमाणे आम्ही सांगितले माहितीही तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

      धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here