जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

0
3046
जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय
जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

 

नमस्कार, धावपळीच्या जीवनात आपण आपला आहार व्यवस्थित घेत नाही. आपण पोटापुरते तात्पुरता काही थोडासा आहार घेतो, आपण आपले जेवण व्यवस्थित करत नाही. त्यामुळे आपल्याला भूक न लागणे, तसेच जेवण झाल्यावर पोटात दुखणे यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. आधी आपण लहान मुलांना सांगायचे, की जेवण व्यवस्थित करत जा. पण आता हल्ली आपण आपली स्वतःची काळजी घेत नाही, आपण जेवण व्यवस्थित करीत नाही. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आरोग्यावर होतो. आपण आपली काळजी घ्यायला हवी. जेवण नेहमी व्यवस्थित करायला हवे, त्यामुळे आपल्याला अनेक आजार उद्भवण्याची पासून आपण रोखू शकतो. आज आपण बघणार आहोत की, जेवण झाल्यावर पोटात दुखणे म्हणजे नेमके काय? चला तर मग जाणून घेऊयात ! 

पोटात का दुखते ?

पोटात दुखण्याची अनेक कारणे आहेत, जसे की अति व्यायाम, जड वस्तू उचलून पोटात गाठ पडून पोट दुखू शकते.  तसेच महिलांना मासिक धर्मात पोटात दुखते. तसेच किडनीला / लिव्हरला सूज आली की, पोटात दुखू शकते. खोकला असेल, तर खोकून-खोकून ही पोटात दुखते.  तर कोणाची अपेन्डिस उकळल्यावर ही पोटात दुखते, तर कोणाला किडनी स्टोन झाल्यानेही पोटात दुखते. ज्यांना गॅसेस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशांचे ही पोट दुखते. अशी काही कारणे, आम्ही तुम्हाला सांगितले आहे, आज आपण बघूया, जेवण झाल्यावर पोटात दुखणे याचे कारणे उपाय  ? 

जेवणानंतर पोटात का दुखते? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही पोट का दुखते, ते सांगितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत, की जेवण झाल्यावर पोटात का दुखते?  ते आज आपण ते बघूयात ! 

  • हल्ली आपण घाईघाईत जेवण करतो, सर्व पदार्थ बारीक न चावता खातो. अशामुळे आपल्याला ऍसिडिटी यासारख्या समस्या होऊ शकतात, त्यामुळे आपले पोटात दुखू शकते.  
  • आपण जेवणाची वेळ बदलली, तरीही पोटात दुखू शकते. 
  •  पोटात गॅस्ट्रिक ऍसिड वाढल्या ने, अशावेळी जेवणानंतर पोटात दुखते. 
  •  आपण दोन जेवणाच्या वेळेत अंतर न ठेवता, दिवसभर सारखेच खात राहिले, तरीही पोटात पचन संस्था बिघडून, पोटात   दुखण्याच्या, समस्या आपल्याला बघावयास मिळतात. 
  • पोटात उष्णता वाढल्याने, ही जेवणानंतर पोटात दुखते. 
  • जर आपण एखादी तर जड वस्तू उचलली, तर जेवण झाल्यावर ही पोटात दुखू शकते. 
  • तसेच तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने, ही जेवण झाल्यावर पोटात दुखते. 
  • शिळे पदार्थ खाल्ल्याने, ही पोटात दुखू शकते. 
  • उग्र पदार्थ खाल्ल्याने, ही पोटात दुखते. 
  • तेलकट, बटाटे युक्त पदार्थ खाल्ल्याने ही, जेवण झाल्यावर पोटात दुखते. 
  • जास्तीची जेवण केल्याने, ही जेवण झाल्यावर पोटात दुखते. 
  • जेवताना सारखे-सारखे पाणी पिल्याने, ही जेवण झाल्यावर पोटात दुखते. 
वाचा  स्वप्नात सत्यनारायण पूजा दिसणे शुभ की अशुभ

जेवण झाल्यावर पोटात दुखत असेल तर कोणते घरगुती उपचार करावेत ? 

आज आपण बघितले आहे, की जेवण झाल्यावर पोटात का दुखते. तर आपण जेवण झाल्यावर पोटात दुखू नये, यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो, ते बघूयात ! 

जिऱ्याचा वापर करून बघा :

हो, जिरे हे तुमच्या पचन संस्थेशी निगडित कोणतीही समस्या असेल, त्यावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात जिरे वापरावे लागेल. त्यासाठी तुम्ही जिरे हे तव्यावर भाजून, त्याची बारीक पूड करून, एका डब्यात ठेवावी. ज्यावेळी तुम्ही जेवायला बसतात, त्यावेळी जेवण झाल्यावर तुम्ही एक चमचा जिरे पावडर, कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे, याने तुमच्या पचन संस्थेशी निगडित, कोणताही आजार असेल, तर जिरे पावडर पिल्याने कमी होईल. खरंच अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा. 

ताक पिऊन बघा :

ताक पिल्याने पचनसंस्थेचे निगडीत कोणतीही समस्या असेल, तर ते दूर करण्यास मदत मिळते.  तुमचे जेवण झाल्या नंतर जर तुम्ही ताक पिले, तर तुमच्या पोटात दुखणे, हे कमी होईल. शिवाय नेहमी जेवणानंतर पोटात दुखण्याचे, समस्याही हळू दूर होतील. त्यासाठी तुम्ही रोज जेवणानंतर, ताक त्यात+ काळे मीठ +जीरा पावडर +पुदिना पावडर यांचे मिश्रण एकजीव करून  तुम्ही जेवणानंतर प्यायले, तर तुमच्या पोटात दुखण्याचे समस्या हळूहळू कमी होतील. 

लिंबू पाणी प्या :

लिंबू मध्ये विटामिन सी असते. तसेच लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे, तुमच्या आम्लपित्त च्या समस्या याने दूर होतात.  जेवणानंतर तुमच्या पोटात दुखते, अशावेळी जर तुम्ही लिंबू आणि त्यात खाण्याचा सोडा टाकून ते पाणी पिल्याने, तुमच्या पोटात दुखण्याचे समस्येवर आराम मिळतो. शिवाय जर तुम्ही तुमच्या आहारात लिंबू चा वापर केला, तर तुमच्या पोटात दुखण्याच्या समस्या दूर होतील. 

ओवा काळे मीठ खा :

ओवा आणि काळे मीठ एकत्र करून ठेवल्यास, जेवण झाल्यावर तुम्ही खाऊ शकतात. ओवा+ काळे मीठ खाल्ल्यास, तुमच्या पोटातील गॅसेस, ऍसिडिटी, पित्त यासारख्या समस्या दूर होतात. शिवाय जेवण झाल्यानंतर तुम्ही ओवा आणि काळे मीठ एकत्र करून खाल्ले, तर तुमची पोट दुखीची, पोट फुगी ची शिवाय गॅस ची समस्या ही होणार नाही. त्यासाठी तुम्ही ओवा आणि त्यावर काळे मीठ पाण्यात एकत्र करून उन्हात वाळून घ्या, नंतर गॅसवर भाजून ते एका डब्यात भरून ठेवा. तुम्ही हे रेगुलर ही वापरू शकता. 

वाचा  तोंडली खाण्याचे फायदे

दही खा :

ज्यावेळी तुम्हाला जेवणानंतर पोटात दुखण्याची समस्या होत होते, पोटात आग होत असेल, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात दही खाऊ शकतात. दही पोटाला थंडावा देते. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, अशा वेळी यांनी त्यांच्या जेवणात दही आवर्जून घ्यावी. 

केळ खा :

आता तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की केळ कसा फायदेशीर ठरेल. तर खरच !  तुम्ही तुमच्या आहारात नेहमी केळ खा. कारण केळ हा पोटातील मलरोध बाहेर काढण्यास मदत करतो. केळ हा तुमच्या मोठ्या व छोट्या आतड्यातील,  साचलेला मळ बाहेर काढण्यास मदत करतो. शिवाय जेव्हा तुम्ही केळं खाल, त्यावेळी त्यावर थोडे कोमट पाणी प्यावे, म्हणजे तुमची पोटातील सगळी घाण बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. केळ खाल्ल्याने तुमच्या पोटातील स्नायूंची हालचाल व अंकुचन व्यवस्थित प्रकारे होते, आणि केळ खाल्याने पोट नेहमी साफ राहते, आणि जेवणानंतर तुम्हाला पोट दुखीची समस्याही होत नाही. 

गुळ खा :

तुम्ही म्हणाल की, गुळ हा उष्ण असतो, आणि तो पोटासाठी कसा फायदेशीर ठरेल. तर  खरंच गुळ हा उष्ण जरी असला, तरी तो नैसर्गिक गोडवा आहे. तो तुमच्या पोटातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करतो. गूळ हा पाचक आहे. तुमचे अन्न पचनाच्या समस्या गुळ खाल्ल्याने कमी होतात. जर तुमच्या छातीत जळजळ, पोटात आग होत असेल, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात नेहमी गुळ खावा. आणि गुळ खाल्यावर त्यावर थोडे पाणी प्यावे. 

बडीशोप खा :

बडीशेप खाल्ल्याने, तुमच्या पचन संस्थेशी निगडित असलेल्या समस्या दूर होतात. तसेच गॅस्ट्रो, अपचन, पोटफुगी, सारख्या समस्यांवरही तुम्हाला आराम मिळतो. त्यासाठी तुम्ही बडिशोप एका ग्लासमध्ये, रात्री भिजवून ठेवायची, आणि सकाळी उठल्यावर  पाणी पिताना बडीशोप कच्ची खाऊन द्यायची, तुमच्या पचनाची निगडीत कोणतीही समस्या असेल, तर ती बाहेर निघून जाण्यास मदत मिळते, करून बघा, अगदी साधा सोपा उपाय आहे. 

वाचा  खोबरेल तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

चला, तर आज आम्ही तुम्हाला जेवण झाल्यावर पोटात का दुखते, तसेच पोटात अजून कोणत्या कारणामुळे दुखते, तेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय दिलेले आहेत. आणि आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही, तुम्हाला फरक पडत नसेल, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट मध्ये जरूर कळवावे. 

 

                        धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here