दाढ काढताना घ्यावयाची काळजी

0
2495
दाढ काढताना घ्यावयाची काळजी
दाढ काढताना घ्यावयाची काळजी

 

नमस्कार, आपल्या शरीराचा मुख्य भाग म्हणजे आपले तोंड आणि आपल्या तोंडातील मुख्य भाग म्हणजे आपले दात, असतात याच दातांमुळे आपल्या पोटात मस्त-मस्त चमचमीत पदार्थ जातात. आणि त्यावर आपण जगतो. त्याच्यासाठी आपण दात सर्व श्रेष्ठ  मानतो. आपले दात असतील, तरच आपण जेवण करतो, आणि जगतो. जर दात, दाढीला काही दुखापत झाली, तर आपल्याला  अशक्तपणा, कमजोरी, थकवा यासारख्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात. त्यासाठी आपण आपल्या दातांची योग्य ती काळजी घ्यायला हवी, आणि समजा दाताला व दाढी ला कीड लागली, तर त्यावरही उपचार आहेत. दात दुखत असतील किंवा दाढ काढताना  त्यावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी ?  ते आपण बघायला हवे, चला तर मग बघुयात ! 

दाढ कधी व केव्हा काढायची ते बघूया !

ज्या वेळी दाढीला कीड लागते, त्यातून रक्त येते अशा वेळी आपल्या दाढीत दुखत असेल, दाढी चे तुकडे पडले असतील, व त्यावर रूट कॅनल ही पर्याय नसेल, अशा वेळी डॉक्टर आपल्याला सांगतात की, तुम्हाला दाड काढावी लागेल. दाढ काढणे हा शेवटचा पर्याय असतो. पण दाढ काढताना याबाबत भरपूर गैरसमज आपल्या समाजात अजूनही आहेत, काही जण म्हणतात, की दाढ लवकर काढली की, आपण लवकर म्हातारे होतो, तर काही जण म्हणतात की, दाढ काढल्याने आपल्याला डोकेदुखीचा त्रास वाढतो. तर काहींचे म्हणण्यानुसार दाढ लवकर काढली, तर चश्मा लवकर लागतो. पण या गोष्टींचे आपल्या दाढी वर काहीच परिणाम होत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. दाढ ही वयाच्या कोणत्याही वर्षी काढता येऊ शकते. जर तुमच्या दाढीला लहानपणीच कीड लागली असेल, आणि त्यावर काहीच पर्याय नसेल, अशा वेळी तुमची दाढ काढली जाऊ शकते, आता आपण जाणून घेऊया, की दाढ काढताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ? चला तर मग बघुयात ! 

वाचा  छातीत धडधडणे घरगुती उपाय

दाढ काढल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यावी ?

दाढ काढल्यावर आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी, ती कोणती? चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • दाढ काढल्यानंतर दोन ते तीन तासानंतर हलका आहार घ्यायला सुरुवात करावी. 
  • तसेच डॉक्टर जे औषध देतात, ते योग्य वेळेवर घ्यायला हवीत. 
  • आराम करायला हवा. 
  • दाढ काढून झाल्यानंतर जास्तीची बोलणे टाळावे. 
  • दाढ काढल्यावर पातळ हलका आहार घ्यावा. 
  • अशावेळी  तुम्ही फळांचा ज्यूस ही घेऊ शकतात. 
  • कडक पदार्थ खाणे टाळावे. 
  • दाढ काढताना  दोन ते तीन दिवस वेदनाशामक औषधे घ्यायला हवी. 
  • दाढ काढल्यानंतर त्या जागेतून रक्त व लाळ येते, ती  बाहेर थुंकावी. 
  • आइस्क्रीम व थंड पदार्थ खावे, जेणेकरून तुमच्या त्या जखमा लवकर भरण्यास मदत मिळतात. 
  • दाढ काढली कि, तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. 

दाढ काढल्यानंतर कोणता घरगुती आहार घेऊ शकतो, ते बघुयात ! 

 

पातळ डाळ खिचडी खा :

हो, दाढ काढल्यानंतर तुम्ही पातळ डाळ खिचडी खाऊ शकतात. त्यासाठी भात तुम्हाला एकदम मऊ शिजवायचा आहे, आणि त्याची मिक्सर  पातळ पेज करून, तुम्ही खाऊ शकतात. तुम्हाला गिळायला त्रास होणार नाही, आणि तुम्हाला अशक्तपणा येणार नाही. 

उपमा खा :

दाढ काढल्यानंतर, तुम्ही रव्याचा उपमा खाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही रवा  तेलाचा किंवा साजूक तुपात भाजून, त्यात जिरे पावडर, नमक आणि हळद यांचे मिश्रण टाकून, पातळ-पातळ असा मऊ शिजवून खाऊ शकतात. 

फळांचा ज्यूस प्या :

दाढ काढल्यानंतर तुम्ही  तीन ते चार तासानंतर खाऊ शकतात. अशा वेळी जर तुम्हाला खाण्याची इच्छा नसेल, त्यावेळी तुम्ही एप्पल, बनाना, स्ट्रॉबेरी, मोसंबी यांचा ज्यूस घेऊ शकतात. 

दूध हळद प्या :

दुधा मध्ये कॅल्शियम असते, आणि हळद मध्ये अंतीबॅक्टरियल गुणधर्म असतात. ज्यावेळी तुमची दाढ काढली जाते, अशा वेळी जर तुम्ही दुधात हळद टाकून पिले, तर तुमच्या दातांमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म बाहेर निघून, तुम्हाला पोषक आहार मिळेल. 

वाचा  जेवण करताना घाम येणे

बिस्किटांची पेज करा :

हो अगदी साधे सोप्पे,  जसे लहान बाळाला बिस्किट पेस्ट करतो, तशी तुम्ही दाढ काढल्यावर तुम्ही बिस्किटांची पेज खाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही दूध गरम करून, त्यात पार्लेजी, मारीगोल्ड किंवा तुम्हाला जर नमकीन आवडत असेल, तर हे बिस्किट दुधामध्ये दहा मिनिटे भिजवून, त्याची पेज तुम्ही पिऊ शकतात. 

आईस्क्रीम खा :

हो, आईस्क्रीम कोणाला आवडत नाही. आईस्क्रीमचा सगळ्यांनाच आवडते. ज्या वेळी दाढ काढली जाते, अशा वेळी आईस्क्रीम खायची, तर मज्जाच न्यारी. कारण आईस्क्रीम थंड असते आणि अशावेळी तुम्ही आईस्क्रीम खाल्ली, तर तुमच्या दाढीचे दुखणे व जखमा लवकर भरून निघण्यास मदत मिळते. थंडावा आल्यामुळे लवकर तुमचा दात चांगले होण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही आता हल्ली मार्केटमध्ये व्हॅनिला, स्ट्रॉबेरी यासारख्या आईस्क्रीम खाऊ शकतात. फक्त आईस्क्रीम खाताना, तुम्ही कडक बटरस्कॉच, वगैरे चॉकलेटचे पीस असलेल्या, यासारखे आइस्क्रीम खाऊ नका. कारण ते दाड काढलेल्या ठिकाणी अडकून, अजून दुखण्यास कारणीभूत ठरू शकतात. ही काळजी घ्यावी. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला दाढ केव्हा व कधी काढायची ? तसेच दाढ काढल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्यावी. आणि कोणता आहार घ्यावा. हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                         धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here