संडास मधून रक्त पडणे याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय

0
11339
संडास मधून रक्त पडणे याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय
संडास मधून रक्त पडणे याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय

  नमस्कार, मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या असतात. या धावपळीच्या जीवनात, आपण आपल्या आरोग्याकडे व आपल्याला होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामध्ये काही अशी गुप्त आजार असतात, की ते बाहेर सांगायला, ही आपण लाजतो, आणि त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्याचे प्रमाण अधिक वाढून, आपल्याला शारीरिक त्रास होतो. शिवाय त्याचा मनावरही परिणाम होतो, तसेच त्यामध्ये एक आहेत, की संडास मधून रक्त पडणे ? हे कारण असे आहे, की फक्त आपल्यालाच माहिती असते, पण आपण सांगायलाही लाजतो, पण लाजल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच आपल्या शरीरात रक्ताची पातळी कमी होत आहे, व त्या छोट्याशा गोष्टीचे कधी गंभीर स्वरूपात, बदल होऊन जातात, हे आपल्याला  लक्षातच येत नाही. कृपया असे करू नका. आज आपण जाणून घेणार आहोत, की संडास मधून रक्त कोणत्या कारणांनी येते, व त्याची कोणते लक्षणे असू शकतात? व त्यावर काही उपाय आहेत का ? चला, तर मग आपण आता जाणून घेऊयात. 

संडासातून रक्त येण्याची कारणे ? 

संडासातून रक्त येण्याची अनेक कारणे आहेत, ती आता आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

 • खरे संडासातून रक्त येण्याची, मुख्य कारण म्हणजे मूळव्याध. ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास असतो, अशा लोकांना संडासातून रक्त येते. 
 • ज्यांना फिशर त्रास आहे, अशा लोकांचेही संडास करताना रक्त येते. 
 • तसेच अवेळी खानपान, तसेच उघड्यावरचे पदार्थ खाणे, तेलकट, तुपकट, अतिशय गोड पदार्थ खाणे, यासारख्या खानपाणमुळे, तुमच्या शरीरात जंत होऊ शकतात. अशा वेळी ते जंतांचे पोटात प्रमाण वाढल्यावर, ही संडासातून रक्त येऊ शकते. 
 • तुम्हाला शरीरात व पोटात कुठे इन्फेक्शन झाले, असल्यास संडास करताना रक्त येऊ शकते. 
 • ज्या लोकांना अल्सरचा त्रास आहे, अशा लोकांचे ही समस्या होऊ शकते. 
 • जर तुमच्या पोटातील छोट्या व मोठ्या आतड्यामध्ये, काही इन्फेक्शन झालेत, तर तुमच्या पोटात दुखून संडास करताना, तेथे रक्त येऊ शकते. 
 • जर तुम्हाला पोटाचा म्हणा, किंवा गुदाचा तसेच मलाशयाचा कॅन्सर झाला असेल, अशा वेळीही संडास करताना, तिथून रक्त येते. 
 • तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांची ही संडासातून रक्त येते. 
वाचा  केस गळतीवर आयुर्वेदिक तेल

संडासातून रक्त आल्याने होणारे दुष्परिणाम ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, की संडासातून रक्त कोणत्या कारणांमुळे येते, तसेच जर तुमच्या शरीरातून संडासात रक्त येत असेल, तर त्यावेळी तुम्हाला कोणत्या दुष्परिणाम होऊ शकतात, ते जाणून घेऊयात. 

 • जर तुमच्या संडासातून सारखे रक्त पडत असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 
 • अशावेळी तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊन जाते. 
 • तसेच संडासला बसताना, त्या जागेची आग होते. 
 • तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊन, तुम्हाला ॲनिमिया चा त्रास संभवतो. 
 • तुम्हाला अशक्तपणा व थकल्यासारखे जाणवते. 

संडासातून रक्त येत असेल, तर त्यावर काही घरगुती उपाययोजना ! 

वरील दिलेल्या माहिती मध्ये, आम्ही तुम्हाला संडासातून रक्त कोणत्या कारणांमुळे येते, तसेच त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुम्हाला बघावयास मिळतात, हे सांगितलेले आहेत. आत्ता आम्ही तुम्हाला त्यावर काही घरगुती उपाय, सांगणार आहेत. ते करून बघा. चला, तर मग जाणून घेऊया की कोणते घरगुती उपाय करावेत. 

साजूक तुपाचा वापर करावा :

हो, साजूक तुपाचा वापर केल्याने, तुमच्या संडासातून रक्त येत असेल, त्या जागेची आग होत असेल, तर तसेच तिथे खाज येत असेल, या जागेवर थोडा आराम मिळतो. त्यासाठी तुम्हाला कोमट पाण्यात साजूक तुपाचे दोन चमचे टाकून, सकाळी व संध्याकाळी प्यायचे आहे. त्याने तुम्हाला फरक पडेल. तसेच तुम्ही कापसाच्या बोळ्यावर साजूक तूप घेऊन संडासच्या म्हणजे गुदाद्वाराजवळ लावल्याने, तेथे आग कमी होते. 

कांदा वापरून बघा :

कांद्याचा रस मध्ये ऑंटीएक्सीडेंट प्रमाण असते. जर तुम्ही दिवसाला दोन वेळेस कांद्याचा रस काढून, त्यात खडीसाखर मिसळून, ते पाणी पिल्याने तुमच्या संडास मधून रक्त पडणे या  समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

त्रिफळा चूर्णाचा वापर करून बघा :

त्रिफळा चूर्ण अगदी पूर्वीच्या काळापासून, आयुर्वेदात वापरले जाते. त्यामध्ये आवळा, हरड, आणि बेहेडा या तीन फळांचे मिश्रण असते. जर तुमच्या पोटात काही इन्फेक्शन झाले असेल, तसेच पोटात जंत झाले असतील, अशा वेळी जर तुम्ही त्रिफळाचूर्ण चा सेवन केले, तर तुम्हाला त्यावर फरक पडेल. शिवाय पोटातील आग ही निघून जाईल. त्यासाठी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस, त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यामध्ये मिसळून, ते पाणी प्यावयाचे आहेत. त्याने तुमची पोटही साफ होते, शिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. 

वाचा  बाळाचे दूध बंद करण्यासाठी

बडिशोप व खडीसाखर चा वापर करा :

रोजच्या रोज जर तुम्ही जेवणानंतर, बडीशोप आणि खडीसाखर खाल्ली, तर तुमच्या संडास मधून रक्त पडणे, पोटात आग होणे, तसेच पोटात इन्फेक्शन होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास ही तुम्हाला कमी होईल. शिवाय जर तुम्ही हिरडा, बडीशोप व खडीसाखर, रोजच्यारोज सारख्या प्रमाणात घेऊन, त्याची पावडर बनवून, त्याचे चूर्ण तुम्ही एक चमचा अर्धा ग्लास टाकावे, व ते पाण्यात मिक्स करून, पिल्यास तुम्हाला फरक पडेल. 

मुळ्याच्या वापर करून बघा :

हो, खरंच मुळा हा तुम्हाला बद्धकोष्टता साठी तसेच मुळव्याध साठी, तसेच जर तुम्हाला संडासच्या ठिकाणी रक्त येत असेल, त्यासाठी फार फायदेशीर आहे. तसेच पचन संस्थाही सुधारते. तसेच तुम्ही, मुळ्याचे काप कापून, त्यात सेंधव मीठ घालून, सकाळी उपाशीपोटी खावेत. तुम्ही जेवताना मुळ्याचा सॅलाड ही करू शकतात. 

योग्य आहार घ्या :

ज्यावेळी तुम्ही योग्य आहार घ्याल, त्यावेळी तुमच्या शरीराचे आरोग्य एकदम सुधारण्यास मदत होते. जर तुम्ही रोजच्या रोज हिरव्या पालेभाज्या, लोहयुक्त भाज्या, प्रोटिन्स सारखे पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळेल. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने, तुम्हाला झिंक मिळते. तसेच यामध्ये लोह असते. ज्या वेळी तुमच्या संडासात रक्त जाते, त्यावेळी तुम्हाला शारीरिक थकवा येतो, व तुम्हाला अशक्तपणा येतो, ॲनिमिया होण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, तर तुमच्या शरीरात रक्ताची कमी, ही भरून निघते. तसेच तुम्ही रोजच्या रोज तुमच्या आहारात गाजरचाही समावेश करा, बीट खात जा. या हिरव्या पालेभाज्या आणि या रक्त देणाऱ्या भाज्यांची, तुम्ही तुमच्या आहारात योग्य प्रमाणात घेतलेत, तर तुम्हाला शारीरिक व मानसिक थकवा ही जाणवणार नाही. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की संडासातून रक्त येत असल्यास, तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांनाही विचारू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  रात्री झोपण्याआधी दूध हळद पिल्याने काय फायदे होतात?

 

                      धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here