लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे

0
2972
लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे
लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे

  नमस्कार, मित्रांनो लहान मुलांना ताप आल्यावर, आपण खूप घाबरून जातो. याला काय झाले असेल, त्यावेळी त्यांचा चेहरा ही तसाच केविलवाणा होऊन जातो,  पण अशावेळी तुम्ही घाबरून जाता कामा नाही. ताप येणे ही एक सामान्य बाब आहे. मी स्वतः अनेक पालक बघितलेले आहेत, की मुलांना थोड असेही त्रास झाला, की लगेच दवाखान्यात नेतात. त्यावर इंजेक्शन औषधी गोळ्या घेतात. अशा वेळी तुम्ही जर तात्पुरते घरच्या घरी काही उपाय केलेत, तर त्या सारख्या समस्या लवकरात लवकर बऱ्या होतात.

पूर्वीचे लोक तर ताप आला, की लगेच त्यांचा आयुर्वेदिक औषधांचा बटवा काढला जायचा, आणि त्यातील काही औषधे मुलांना दिली जायचे, त्यामुळे त्यांचे आजार हे लवकरात लवकर बरे व्हायचे. पण आता हल्ली तर आपण लगेच थोडे ही काही झाले, की लगेच दवाखान्यात धाव घेतो. जर तुम्ही घरच्या घरी मुलांना थोडे उपचार केलेत, तर त्यावर त्यांना ताबडतोब फरक पडतो. आज आपण जाणून घेणार आहोत, की लहान मुलांना ताप येणे, म्हणजे काय ? व कोणत्या कारणांमुळे लहान मुलांना ताप येतो ? व ताप आल्यावर मुलांना कोणते घरगुती उपचार आपण करू शकतो ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

लहान मुलांना ताप येण्याची कारणे ? 

लहान मुलांना ताप येण्याची आणि कारण आहे, ते आता आपण जाणून घेऊयात ! 

  • जर मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असेल, अशा वेळी कोणतेही इन्फेक्शन झाल्यावर, लहान मुलांना ताप हा लवकर येतो. 
  • तसेच व्हायरल इन्फेक्शन मध्येही मुलांना ताप येतो. 
  • सर्दी खोकल्यासारखे आजारांमध्ये लहान मुलांना ताप हा येतो. 
  • लहान मुलांना लसीकरण केल्यास ताप येऊ शकतो. 
  • तसेच खाण्यामध्ये काही बिघाड आल्यामुळे, ही लहान मुलांना ताप येऊ शकतो. 
  • साथीचे आजार डेंगू, मलेरिया, सारखे आजारांमध्ये लहान मुलांना ताप येऊ शकतो. लहान मुलांचा ताप हा तीन ते चार दिवसाच्या वर राहिला, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ब्लड टेस्ट करून निदान करून घ्यावे. 
  • तसेच जर लहान मुलांना खाण्यामध्ये अपचन, ऍसिडिटी झाली, तरी त्यांना ताप लगेच येतो. 
  • थंड पाण्यात भिजल्यामुळे, ही लहान मुलांचे अंग भिजून त्यांना ताप येतो. 
  • तसेच अंगामध्ये हाड्या ताप म्हणजे, हाडामधील ताप असल्याने, लहान मुलांचे अंग सतत गरम असते. 
वाचा  मासिक पाळीत केस धुवावेत का ? जाणून घ्या काय आहे खर : 

ताप आल्यास कोणती लक्षणे होतात ? 

  • ज्यावेळी लहान मुलांना ताप आल्यावर, त्यावेळी त्यांना अशक्तपणा जाणवतो. 
  • त्यांची लघवी ही पिवळसर होते. 
  • त्यांचे कशातही मन लागत नाही. 
  • तोंडाला चव लागत नाही, जेवण करावेसे वाटत नाही. 
  • ताप येऊन थोड्यावेळाने घाम येतो. 
  • तसेच त्यानंतर थरथरल्या, सारखे जाणवते. 
  • ताप आल्यामुळे, ओठांच्या बाजूला ज्वर येतो. 
  • आणि कोणाचे डोके दुखायला लागते. 
  • लहान मुलांना ताप आल्यावर,  सर्दी खोकला सारखे समस्या उद्भवतात. 

लहान मुलांना ताप आल्यास, कोणते घरगुती उपचार करावेत ?

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही व लहान मुलांना ताप कोणत्या कारणाने येऊ शकतो. त्याची काही कारणे, व लक्षणे सांगितलेले आहेत. आता आपण त्यावर कोणते उपचार करू शकतो, ते जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊयात! 

मुलांच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याचे घड्या ठेवावेत :

लहान मुलांना ताप आल्यावर त्यावेळी त्यांचे डोळेही लालसर होतात. दुखीवर डोळ्यातून पाणी येते, नाकातून पाणी येते, त्यावेळी त्यांचा चेहरा अगदी कोमेजुन जातो, हात लावला की अक्षरशः अंगाला चटके बसत असतील, अशावेळी तुम्ही ताबडतोब एका वाटीमध्ये मीठ किंवा मिठाचे खडे टाकून घ्यावे, त्यानंतर सूती कापड त्या पाण्यामध्ये भिजवून, त्याची घडी करून, मुलांच्या कपाळावर त्या घड्या ठेवाव्यात. आणि त्या कोरड्या झाल्या की, वारंवार बदलत राहावेत. तसेच तुम्ही मिठाचे पाण्याने मुलांची संपूर्ण अंगही पुसून घ्यावेत. त्याने ताप हळू कमी होण्यास मदत मिळते. 

तुळशी चा वापर करून बघा :

खरंच, तुळस मध्ये अँटीफंगलइन्फेक्शन, अँटीबॅक्टरियल व अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात कोणत्याही समस्या झाल्यावर तुळशीचे पाने ही फायदेशीर ठरतात. जर लहान मुलांना ताप येत असेल, अशावेळी जर तुम्ही तुळशीचे पंधरा ते वीस पान घेऊन, ते एका पातेलीत घेऊन, त्या पातेल्यात काळे +मिरे+ लवंग याचे दोन-दोन तुकडे टाकून, ते पाणी खळखळून उकळून कोमट झाल्यावर, लहान मुलांना प्यायला द्यावेत. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन झाले असेल, किंवा अंगात ताप असेल, या समस्येवर त्वरित आराम मिळतोय. असे तुम्हाला दिवसातून दोन वेळेस करावयाचे आहे, तुळशीच्या हा काढा पिल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असेल, तर तो लवकर निघण्यास मदत मिळते. तसेच त्यामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच अशक्तपणा ही कमी होतो. 

वाचा  पोट कमी करण्यासाठी उपाय

जिऱ्याचा वापर करा :

हो, आता तुम्ही म्हणाल, की जीरे हा मसाला पदार्थाचा वापरला जाणारा पदार्थ आहे. पण खरे सांगू जिर्‍याचा वापर केल्याने, लहान मुलांचा ताप हा लवकरात लवकर जातो. तसेच काही मुलांना हाड्या ताप म्हणजे सतत त्यांचे अंग सारखे गरम राहत असेल, अशावेळी जिरे वापरल्यास, त्यांचा तो तापही लवकरात लवकर नष्ट होतो. अशावेळी तुम्ही जीरे भाजून, त्याची पावडर करून घ्यावेत. व त्यात एक चमचा मध घालून, त्याचे चाटण मुलांना करायला लावावेत. तसेच जर तुम्ही रात्री एक ग्लास कोमट पाण्यात मुलांना जिऱ्याची पूड टाकून, ते पाणी प्यायला लावले, तर त्यांच्या अंगातील ताप हा लवकर जाण्यास मदत मिळते. शिवाय ऍसिडिटी, पित्तामुळे आलेला ताप ही लवकरात लवकर जातोय. 

सतत पाणी प्यायला द्यावे :

ज्यावेळी लहान मुलांना, मोठ्यांनाही सतत ताप येत असेल. त्यावेळी त्यांची तोंड सारखे कोरडे पडते, अशा वेळी तुम्हाला मुलांना दिवसभर पाणी प्यायला द्यायचे आहे. कारण पाणी पिल्याने ही शरीरातील तापाचे प्रमाणे कमी होते, व त्यांना डीहायड्रेशन सारख्या समस्या या होत नाहीत. तसेच तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही त्यांना लिंबू मीठ साखर याचे मिक्स करून ते पाणी प्यायला दिल्याने, ही मुलांचा ताप कमी होतो. व शरीरात एनर्जी येते, व अशक्त पणा जाणवत नाहीत. 

सुंठ व अद्रक चा वापर करा :

सुंठ व आद्रक हे एकच असते. अद्रक वाळवून त्याची सुंठ पावडर तयार होते. मुलांना ताप येत असेल, अशावेळी जर तुम्ही मुलांना सुंठ पावडर किंवा अद्रक चा रस काढून, त्यामध्ये मध टाकून, मुलांना चाटायला दिले, तर मुलांना तापावर फरक पडतो. शिवाय ताप येऊन, त्यांची जर तोंडाची चव गेली असेल, तर ती लवकर येण्यास मदत होते. त्यामुळे मुलं जेवण करतात, व त्यांना अशक्तपणा व थकवा येणे नाहीसे होते, तसेच लहान मुलांचे ताप आल्यास अंग फार दुखते असेल, तर तुम्ही सुंठ पावडर मध्ये गुळाचा खडा मिक्स करून, त्याची गोळी बनवून, मुलांना खायला द्यावी. त्याने फरक पडेल. 

आयुर्वेदिक काढा प्यायला द्या :

आता तुम्ही म्हणाल की, हा आयुर्वेदिक काढा कसा व कुठे मिळतो? तर तो तुम्हाला घरीच तयार करावयाचे आहेत. तापावरील औषधी आपल्या या घरातच राहतात. त्यासाठी तुम्हाला तुळशीच10 ते 12 पाने घेऊन+ त्यात अद्रक चा किस+ काळे मिरे यांचे दोन-तीन दाणे+ लवंग +दालचिनी पावडर+ चिमूटभर गुळ + हळद +गवतीचहा यांचे मिश्रण करून, ते पाणी खळखळून उकळून घ्यायचे आहे.  ते कोमट झाल्यावर, मुलांना एका कपात  ते प्यायला द्यायचे आहेत. असे दिवसातून दोन वेळेस केल्यानेही मुलांचा ताप हा लवकर जाण्यास मदत मिळतो.  शिवाय या आयुर्वेदिक औषधामध्ये ऑंटीऍक्सीडेन्ट, ऑंटीफंगल इन्फेक्शन, वर मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांना लवकर फायदा होतो. 

वाचा  बेंबीतून पाणी येणे या समस्या ची वेगवेगळी लक्षणे व घरगुती उपचार :-

ताप आल्यास ही काळजी घ्यावी :

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही मुलांना ताप येण्याची कारणे, व त्याची लक्षणे व त्यावर काही उपाय सांगितलेले आहेत. आता आपण जर तुमच्या मुलांना ताप आल्यास, त्यावेळी तुम्ही काय करावे व कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात! 

  • मुलांना ताप आल्यास तो थर्मामीटर मध्ये किती प्रमाणात आहे, हे मोजून घ्यावे. 
  • ताप जर जास्त प्रमाणात असेल, तर लगेच मिठाच्या थंड पाण्याने मुलांचे अंग पुसून घ्यावेत. 
  • त्यानंतर मुलांना पाणी प्यायला द्यावे, कारण ताप आल्यास मुलांचे तोंड सारखे कोरडे पडते. 
  • मुलांना ताप आल्यावर जेवण जात नाही. अशा वेळी तुम्ही त्यांना पातळशी पेज, किंवा डाळ खिचडी किंवा मुगाच्या डाळीचे पाणी, तसेच सूप प्यायला द्यावेत. त्याने त्यांच्या शरीरात एनर्जी येते, अशक्तपणा जाणार नाही. 
  • ताप आल्यास, मुलांना बाहेरील वातावरणात नेऊ नका. त्याने अजून इन्फेक्शन वाढू शकते. 
  • ताप आल्यास मुलांना टीव्ही पाहू देऊ नका, कारण त्यावेळी त्यांची नजर कमजोर होऊन जाते. 
  • तसेच मुलांना ग्लुकोज पावडर ,ही देऊ शकतात. 
  • मुलांना ताप आल्यास, तुम्ही पॅरासिटामोल ही गोळी ही देऊ शकतात. त्याने ताप लवकरात लवकर जातो. 

डॉक्टरांना कोणत्या वेळी दाखवावे ? 

जर मुलांना ताप हा जास्त प्रमाणात असेल. तसे घरगुती उपाय करूनही, मुलांना फरक पडत नसेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवावे. तसेच तुम्ही लहान मुलांच्या लघवी कडे अनुकरण करावेत, जर लहान मुलांना लघवी ही पिवळी होत असेल, आणि ताप येऊन जर दोन दिवस होऊन गेले असतील, अशा वेळी तुम्ही मुलांना डॉक्टरांकडे न्यावे. त्यावेळी डॉक्टर त्यांचे ब्लड टेस्ट करून, त्यांचे निदान तुम्हाला सांगतीलच. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला लहान मुलांना ताप येण्याची काही कारणे, लक्षणे व त्यावर काही उपाय व कोणती काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                         धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here