कानातील मळ काढण्यासाठी उपाय

0
763
कानातील मळ काढण्यासाठी उपाय
कानातील मळ काढण्यासाठी उपाय

नमस्कार, मित्रांनो देवाने आपले शरीर हे इतके सुंदर बनवलेले आहे, की त्याची कल्पनाच करायला नको. आपल्या शरीरामध्ये एखादा घटक जरी जास्त झाला, तरी आपल्याला त्याचा त्रास होतो, किंवा एखाद्या घटक कमी झाली झाला, तरी त्याचा त्रास होतो. आपल्या शरीरामध्ये कुठलीही जास्तीची गोष्ट आपल्याला सहन होत नाही. त्याचा आपल्याला त्रास होतो. तसेच आपल्या शरीरामध्ये एक एक अवयव फार महत्त्वाचा आहे. आपले हात, पाय, पोट, मान, डोळे, नाक, कान ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आज आपण कानातील मळ याविषयी थोडे जाणून घेणार आहोत.

आपले कान हे अगदी तीक्ष्ण असतात. आपल्याला आपल्या आजूबाजूला काही वाजले, किंवा काय चालले हे लगेच समजते. आणि जर आपल्या कानामध्ये मळ राहिला, तर आपल्याला ऐकायला ही कमी येते, त्याचा त्रास होतो. तर कानामध्ये मळ कोणत्या कारणाने होतो, तसेच तुमच्या कानामध्ये मळ असेल, तर त्यावर तो काढण्यासाठी कोणते तेल वापरावे, व कोणते घरगुती उपाय करावेत? हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की कानामध्ये मळ झाल्यास तो काढण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? ते जाणून घेऊया ! 

कानात मळ कसा तयार होतो ?

बऱ्याच वेळेला ही गोष्ट खूप जणांना माहिती नसते, की कानात मळ का आणि कशामुळे तयार होतो. पण एक सांगू कानात मळ राहिला, तर आपल्या कान सुरक्षित आहे, असे समजावे. कारण बाहेरील कोणतेही घटक, कानामध्ये मळ असल्यामुळे, तुमच्या कानात आतवर, खोलपर्यंत जात नाही. मळ असल्यामुळे ते तिथे चिटकून राहतात. कानामध्ये मळ हा आपल्या शरीराने तयार केलेले यंत्रणे पासून तयार होतो. कानात मळ राहिल्यामुळे, बाहेरच्या बॅक्टेरिया, इन्फेक्शन तुम्हाला होत नाही. तसेच कानातील मळ हा चिकट मेणासारखा असतो, तसेच कानामध्ये मळचे जास्त प्रमाण झाले, की कान दुखतो, कानामध्ये मळ जास्त साठून राहिल्यामुळे ऐकायला कमी येते, अशा वेळी तुम्ही हप्त्यातून किंवा महिन्यातून दोन वेळेस तुमचा कान साफ करून घ्यावा. 

वाचा  भाताची पेज ही पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

कानातील मळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय ? 

मित्रांनो, कानातील मळ काढण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात. 

मोहरीच्या तेलाचा वापर करा :

कानामधील मळ काढण्यासाठी, तुम्ही मोहरीचे तेल वापरले, तर तुम्हाला सोपे पडते. त्यासाठी तुम्हाला मोहरीचे तेलाचे दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकून ठेवायचे आहे. पाच मिनिटानंतर कानातला मळ भिजल्यावर, तुम्हाला हळुवारपणे कानातील मळ काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे कानातील मळ निघण्यास सोपे जाते. 

कांद्याचा रस टाकून बघा :

कानातील मळ हा अगदी सोप्या रित्या बाहेर येण्यासाठी तुम्हाला कांदा मिक्सर मध्ये बारीक दळून, त्याला चांगले शिजवून, नंतर त्याला वस्त्रगाळ करून, त्याची दोन ते तीन थेंब तुम्ही कानात टाकून बघा. त्यामुळे कानातील मळ बाहेर निघण्यास मदत होते व कापसाचे साह्याने तो अलगद पुसून घ्यावे. 

खोबरेल तेल टाका :

खोबरेल तेल वापरण्याची पद्धती अगदी पूर्वीच्या काळापासून आहे, कानामध्ये मळ तयार झाल्यास, खोबरेल तेल टाकून कान भिजून मळ बाहेर निघण्यास लवकर मदत मिळते. तसेच काही जणांनी जर रात्री झोपायच्या वेळेस दोन ते तीन थेंब खोबरेल तेल कानामध्ये टाकून ठेवायचे, सकाळी उठल्यावर अलगद कानातील मळ बाहेर निघतो. तसेच एअर बर्ड्स च्या साह्याने तुम्ही कानातील मळ काढून घ्यावा. 

तिळाच्या तेलात लसूण टाकून बघा :

तिळाचे तेल घेऊन ते गरम करून, त्यामध्ये लसूण पाकळी चांगली तळून घ्यावी. त्यानंतर ते तेल कोमट करून, कानामध्ये टाकल्यास तुमच्या कानातील मळ हळुवारपणे बाहेर निघण्यास मदत मिळते. लसुन टाकल्यामुळे कान दुखणे, यासारख्या समस्या असतील, तर त्याही थांबण्यास मदत मिळते. 

तुळशीच्या पानांचा रस टाका :

तुळशीच्या पानांमध्ये ऑंटी बॅक्टरियल तसेच, ऑंटी फंगल इन्फेक्शन चे गुणधर्म असतात. त्यामुळे कानातील इन्फेक्शन वर तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. तसेच तुमच्या कानामध्ये मळ साठून राहिला असेल, अशावेळी तुम्ही तुळशीच्या पानांचा रस काढून, त्याचे दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकल्यास मळ बाहेर निघण्यास मदत मिळते. 

वाचा  बाळाला दात येण्याची लक्षणे

चला, तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की जर तुमच्या कानात मळ झाला असेल, आणि त्याला काढायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकतात. व कशाप्रकारे काढू शकतात. तसेच कानात मळ राहिल्यामुळे, तुम्हाला ऐकायला कमी येते, त्यामुळे तुम्ही महिन्यातून दोन वेळा तरी नियमित कानामधला मळ काढायला हवा. तसेच सांगितलेल्या माहिती मध्ये जर तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही कानातील मळ काढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायला हवा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here