दाढ दुखीवर उपाय स्वागत तोडकर

0
4762
दाढ दुखीवर उपाय
दाढ दुखीवर उपाय

दाढ दुखीवर उपाय

नमस्कार, दाढ दुखणे म्हणजे फार कठीण दुखणे होय. हल्ली दाढदुखी ची समस्या आता आपल्याला भरपूर प्रमाणात बघावयास मिळत आहे. दाढ दुखीवर अनेकांचे वेगवेगळे उपाय आहेत. कोणी म्हणतात, या कारणामुळे दुखते, तर त्या कारणामुळे दुखते, आपण नुसते उपाय शोधत बसतो, पण जर आपल्याला उपाय मिळाले नाही, तर आपण मोबाईलवर, नेटवर, यूट्यूब वर अनेक प्रकारे शोधत बसत असतो. पण त्यामध्ये आपल्याला एकही उपाय चांगला करण्यायोग्य वाटत नाही. तसेच काही उपाय करूनही तुम्हाला फरक जाणवत नाही, अशावेळी स्वागत तोडकर यांनी त्यांच्या उपायांमध्ये खूप सोप्या पद्धतीने समजावलेले आहे, नेमक्या कोणत्या कारणामुळे दुखते, आज आपण जाणून घेणार आहेत, की स्वागत तोडकर नेमके काय म्हणतात  त्यांचे दाढ दुखीवर उपाय काय आहेत, आणि ते कशाप्रकारे करावेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत, आणि दाढ कोणत्या कारणांमुळे दुखते?  दाढ दुखत असल्यास आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो? हे स्वागत तोडकर यांनी एकदम छान रित्या आपल्याला समजावून सांगितलेले आहेत!  

चला तर मग जाणून घेऊया की, दाढ दुखीवर काही घरगुती उपाययोजना! 

दाढ का दुखते? 

दात दुखण्याची अनेक कारणे आहेत, ती आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

  • दाढ दुखीवर स्वागत तोडकर म्हणतात, की दाढ दुखी ची अनेक कारणे आहेत, जसे की जेवण झाल्यावर दातात अन्नपदार्थाचा एखादा कन अडकला, आणि तो निघाला नाही, तर त्याला कीड लागण्याची शक्यता असते, आणि ती कीड लागून दाढ दुखू शकते. 
  • तसेच तुम्ही जर रोज च्या रोज वेळेवर दिवसातून दोन वेळेस ब्रश करत नसाल, तर किटाणू तुमच्या दाढ मध्ये असतात, त्यामुळे दाढीला कीड लागू शकते. त्यामुळे तुमची दाढ दुखू शकते. 
  • जर तुमची दाढ वाढायला जागा नसेल, ती एखाद्या हिरडी मध्ये वाकडी घुसत असेल, अशावेळी, हिरड्या सुजतात आणि दाढ दुखू शकते. 
  • थंड पदार्थ खाल्ल्याने, ही दाढ दुखू शकते. 
  • गोड पदार्थांचं अति सेवन केल्यामुळे, दातांना कीड लागून, दाढ दुखू शकते. 
  • तसेच तंबाखू, गुटखा सारखे व्यसन असलेल्यांच्या दाढ मध्ये अडकून दाढ दुखण्याचे, प्रमाण वाढायला लागले आहेत. 
  • तसेच दाढ दुखल्यामुळे, हिरडया सुजून असह्य वेदना होतात. 
वाचा  अशोकाच्या पानांचे फायदे

दाढ दुखी ची लक्षणे? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला सांगितले की, दाढ दुखी ची कारणे कोणती? आता पण त्याची लक्षणे जाणून घेऊयात! 

  • ज्यावेळी तुमची दाढ दुखते, अशा वेळी तेथील जागेवर सूज येते. 
  • तुमच्या जबडा बाहेरून सुजतो. 
  • जेवता येत नाही. 
  • डोकेदुखी होते. 
  • दाढ दुखत असल्यामुळे चिडचिड होते. 
  • तुम्हाला काहीही खाता येत नाही. 
  • दाढ दुखी मुळे हिरड्या ही सुजतात. 

दाढ दुखत असल्यास, स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय! 

स्वागत तोडकर म्हणतात, की ज्यावेळी तुमची दाढ दुखते, सुजते, अशावेळी तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जातात. त्यावेळी डॉक्टर तुमची दाढ काढून टाकायचा सल्ला देतात, पण असे करण्यापूर्वी तुम्ही एकदा काही घरगुती उपाय करून बघा. कारण  तुमची दाढ  ही एकदाच येते, आणि ती गेल्यावर तुम्हाला परत मिळत नाही, त्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत, ते करून बघा. त्याने तुम्हाला फरक पडेल, 

चला तर मग जाणून घेऊया, की नेमके कोणते कोणते घरगुती उपाय, स्वागत तोडकर सांगतात! 

पेरूची पाने खा

स्वागत तोडकर सांगतात की, जर तुमचे दाढ दुखी तसेच हिरड्या सुजल्या असतील, अशा वेळी जर तुम्ही कच्च्या पेरूची पाने चावून चावून खाल्ली, तर तुमच्यात दाताचे व दाढ दुखणे त्वरित थांबते. ते म्हणतात करून बघा, तुम्ही हे उपाय सलग पंधरा दिवस करावे. त्याने तुमचा दात आणि दाढ कधीच दुखणार नाही. शिवाय हलणार नाही, खरच करून बघा अगदी साधे सोपे उपाय आहेत. 

आंब्याची पान चावून खा

 स्वागत तोडकर यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही आंब्याची पाने चावून खाल्ले, तर तुमच्या दाता मधील किड व दाढ दुखी ची समस्या लवकर बरी होईल. त्यासाठी तुम्हाला आंब्याचे पान आणून पटापट चावायचे आहे, आणि थुंकी व लाळ बाहेर फेकायची आहेत. त्याने तुमच्या दाढ मधील कीड व जंतू बाहेर निघतील. 

वाचा  मासिक पाळीत केस धुवावेत का ? जाणून घ्या काय आहे खर : 

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा

हो, खरंच स्वागत तोडकर यांच्या म्हणण्यानुसार, तुरटी मध्ये अँटिबायोटिक व गुणधर्म असतात. जे आपल्या दाढ दुखी साठी फार फायदेशीर ठरतात. तुमची दाढ दुखत असेल, ठणकत असेल, व तिच्या वेदना होत असेल, अशा वेळी जर तुम्ही तुरटीचे पाणी करून, त्या पाण्याने गुळण्या केल्या, तर तुमची दाडदुखी ही त्वरित थांबते. 

थंड पाण्याच्या पिशवीने शेक द्या

 तुमची दाढ दुखते त्या वेळी तिच्या हिरड्यांना सूज येते, शिवाय बाहेरील जबड्याला ही फार सूज येते, अश्यावेळी जर तुम्ही आइस पॅक एका कापडात गुंडाळून त्याने बाहेरील जबड्याला, गालाला शेक दिला, तर ती सूज कमी होते. शिवाय दाढ दुखी चे आजूबाजूचा भाग सुजलेला असतो, तो सुद्धा कमी होतो. 

लसुन चा वापर करून बघा

लसुन मध्ये अँटीसेफ्टीक गुणधर्म असतात. जर तुमची दाढ दुखी ची समस्या असेल, अशा वेळी जर तुम्ही लसणाचा रस एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन, तो दाढ दुखत असलेल्या ठिकाणी लावला. तर तुमच्या दाढ दुखी ची समस्याही त्वरित थांबते. 

हिरड्यांना सूज आली असेल, तर काय करावे? 

 स्वागत तोडकर म्हणतात, की हिरड्यांना सूज आली अशावेळी तुम्ही एक मोरआवळा घ्यायचा, त्याला एक तांब्याभर पाण्यामध्ये खळखळ उकळून घ्यायचा, त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर, त्यां पाणी ने चूळ भरून घ्यायची. असे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेस करायचे आहे. त्याने तुमची हिरड्यांची सूज कमी होऊन, हिरड्या लगेच जागेवर बसतात. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, की जर तुमचे दात दुखत असतील, दाढ दुखत असेल, तसेच हिरड्या व दाढ कोणत्या कारणांमुळे दुखतात. तसेच त्याची लक्षणे आणि त्यावर स्वागत तोडकर यांचे काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच त्यांनी सांगितलेले घरगुती उपाय करून, जर तुम्हाला फरक पडत नसेल. तर तुम्ही त्वरित दवाखान्यात दाखवावे. तसेच सांगितलेल्या उपायांमध्ये, तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावे. 

वाचा  स्वप्नात आई एकविरा दिसणे शुभ की अशुभ ?

 

                     धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here