प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

0
881
प्रसूती म्हणजे काय
प्रसूती म्हणजे काय

प्रसूती म्हणजे काय

नमस्कार, मैत्रिणीने जेव्हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागते, त्यावेळी तिच्या जीवनातील एक सुंदरसा क्षण तिच्या जवळ येत असतो, तर मग पहिल्या महिन्यापासून तर शेवटच्या म्हणजेच, नवव्या महिन्यापर्यंत, आपण त्याची देखभाल करत असतो. त्यामध्ये आपण योग्य रित्या आहार, तसेच डॉक्टरची ट्रिटमेंट, इंजेक्शन, गोळ्या, घेत असतो. तसेच त्या नवीन पाहुण्याची हालचाल, व त्याचे ठोके, त्याचे अवयव ही आपण सोनोग्राफीद्वारे आपण बघत असतो. किती छान असतात ना हे अनमोल क्षण. तेव्हा आपल्याला असे वाटते, की कधी हा बाहेर येणार, आणि मी त्याला माझ्या कवेत घेऊ. ज्यावेळी नवा महिना लागतो, त्यावेळी आपल्या छातीत जरा धडधडत होते, की कसे होईल, केव्हा होईल, कोणत्या वेळी होईल, एक मनात चाहूलच रहाते, मग शेवटी तो एक दिवस येतो, त्यामध्ये कळा येतात, पोटात दुखते, नवीन पाहुणा बाहेर पडायला तयारीतच राहतो. या वेदनांना प्रसूती असे म्हणतात. प्रसूती म्हणजे डिलिव्हरीच्या कळा येणे होय, प्रसूती ही केव्हा होते ? आपल्याला माहित नसते. आज आपण बघणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात प्रसूती म्हणजे काय

प्रसुती केव्हा होते? 

प्रसूती ही सहसा करून 9 वा महिना झाल्यावर, किंवा नव्या महिन्याची चाहूल लागताचही होते, म्हणजे 38 ते 40 आठवड्यापर्यंत तुमची प्रसूती होऊ शकते. काही जणांची प्रसूती ही सातव्या महिन्यातच होऊ शकते, त्यावेळी बाळाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते, कारण ती लवकर झालेली असते, 

प्रसूती ही योनीमार्गातून होते, तसेच जर मार्गाद्वारे बाळाला अडथळा येत असेल, तर तुम्हाला शस्त्रक्रिया करून, प्रसूती ही करावी लागते. 

वाचा  साखर ऐवजी कोणत्या गोष्टींचे सेवन आपण केले पाहिजे ?

प्रसुतीची काही लक्षणे? 

जर प्रसूतीचा काळ जवळ आलेला असतो, अशा वेळी तुमच्या पोटात कळ येऊन-येउन थांबते. परत पंधरा ते वीस मिनिटात परत दुसरी कळ येते, त्या वेळी पोटात दुखू लागते, याला प्रसुतीचे पेन चालू झाले, असे समजावे. 

तसेच तुम्हाला मळमळल्यासारखे ही वाटते. तर कधी कधी तुम्हाला जुलाब होतात. त्यावेळी तुम्ही योग्य काळजी घ्यावी, कारण प्रसूती होऊ शकते, ही काळजी तुम्ही लक्ष देऊन करावी. तसेच सारखे सारखे लघवीला जावेसे वाटते, सोबत जाताना कोणालाही घेऊन जावे, तर कधीकधी मांड्या जबरदस्त दुखतात. मांड्यांमध्ये दुखणे आले, की उठा-बसायला ही त्रास होतो. चालताना जड वाटते, पूर्ण चेहरा कोमेजुन जातो. त्यावेळी जेवणही जात नाही. पण तुम्हाला एनर्जी यावी, यासाठी तुम्हाला जेवण आणि पाणी याचा वापर करायचा आहे. त्याने तुमच्या शरीरात प्रसूतीच्या वेदना सहन करण्याची ताकद मिळते. 

प्रसुती साठी पोषक आहार

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की प्रस्तुती केव्हा होते, आता आपण जाणून घेणार आहोत, की प्रस्तुती ला जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, चला तर मग जाणून घेऊयात. 

एरंडेल चा वापर करा

एरंडोल चा वापर अगदी पूर्वीच्या काळापासून, प्रसूतीसाठी केला जात आहेत, पहिले सुईन मावशी एरंडेल चहा प्यायला लावायच्या, त्याने प्रसूती मार्ग लवकरात लवकर मोकळा होऊन, प्रसूतीच्या वेदना या कमी होतात. जर तुम्ही प्रसूतीचा काळ जवळ आला आहे, अशावेळी जर तुम्ही चहा मध्ये एरंडेल तेल चे दोन थेंब टाकले, आणि तो चहा पिलात, तर तुमचा प्रसूती सोप्या पद्धतीने होईल, तुम्हाला  प्रसूतीच्या वेदना कमी होतील. 

अद्रक चहा प्या

हो, प्रसूतीसाठी जाताना तुम्ही अद्रक चा चहा पिऊन जावे. कारण त्याने तुमच्या पोटात ऊब मिळेल, तुम्हाला प्रसूतीच्या वेदना सहन करण्यासाठी, एनर्जी टिकून राहील. 

दूध हळद पिऊन जाऊ शकतात

प्रसूती ला जाताना त्या वेदना सहन करत करत आपण अस्वस्थ होऊन जातो, अशा वेळी जर तुम्ही जाण्याच्या आधी दूध आणि हळद पिलात, तर तुम्हाला प्रसूतीच्या वेदना सहन करण्यासाठी, ताकद मिळेल, व दूध हळद ने ही तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल. कारण प्रसूतीच्या वेदना येत असताना, तुम्हाला जेवण जात नाही, अशावेळी तुम्ही सहारा करू शकतात. 

वाचा  संत्र्याच्या सालीचे उपयोग

जास्तीत जास्त चालायला जा

प्रसूतीच्या अवधी जसा जवळ जवळ येतो, तसतसे तुमचे दिवस भरायला लागले, अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त चालायला जावे. त्याने गर्भ खाली उतरून, सुलभ रीत्या नैसर्गिक प्रसूती होऊ शकते. चालल्याने तुम्हाला प्रसूतीच्या कळा ही कमी होतात. 

प्रसूती ला जात असताना काय काळजी घ्यावी? 

प्रसूतीसाठी जाताना, तुम्ही तुमचे कपडे बाळाला घेण्यासाठी कॉटनचे टॉवेल्स, डेटॉल लिक्विड ची बाटली, तसेच गाऊन, मॅक्सी, रुमाल, या वस्तू तुमच्या बॅगमध्ये ठेवायला हवेत, तसेच प्रसूती ला जाताना तुम्ही आराम दायक वाहन करून जावे, रिक्षा व बसने जाऊ नये, कारण त्यात तुम्हाला खड्डे बसून, प्रसूतीच्या काळात तीव्र होण्याची शक्यता असते. 

प्रसूती झाल्यावर कोणता काढा घ्यावा? 

प्रसूती सुलभ रीत्या झाली, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली, अशावेळी तुम्ही तीन ते चार तास काही खाऊ नका. त्यानंतर घरगुती काढा, म्हणजे गुळाचा खडा, कडुलिंबाची सहा ते सात पाने, जिरे, दोन काळे मिरे, यांना खळखळून उकळून त्याला कोमट कोमट काढा, बाळंतिणीला द्यावे. त्याने तुमच्या पोटातील अशुद्ध रक्त म्हणजे, रक्तस्राव बाहेर निघण्यास मदत होते. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला प्रसूती म्हणजे काय, प्रसुती केव्हा होते, तसेच प्रसिद्धीला जाताना काय काळजी घ्यावी, कोणता पोषक आहार घ्यावा, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये, जर तुम्हाला काही     शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावे. 

 

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here