दात दुखण्याची कारणे व घरगुती उपाय 

0
806
दात दुखण्याची कारणे व घरगुती उपाय
दात दुखण्याची कारणे व घरगुती उपाय

    आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा वेगवेगळ्या प्रकारे त्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या महत्त्वाचा भाग म्हणजे आपले दात. या दातांच्या मदतीने आपण जेवण करू शकतो. त्याच बरोबर आपली जीभ या दातां च्या साह्याने मराठी भाषेमधील बाराखडीतील विविध व्यंजन देखील बोलण्यासाठी आपल्याला मदत होते. आपल्याला बऱ्याचदा दाताचे निगडित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या मधील सर्वात महत्त्वाची समस्या अधिक लोकांना उद्भवते ती म्हणजे दात दुखणे. बऱ्याच लोकांनी दात दुखीचा अनुभव एकदा तरी घेतला असेल. दात दुखी ही समस्या आपल्याला अत्यंत त्रासदायक असते. दात दुखण्याची कारणांमुळे मुळे आपल्याला कोणतेही अन्न खाण्यासाठी त्रास होतो. त्याचबरोबर कोणाशी देखील बोलताना किंवा संवाद साधतांना सुद्धा या दात दुखी चा आपल्याला त्रास जाणवू शकतो.

जर आपले दात दुखी हा त्रास अधिक होत असेल तर आपल्याला विविध कामे करण्यास खूप अडचण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर आपले कोणतेही काम एकाग्रतेपणे होऊ शकणार नाही. आपले सर्व लक्ष दात दुखीकडे जाते पण या दात दुखण्याची समस्येची विविध कारणे देखील असू शकतात. बरेच लोक दात दुखी थांबवण्यासाठी विविध पेन-किलर्स चा आधार घेतात पण जर तुम्ही पेन-किलर्सच्या गोळ्या अति प्रमाणात घेतल्या तर त्यामुळे आपल्याला विविध साईड इफेक्ट देखील होऊ शकते. पेन किलरच्या गोळ्या घेतल्यामुळे दात दुखी चे समस्याही थोड्या कालावधीसाठी थांबू शकते. पण आपण डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे फार महत्वाचे आहे .  

दात दुखणे या समस्येची विविध कारणे :-

    तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दात दुखण्याची कोणकोणती विविध कारणे असू शकतात व त्याचबरोबर कोण कोणते घरगुती प्रभावशाली उपाय करून आपण दात दुखणे या समस्येपासून आराम मिळवू शकतो? चला तर मग बघूया!

  • दातांची योग्य प्रमाणात काळजी न घेणे :-

     अनेक वेळा आपल्याला दातदुखी सारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण या दात दुखणे समस्येचे एक मुख्य कारण म्हणजे आपल्या दातांची योग्य प्रमाणात काळजी न घेतल्यामुळे देखील आपल्याला दात दुखणे ही समस्या उद्भवू शकते. दात नेहमी अस्वच्छ असणे त्याच बरोबर दात स्वच्छ न घासणे अशा विविध कारणांमुळे देखील दात दुखणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते.

  • दात किडणे :-

    दात दुखी असणे या समस्येचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दात किडणे. अनेकदा अति प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे देखील दात किडणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. अशा विविध कारणांमुळे आपले दात किडणे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला दात दुखणे ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे दात दुखणे या समस्येचे हे एक महत्त्वाचे कारण देखील असू शकते.

वाचा  स्वप्नात पाण्याची टाकी दिसणे शुभ की अशुभ

दातदुखी ची समस्या थांबवण्यासाठी घरगुती उपाय :-

    मित्रांनो वरील भागात आपण बघितले की दात दुखणे या समस्येचे कोण कोणते मुख्य कारणे आहेत? आता आपण बघणार आहोत की दात दुखी असणे हे समस्या थांबवण्यासाठी कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय आपण करू शकतो?

  • दाताला आल्याची पेस्ट लावून बघावी :-

    आलं हे वेगवेगळ्या समस्या अत्यंत गुणकारी आहे असे मानले जाते. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आल्याचा वापर केला जातो. जर तुम्हाला दात दुखणे ही समस्या जर होत असेल तर तुम्ही दाता ला आल्याची पेस्ट लावून बघावी. आल्याची पेस्ट लावल्यामुळे दात दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते. आल्याची पावडर तयार करून घेऊन त्यामुळे थोडेसे कोमट गरम पाणी टाकावे व त्याची एक चांगली पेस्ट तयार करून घेऊन ती पेस्ट आपल्याला जिथे दात दुखणे ही समस्या उद्भवली असेल त्या ठिकाणी लावावी. पंधरा ते वीस मिनिटं ही पेस्ट तशीच राहू द्यावी व नंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे पाच ते दहा दिवस केल्यामुळे जर तुम्हाला जात झोपेची समस्या उद्भवली असेल तर त्या समस्या पासून आराम मिळण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

  • लवंग वापरून बघावी :-

    आपल्या आयुर्वेदानुसार वेगवेगळ्या समस्यांवर देखील लवंग उपयुक्त आहे असे दर्शविला आहे. लवंग चा वापर केल्याने आपल्याला विविध समस्यांपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते. जर तुम्हाला दात दुखणे ही समस्या उद्भवत असेल व या दात दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी जर तुम्ही वेगवेगळी घरगुती उपाय करत असाल तर तुम्ही ह्या उपायांचा वापर करून बघावा. लवंग ची पावडर तयार करून घेऊन ज्या ठिकाणी तुमचे दात दुखत असतील त्या ठिकाणी ठेवावी. पाच ते दहा मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरून घ्यावी असे सतत दिवसातून दोन ते तीन वेळा करावे. असे जर तुम्ही केले तर दात दुखणे या समस्येपासून आराम मिळण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल. त्यामुळे दात दुखी च्या समस्या बस आराम मिळण्यास हा एक महत्त्वाचा खूप आहे आपल्याला फायदेमंद ठरू शकतो .

वाचा  थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की दात दुखणे या समस्येचे कोण कोणते विविध कारणे असू शकतात व त्याचबरोबर या समस्येपासून आराम मिळण्यासाठी कोणकोणते विविध घरगुती उपाय आपण करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here