श्वास घेताना आवाज येणे कारण व उपाय

0
3083
श्वास घेताना आवाज येणे कारण व उपाय
श्वास घेताना आवाज येणे कारण व उपाय

नमस्कार, श्वास घेताना अनेक जणांचे आवाज येतात. ज्यांना सर्दी-पडसे नेहमी राहते, ज्यांना दम लागतो, चालताना धाप लागते, अशा लोकांचा श्वास घेताना आवाज येतो. माझ्या बाबांचा झोपेत श्वास घेताना खूप आवाज यायचा, त्यावेळी  मी खूप घाबरायची, मला वाटायचे की भुत आला, पण आई म्हणायची, अगं पप्पा घोरतात आहे. तू घाबरू नको, मग आई बाबांना अलगद हात लावून, झोपेतून हलवून द्यायची, त्यावेळी बाबांच्या नाकातून, तोंडातून आवाज येणे बंद व्हायचे. मग अशावेळी घाबरून जाण्यासारखे काहीही नसते, त्यावेळी मला समजले. श्वास घेताना आवाज येणे यामागची कारणे जाणून घेणे फार महत्वाचे आहेत..

      श्वास घेताना आवाज येण्याची, अनेक कारणे आपल्याला बघायला मिळतात. जसे की धुळीची ऍलर्जी असेल, सारख्या-सारख्या शिंका येत असतील, तसेच ज्यांना दम्याचा त्रास असेल, कफ प्रवृत्तीच्या  लोकांना आपल्याला श्वास घेताना आवाज येऊ शकतो, तर काही लोकांचा श्वास घेताना, शिट्टी सारखा आवाज येतो. तसेच अजून श्वास घेताना आवाज येण्याची नेमकी  कोणती कारणे असतात, ती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, की श्‍वास घेताना नेमका आवाज का? व कशामुळे येतो? ते बघूयात! 

श्वास घेताना आवाज येण्याची कारणे? 

श्वास घेताना आवाज येण्याची अनेक कारणे असू शकतात, चला तर मग आपण जाणून घेऊयात ! 

 • झोपेत ज्यांना घोरण्याची सवय असते, त्यांना श्वास घेताना आवाज येत असतो.
 • ज्यांना सर्दी असते, अशा लोकांना श्वास घेताना आवाज येतो. 
 • ज्यांचे वजन वाढलेले असते, अशाही लोकांचा श्वास घेताना आवाज येतो. 
 •  दम्याचा त्रास असेल , अशा व्यक्तींचा श्वास घेताना आवाज येतो. 
 • ज्यांना बाहेरील वातावरणाची धुळीची, व थंड पाण्याची ऍलर्जी असेल, अशा लोकांचा ही श्वास घेताना आवाज येतो. 
 • फुफ्फुसातील संबंधित आजार असलेल्याना ही श्वास घेताना आवाज येतो. 
 • ज्यांना व्हायरल इन्फेक्शन होते, त्यांच्या श्वासनलिकेत सूज येऊन, श्वास घेताना आवाज येऊ शकतो. 
 • अति धावपळ केल्यानेही, जोरजोरात धाप लागून, श्वास घेतल्याने आवाज होतो. 
 • कफ प्रवृत्तीच्या लोकांचा श्वास घेताना आवाज येऊ शकतो. 
 • कधीकधी एखाद्या व्यक्तीला श्वसन मार्गात कॅन्सर झाल्याने, ही श्वास घेताना आवाज येऊ शकतो. 
वाचा  भाताची पेज ही पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

माणसं का घोरतात? 

कुंभकर्णाचा सगळ्यांनाच माहिती आहे, कुंभकर्ण इतका झोपायचा, व झोपताना इतका  घोरायचा, की सगळे गाव त्याच्या घोरण्याने हैरान व्हायचे. त्याच प्रमाणे बऱ्याच लोकांना घोरण्याची सवय असते. पण कशामुळे, हे आपल्याला माहिती नसते. घोरण्याची सवय असल्यास, आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. 

घोरणे म्हणजे नेमके काय? तर ज्या लोकांचे वजन  असते, व ते प्रमाणाबाहेर जाड असतात, त्यांच्या  गळ्याजवळील भागात फॅट हा  जमा होऊन त्यांच्या गळ्याचे आजूबाजूच्या नसां अंकुचन पावतात, व ज्यावेळी ते झोपतात, अशा वेळी ते श्वास घेतात, त्या वेळी त्यांच्या घोरण्याचा आवाज येतो. तसेच अनुवांशिकता असलेल्या लोकांचाही घोरतांना आवाज येतो, किंवा अति थकवा, अतिशय जागरण, झोप वेळेवर न होणे, अशा लोकांचाही घोरतांना आवाज येतो. तसेच ज्यांना उच्चरक्तदाब आहे, अशा लोकांचाही घोरतांना आवाज येतो. तसेच घोरतांना आवाज आल्यामुळे, फुप्फुसांमध्ये बिघाड होऊन, श्वसन रोगही होऊ शकतात. 

श्वास घेताना आवाज आल्यास काय करावे व कोणती काळजी घ्यावी? 

श्वास घेताना आवाज येणे, हे भरपूर जणांच्या समस्या आहे. त्यावेळी घाबरायचे नाही, त्यावर काही उपाय आहेत, आम्ही ते तुम्हाला सांगत आहोत. 

 • गरम पाणी प्यावे, 
 • थंड पदार्थ खाणे टाळावे, 
 • दिवसातून दोन ते तीन वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. 
 • तुळशीचे पाने व काळे मिरे आल्याचा तुकडा यांचा काढा करून प्यावा. 
 • दगदगीच्या ठिकाणी जाऊ नये, त्याने धाप लागून श्वास घेताना, आवाज येऊ शकतो. 
 • ज्यांचे अति वजन असते, अशा लोकांचा श्वास घेताना आवाज येतो. अशा वेळी त्यांनी  त्यांचे वजन कमी करायला हवे, डायट टिप्स फॉलो करायला पाहिजेत. 
 • बाहेर जायचे वेळी नाकाला रूमाल बांधावा, म्हणजे जेणेकरून नाकात धुळ न जाता, तुमचे श्वासनलिका एकदम स्वच्छ राहील. 
 • नेहमी मोकळ्या हवेत फिरायला जावे. 
 • श्वासाचे योगा करावा. 
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नाकात टाकायचा स्प्रे मिळतो, तुम्ही वापरू शकतात. 
 • घराचे दारे खिडक्या नेहमी उघडे ठेवावेत. 
 • कोणतेही काम करताना, अती धावपळ करू नका. 
वाचा  लहान मुलांना जंत झाल्यास घरगुती उपाय

श्वास घेताना आवाज आल्यास, कोणता योगा करावा? 

हल्ली धावपळीत, आपण तर योगा ही करत नाही. तसे आतापर्यंत कोरोना काळामध्ये घरात राहून, आपण वर्क फ्रॉम होम करत होतो, त्या काळात वजन वाढीची समस्या भरपूर बघावयास मिळाल्या, ज्यावेळी आपले वजन वाढते, तेव्हा आपल्या आजारांना निमंत्रण होते, त्यासाठी आपण व्यायाम करायला हवेत. योगा करणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. मग आपल्या शरीरात कोणताही तांत्रिक बिघाड झाला, त्यावर त्याप्रमाणे योगा  असतो. हल्ली टीव्ही वर, नेटवर, तसेच कॉम्प्युटरवर, लॅपटॉप वर, युट्युब वर आपल्याला सगळीकडे योगाचे पद्धती माहिती आहेत, पण नेमका कोणता योगा कशासाठी आहे, हे आपल्याला माहिती नाहीत.  जर तुम्हाला श्वसन संबंधित काही तक्रारी असेल, तर त्यावरही योग्य योगा आहेत. आणि तो आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मग तो नेमका कोणता आहे, चला तर मग जाणून घेऊयात. 

 • अनुलोम विलोम
 • भस्त्रिका
 • कपाल भारती

अशी काही श्वसन योगांची आम्ही तुम्हाला नावे सांगितली आहेत. ही करण्यापूर्वी तुम्ही युट्युब वर किंवा इंटरनेटवरही बघू शकतात, आणि तो कसा करावा, त्या पद्धतीत मध्ये सांगितलेले आहेत. हे व्यायाम केले, की तुमच्या श्वसन संबंधित तक्रारी दूर होईल. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला श्वास घेताना, आवाज येण्याची कारणे कोणती, व श्‍वास घेताना आवाज आल्यास कोणती काळजी घ्यावी. तसेच आम्ही तुम्हाला श्वासन संबंधित कोणते व्यायाम करावे, तेही आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला ही समस्या जास्त प्रमाणात असेल, अशावेळी तुम्ही डॉक्टरांना एकदा दाखवून द्यावे. आणि आम्ही सांगितलेली माहिती म्हणजे, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. 

 

                     धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here