चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी क्रीम

0
1912
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी क्रीम
चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी क्रीम

 

  मित्रांनो, बरेच जण आपला चेहरा छान दिसावा यासाठी खूप काळजी घेत असतात. इतरांप्रमाणे आपला चेहरा देखील सुंदर, स्वच्छ, नीटनेटका असावा व आपला चेहरा देखील गोरापान व्हावा,आपल्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे डाग असू नयेत म्हणून खूप जागृत असतात. यासाठी ते बाजारातून महागडे प्रॉडक्ट आणत असतात. बरेच जण पार्लरमध्ये देखील जात असतात. याच्या त्याच्या सल्ल्याने कुठल्याही प्रकारचे क्रीम वापरतात. परंतु तरीसुद्धा त्यांना हवी तशी चेहऱ्याची त्वचा मिळत नसते. चेहऱ्यावरील काळे डाग तसेच असता. बऱ्याच महिला फक्त यासाठी पार्लरमध्ये जात असतात. परंतु मित्रांनो पार्लर मध्ये जाऊनच आपला चेहरा नीटनेटका राहू शकतो असे नाही. बऱ्याच महिलांना ब्लिच केल्याने देखील त्याची ऍलर्जी होऊ शकते. ब्लीच म्हणजेच केमिकलयुक्त. तुमच्या हलगर्जीपणामुळे देखील चेहऱ्यावर काळे डाग येत असतात.

चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे ?

          बरेच जण कामानिमित्ताने बाहेर जात असतात. बाहेरील उन्हामुळे देखील काळे डाग पडण्याची शक्यता असते. तसेच हार्मोनल इन बॅलन्स मुळे देखील काळे डाग पडू  शकतात. मग हे काळे डाग जावेत म्हणून  अनेक जण काही ना काही प्रयोग करत असतात.बाजारात जाऊन महागड्या क्रीम आणून त्या चेहऱ्याला लावत असतात. परंतु हे क्रीम वापरणे कितपत योग्य ? या क्रीम चा अयोग्य वापर केल्याने देखील काळे डाग जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता असते. अति मेकअप केल्याने देखील तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची दाट शक्यता असते. यामुळे तुम्हाला पिंपल्सची समस्या देखील होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे यामुळे देखील काळे डाग पडण्याची शक्यता असते. तसेच डोळ्यांखाली देखील काळे डाग पडत असतात.

        चेहऱ्यावर काळे डाग आहेत म्हणून इतर लोक आपल्याला काय म्हणतील? आणि हे काळे डाग  झाकण्यासाठी तुम्ही अजून  कुठल्यातरी क्रीम चा वापर करतात. याने जास्त समस्या उद्भवू शकते.  काळे डाग जाणे ऐवजी अजून काळे डाग वाढतात. परंतु मित्रांनो जास्त घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी बाजारातून महागडे क्रीम आणण्यापेक्षा जर घरगुती आयुर्वेदिक उपचार केले तर? काळे डाग जाण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही टिप्स वापरून उपाय करू शकतात. आयुर्वेदाचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत हा घरगुती उपचार कोणता  चला तर मग हे आपण जाणून घेऊया.

वाचा  लहान वयात केस पांढरे

रुईचा चीक :

   मित्रांनो, रुईचे झाड तुम्ही बघितलेले असेल. रुईच्या झाडाची पाने ही मारुती देवाला वाहत असतात. तसेच त्याचे फुले देखील देवाला लोक वाहत असतात. बऱ्याच लोकांना हे देखील माहीत नसते की या रूई च्या झाडांच्या पानांचा व फुलांचा आयुर्वेदाच्या दृष्टीने किती उपयोग होत असतो. रुईच्या झाडाचा चीक वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करू शकतात.  रुईच्या झाडाचा चिकाचा वापर करावा तरी कसा ? चला तर मग जाणून घेऊया रुईच्या झाडाचा कसा वापर तुम्हाला कशा प्रकारे करता येईल.

      सर्वप्रथम तुम्ही रूई या झाडाचा चीक व्यवस्थित काढून घ्या. चीक काढून घेतल्यावर त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. या चिकांमध्ये तुम्ही रान हळद मिक्स केली तर उत्तमच. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग असतील त्या ठिकाणी हे व्यवस्थितपणे लावून घ्या. थोडा वेळ ते तसेच राहू द्या आणि नंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. मित्रांनो, असे तुम्ही केल्याने तुमचे काळे डाग जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते.

तांदळाचे पीठ :

   मित्रांनो,तांदूळ हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. तांदळाचा वापर फक्‍त खाण्यासाठी होतोच असं नाही. तांदळाचा वापर तुम्ही तुमचे केस वाढवण्यासाठी साठी देखील करू शकतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील ते काढून टाकण्यासाठी देखील तांदळाचे पिठाचे तुम्हाला मदत होऊ शकते. ते कसे हे आपण जाणून घेऊया.

   सर्वप्रथम एका वाटीत दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. एक टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याची पेस्ट करून घ्या. आणि ही पेस्ट तांदळाच्या पिठात टाका. आता यामध्ये दोन चमचे कोरफडीचा रस टाका. एक विटामिन कॅप्सूल टाका. हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्या. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. चेहरा धुतल्यानंतर ही पेस्ट काळे डागांवर सर्कुलर मोशन मध्ये लावा. आणि आता हे एक ते दोन तास तसेच राहू द्या. सुकल्यावर तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका. असे तुम्ही सतत दोन ते तीन आठवड्यात केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते.आणि चेहर्‍यावर देखील एक वेगळ्याच प्रकारे ग्लो येण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो तर वरील उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकतात.

वाचा  गळू पिकण्यासाठी उपाय

जायफळ चा वापर करून बघा :

       जायफळ हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी लहान बाळांना देखील सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर जायफळ चा वापर केला जातो. तर या जायफळ चा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढू शकतात. जायफळ चा वापर चेहर्यासाठी कसा करावा हे आपण जाणून घेऊया.

    सर्वप्रथम तुम्ही जायफळ स्वच्छ धुऊन टाका. नंतर जायफळ हे पाण्यात न उगळता ते दुधामध्ये व्यवस्थितपणे उगळून घ्या. त्याच्यात जाड असा गंध तयार करा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावण्याआधी तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्या. हा प्रयोग तुम्ही सकाळी करू शकतात. मित्रांनो तुम्ही तीन ते चार आठवडे केल्याने नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी मदत होऊ शकते. तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघू शकतात.

मोहरीचे तेल :

   मित्रांनो मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढू शकतात. मोहरीच्या तेलाचा उपयोग हा स्वयंपाकात देखील होत असतो. मोहरीच्या तेलाने लहान बाळांची देखील मसाज केली जात असते आणि त्यांचे हाडे बळकट होण्यास मदत होत असते. मोहरीच्या तेलात विटामिन ई चे प्रमाण जास्त असते. मोहरीच्या तेलाचा वापर हा केसांसाठी तर फारच उत्तम. या मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्या वरील काळे डाग करू शकतात. याचा वापर कसा करावा हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो मोहरीच्या तेलाचा वापर तुम्ही शक्यतो रात्री केला तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. आणि मोहरी चे थोडेसे तेल घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्याची मसाज करा. तुमच्या शरीरावर जिथे काळे डाग असतील तिथे मोहरी तेल लावून सर्कुलर मोशन मध्ये मसाज करा. असे तुम्ही सतत केल्याने नक्कीच तुम्हाला तुमचे चेहऱ्यामध्ये फरक जाणवू शकतो. तर मित्रांनो  हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकतात.

वाचा  तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

   मित्रांनो, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी वरील प्रमाणे उपयोग करू शकतात. बाजारातून महागडे प्रोडक्स खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही घरीच घरगुती उपाय केले तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होऊ शकणार आहे. परंतु मित्रांनो,हे घरगुती उपाय करून देखील तुमचा चेहऱ्यावरील काळे डाग जात नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वरील प्रमाणे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

   धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here