पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय काय आहेत जाणून घेऊया

0
1049
पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय
पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय

 

नमस्कार,  मित्रांनो, आपल्या शरीरातला मुख्य भाग हा म्हणजे आपला पाय आहेत, आपले पाय आपल्या पूर्ण शरीराचे वजन हे धरून ठेवतात, आणि जर आपल्या पायांना काही झाले की, आपल्याला खूप प्रॉब्लेम होतात. आपल्या शरीरातला एक-एक अवयव आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. हल्ली पाय दुखीच्या समस्या भरपूर बघावयास मिळत आहे, तसेच शंभरातल्या सत्तर ते ऐंशी लोकांना पाय दुखी च्या समस्या असतातच. धावपळीच्या जीवनात, तसेच बदलत्या वातावरणामुळे, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय  तसेच पाय दुखी ही रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात जाणवून येतो.दिवसभराचा थकवा निघाल्यावर, रात्रीच्या वेळी आपण झोपतो, त्यावेळी पाय दुखीचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो. अगदी तरुण, वयस्कर, तसेच मुलांनासुद्धा पाय दुखी चा त्रास होऊ शकतो. कारण ते दिवसभर खूप खेळतात. मग खेळल्यानंतर ते दमतात, त्यामुळे त्यांना पाय दुखीचा त्रास होऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत, की पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात, की पाय दुखी कोणत्या कारणांनी होते? तसेच त्यावर कोणते घरगुती उपचार करावेत?

 पाय दुखीची कारणे? 

पाय दुखी होण्यामागे अनेक कारणे आहेत, मग ती नेमकी कोणती? चला तर मग जाणून घेऊयात! 

 • दिवसभर सतत उभे राहून, काम केल्यामुळे पाय दुखीची समस्या होऊ शकते. 
 • तसेच दिवसभर पायामध्ये जोडे म्हणजेच बूट, चप्पल घालून ठेवल्यामुळे, आपल्या पायांची बोटे आखडून, संध्याकाळच्या वेळी झोपतेवेळी, पाय दुखीचा त्रास भरपूर बघावयास मिळतो. 
 • तसेच तुमच्या शरीरात आवश्यक ते विटामिन्स, व कॅल्शियम ची कमतरता आल्यामुळे, पाय दुखणेच्या समस्या होऊ शकतात. 
 • तसेच जर तुमचे वजन जास्त प्रमाणात असेल, तर आपल्या आपल्या शरीराचा भार त्या पायांवर आल्यामुळे, तुम्हाला गुडघे दुखी व पाय दुखी त्या समस्या होऊ शकतात. 
 • जर तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर तुम्हाला डी हायड्रेशन सारख्या समस्या होऊन, तुम्हाला शारीरिक थकवा हा जाणवतो. त्यामध्ये पाय दुखीचा त्रास ही तुम्हाला होऊ शकतो. 
 • तसेच काही स्त्रियाना मासिक पाळी आल्यानंतर, त्यांना कंबर दुखी, पाय दुखी चा त्रास हा जाणवतो. 
 • तसेच अति कष्ट केले, अति काम केले, किंवा जास्ती चालणे, अति व्यायाम करणे, यासारख्या कामामुळे तुमचे पाय दुखतात. 
 • खेळाडूंना पाय दुखी चा त्रास होऊ शकतो. 
 • आता फॅशनचा जमाना आहे, म्हणून काही स्त्रिया उंच टाचेच्या चप्पल्स पायामध्ये घालतात, त्यामुळे पायाला रक्तभिसरण चा पुरवठा व्यवस्थित न होता, पाय दुखीचे समस्या होतात. 
 • तसेच तुमच्या काम हे जिन्यावरून चढ- उताराचे असेल, तर तुम्हाला दिवसभर चढ-उतार केल्यामुळे, तुमचे पाय दुखण्याची  समस्या असू शकतात. 
 • तसेच वाढत्या वयामध्ये वयस्कर व्यक्तींचे पाय दुखू शकतात. 
 • तसेच लहान मुलांची दिवसभर, मस्ती करून, खेळून पाय दुखू शकतात. 
वाचा  चेरी याचे आपण सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व विविध तोटे :-

पाय दुखी ची लक्षणे? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, पाय कोणत्या कारणांमुळे दुखतात, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. आता त्याची काही लक्षणे जाणून घेऊयात! 

 • ज्यावेळी तुमचे पाय दुखतात, त्यावर पायांना गोळे येतात. 
 • पाय ठणकतात. 
 • अक्षरशः पायांना दाबून धरावे, असे वाटते. 
 • पायांची त्वचा ही लालसर दिसायला लागते. 
 • तसेच काहींचे पाय हे सुजतात. 

पाय दुखत असल्यास, त्यावर काही घरगुती उपाय! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला पाय दुखीची लक्षणे व कारणे सांगितलेले आहेतच, तसेच आता आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

गरम पाण्याचा वापर करा

जर तुमच्या पायाला गोळे येत असतील, पाय दुखत असतील, अशा वेळी जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केलाच, तर तुमच्या पायांना आराम मिळेलच. त्यासाठी तुम्हाला एका मोठ्या  बादली किंवा टब मध्ये, गरम पाणी घ्यायचे, पाणी जास्त गरम नाही, तर नॉर्मल गरम घ्यायचे आहेत. नंतर जाड मिठाचे खडे किंवा सेंदवमिठ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे पाय त्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे धरून ठेवावे. असे केल्याने तुमचे पाय दुखीवर आराम मिळतो, व पायाचे दुखणे लवकर जाण्यास मदत मिळते. 

पाय दुखी वर  उपाय म्हणून निलगिरीचा तेलाचा वापर करा

काही वेळेला पाय इतके ठणकतात, की अक्षरशः , उठता, बसता येत नाही, व चालतानाही त्रास खूप त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही निलगिरी तेलाचा वापर केला, तर तुम्हाला त्याने फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला पाय दुखतात, तेथे निलगिरीचे तेलाने 15 ते 20 मिनिटे चांगली मालिश करायची आहे. त्यानंतर पायाला एक कपडा गुंडाळून ठेवायचा आहे, असे केल्याने तुमचे पाय दुखीवर दुसऱ्या दिवशी त्वरित आराम मिळेल. 

टिप्पणी: पाय दुखीसाठी, मसाज करण्यासाठी जर तुम्ही राईचे तेल, तिळाचे तेल, खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालू शकतो. 

वाचा  पायाचे व्यायाम कोणते व ते केल्यामुळे होणारे शरीराला वेगवेगळे फायदे :-

चप्पल योग्य घ्यावी

आता हल्ली फॅशनची दुनिया आहे, पण पण त्यां फॅशनच्या दुनियेत आपण आपल्याला सोयीस्कर अशी चप्पल वापर करायचा आहे, कारण पायाच्या दुखण्याला, कारणीभूत चप्पलही ठरू शकते. कारण हल्ली उंच टाचेच्या हिल्स मुली, व महिला घालतात, तसेच फॅशनचे बूट हे पुरुष घालतात. त्यामध्ये त्यांच्या पायाची बोटे आखडून जातात, तसेच तेच चप्पल किंवा बूट तासन्तास पायामध्ये राहिले, तर  त्याचा परिणाम त्यांच्या पायावर होतो. त्यामुळे पायांना रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. शिवाय पायांना गोळे येतात, मुंग्या येतात, पाय  ठणकतात. अशा वेळेस जर त्यांनी साधे फ्लॅट व नरम चप्पल वापरले, तर त्यांना फायदा होईल. तसेच ज्यांना पायाच्या त्रास फार काळापासून आहे, तर त्यांनी डॉक्टर चप्पल मिळते, ती चप्पल वापरावेत. त्याने त्यांच्या पायाला आराम मिळेल. शिवाय आता ॲक्युप्रेशर चप्पल सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. त्यासुद्धा घातल्याने त्यांना फरक पडेल. 

झोपतेवेळी पायाखाली उशी घ्या

आपल्या शरीराच्या रक्तप्रवाह आपल्या पायापासून होतो. अशा वेळी जर तुम्ही झोपणार आहेत, त्यावेळी तुमच्या पायाखाली उशी घेतली, तर तुम्हाला पाय दुखीच्या समस्या होत नाही, ज्यावेळी तुम्हाला पायदुखी ची समस्या जाणवत असेल, अशावेळी तुम्ही पायाखाली एक किंवा दोन उशी घेऊन झोपावे, त्याने तुमचे पायांना आराम मिळतो, पाय दुखणे कमी होते. 

पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय म्हणून फिश ऑईल चा वापर करा

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण या समस्येवर तुम्ही फिश ऑइलचा वापर केला, तर तुम्हाला लवकर फायदा मिळेल. कारण त्या तेलात ओमेगा-3 हे असते. त्यामुळे तुमचे पाय दुखी, पायाचे तळवे दुखणे, पायाची पोटरीदुखीचे समस्या असतील, तर त्यासारखे समस्येवर तुम्हाला जलद गतीने आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला फिश ऑइल घेऊन, तुमच्या पायांवर पाच ते दहा मिनिटे त्याने मसाज करायचा आहे, नंतर पायाखाली एक उशी घेऊन झोपायचे आहे, तुम्हाला असे केल्यास त्वरित आराम मिळेल. 

वाचा  स्वप्नात चतुर पक्षी दिसणे शुभ की अशुभ!

पाय दुखी वर आयुर्वेदिक उपाय म्हणून लवंगाचे तेल वापरून बघा

लवंगच्या तेलामध्ये भरपूर गुणधर्म असतात. जे आपल्या शारीरिक तक्रारींना दूर करण्याची क्षमता ठेवते. जर तुम्हाला सांधेदुखी, मांड्या दुखणे, तसेच पाय दुखी, कंबर दुखी, यासारख्या समस्या असतील, तर अशी वेळ जर तुम्ही लवंगचे तेलाने मसाज केला, तर त्यावर तुम्हाला फायदा मिळेल. लवंगाचे तेल हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल. 

वजन कमी करा

ज्या लोकांना सतत पाय दुखी ची समस्या असते, त्यांना कारणीभूत हे त्यांचे वजन असते, कारण आपल्या शरीराचा भार त्यांच्या पायांवर राहतो, अशा  लोकांनी त्यांचे वजन नियंत्रणात आणायला हवेत, त्यांनी रोज हिरव्या पालेभाज्या, फळे व तसेच प्रोटीन युक्त आहार घ्यायला हवा. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात येते, व त्यांना शारीरिक व मानसिक तक्रारी या होत नाही. 

रोज फिरायला जात जा

जर शरीराला आराम असेल, अन त्यांनी कधी तरी चालायचे काम केले, तर त्यांच्या पाय दुखी च्या समस्या फार होतात. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या शरीराला रोज चाल ठेवली, तर त्यांना हा त्रास होत नाही, शिवाय त्यांचे शरीर एकदम फिट व तंदुरुस्त राहते. 

पाय दुखी वर आयुर्वेदिक औषधी

हल्ली मार्केटमध्ये पाय दुखी वर भरपूर क्रीम असतात, जर त्यांचा वापर केला, तर तुम्हाला पाय दुखीचे समस्येवर आराम मिळू शकतो, त्या क्रीम तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन शकतात. तसेच तुम्ही पॅरासिटॅमॉल ही एक गोळी आहे, ती तुम्ही पाय दुखी च्या समस्येवर घेऊ शकतात. त्याने तुम्हाला आराम मिळेल. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पाय कोणत्या कारणामुळे दुखतात, त्याची लक्षणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, जर तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                     धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here