उन्हातून आल्यावर काय करावे आणि काय करू नये

0
913

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हातून आल्यावर काय करावे आणि काय करू नये वर्षातील ऋतू हे किती असतात हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच प्रत्येक ऋतूनुसार वातावरण कसे असते, याविषयी देखील प्रत्येकालाच माहीत असते. ऋतू जर म्हटले तर प्रत्येक देशानुसार ऋतुनुसार वातावरण हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असते. आणि त्यात जर उन्हाळा ऋतु म्हटला तर उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण प्रकारचे वातावरण असते. प्रत्येक ठिकाणानुसार वातावरण हे बदलत जाते. काही ठिकाणी उन्हाळाच्या वेळी उन हे जास्त असते तर काही ठिकाणी कमी प्रमाणात असते. मे महिना सुरू होतच हे जास्त प्रमाणात वाढत असते. खरं तर उन्हाळा हा ऋतू आपल्यासाठी तर खूपच फायदेशीर असतो परंतु या ऋतू मध्ये व्यवस्थित काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागण्याचे प्रमाण देखील भरपूर प्रमाणात घडत असते. जर आपण आपल्या स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर यापासून आपण दूर राहू शकतो. ऋतू कोणताही असो काम करण्यासाठी मात्र घरातून बाहेर पडावे लागत असते. आणि प्रत्येक ऋतूनुसार आपण आपली काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रत्येक ऋतूनुसार कपडे देखील हे वेगवेगळे प्रकारचे असतात. तर उन्हाळ्यात आपण घट्ट कपडे न घालता मोकळे कपडे घालायला हवे. जेणेकरून आपल्याला गर्मी पासून बचाव होऊ शकतो. तसेच कामानिमित्ताने बाहेर जाताना उन्हाळ्यात आपण आपली स्वतःची व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी. तर मित्रांनो उन्हातून घरी आल्यावर देखील आपण आपली स्वतःची व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी. आणि उन्हातून घरी आल्यावर जर आपण आपली व्यवस्थित प्रकारे काळजी न घेतल्यास आपणास त्रास होऊ शकतो. उन्हातून आल्यावर काय करायला हवे व काय करू नये? याविषयी आपल्याला माहिती असायला हवी, तर आज आपण या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, उन्हातून आल्यावर काय करायला हवे व काय करू नये याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी?

   मित्रांनो, उन्हाळा ऋतु आला तर तापमानात खूपच वाढ होत असते. उन्हाळा ऋतूनुसार जर आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली नाही तर आपल्याला याचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम देखील होत असतो. अनेक लोकांना उन्हाळ्याचा त्रास हा खूप प्रमाणात होतो जसे की, अति तापमान वाढीमुळे गरम होत असते तर गरमीमुळे घामोळ्या होणे, काहींना तर उन्हातून घरी आल्यावर चक्कर येण्याचा त्रास देखील होत असतो. काहींना उन्हामुळे त्वचा काळवंडणे याचा देखील त्रास होत असतो. उन्हाळ्यात तापमान एवढे असते की, शरीरातील पाणीदेखील कमी होण्याची शक्यता असते. यालाच आपण डिहायड्रेशन होणे असे म्हणू शकतो. बऱ्याच लोकांना उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असतो. तर अगदी काही लोकांना थकवा देखील जाणवत असतं. उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे त्रास हे लोकांना होत असतात. जर आपण उन्हाळा ऋतू नुसार स्वतःची काळजी घेतली तर या त्रासापासून आपण दूर राहू शकतो.

वाचा  कच्चे दूध चेहऱ्याला लावण्याचे फायदे

        उन्हाळ्यामध्ये आपण आपले शरीर हे डिहाइड्रेट होण्यापासून बचाव करायला हवा. त्यासाठी आपण भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. नारळ पाणी देखील आपण घ्यायला हवे. तसेच आपण लिंबाचे सरबत देखील घेऊ शकतो. बऱ्याच वेळा उन्हाळा लागला म्हणजे लोक फ्रीज मध्ये पाण्याच्या बॉटल्स थंड व्हायला ठेवत असतात. परंतु, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंडगार पाणी पिल्यामुळे देखील भरपूर प्रमाणात त्रास होत असतो. आणि फ्रीज मधील थंड पाणी पिल्यामुळे पाणी पिले असे वाटत नाही. त्यामुळे आपण माठातीलच पाणी प्यायला हवे. उन्हाळ्यामध्ये आपण तंग कपडे न घालता, सुती व मोकळे कपडे घ्यायला हवे. जेणेकरून आपल्याला घामोळ्याचा त्रास होणार नाही. उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना शक्यतो डार्क कलरचे कपडे अजिबात घालू नये. कारण यामुळे बाहेर गेल्यावर ऊन लागण्याची जास्त शक्यता असते. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी तुम्ही फिक्कट रंगाचे अथवा शक्य झाल्यास पांढ-या रंगाचे कपडे घ्यायला हवे. उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करायला हवा. जसे की मोसंबी,द्राक्ष,टरबूज, नारळ पाणी, डाळिंब काकडी इत्यादी.तसेच, कैरीचे पन्हे, लिंबू शरबत, कोकम सरबत, उसाचा रस, आवळ्याचा रस इ. सारखे पेय देखील भरपूर प्रमाणात पिले पाहिजे. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होणार नाही.

उन्हातून आल्यावर काय करायला हवे?

        कामानिमित्ताने आपल्याला बाहेर जावे लागत असते मग, ऋतू हा कोणताही असो काम हे करावेच लागते. त्यात जर उन्हाळा म्हटला तर, बाहेर जाताना उन्हाळ्या नुसार व्यवस्थित काळजी देखील घ्यायला हवी. उन्हाळ्यामुळे उष्माघात होण्याची देखील शक्यता असते. तसेच उन्हात जाताना आपला स्वतःचा बचाव यासाठी आपण योग्य प्रकारची काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधावा नाहीतर टोपी तरी घ्यायला हवी. नाहीतर उन्हाळ्यात बाहेर छत्रीचा देखील वापर करू शकतात. जेणेकरून सूर्यकिरणांपासून स्वतःचा बचाव होऊ शकेल. बऱ्याच वेळा आपल्याला उन्हामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो तर डोकेदुखी होऊ नये यासाठी बाहेर पडताना डोक्याला संरक्षण द्यायला हवे. उन्हात बाहेर जाताना फिकट रंगाचे कपडे घातले पाहिजे. तसेच उन्हातून आल्यावर आपण आपल्या स्वतःची देखील व्यवस्थित प्रकारे काळजी घ्यायला हवी.

  1. उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधील थंड पाणी पिणे शक्यतो टाळायला हवे. उन्हातून घरी आल्यावर थंडगार पाणी पिल्यामुळे जास्त चा त्रास होऊ शकतो. तर उन्हातून आल्यावर शक्यतो तुम्ही दहा मिनिटानंतर माठातीलच पाणी प्यायला हवे.
  2. उन्हातून आल्यावर सर्वप्रथम शांतपणे बसून घ्यावे. उन्हातून आल्यावर दहा ते पंधरा मिनिटे काहीही घ्यायला नको.
  3. उन्हातून आल्यावर शरीराचे तापमान हे वाढलेले असते. त्यामुळे शरीराचे तापमान हे साधारणपणे होण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी आपण द्यायला हवा.
  4. उन्हातून आल्यावर पूर्वीची लोक हे गूळ आणि पाण्याचे सेवन करत असत. यामुळे शरीरातील जास्तीचे तापमान हे कमी होण्यास मदत होत असे. तसेच, शरीरातील थकवा देखील जाण्यास यामुळे मदत होत असे.
  5. त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांनी गूळ पाणी याचे सेवन करायला हवे. जेणेकरून तुमच्या शरीरातील थकवा देखील जाण्यास मदत होईल व तापमान देखील व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकेल.
  6. उन्हातून आल्यावर थोड्या वेळानंतर तुम्ही लिंबू सरबत देखील घेऊ शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील स्फूर्ती मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकेल.
  7. उन्हातून आल्यावर तुम्ही थोड्या वेळानंतर कैरीचे पन्हे देखील घेऊ शकतात. यामुळे देखील तुमच्या शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.
  8. उन्हातून आल्यावर आपण काही काळाने धने-जिरे आणि बडीशेप मिश्रित पाण्याचे सेवन देखील करू शकतो.
  9. उन्हातून आल्यावर बऱ्याच जणांचा चेहरा हा काळवंडत असतो. तरी यासाठी तुम्ही उन्हातून आल्यावर काही वेळानंतर चेहऱ्यावर लिंबू, दही, बेसन पीठ मिश्रित फेस मास्क लावू शकतात. जेणेकरून, चेहर्यावरील काळपट त्वचा निघून जाण्यास मदत होईल.
वाचा  गरोदर आहे हे किती दिवसात कळते

उन्हातून आल्यावर काय करायला हवे याविषयी आठवणीप्रमाणे जाणून घेतले आहे. तसेच उन्हातून आल्यावर कुठल्याही थंडगार पेय लगेच पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही हे टाळायला हवे. उन्हातून आल्यावर तुम्ही काय करायला नको याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

उन्हातून आल्यावर काय करू नये?

 मित्रांनो, उन्हाळा म्हटला की तापमानात वाढ ही होणारच. तसेच, उन्हाळ्या नुसार आपण आपल्या स्वतःची काळजी घेणे हे देखील आवश्यक ठरत असते. बऱ्याच व्यक्‍तींना उन्हाळ्यात खूप प्रकारचा त्रास होत असतो. तर काहींना उन्हाळ्यात चक्कर येणे शरिराचे डिहायड्रेशन होणे डोकेदुखीचा त्रास वगैरे इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. तर उन्हातून आल्यावर देखील आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा त्रास होणार नाही. उन्हातून आल्यावर काय करू नये याविषयी आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • उन्हातून आल्यावर लगेच एसी ऑन करू नये.
  • उन्हातून घरी आल्यावर लगेच बाथरूम मध्ये थंड पाण्याने आंघोळ करू नये यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.
  • उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधील थंडगार पाणी प्यायला नको. कारण उन्हातून आल्यावर आधीच शरीरातील तापमान हे वाढलेले असते. म्हणून आल्या आल्या लगेच थंडगार पेय जसे की फ्रिजमधील थंड पाणी, कोड्रिंक्स इत्यादी घेऊ नये.
  • उन्हातून आल्यावर लगेच जेवण करायला बसू नये. दहा-पंधरा मिनिटं शांतपणे बसून घ्यावे आणि त्या नंतर हात पाय स्वच्छ धुवून मग जेवण करायला हरकत नाही.
  • उन्हातून आल्यावर लगेच आइस्क्रीम खाऊ नये. कारण उन्हातून आल्यावर शरीराचे तापमान वाढलेले असते आणि त्यात जर थंड मिक्स केले तर त्याने शरीराला त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, उन्हातून आल्यावर काय करू नये? आपली स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी या विषयी आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या उन्हातून आल्यावर लगेच करू नये. नाहीतर याचा त्रास हा आपल्या शरीराला होत असतो. म्हणून आपण स्वतःची उन्हाळ्याच्या दिवसात जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ तितके आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वाचा  ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

       मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

लाल केळी खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here